Рет қаралды 41,879
#BolBhidu #DeepSeekVsChatGPT #AI
चीननं बनवलेलं डीपसीक अँप सिलिकॉन व्हॅलीसाठी वेक अप कॉल आहे", अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा आहे. चीनचं डीपसीक एआय हे ओपन एआय सारख्या कंपन्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचंच ट्रम्प यांनी आपल्या या विधानातून सुचवल्याचं दिसून येतं. २० जानेवारीला डीपसीक लॅब या चायनिज कंपनीनं डीपसीक R1 एआय हे लेटेस्ट अपडेट लाँच केलं. ज्यानंतर अमेरिकन शेअर मार्केटला मोठा हादरा बसल्याचं पहायला मिळालं. या डीपसीक एआय मुळं गुगल, मायक्रोसॉफ्ट, nvidia सारख्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच आपटले. डीपसीकमुळे एआय टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या एनव्हाडियाचे शेअर्स १३ टक्क्यांनी घसरले. तर कंपनीची व्हॅल्यू सुमारे ४६५ अब्ज डॉलर्सनी घसरली.
डीपसीकमुळे चॅट जीपीटी या लोकप्रिय एआय टूलचं मार्केट देखील डाऊन झालं आहे. डीपसीक अॅपनं अमेरिकेत अवघ्या ७ दिवसांत डाऊनलोड्सचा नवा विक्रम केलाय. या अॅपनं अॅपल स्टोअरवर डाऊनलोड्सच्या बाबतीत अमेरिका, युके, कॅनडा, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये चॅट जिपीटीला मागे टाकलंय. आता प्रश्न हा आहे की, जगभरात धुमाकुळ घालत असलेलं हे डीपसीक अॅप खरंच चॅट जीपीटीपेक्षा चांगलं आहे का? डीपसीक आणि चॅट जीपीटी या दोन लोकप्रिय एआय अॅप्समध्ये नेमका फरक काय? तुमच्यासाठी कोणतं अॅप वापरणं योग्य असेल? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/