Рет қаралды 42,625
पुण्यात सकाळी नाश्त्याला मटार उसळ खाण्यासाठी अनेक पुणेकर ठरलेल्या ठिकाणी जातात. पुणेकरांच्या या ठरलेल्या ठिकाणांमध्ये टिळक स्मारक मंदिराजवळ उभ्या असणाऱ्या मधुच्या गाडीचा नंबर वरचा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून लांब लांब वरून अनेक खवय्ये मटार उसळ खाण्यासाठी या गाडीवर येतात. काही वर्षांपूर्वी या गाडीचे मूळचे मालक मधुकर शानभाग यांचे निधन झाले. त्यानंतर आता त्याच्या जुन्या ओळखीतील सुमीत तापकीर आणि अविनाश मोरे हे बंधू ही गाडी चालवतात. त्यांनी मधुच्या गाडीवर मिळणाऱ्या पदार्थांची चव जपली आहे. येथे नित्यनेमाने येणाऱ्या ग्राहकांशी मधूप्रमाणे या बंधूंनीही आपुलकीचे नाते तयार केले आहे. फूडी आशिषने यावेळी मधुच्या गाडीला भेट देऊन तेथील मटार उसळ आणि कांदा भजीची चव चाखली. तुम्हाला या गाडीची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की बघा.
maharashtrian recipes,usal recipe,marathi padarth,vatana usal,watana usal,green peas curry recipe,vatanyachi usal,maharashtrian padarth,matar usal marathi recipe,हिरवा वाटाणा उसळ,how to make usal,hirva watana usal recipe,usal misal recipes,maharashtrian recipes in marathi,maharashtrian usal recipe,marathi recipe