madam mi rajyaseva made Marathi litrechure subject gheto ahe tr tumi mala help karsal la poem made
@akashaykadam53233 жыл бұрын
मॅडम मला विशाखा या कवितासंग्रह मधील सर्व कवितांचा अर्थ हवा आहे
@Granthyatra3 жыл бұрын
ग्रंथयात्रा उपक्रम पूर्ण झाल्यावर चर्चा करू
@dipaliainapure64068 ай бұрын
@@Granthyatraहो, मलाही अर्थ समजावून घ्यावयाचा आहे.
@DrAnilJoshi3 жыл бұрын
अहि-नकुल ही कविता वर्गसंघर्षाचे प्रतिक आहे हे फारसे पटले नाही .
@Granthyatra3 жыл бұрын
समीक्षकांनी असे प्रतिपादन केले आहे. पण कवितेची हीच तर खुबी असते, की प्रत्येकाला; इतकेच नव्हे तर प्रत्येक वाचनात, आपल्याला वेगळा अर्थ सापडू शकतो.
@DrAnilJoshi3 жыл бұрын
कुसुमाग्रजांचा विशाखा हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता काव्यसंग्रह १९४४ साली प्रसिद्ध झाला . वि स खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे.या प्रस्तावनेत ला त्यांनी अर्घ्यदान म्हटले आहे. ती मुळातून वाचण्यासारखी आहे.कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांनी “विशाखा” हे नाव का दिले असावे? विशाखा हे १६ वे नक्षत्र. हे तूळ राशीत येते. तूळ म्हणजे तुला. तराजू ला जशी दोन पारडी असतात तश्या विशाखा नक्षत्राच्या दोन चांदण्या असतात. विशाखा ही दक्ष राजाची कन्या. कवितासंग्रहाच्या नावांची निवड करत असताना हे ऐतिहासिक, खगोलशास्त्रीय, किंवा पौराणिक संकेत कुसुमाग्रजांच्या समोर होते का ? हे कोणा व्यक्तीचे नाव आहे का? माहित नाही. शिवाय या नावाची या कवितासंग्रहात कविताही नाही.नक्षत्र क्रमांमध्ये विशाखा नक्षत्रानंतर अनुराधा हे नक्षत्र येते. त्यामुळे विशाखा म्हणजे राधा. हा अर्थ गृहीत धरला तरी संग्रहातल्या कवितांचे विषय व हा अर्थ यांचा सहज संबंध प्रस्तावित वा प्रस्थापित करणे तसे अवघड आहे. विशाखा नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याला उंदर्या असे म्हणतात .या पावसामुळे उंदीर, सापआणि काही विषारी वनस्पती इत्यादी निर्माण होतात असे समजले जाते. मागून येणाऱ्या अनुराधा नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याला मांजर्या असे म्हणतात. उंदर्यानी केलेला उत्पात हा मांजऱ्या संपवतो अशी धारणा आहे.अर्थात ही सारी अवांतर व काहीशी निरर्थक माहिती व चर्चा झाली. काव्यसंग्रहाच्या नावाशी त्याचा अजिबात संबंध नाही. एका मानवतेच्या कवीचे नक्षत्राप्रमाणे तेज:पुंज स्फुरण म्हणजे ही विशाखा असा अर्थ सध्या काढून पुढे जाऊयात आणि याबाबत तज्ञ व जाणकार काय सांगतात त्याची वाट पाहूयात .
@Granthyatra3 жыл бұрын
तुमचे निरीक्षण बरोबर आहे. यावर काही माहिती उपलब्ध असेल तर तज्ञांनी सांगावी.
@shrikantbhatkar50133 жыл бұрын
mam,when u will tk abt C.T. khanolkar?he deserve Nobel; nt less anything else
@Granthyatra3 жыл бұрын
We are going chronologically. His writings belong to a later date.