कसं जगावं ह्याचा वस्तुपाठ म्हणजे आजची मुलाखत, कसलाही अभिनिवेश नाही,शांतपणे हसतमुख चेहर्याने दिलेली एक संयत आणि 'खरी' मुलाखत ,उगीचच इंग्रजीचा आधार नाही किंवा क्लिष्ट मराठी पण नाही खूप आवडली Thank You Sulekha
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@suneetagadre552 жыл бұрын
६०- ६५ वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करणारे सावरकर ८७ वर्षांचे तरूण.. त्यांनी सांगितलेले अनुभव हा एक सामाजिक इतिहास आहे.. किती बदल बघितले आहेत यांनी. किती पिढ्या बदलल्या आहेत. किती प्रेरणा देणारे आहे. परमेश्वर अण्णांना निरामय आरोग्य देवो आणि १०० वा वाढदिवस साजरा होवो ही हार्दिक शुभेच्छा.
@prachishinde52872 жыл бұрын
सुलेखा ताई तुमचे दिल के करीब जणू काही एक पुस्तकच आहे , प्रत्येक शनिवारी आम्ही एक एक पान ऊघडतो आणि प्रत्येक वेळेस त्यातून काही नां काही शिकायलाच मिळते. तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहोत.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@baalah72 жыл бұрын
खूप छान व्यक्त केले 🙌🏽
@yogeshkokate46762 жыл бұрын
Good
@exploreandadore2 жыл бұрын
@Prachi Shinde-agdi khara aahe…. Anubhav samrudhdha show aahe @Sulekha- manapaasun thank you ha show suru kelyabaddal
@pranjalalimaye16172 жыл бұрын
Kharay...thanks
@अश्विनी_विद्या_विनय_भालेराव2 жыл бұрын
बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होतेय... अण्णा तुम्हाला आणि तुमच्यातल्या प्रतिभा संपन्न कलाकाराला वंदन 🙏
@simplyshweta182 жыл бұрын
KZbin ने लवकरच like button बरोबर heart button ची पण सोय करावी, किती सूंदर, guiding आणि inspiring मुलाखत. सावरकर आजोबांसारखी व्यक्ती अशी समोर बोलताना दिसली तरी आपण आयुष्यात खूप काही करू शकतो साधी राहणी ठेवून या गोष्टीवर विश्वास बसतो. त्यांना साष्टांग नमस्कार आणि तुम्हाला खूप धन्यवाद🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
अरे वा, छान वाटलं वाचून...आभार
@dhanashreephadke342 жыл бұрын
वाह... एकदम मस्त सुरेख सरप्राइज. सुलेखा ताई तुझे अणि तुझ्या टीम चे चॉईस म्हणजे समुद्रातून एक एक अप्रतिम मोतीच जणू..... जयंत सावरकरांनी त्यांच्या उमर चा राज इतका मस्त सांगितला...किती processed ani चांगल्या सवाई म्हणून इतका चांगला आरोग्य आणि किती enthusiasm...ani struggle ani कष्ट हे किती सरळ अणि साध्या शब्दात सांगितलं...आजकाल इतका साधेपणा नाही पाहायला मिळत...
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
खरं आहे, धन्यवाद
@vaidehivaze51272 жыл бұрын
ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रतिभा वान कलाकार श्रीयुत अण्णांना आज ऐकावयास मिळाले हे आमचं भाग्य , अतिशय छान मुलाखत, अशा कलाकारांस माझा सादर प्रणाम, सुलेखा तुमचे खूप धन्यवाद तुमच्या मुले आज हा योग आला
@kirtigaidhani13462 жыл бұрын
अरे वाह.... इच्छा पूर्ण झाली अशा लोकांची मनोगत ऐकण्यासाठी कान आतुरलेलं असतात. Thank you सुलेखा ताई... 💐
@sumatipainarkar40692 жыл бұрын
ज्येष्ठ श्रेष्ठ आणि प्रतिभावंत कलाकाराची वास्तव कहाणी ऐकून खूप छान वाटलं .त्यांचा सहजसुंदर अभिनय खूप वर्ष बघतोय .ते स्वतःच्या प्रकृतीची काळजी उत्तमपणे घेताहेत त्यांचा आदर्श जरूर घ्यावा .त्यांना उदंड आयुष्य लाभो
@WorldPeaceandLove2 жыл бұрын
सुलेखा मला तुझा हा कार्यक्रम खूप खूप आवडतो. मी स्वयंपाक बनवताना हा कार्यक्रम नित्य पाहते. तुझ्या मुळे माझा माझ्या भाषेशी महाराष्ट्राशी संबंध आहे. मला मराठी इतकी गोड वाटते ऐकायला तुला काय सांगू. आणि तुझ्या कार्यक्रमात आलेले पाहुणे अगदी माझ्या घरी आले आहेत आणि माझ्याशी गप्पा मारत आहेत असे वाटते. तू खूप सुंदर मुलाखत घेतेस. हा उपक्रम असाच सुरू ठेव. खूप खूप शुभेच्छा
@kirankunte59252 жыл бұрын
Probably this is the Youngest of the Personalities who are on Dil Ke Kareeb so far. His Energy and Enthusiasm and his Experiences of career over 5 decades must be very resourceful. Thanks Sulekha jee for this.. Waiting eagerly..
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Yes, true.....Always welcome....do watch!
@sandhyaakerkar13762 жыл бұрын
सुलेखाताई, आजचा तुमचा एपीसोड मस्तच. जयंत सावरकर (अण्णा) सारख्या ज्येष्ठ अभिनेत्याची मुलाखत ऐकणे--बघणे ही एक पर्वणीच होय. एका सन्मानीय मराठी अभिनेत्याचा जीवनपट ऐकायला मिळणे हे आमचे भाग्यच होय. आणि हे तुमच्या मुळे शक्य झाले. खूप खूप धन्यवाद. अण्णांच्या 87व्या वर्षि ही त्यांची एवढी निरोगी, तंदुरुस्त प्रकृती असण्याचे त्यांनी जी 3-4 रहस्ये सांगितली, त्याला तर तोडच नाही. मानले त्यांना. एकंदरीत मुलाखत छानच झाली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अण्णांना त्यांच्या निरोगी, आरोग्यसंपन्न वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐🌹👍👍🎉🎊
@poorvapethe64532 жыл бұрын
अतिशय ज्येष्ठ, प्रतिभावंत आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले अण्णा! सुलेखा ताई....ह्या दिलखुलास मुलाखतीसाठी मन:पूर्वक आभार!😊🙏
@mangalasant52462 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत..या वयात सलग बोलत होते..परत मी कोणीतरी आहे हा भाव नाही मन प्रसन्न झाले..शक्ती मिळाली..याला जीवन ऐसे नाव
@prasadkulkarni65822 жыл бұрын
सुलेखा ताई, किती कौतुक करावं तुझं, तू एक एक सोनेरी पान आणतेस आमच्यासाठी. संवादातील एक न एक शब्द ऐकण्यासारखा. Commitment, Respect याची जवळन ओळख. "मोठेपण पदरात येत गेलं ज्याची मला सवय नव्हती" हे सगळयात जास्त स्पर्शून गेलं मनाला.👌
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@sampadakulkarni76502 жыл бұрын
Great person .
@shailajadeshmukh53852 жыл бұрын
जयंत सावरकर काका हे खूप अनुभवी व आदर्श व्यक्तिमत्व आहे. प्रथम त्यांस नमस्कार, मुलाखतीतून खूप गोष्टींचा त्यांच्या बाबतीतल्या समजल्या कलाकारांच वैयक्तिक आयुष्यात थोडं डोकवायला मिळालं आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्यात.आयुष्यात स्थिर व शांत कसं राहावं.सुलेखा खूप खूप धन्यवाद 🙏🌹🌹
@anaghapabalkar59442 жыл бұрын
सुलेखा, तुझे खूप खूप आभार🙏 सुखाची परीमाणं जी अण्णांनी सांगीतली, ती अगदी बरोबर आहेत🙏 अण्णांसारख्या लोकांना जे ‘ समाधान’ मिळालयं, ते हल्ली च्या लोकांनी कोट्यावधी रूपये कमवून पण मिळेल की नाही शंका आहे.. जे मिळालं त्यात समाधान मानणे..कशाचाही हव्यास न धरणे.. व आपल्या जगण्यातून एकप्रकारचा ‘ आदर्श’ लोकांसमोर ठेवणे..अण्णांच हे काम, त्यांना आपल्या दिल के करीब घेऊन जातं.. तुमच्या दीर्घायुषासाठी खूप शुभेच्छा🙏
@hrushikeshjoshi21472 жыл бұрын
ह्या सर्व मुलाखती खूप आनंद देऊन जातात. त्यामुळे ह्याचं एक पुस्तक प्रकाशित करावं ही एक छोटीशी विनंती प्रेक्षक म्हणून.
@shilpakulkarni77522 жыл бұрын
अत्यंत साधा स्वभाव, साधी राहाणी, परिस्थिती आणि कष्ट यांचा सामना करत मिळवलेले यश, सगळ्यासाठी सगळ्यांच्यासाठी कृतज्ज्ञतेने भरलेले समृद्ध जीवन. 🙏🙏. अत्यंत सुंदर मुलाखत. अण्णाना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सुलेखा. 👍
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@manjirikhambete88912 жыл бұрын
सुलेखा तुमचा हा कार्यक्रम पहायला आम्ही खूप आतूर असतो, खरोखरच उत्तम कार्यक्रम करता तुम्ही व तुमची पूर्ण टिम, खूप खूप आभार
@archanajoshi43762 жыл бұрын
Very true
@aditioak26832 жыл бұрын
अरे व्वा...खूपच छान...ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा खूप मोठे, सन्माननीय, आदरणीय व्यक्तिमत्व भेटायला येणार याचा खूप आनंद होत आहे.. सुलेखा ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...अशीच छान छान माणसं आम्हाला भेटवता त्याबद्दल.. 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@VasuudhasKitchen2 жыл бұрын
किती छान ऐकतच रहावे असे . जयंत सावरकर म्हणजे आपल्या घरातील आजोबा किंवा बाबा असतात तसे वाटते. त्यांचे अनुभव ऐकत रहावे असे वाटते. त्यांनी आमच्या कणकवलीचा उल्लेख केला. नेहमीप्रमाणेच छान झाली मुलाखत.
@jyotibhave60012 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत. अतिशय साधे, सरळ, आणि खरा माणूस. आता अशी माणसं फार कमी बघायला ऐकायला मिळतात. त्यांना शत शत प्रणाम 🙏🙏
@varshanirkhe61162 жыл бұрын
खूपचअविस्मरणीय मुलाखत. त्यांच्या अनुभवाने ते इतरांना खूपच समृध्द करतात. या पिढीने घेतलेले अनुभव आम्हाला खुप काही शिकवून जातात. साधी सरळ रहाणी. जयंत सावरकरांना माझा साष्टांग नमस्कार 🙏 सुलेखा ताई तुमच्या सर्वच मुलाखती खूपच छान. दरवेळी उत्सुकता असते यावेळी कोण असेल याची. तुमच्या सर्वच टीमचे मनापासून आभार 🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आमच्या टीमकडून धन्यवाद...
@baalah72 жыл бұрын
*Pearls of Wisdom - filled with lifetime of experience, elegance and much effort* 🙌🏽
@smitaadval51372 жыл бұрын
खूप आवडली मुलाखत. ऐकत राहावे आणि कधी संपूच नये असे वाटत होते. अण्णा सुद्धा अजून बोलत राहिले असते असे वाटले.
@urmilaapte98532 жыл бұрын
सावरकर महोदय, आपण आयुष्यभर घेतलेले कष्ट, त्यात मानलेलं सुख हे आम्हां पुढे मांडलंत ते फार फार बरं झालं...... आपल्याला आदरपूर्वक नमन 😌🙏
@viijayrajcreations78472 жыл бұрын
वाह,,खुपच मस्त,,आणी अनुभवी कलाकार...(अण्णा) आज यांचे मनोगत ऐकुन खरचं धन्य झालो..🙏🙏🙏🙏
@vandanaranade44482 жыл бұрын
सुलेखा तळवलकर तुमचे खूप खूप आभार.असे कलाकार बघण्याबरोबर ऐकणे हे किती आनंदाचं आहे हे आज अनुभवलं.ष आणि श मधला फरक आजच्या पिढीला माहिती नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी आठ वर्षांची नात अमेरिकेत असते . ती तिथे मराठी शाळेतही जाते.सध्या ती इकडे आली आहे.काल ती प्रवास वर्णन लिहित होती तेंव्हा तिने श आणि ष यांचा उच्चार वेगवेगळा करून मग शब्द लिहिला.महाराष्ट्रातील मराठी शाळेत हे शिकवतात की नाही माहित नाही
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
अरे वा! तिचं मनःपूर्वक अभिनंदन आणि तिला मराठी शिकायला प्रोत्साहन देणाऱ्या आई-वडिलांचे आभार. इथेही शिकवतात, पण ते घेणारे - न-घेणारे सगळीकडेच असतात.
@shwetaghag81292 жыл бұрын
नमस्कार सर नमस्कार सुलेखा मॅडम माझे वडील ठाण्याला bethany hospital मध्ये ऍडमिट होते... तिकडे तुम्हाला मी बघितलं होत...hat घातली होती तुम्ही....मी ओळखलं होत तुम्हाला पण माझी हिम्मत झाली नाही बोलायची...पण तुम्हाला बघितलं हेच खूप होत माझ्या साठी...तुमचं ज्ञान आणि तुमचे अनुभव ऐकून खूप भरून पावलो आम्ही...तुमच्या सारख्या लोकांकडून तुमचे अनुभव ऐकण म्हणजे निव्वळ पर्वणी...अगदी मस्त वाटलं ऐकून...याचं सगळं श्रेय सुलेखा मॅडम ना आहे...तुम्ही तर खूप लकी आहात की तुम्ही समोरासमोर मुलाखत घेता आणि आम्ही सुद्धा लकी आहोत...की अशा दिग्गज व्यक्तीला आपल्याला ऐकायला मिळत...खूप खूप धन्यवाद... 🌹🙏🏻🌹
@anjaligadgil95242 жыл бұрын
दिल के करिब टीम आणि सुलेखा ताई चे मनापासून आभार. कलेसाठी झोकून देणं, त्यासाठी प्रामाणिक असणं, आयुष्यात शिस्त बाळगणं आणि कुठलंही काम हे लहान अथवा मोठं असं काही नसतं....यश, अपयश, याच्या पलीकडे असलेल्या श्री. सावरकर नानांना आणि त्या पिढीला साष्टांग दंडवत. प्रत्येक वेळी कोण पाहुणे असतील याची उत्सुकतेने वाट पहात असतो यात खूपच मजा वाटते.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@radhikakulkarni61742 жыл бұрын
सुलेखा मम् किती सुंदर जयंत सावरकर म्हणचे असंख्य अनुभवाचा झरा च आहेत ...आणि तुमच्या माध्यमातून आम्हला त्यांना अनुभवता येत खूप खूप धन्यवाद... आम्हला इच्छा असूनही अश्या सगळयांना नाही भेटता येत पण दिल के करिब पाहिलं की वाटत आपण त्यांना प्रत्यक्ष भेटलो ....हा कार्यक्रम चालूच राहो आम्ही खरच नवीन एपिसोड ची वाट अगदी आतुरतेने पाहतो .....
@gaurikinikar33782 жыл бұрын
खरचं फार छान झाली मुलाखत आणि जयंत सरांबद्दल काय बोलणार फक्त मनापासून वंदन आणि हॅट्स ऑफ...आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई🙏
@rashmichawan92672 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सुलेखा.... can't express in words 👏👏👏 amazing n respectable person.... 👏👏me n my daughter regularly follow his serial ' तुमची मुलगी....' जबरदस्त माणूस.... Thank u Sulekha once again 👏😀
@shaileshpadyal49142 жыл бұрын
नाटक आणि सिनश्रुष्टी चा प्रदीर्घ अनुभव असलेले जयंत सावरकर यांचं खूप छान व्यक्तिमत्व ऐकायला मिळालं ते फक्त तुमच्या मुळे सुलेखा ताई .. तुम्ही मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त बोलू देता हा तुमचा गुण खूपच चांगला वाटतो... 1:30 तासाच्या मुलाखती मध्ये तुम्ही बोटावर मोजण्या इतकेच प्रश्न विचारलेत आणि अण्णांना जास्तीत जास्त बोलू दिलंत... 👌👌👏👏👍
@3aruna2 жыл бұрын
खूप अप्रतिम interview अगदी पुन्हा पुन्हा ऐकावा असा .खूप धन्यवाद सुलेखा ताई की तुला यांचा Interview घ्यायचं सुचलं ...❤️
@archanadhumma7591 Жыл бұрын
Such a senior, respectful actor 🙏 gem of Marathi industry 🤗 ....May dil ke kareeb become no 1 channel on KZbin n break all the records of viewership. Thank you ❤️
@virendradeosthalee17932 жыл бұрын
किती soft spoken व्यक्ति आहेत. साधी रहाणी, शिस्तबद्ध स्वभाव....कितीतरी शिकण्यासारखं आहे
@sushantparab13772 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली.या वयातही अण्णाचा उत्साह व मराठी भाषे वरील पभुत्व पाहून अचंबित व्हावयास झाले. त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आज ताई तुमच्या मुळे इतक्या छान वक्तीमत्वाशी ओळख झाली.त्यासाठी खूप खूप आभार...धन्यवाद.🙂💐🙏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@rashmidanait29382 жыл бұрын
फारच सुरेख.... आयुष्य कसं जगल पाहिजे... नेहमी सकारात्मक राहून तडजोडीलाही सहज घेत अनुभवांनी समृद्ध होत कसं पुढे जात राहायचे हे अतिशय उत्तमरित्या समजून आले.अशा माणसं आदरणीय व प्रेरणादायी वाटतात....खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@msp13dec2 жыл бұрын
दिलके करीब चा सर्वात प्रेक्षणीय आणि श्रवणीय असा हा भाग..... 🙏
@anukatyare Жыл бұрын
नतमस्तक व्हायला होत अशा लोकांच्या आयुष्यात डोकावून बघितलं की! धन्यवाद सुलेखा. तुमच्या माध्यमातून जयंत सावरकरांसर्ख्या ज्येष्ठ रंगकर्मीची ओळख झाली. आयुष्याबद्दल किती कृतज्ञ आणि समाधानीआहेत जयंत सावरकर! आता त्यांचे सिनेमे शोधून बघते!
@manishadesai73032 жыл бұрын
खूप छान मुलाखत, आणि अण्णा खुप सुखी आहेत हे ऐकुन खुप बरं वाटलं, चांगली माणसे सुखातच असावीत असे मला नेहमी वाटते,खुप छान वाटले
@urmilaapte98532 жыл бұрын
Wow !!! धन्यवाद सुलेखा जी !!! मला आत्ता माझ्या एका अमेरिकेतील मित्रांनी सांगितलं की उर्मिलाताई तुमचं पुस्तक दिलं ; अन् मी कार्यक्रम पहात आहे नॉर्वे मधील OSLO येथून 😘😀😎🤩 😍..... ज्येष्ठ अभिनेते जयंत जी सावरकर यांना सादर नमस्कार 😊🙏 ...... मी ही गेली 30 वर्षे आयुर्वेदाची अनुयायी (follower) आहे.माझी आई आयुर्वेदिक डॉ.(वैद्य) आहे. 😊👍 जयंत जी , भारताच्या लिजेंडरी सुरबहार वादक माँ अन्नपूर्णदेवी यांचं चरित्र अनुवादित करून मराठीत प्रसिद्ध करण्याचा एक लहानसा प्रयत्न केलाय ; आपण जरूर वाचावे ही विनंती😊🙏 ....
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@vandanamhatre60572 жыл бұрын
खरं आहे ताई तेव्हाचे दिवस कष्ट दायक होते.पण फार आनंद दाई होते.👌🙏
@ashwinijoshi56612 жыл бұрын
सुलेखा तुझा हा programme मी पहील्या भागापासुन पाहीला आहे. अतिशय सुंदर मुलाखत घेतेस तु. Upcoming एपिसोड ची मी आतुरतेने वाट पाहात असते.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
यामुळेच तर कामाचा उत्साह वाढतो, धन्यवाद
@davidsling85402 жыл бұрын
अण्णा सावरकर यांचं जीवन म्हणजे "व्याकरणातील सर्वनाम चा प्रकार " व्यक्ती म्हणून....पुरुषवाचक, निष्ठा म्हणजे....निश्चय वाचक कारकीर्द म्हणजे...अनिश्चय वाचक व्यवहार म्हणजे.....संबंध वाचक उत्पन्न म्हणजे....प्रश्न वाचक सुंदर आणि पवित्र मुलाखत...... Bravo....
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
फारच सुंदर...आभार
@gaurideshmukh35372 жыл бұрын
Kiti aai ani kiti nako ase zale hote hee mulakhat aaikatana. Kiti sadhe,saral,sahishnu vyaktimatva!!! Kaay udanda anubhav aahe tyanchyapashi. Sulekha, kharach khup khup abhar aahet tuze.👍🏻👍🏻🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@prachisathe76562 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत..या वयातही सगळ्यांची नाव,साल,ठिकाणं सगळं आठवणीत आहे…खूप सुंदर मुलाखत..प्रत्येक आठवड्यात मेजवानी मिळते.सुलेखा तू समोरच्याला बोलायची मोकळीक देतेस ती खूप चांगली कॅालिटी आहे
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@dhanashreegiranje77472 жыл бұрын
प्रथम सुलेखा तुझे आभार खुप छान👏झाली मुलाखत एवढे वर्ष काम केले यांनी तरीही कोणा बद्दल कटुता नाही नवीन कलाकारांना नावं ठेवण नाही यामुळे ही एवढी मोठी आहेत तुझे आभार यासाठी की तु त्यांना भरभरून बोलु दिलेस तु जेमतेम चार ते पाच वेळाच प्रश्न ❓ विचारले त्यामुळे मुलाखत रंगतदार झाली मनापासून आभार🙏💕
@anjalipathak78852 жыл бұрын
श्री अण्णांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. सुलेखा अभिनंदन आणि शुभेच्छा.
@smrutiathalye78002 жыл бұрын
सुलेखाजी आपले खूप खूप धन्यवाद. अण्णांसारख्या अनुभव संपन्न आणि अभिनय संपन्न व्यक्तींकडून त्यांचे आयुष्यातील अनुभव आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यातून सर्वसामान्यांना शिकण्यासारखे खूप काही आहे. शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण. धन्यवाद🙏👏👏
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@mrunaljoshi75062 жыл бұрын
खूप छान मुलाखत. एका जेष्ठ कलाकाराला तुम्ही कार्यक्रमात बोलावले, त्यामुळे कार्यक्रमाचा दर्जा खरंच आणखीन उंचावला. 👍 'दिल के करीब' टीमचे अभिनंदन 💐💐 श्री.जयंत सावरकर प्रेक्षकांना खूप जुन्या नाटकांच्या काळात घेऊन गेले.
@shivanandhattargi23242 жыл бұрын
८७ व्या वर्षी सुद्धा सगळ्या कलाकारांची नावे, प्रसंग त्यांनी सांगितले. खुप छान मुलाखत झाली.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@shivanandhattargi23242 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखाजी, आण्णाची मुलाखत एका श्रोत्याच्या (नाव विसरलो) विनंतीवर घेतल्याचे सुरुवातीस बोललात. अशीच विनंती २ ते ३ वेळा मी तुमच्या इंन्स्टावर केली आहे, ती म्हणजे कै. विनयजी आपटे यांच्याबद्दल खूप चांगले बोलणा-या जसे सुकन्याजी, मुक्ताजी, सुनिल बर्वे इ.सोबत एकत्र विनयजीसंदर्भात एक मुलाखत घेण्याबद्दल लिहीले आहे. कृपया, विचार करा.
@suhasinisatam79522 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा🙏😘 दोघांना। शब्द नाही बोलायला इतक्या चांगल्या व्यक्तींची भेट घडली। धन्यवाद। खुप छान छान गोष्टी एैकायला मिळाले। सारख ऐकत राहावंसं वाटते।
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@vandanasawakare81172 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत..अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपला जीवनपट सांगितला..असे खरेपणा आता दुर्मिळ झाला आहे. खूप छान.
@ashwini12922 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत!!...खूप काही शिकण्यासारखे ऐकायला मिळाले.खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@jaytav0012 жыл бұрын
The veteran actor. A lot to learn from him. Thanks you so much for taking us through this amazing journey. 👌 Keep it up Dil ke karib. 👍
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
thanks
@mylifemyrule68412 жыл бұрын
Treat to listen him...अनुभवाचा खजिना Thanks Jayanta Kaka ani sulekha tai
@ushakshirsagar34662 жыл бұрын
जयंत सावरकर यांच्या खणखणीत आवाज खूप जास्त भावतो तुझे आहे तुज पाशी आणि असा मी असा मी या नाटकांमधील भुमिका तसेच इतर ही अनेक चित्रपट, नाटकं, मालिका यांमधील सुंदर भुमिका....! खूप धन्यवाद सुलू दीदी....
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@vidyabhide1008 Жыл бұрын
सुलेखा ताई खूप छान interview होता हा असे बरेच interview मी ऐकते पहाते पण आज नेसलेले साडी खूप वेगळी वाटली व आवडली कुठून घेतली .
@adsuper1002 жыл бұрын
पर्वणी, दुसरा शब्दच नाही. सुलेखाताई तुमचे अगणित आभार आणि अभिनंदन, जयंत सावरकरांन शतशः प्रणाम आणि अभिवादन!! 🙏👍💐🌹
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@medhabharadwaj21062 жыл бұрын
आण्णा,या वयातील तुमच्या उत्साहाला सलाम 🙏🙏
@asmitabapat83392 жыл бұрын
जुने अनुभव, माहिती ची नावे हे या आमच्या वयातील श्रोत्यांना आनंददायी आहे.या जेष्ठ कलावंताना ऐकताना,त्यांचे सकारात्मक विचार सामान्य माणसांना प्रेरक आहेत.
@spp47082 жыл бұрын
मी आज ६० च्या उंबरठयावर आहे... माझे वडील आज असते तर जयंतकाकांच्या वयाचे असते... जयंतकाका म्हणाले की त्यांची पिढी तेव्हाच्या परिस्थिती पण समाधानी व आनंदी होतो.... माझी आजी नेहेमी म्हणायची की हल्लीची पिढी म्हणजे तीची पंतवंड ( आमची मुलं) त्यांना दिसत म्हणून मागतात... ती म्हणायची तीच्या लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी दिसतच नव्हत्या .. बहुतांश लोक समाधानी होते.... जयंतकाका व त्या पिढीला शत शत नमन 🙏🙏🙏🙏
@sushrutbankapure3524 Жыл бұрын
खुप सुंदर
@malatinanal25272 жыл бұрын
खुपच छान या वयात सुध्दा खुप अभिनय करतात सध्या तुमचि मुलगि काय करते ह्या सिरियल्स मधे त्यांचा अभिनय पहायला मिळाला तुमच्यातील कलाकाराला सलाम 🙏🙏
@prachishinde52872 жыл бұрын
अनुभवाची शिदोरी काय असते हे आपल्याला अशा मोठ्या लोकांकडून शिकायला मिळते.सुलेखा असे भाग्य आम्हांला तुमच्यामुळे मिळते आहे.तुमचे आभार मानण्यासाठी शब्द फार तोकडे पडत आहेत.
@prachishinde52872 жыл бұрын
मला सुलेखा ताई असे म्हणायचे होते.नुसते सुलेखा लिहीले त्याबद्दल क्षमा असावी सुलेखाताई.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार नकाच मानू कारण मी ही खूप शिकते यासारख्या जेष्ठ्य कलाकारांकडून .
@sandhyakapadi41122 жыл бұрын
एकच प्रतिक्रिया देऊ शकतो - अंतर्बाह्य सच्चा माणूस 🙏🏻
@sumitragadhave94982 жыл бұрын
मी खूप मन लावून मुलाखत ऐकली.खूप काही शिकायला भेटले. खरचं खूप छान. सुलेखा ताई खूप धन्यवाद .
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@sandhyamahurkar24562 жыл бұрын
खुप छान मुलाखत काकांना बोलताना बघतील तर असं वाटतं कि आपण प्रत्यक्ष भेटलो त्यांना आणि खुप छान काम करतात अजूनही ह्या वयात छान एनर्जी आहे
@smitasathe38082 жыл бұрын
मनापासून आण्णा नमस्कार! काही शब्दच सुचत नाही काय बोलावे लिहावे त्यासाठी ! खूप प्रेरणा मिळाली तुमच्याकडून आण्णा! धन्यवाद सुलेखा ! अशीच अनेक रत्न आहेत आपल्याकडे . आणि त्यांची आमची भेट घडवून आणालच तुम्ही अशी खात्री आहे .
खूपच अविस्मरणीय मुलाखत धन्य झालो त्यांचे अनुभव ऐकून.. खूप काही शिकायला मिळालं. विनम्र अभिवादन अशा दर्जेदार व्यक्तीमत्वाला.... सुलेखाजी तुमचेही खूप आभार असे कलाकार सादर केल्याबद्दल...
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@annubhat43732 жыл бұрын
God Blessed Actor of all times well talented experienced in all stages of life long live Anna Jayant Savarkar a great personality in the field of performing arts in Marathi Stage I admire him a lot a veteran well admired actor 🌹🌹 his simplicity is well personified most respected actor in both mediums Hindi as well as Marathi
@neetamore2902 жыл бұрын
अण्णा च्या रूपाने एक अनुभवी आणि चिरतरुण व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले खूप छान सुळखताई खूप आभार ❤️
@neetashinde5382 жыл бұрын
जयंत सावरकर काका या वयात उच्चार स्पष्ट खूप खूप अभिनंदन आजचा सुलेखा ताई तुझा पेहराव छान होता असेच जुन्या कलाकारांना भेठवत जा
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@littlepenguinsschool24472 жыл бұрын
He is a walking , talking encyclopaedia of drama and film industry . His intellect is sharp . His knowledge is like a vast ocean . Wishing him a wonderful life . Keep interview such elderly artistes . 🙏🙏
@shubhadakhandekar86602 жыл бұрын
Sir, I respect you. Your love and dedication to your acting is admirable. Your simplicity is great. Thank you , Sulekha,for this great gift of Natyakarmi's interview.
@kalyaniwyawahare50102 жыл бұрын
खुप खुप खुप खुप धन्यवाद. अण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुलेखा छान खुलली मुलाखत.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@sarikagawand58922 жыл бұрын
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची मुलाखत ऐकायला खुप आवडेल, वाट बघतोय सुलेखा। कृुपया विनंती करते लवकर उषा नाईक ना बाेलव दिल के करीब मध्ये, तु खुपच छान दिसतेस ह्या साडीमध़्ये
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
धन्यवाद....प्रयत्न सुरु आहेत
@tejaswinipadalkar-patil63652 жыл бұрын
Wow...chintu nana...mastch...ek atishay anubhavi n harhunnari vyaktimattva...thanks tai...waiting
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
Enjoy
@HappyMind252 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सुलेखा मॅम...... जयंत सरांबद्दल प्रचंड आदर आहे त्यामुळे अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते...... आहाहा....सुख 😊😊
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@tsgeeta2 жыл бұрын
how do you maintain your beauty?...i admire you so much. wish i could do something to follow your strategy and enhance my beauty
@bharatisoundattikar17982 жыл бұрын
Jayant Savarkar sir atishay great aahet. Te kiti chan bolatat 🙏 mala mazya aajichi aathavan aali.
@chaitalijamindar51362 жыл бұрын
अप्रतिम झाला एपिसोड. Really incredible 👏
@ashwinithakurdesai Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. ..या निमित्ताने ऐकायला मिळाल त्यांना
@lalitagaurimhasawade36692 жыл бұрын
नमस्कार सुलेखा ताई. खूप छान मुलाखत होती. अशा जेष्ठ, श्रेष्ठ, कलाकारांच्या मुलाखती तून खूप छान व चांगले विचार ऐकून खूप काही शिकायला मिळाते. अण्णांना दीर्घायुष्य लाभो. ह्याच हार्दिक शुभेच्छा!
@skp17932 жыл бұрын
पुरुष मिरवत असतात.बायका आहेत म्हणून आपण अहोत... हे वाक्य फार आवडलं
@sangeetabansal81752 жыл бұрын
किती आपल्या घरातील लोकांचा विचार आणि कसलीही तक्रार n करता काम केली होती तुम्ही Great
@sangitagode21912 жыл бұрын
छान सुलेखा ताई तुमच्या मुळे आम्हाला आण्णा वाचायला मिळाले !खूप खूप धन्यवाद
@himalivarad82832 жыл бұрын
सुलेखा ताई नमस्कार, आजचे दिल के करीब एकदम सुंदर होते, जयंत सावरकर माझे अतिशय आवडते , खूपच सुंदर, हा भाग संपूच नये असं वाटत होते
@jyotideshmukh5697 Жыл бұрын
प्रामाणिक रंगकर्मी,अतिशय खरा,प्रेक्षक मुकले आता ह्या राजा माणसाला!! परमेश्वर त्यांना दिलं के करिब घेऊन गेला अचानक!😢
@seemabhat3952 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत किती साधेपणा अशी लोक दुर्मिळ झाली आहेत नमस्कार काका ना
@swatiatkar16462 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत 👍👍जेष्ठ कलाकाराचे अनुभव ऐकून खूपकाही शिकायला मिळाले. धन्यवाद 💐
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@vibhavarijoshi52512 жыл бұрын
खुपच छान....किती तरी शिकण्यासारखे आहे आण्णांकडून....ग्रेट🙏🙏....धन्यवाद सुलेखाजी ....👍
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@ketakipatankar66412 жыл бұрын
Amazing personality. kiti tari vyaktirekha ajun dekhil smarnat aahet. knowledgeable, hard working and great actor 🙏🏼😊 can't wait till tomorrow