आपल्या सर्वांमुळे अतुल परचुरे यांचा हा प्रेरणादायी भाग लवकरच 10 लाख व्युअर्स चा टप्पा पार करतो आहे. अतुल परचुरेंसह आपणा सर्वांच्या लढवय्या बाण्याचा हा भाग साक्षीदार आहे. आपल्या सर्वांना आपापल्या लढाईत यश मिळो. भले ते घडो.
@sunitapundlik1443 Жыл бұрын
वदलों
@sunitapundlik1443 Жыл бұрын
9:41
@pandurangbelhe71329 ай бұрын
Happ
@sailaabАй бұрын
in this interaction, 💫he🛐 had opened up about how, the wrong treatment from one team of medical caregivers, worsened his condition and the infection spread to the pancreas🥺. Initially what was said to be a tumour in the liver, was made much worse😭 due to misdiagnosis, wrong treatment. Atul🛐 sir mentioned that after changing doctors, he was hopeful of making a comeback and remission to work in his favour. Got to see him on-stage once. Very accomplished theatre actor who effortlessly portrayed serious roles. Now only ifs and buts remain. But yes, had the initial diagnosis been proper and the treatment had been effective in containing the spread, then surely he could have got a chance to be with us longer and possibly have had a better 'quality of life. Prayers and heartfelt condolences to Sonia ma'am, Sakheel and those bereaved by this immense loss.🛐💫
@shraddharaut1803Ай бұрын
1à@@sunitapundlik1443
@vaibhavthube5798Ай бұрын
अतुल आज तू नसताना हि मुलाखतं परतं एकदा पाहतोयं. कायं भरभरून बोलतं होतासं तू आणि किती स्थितप्रज्ञ होतासं तू कायमं आठवणीतं राहशीलं तू ..🙏🏻
@rahulchavan3318Ай бұрын
हो मी ही आताच परत बघत आहे 😢😢 भरुन आले
@gdhairyawan28 күн бұрын
Me too
@aanand2017 Жыл бұрын
जन्मदात्या आईची सकारात्मकता, ऊर्जा ज्याला लाभते, त्याला जगात अजून काय हवं. देवही त्या आईपुढे काही करू शकत नाही..😊🙏🏻
@akshatashende7210 Жыл бұрын
नशीबवान आहात तुमचं कुटुंब मला थर्ड स्टेज कॅन्सर आहे भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या मी एकटीच लढत आहे तरीही मी ही कॅन्सरशी लढाई जिंकणार
@anajogipethkar515 Жыл бұрын
All The Best... Swaminvar shraddha theva....
@devyanikarvekothari Жыл бұрын
Tai .himmat haru naka..I will pray for you😊
@vaibhavbhalerao2963 Жыл бұрын
Best wishes 🙏
@Chaitanya_Jog Жыл бұрын
हो 🙏 नक्कीच तुम्ही जिंकाल.
@rashmi1712 Жыл бұрын
मी तुमची परिस्थिती समजु शकते, crowd funding चा option वापर करून तुम्ही ट्रीटमंटसाठी काही पैसे जमु शकता. You will definately win in this battle.
@narayantandel766 Жыл бұрын
तंदुरुस्त असलेल्यांना आणि आजार ग्रस्तांना नवजीवन देणारी मुलाखत! प्रेरणादायी! अतुलजी,या लढ्याला शब्द अपुरे!😊
@shreyap1672Ай бұрын
RIP sir🙏🏻🙏🏻💐💐 .. सर्व चैनल वर तुम्ही अखेरचे दिसाल म्हणून सर्व चैनल बघत होते पण कुठेच तुम्हाला दाखवत न्हवते म्हणून हा पॉडकास्ट पुन्हा पाहिला आणि डोळ्यातून पाणी आले😢 , तुमच्या सारखे नट देवाला ही प्रिय असतात वाटते, त्यामुळे तुम्हाला लवकर बोलावून घेतले 🙏🏻🙏🏻😢
@theone6628Ай бұрын
6 महिन्यां पुर्वी ही मुलाखत बघितली होती.. तेव्हा खूप बरं वाटलं होतं की अतुल सर या आजारातून बाहेर आले.. आणी आज अचानक बातमी आली की अतुल सर गेले. खुपच धक्कादायक बातमी..😢😢😢😔😔😔
@rupalimayekar291Ай бұрын
अतुल परचुरे उत्कृष्ट अभिनेता कायम स्मरणात राहील
@mugdhakarnik7339 Жыл бұрын
जसे श्री शरद पोंक्षे यांच्या पुनरागमनामुळे आनंद झाला तसाच आनंद तुम्ही लवकरच आम्हाला द्याल याची खात्री आहे.आपले कुटुंब आणि मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात फार महत्वाचे असतात हे खरे आहे.
@मीमराठी-त8घАй бұрын
Ma'am तुम्ही लेखिका आहात का? मी तुमच्या द्वारे अनुवादित केलेली" the fountainhead " ही कादंबरी वाचतोय ❤
@sonaljoshi5189 Жыл бұрын
डॉ. चांगले मिळणे ही देवाची कृपा आणि आपल्या आई वडीलांची पुण्याई. तुम्ही आता दुसर्यांना मदत करा.
@damayantishinde792 Жыл бұрын
हो ताई doctor चांगले मिळणे देवाची कृपा
@paragkolwankar9392 Жыл бұрын
अतुल परचुरे..मी पराग कोळवणकर...x. रुपारेल..तुझा १ जुना मित्र..मी बाकीच्या सारख्या take care हा MSG कधीच टाकणार नाही..कारण माझा १००१% विश्वास आहे हा आजार तुझ काही काहीच वाकड करू शकत नाही..कारण तू किती चांगल्या स्वभावाचा आहेस ते मी खूप वर्षापूर्वी जवळून बघितले आहे..तेव्हाही तुझ्यावर खुप लोक प्रेम करायचे आणि आजही खुप करतात... एवढ्या लोकांचं तुझ्यावरच प्रेम आणि आशीर्वाद याच्या समोर हा प्रोब्लेम शुल्लक आहे..तुला भेटायची इच्छा आहे पण ती घरी येवून as a पेशंट म्हणून नाही..तर कुठल्या तरी तूझ्या शूटिंग चा set वर.. नक्कीच भेटू...
@pradippathak2492 Жыл бұрын
खूपच सच्चा माणूस.. kharach inspiration तुमच्या कडून घेण्या सारखे आहे. कुठेही नाटकीपणा नाही. किती krutadnyata सर्वांबद्दल.... अतिशय छान मुलाखत घेतली आहे.
@meenajadhav1219 Жыл бұрын
मी स्वत: कॅन्सर मधून बाहेर पडलेली आहे. तुमचा इंटरव्ह्यू खूप positivity देणारा आहे...मला बुस्टर वाटला...कारण you never know पुढे काय वाढून ठेवलंय.
@rekhadesai1417 Жыл бұрын
मी स्वतः cancer treatment घेतलेली आहे….बाहेर आलेली आहे आजारातून…पण तेव्हा परिस्थितीला सामोर जाण्याशिवाय पर्यायच नसतो दुसरा…त्याकाळात अतुलजी म्हणाले तस… तुमची कुणावरतरी असलेली श्रध्दाच कामाला येते 🙏🙏
@rohitkale24RK Жыл бұрын
आपलं प्रारब्ध संपल्याशिवाय कर्क रोगासारख्या आजारही आपलं काही वाकड करू शकत नाही .... Hats off to you Ma'am...
@rekhadesai1417 Жыл бұрын
Breastcancer पूर्ण बरा होतो. डॅा.सांगितलेली treatment पूर्ण करावी लागते..माझा ३rd stage चा बरा होऊन ५ वर्षे झालीत….माझ्या ओळखीतल्या वहिनींचा last stage breastcancer बरा होऊन १० वर्षे झाली आहेत. 🙏🙏
@MAU9820. Жыл бұрын
@@user-xd7cb8hv5uho deeds must be good 👍
@smitasudhir9209 Жыл бұрын
मी 3 rd stage liyomayosarcoma या rare cancer मधून पूर्णपणे बरी झाले. याचे पूर्ण श्रेय माझे सद्गुरु परम पूज्य अनिरुद्ध बापू फक्त. Ambadnya Naathsanvidh
@meandmyworld3632 Жыл бұрын
@@smitasudhir9209Ambadnya-Naathsamvidth
@mandarbilpe481Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 😢💔💔विश्वास बसत नाही.. खूप चांगला अभिनेता हरवला 😢💔🥺🥺
@siddheshsawant1771 Жыл бұрын
खूप वर्षांनी अशी मुलाखत पाहिली.... खूप शिकण्यासारखा आहे.. धन्यवाद सगळ्या टीम चे.... 🙏🙏🙏
@vandanashenage7828 Жыл бұрын
दादा खुप मोठा लढा दिलास व कॅन्सर च्या पेशटसाठी तुझी मुलाखत प्रेरणादायी वाटते कारण गेल्या १ वर्षापासुन आर्थिक संकटाना शारिरीक संकटाना सामोरे जाताना खुप अनुभव घेत असताना मी बरी होणार हा विचार खुप महत्वाचा आहे तो मिळाला धन्यवाद
@mitramhane Жыл бұрын
भले ते घडो 💛
@pandurangbelhe71329 ай бұрын
Happy-go-lucky
@arraafanatic Жыл бұрын
Outstanding! अतुल परचुरेबद्दल actor म्हणून आदर होताच...पण ह्या episode मधला सच्चा आणि जिद्दी माणूस पाहून तो कैकपटीने वाढला!
@nisha280 Жыл бұрын
खरच सुंदर मुलाखत झाली. अशी मुलाखत कधी पहिलीच नव्हती. डोळे भरून पण आले, व मुलाखतीचा आनंदही घेता आला.
@amolgaikwad5181 Жыл бұрын
खरंच बरोबर बोललात
@Abhsjdj Жыл бұрын
सामान्य माणसाने अचानक काय करावे?
@seemapendse6810 Жыл бұрын
Positivity ला सलाम. खूप छान झाली आहे मुलाखत. सगळे मुद्दे छान मांडले आहेत . परचुरेना मनापासून शुभेच्छा
@rekhadesai1417 Жыл бұрын
४५ व्या वर्षी कॅन्सर होण्याआधी मी अचानक झपाटल्यासारखे अध्यात्मिक ग्रंथ भगवदगीता,एकनाथी भागवत,दासबोध, तुकारामांची गाथा असे जे मिळाले ते वाचले होते…मी गृहिणी आहे माझ्याकडे वेळ असायचा..वाचायचे. अजूनहि हरिपाठ,मनाचे श्लोक वाचते. पण अनुभवावरून एक लक्षात आले आपण या जगाच्या निर्माण करणार्या शक्तीला शरण गेलो कि आपल्याला मार्ग मिळत जातो. शेवटि उत्तपत्ती,स्थिती, लय निसर्गाचा नियम आहे. 🙏🙏
@priyakatke579 Жыл бұрын
ताई तुम्ही आता बर्या आहात का
@rekhadesai1417 Жыл бұрын
हो मस्त मजेत आहे
@MP-bw6vu Жыл бұрын
Je jasta adhyatma vachtat tyanchi guru khari pariksha ghetat
@amritaj7487 Жыл бұрын
@@rekhadesai1417 reoccurring cancer can that be cured? What treatment works best?
@rekhadesai1417 Жыл бұрын
@@amritaj7487yes can be cured in case of breast cancer…i have seen patients of 2 nd time breast cancer 👍👍
@ganeshmorde6666 Жыл бұрын
I felt very good to see Atul after a long gap. Surprised and happy to know that he fought cancer and is fit and fine.God bless him.
@poornimarokade4750Ай бұрын
अतुल परचुरे सर तुमची मुलाखत मी खुप मन लावून दोनदा पाहिली पहिल्यांदा पाहिली तेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या आजारातून बाहेर आलात त्याबद्दल आनंद होता.नंतर पाहिली तेव्हा मनाला अतोनात दुःख होतंय तुम्ही खूप ग्रेट मानुस, ग्रेट कलाकार होता देव तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@kishormandke1929 Жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी मुलाखत. माणसाची श्रद्धा जी ऊर्जा देते त्याला तोड नाही. दीर्घायुष्य लाभो ही मनिषा.
@swapnilk326 Жыл бұрын
ह्या मुलाखतीतून.. अतुलच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. Positive विचारसरणीचं महत्त्व, कुटुंब आणि मित्र परिवार यांचा आपल्या आयुष्यातील role.. Hospitals आणि डॉक्टरांनी मांडलेला बाजार.. ही मुलाखत आमच्यासाठी Available करून दिल्याबद्दल आभार. आणि अतुलला पुढील आयष्यासाठी शुभेछा!
@aditikulkarni9100 Жыл бұрын
एवढं कूटूंब सोबत आहे आणि आमचा शूभेच्छा आहेत ईश्वर चरणी प्रार्थना तूम्हाला पूढे कधीच त्रास होऊ नये तब्येत चांगली रहावी
@udayratnaparkhi6101 Жыл бұрын
मी पण नुकताच म्हणजे 6 दिवसा पूर्वी कॅन्सर मुक्त झालो गेले 8 महिने मी या रोगाशी झुंज देऊन पूर्ण बरा झालो कुटुंबाचा support खूपच महत्त्वाचा असतो तो मला पूर्ण मिळाला dr चे योग्य वेळी निदान ऑपरेशन रेडिएशन नुकताच संपवून पूर्ण मुक्त झालो आहे आणि ज्या दिवशी हे समजले त्यादिवसा पासून ज्या मानसिक. त्रासातून मी गेलो त्याला फक्त आपले कुटुंबीयच बाहेर काढू शकतात तो support खूपच महत्त्वाचा असतो त्यातून मुक्त झाल्यावर जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करु शकत नाही
@Pheonix554 Жыл бұрын
hats off to u both
@sandhyadevke5220 Жыл бұрын
Kuthl hospital la treatment hoti tumchi pls sangal
@missyadav52029 ай бұрын
Konta cancer zala hota tumhala
@archahire68229 ай бұрын
Ya video madhe tyani kashi ani kai kalji ghayyachi te sangital nahi, konkontya goshti karne avshyak ahe te hi samjle nahi tumhi kahi sangu shakta ka
@missyadav52029 ай бұрын
@@archahire6822 Majya vadilana zala ahe high grade muscle invasive bladder cancer. Sadhya chemo radiation chalu aahe. आहारात tyna liquid jast dete. Soup ,juices. Palak soup, पातळ Gajar halava Pani घालून, fruits, हिरव्या पालेभाज्या, जे पचनाला हलके आहे ते सर्व..लसूण सर्व भाज्यात घाला, शक्य तेवढे तेल कमी किंवा बिन तेलाचे जेवण, दूध आणि दुधाचे पदार्थ टाळा, साखर कमी वापरा एकदम बंद नका करू, भाकरी आहेत असुद्यात, भाकरी किंवा चपाती पातळ भाजी मध्ये काला करून द्या, कोणतेही फळ देताना साल काढून कोमट पाण्यात एक मिनिट ठेऊन मग च खायला द्या, फळांमध्ये सफरचंद, देशी केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट द्या. आंबवलेले पदार्थ डोसा इडली, पनीर, मांसाहारी बंद करा थोडे दिवस जर ट्रीटमेंट चालू असेल. त्या सोबत अमी होप मेडिसिन पुणे इथून काढे म्हणजे पावडर घेतली आहे. थोडी महाग आहे. पण फरक जाणवतोय त्याचा सुधा. सकाळी प्राणायाम, आणि हलका व्यायाम, देवपूजा, सूर्य ल अर्ध्य वाहत जा रोज. कोवळ्या उन्हात थोडावेळ प्राणायाम करा..सकाळी केल्याने ऑक्सिजन जातो शरीरात, भ्रमरी ( डोळे, कान बंद करून भुंग्याचा आवाज काढणे), तीन वेळा ओम म्हणणे, खूप positivity Yete. Main aamhi कोणापासून लपवले नहीं की tyna cancer zala ahe, tymule ek emotinal support milato loknacha, loknche yene Jane asel tr पेशंट ल पण नॉर्मल वाटते, पेशंट सोबत काही ना काही टॉपिक काढून गप्पा मारणे, tyna Chan chan padharth पथ्य पाळून देणे. त्यामुळे ते खचून जाणार नाही ह्याची काळजी घेतो.
@vandanasonawane7977Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली! तुमच्या हा मुलाखतीचा व्हिडिओ ऐकून फार वाईट वाटलं पण तुम्ही तुमचा अनुभव लोकांना सांगितला. आणि मार्गदर्शन केल.आपल्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं. आपलया आत्म्यास शांती व सद्गदित लाभो!
@dr.poojapatil Жыл бұрын
अभूतपूर्व ... मी स्वतः एक डॉक्टर आहे. अश्या केसेस नेहमीच पाहतो पण, जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणे आणि बलवत्तर नशीब म्हणजे काय तर अतुल परचुरे . तुमच्या पुढील सुदृढ जीवनासाठी अनंत शुभेच्छा.
@sohamvinaykarnawat5671 Жыл бұрын
Kontya doctor ahat madam ?? Mhanje kontya specialist!
@siddhinanche2000 Жыл бұрын
सर, तुम्ही म्हणालात ते बरोबर कोणावर तरी श्रद्धा असावी, कारण हीच भक्ती आणि श्रद्धा ह्या वेळी पाठीशी उभी राहते आणि म्हणून ओळखीतून योग्य डॉक्टर कळतात आणि डॉक्टर करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळते ह्या पुढे हे सगळं चांगलच होईल, श्री स्वामी समर्थ 🙏
@manasipai5107 Жыл бұрын
खरच ह्या मुलाखतीतून खुपश्या कॅन्सर पेशंटना जगण्याच्या आशा उभारतील . तुम्हाला देव उदंड आयुष्य देवो 🙏 आणि तुमच्या सोन्यासारख्या कुटुंबाला नजर न लागो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
@madhavdeshpande6496 Жыл бұрын
परचुरे सर, आपली मुलाखत ऐकली आणि २०२० साली माझ्या कॅन्सर डिटेक्शन वेळी च्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या.मी एकदा बरा होऊन पुन्हा recurrance चा कटू अनुभव घेतोय. सगळ्या प्रकारच्या chemo होऊन गेल्यात. आता 4th stage असूनही मी जगण्याची आशा सोडली नाही. आज ५७ व्या वर्षी मी ८०व्या वर्ष्यापर्यंत जगण्याची आशा बाळगून आहे. तुम्हाला पुन्हा अभिनय करताना पहायचे आहे. 🙏🏻
@shwetasawantchavan624 Жыл бұрын
Get well soon kaka.🙏
@tusharmandawade5213 Жыл бұрын
God bless you 🎉
@snehalkoli94568 ай бұрын
Shri swami samrth kaka
@ravinakambli94747 ай бұрын
Nakki ch bare whal❤ shri swami samrth🎉
@jagannathsurwade41606 ай бұрын
तुम्ही परचुरे यांनी घेतलेली होमिओपॅथीचे डॉ शैलेश देशपांडें ची ट्रिटमेंट घेतली पाहिजे
@ashokjaiswal4277 Жыл бұрын
अतुल सर, तुम्ही खूप छान माणूस आहात. आसं काही ऐकले की जगण्याची उमेद वाढते. धन्यवाद व पुन्हा उत्तोत्तम कामासाठी अनेक शुभेच्छा 💐💐
@sandeshbhosalevines466 Жыл бұрын
माझ्या लाडक्या अभिनेत्याला मी मनोमन सलाम करतो..🙏 आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो अतुल परचुरे..#keepRocking..Love you..❤😊
@gaurimarathe3044 Жыл бұрын
अतुल दादा तुम्ही जबरदस्त आहात..तुम्ही खूप खूप वर्ष जगणार आहात..ekdum healthy and peaceful...🎉
@anayaambardekar8573 Жыл бұрын
फार छान मुलाखत. हृदयस्पर्शी!डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं!अतुलजी काळजी करू नका!चांगलेच राहाल. सौमित्रजी चं कौतुक की ते दुसऱ्याला बोलू देतात. नेमकेच प्रश्न विचारतात.
@mangeshabhyankar93239 ай бұрын
फारंच ऊर्जेने परिपूर्ण व आशादायी मुलाखत. अतुल जी तुम्हाला इथून पुढे निरोगी आयुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏 आणि धन्यवाद सौमित्रजी या मुलाखती बद्दल !!
@mukeshsugade9792 Жыл бұрын
Thanks for this interview. Atul inspired all people who are suffering from cancer. My wife also suffering from cancer and she is also a strong woman. Positive thoughts come from ❤good heart. 🎉🎉
@shalakasohani7834 Жыл бұрын
,खूप सुंदर interview , अतुल यांची positivity ani कुटुंबासमवेत असलेले श्रद्धास्थान खूप काही संगुन शिकवून गेले, परिस्थितीला सामोरे जाणे म्हणजे काय याचे सुंदर उदाहरण 😊😊
@sadabehereАй бұрын
आज पुन्हा एकदा पाहिला व्हिडिओ... १ मे २०१८ ला सिद्धिविनायकाला गेलो होतो, तेव्हा सर मॉर्निंग वाॅकला चालले असतील पण अगदी कळू नये असं टोपी वगैरे घालून मान खाली करून चालले होते, मी त्यांना ' hello सर नमस्कार , कसे आहात ' म्हटलं तर त्यांनी इतकं मस्त हसून असं react केलं की जसं आपली चोरी पकडली जावी 😂😂 लहानपणापासून त्यांचं काम बघत आलोय, प्रत्यक्ष बघितल्यावर खूप छान वाटलेलं. खूप वाईट वाटलं बातमी ऐकून 😔🥺
@jamirmulani853 Жыл бұрын
Atul you are very very Great मुलाखत पाहुन डोळ्यात पाणी आले. पुढील आयुष्य आरोग्य दायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉
@raginimudaliar6925Ай бұрын
आज अतुल सर आपल्या त नाही आहेत आणि मी ही मुलाखत ऐकली. खूप रडू आले. किती पाॅझिटिव होते सर. खरच, छान माणूस, उत्तम कलाकार, हुषार, मनमिळाऊ, देवाला ही प्रिय म्हणून देव घेउन गेले.
@04sohan Жыл бұрын
फारच कमाल आणि ऊर्जेने भरलेली मुलाखत❤️❤️ देव तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो🙏🏼🙏🏼🙂
@varshapaste9148 Жыл бұрын
खूपच छान interview...very inspiring ...अतुल परचूरे माझा आवडता अभिनेता आहे...sir तुम्ही केलेली पू ल ची भूमिका आम्ही कधीच विसरू शकत् नाही ...असेच तुमचे छान role आम्हाला बघायला आवडतील ... लवकरात लवकर बरे व्हा आणी पुन्हा कामाला लागा .. खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@sujatakhot5009 Жыл бұрын
मी स्वतः कॅन्सर पेशंट होते मी सेम अतुल सरा सारखं पॉजिटीव्ह राहिले आता मी पूर्ण पणे बरी आहे मी सुद्धा स्वामीवर विश्वास व श्रद्धा ठेऊन हया आजारला पॉजिटीव्ह फेस केलं
@dharmamuradnar16947 ай бұрын
कुठे ट्रीटमेंट घेतली
@dharmamuradnar16947 ай бұрын
Please mala sanga kuthe tretment ghetli
@shobhatikam1334 Жыл бұрын
मी देखील ब्रेस्ट कैंसर मधून,बरी होवून बाहेर आले.शिक्षिका म्हणून निवृत्त होणार त्याच्या एक महिना आधी कैंसर डिटेक्ट झाला.पती निधनानंतर ,शिक्षण घेवून,दोन मुलांना सांभाळत कष्टाने,पंचवीस वर्षे शिक्षिका होते.ओळखी ब-याच,चांगल्या लोकांशी झाल्यामुळे टा.टा.हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले.आज बारा वर्षे झाली.सकारात्म विचार आपल्याला जगायला बळ देतात,हे खर आहे.अतुल परचुरे,तुमचा हा अनुभव ऐकतांना,डोळे पाणावले.
@anuradhakale6980 Жыл бұрын
हा interview बघताना डोळे भरून येत होते पण आनंदाने व अभिमानाने ... तुमचे कुटुंबीय, मित्र , कृतज्ञता .... इतकी possitivity.... त्याच बरोबर तुमचा सल्ला ... क्या बात है ! देव सर्वांचे बरं करो !! ❤
@swapnilthakur298Ай бұрын
आता पर्यंत बघितलेला सर्वोत्तम poadcast... अशी ऊर्जा , ही positivity .. सलाम हया व्यक्तिमत्त्वाला....❤🙏.. त्यांच्या Mind set लां... 🙏
@bipinmore6346 Жыл бұрын
योग्य वेळी अशी आशादायक मुलाखत ऐकायला मिळाली याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@atulbhole564 Жыл бұрын
अतिशय सुरेख अनुभव, Atul परचुरे तुम्हाला सलाम, सगळ्यांना अभिमान वाटेल असेच तुमचे विचार, पुन्हा एकदा तुमच्या patience ला सलाम...पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@vaidehirajshekar9405 Жыл бұрын
Interview is owesome, no doubt, I am myself cancer patient, undergone more than 35 chemos so far, but still standing storng and fighting. Cancer changes ur life, ur perception, outlook towards life, going through the treatment is imp, but post survival, adaptibility and positivity and acceptibility towards uncertainty is very much needed.
@aartipitale6843 Жыл бұрын
get wellsoon
@shubhameher5473 Жыл бұрын
खुप छान मुलाखत होती, इतकी ऊर्जा मिळाली बघून आणि ऐकून, अतुल दादांचे खुप आभार, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, बऱ्याच जनानां याचा फायदा होईल, त्यांच काम आम्ही पाहिले आहे, खुप सहज अभिनय करतात ते, त्यांना खुप साऱ्या शुभेच्छा पुढल वाटचाली साठी 👌👌👍👍
@dattarampanchalparshuram6893 Жыл бұрын
अतिशय छान प्रेरणादायी मुलाखत, तुमचे विचार फार सकारात्मक होते, आम्ही तुमच्या पुनरागमनाची वाट पाहू👌👌👍
@indiancitizen8297 Жыл бұрын
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये माझी कॅन्सर treatment झाली....खूप चांगला अनुभव होता.... डॉक्टर, नर्स, स्टाफ... अगदी ग्रेट... देवाचे आणि लता दीदी चे आभार
@ajitkadam3941 Жыл бұрын
माझ्या.मुलीची पण ब्रेन tumor che opration dinanath la jhale radiation chemo chalu ahe
@rohinilagade-ge4rpАй бұрын
Kontya doctor kade zale
@indiancitizen8297Ай бұрын
@@rohinilagade-ge4rp डॉक्टर अमित पारसनीस
@anupwadekar38527 күн бұрын
@@ajitkadam3941 can you suggest us the name of the doctor ? As i am also looking for a good doctor. Your guidance would really help us out. Thanks
@jyotimhatre630 Жыл бұрын
मी स्वतः आता कॅन्सर ची ट्रिटमेंट घेत आहे. खरच परिवाराचा खंबीर पाठिंबा आणि ईश्वरी शक्ती या दोघां मुळे गेली दहा महिने पासून या आजारावर मात करत आहे.
@jyotimhatre630 Жыл бұрын
अतुल सर ज्या प्रमाणे तुमची मुलगी तुमच्या पाठीशी होती.त्या प्रमाणे माझी मुलगी फक्त वीस वर्षाची ,ती स्वतः लॅब टेक्निशियन झाली आहे ,त्या मुळे तिने देखील सर्व रिपोर्ट आपल्या डॉक्टर सोबत डिस्कस करून घेतले. मी एक शिक्षिका आहे.गेली दहा महिने माझी मुलगी तिचा जॉब सांभाळून माझे ट्युशन वर्ग सांभाळते. खरचं खुप अभिमान वाटते.
@santoshbhaiyyaDivate15 Жыл бұрын
सुदर्शन क्रिया शिका आणि लवकरच बऱ्या होणार 👍
@minaksheegharde2337 Жыл бұрын
Prophet bajinder singh ministry che videos bagha KZbin var tyanchya church madhe cancer pan bara hoto, Lord jesus tithe sagla heal kartat ekda wel kadhun nakki bagha tumhi pan yeshu masih chya navane purn bare honar
@varshasawant8375Ай бұрын
Be positive , सगळं नॉर्मल होईल . आपल्या कुलादेवाच की किंवा देवीच स्मरण करा. मला सुद्धा गेल्या दिवाळी नंतर गर्भाशयाचा कॅन्सर detect झाला . आणि सुदैवाने माझी भाची gynecologist आहे, आणि तिने पटपट सगळ्या टेस्ट करुन घेतल्या . 1st स्टेज कॅन्सर निघाला . लगेच तिने टाटा हॉस्पिटल मध्येच पुढची ट्रीटमेंट करायची हे सुचवलं. लगेच 4 जानेवारीला ऑपरेशन टाटा हॉस्पिटल मध्ये केलं.आणि आज मी पूर्ण पणे कॅन्सर मुक्त आहे. फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे फॉलो अप साठी जायचं न चुकता. ह्या सगळ्या प्रवासात माझं संपूर्ण कुटुंब पाठीशी उभ होतं. माझे पती, मुलगी की लग्न झालेली आहे, जावई , छोटा मुलगा, आई जी 80 वर्षाची आहे , आणि छोटा भाऊ.
@devyanikarvekothariАй бұрын
विश्वास बसत नाहीये की नियती एवढी क्रूर असू शकते 😭😭😭 ओम शांती अतुल सर 🙏🙏
@mrs.pratimamahajan952 Жыл бұрын
देव करो आणि कोणावर अशी परिस्थिती ओढवू नये ! पण अतुल परचुरे सर तुमची मुलाखत इतरांना प्रेरणादायी ठरेल! तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे. तुमच्या धैर्याला सलाम! तुमच्या मुलाखतीतून दोन गोष्टी पटल्या - 1 सकारात्मक विचार , कुटुंबाचा खंबीर पाठिंबा. 2 मध्यमवर्गीयांसाठी मेडिक्लेम पाॅलिसीचे महत्त्व.
@seemakurhade3374Ай бұрын
अतुल परचुरे यांची ही मुलाखत पाहून वाटले आता ते पूर्ण बरे झालेत...अचानक fb opan केले आणि वाईट बातमी कळली अतुल गेल्याची धक्काच बसला.... पु ल देशपांडे तुमच्यात पहिले आम्ही ....भावपूर्ण श्रद्धांजली
@kimayasakpal4516 Жыл бұрын
फार थोडे actor असे आहेत ज्यांना खरंच कलेची देणगी देवाकडून मिळाली आहे, त्यात अतुल सर येतात, down to earth असे कलाकार, अत्यंत हुशार, सर, तुम्ही बरे होणारच कारण आम्ही सुद्धा तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहणार, 😊
@AbhaKale-sd6qi Жыл бұрын
Y
@neetavinekar4322 Жыл бұрын
Interview was really touched.i am really happy to see the positive side of Atul parchure.God bless him always.
@siddhinarvekar-f3w Жыл бұрын
खूप छान मुलाखत. अतुल सर तुम्ही यामधून लवकर बाहेर याल. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. डॉ. किंवा हॉस्पिटलचे नाव सांगितले असते तर बरे झाले असते. किमान इतर कोणला चुकीचे उपचार मिळणार नाहीत.
@parveenshaikh9728 Жыл бұрын
Brobr
@rohinikachole4330 Жыл бұрын
अतुल सर तुमची मुलखात पूर्ण ऐकली , खूप कॉन्फिडन्स होता तुमच्या बोलण्यात , मी सुद्धा 10 वर्षा पूर्वी कॅन्सर ने आजारी होते . मला दोन प्रकारचे कॅन्सर झाले . पण आत्म शक्ती प्रचंड होती म्हणून मी आज पर्यंत काम करते आहे . तुम्हाला या पुढे आता काही प्रोब्लेम येणार नाही . तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी ऐक प्रेरणा स्तोत आहात . आणि अजून बरेच दिवस तुमचा अभिनय लोकांना बघायचा आहे . मी नेहेमी म्हणत असते ईश्वराने आपल्याला ऐक कामगिरी दिलेली असते जो पर्यंत ती पूर्ण होत नाही तो पर्यंत आपल्याला काही होत नाही कारण ती त्याची जबाबदारी असते . All the best for your future sir .
@ramasamant3870 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी मुलाखत आहे सगळ्यांसाठी.जे आजारी आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे आजारी नाही त्यांच्यासाठी पण .आपण काय करू शकतो कोणासाठी हे पण कळते.आणि सगळ्यात महत्वाचे तुमचे प्रेमळ मन जे तुम्ही सगळ्या लोकांसाठी बोललात.
@SujitRetro Жыл бұрын
वा अशी मुलाखत कधीच पहिली नाही सलाम अतुल सराना... प्रेरणादायी मुलाखत 🙏
मनापासून दुःख झालं!! 🥺 अतुल दादा, खुप मोठा अभिनेता आहे, अतुल दादा अजून खूप काम करणार आहे, त्याच्या मोठमोठ्या भूमिका अजून त्याच्या हातून घडायच्या आहे. ❤️ तो यातून बाहेर आला, फार आनंद झाला. 👍 सौमित्र, खूप आभार तुझे🙌🙌, ही मुलाखत खजिना आहे. सांभाळून ठेवावी अशी आहे
@upendrayelnoorkar1645 Жыл бұрын
Very inspiring interview given by Atul Parchure..specially to those who are fighting with the health issues.... If you are positive & Believe in Divine power..... then you can over come all the difficult situations of your life..... Wishing Atulji quick recovery & Happy Healthy life.. 💐🙏 God bless you & your family🙏🌹
@vitthaldadhi3071 Жыл бұрын
Saumitra khup chhan mulakhat
@madhuriaalim5652 Жыл бұрын
जोपर्यंत मनुष्य स्वतः खचत नाही, स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत समोरची कोणतीही व्यक्ती किंवा आजार त्याला हरवू शकत नाही..अतुल सर हॅटस आॅफ.. कित्येक कॅन्सर पिडीतांनाच नव्हे तर नाॅर्मल माणसांनाही आपण एक नवी दृष्टी दिलीत.. खूपच छान.. प्रेरणादायी मुलाखत..
@anjaligokhale4494 Жыл бұрын
Khup chaan episode . Cancer patients should watch and hear atulji how calm he was and also how family and friends supported him mentally.
@surendra1990 Жыл бұрын
Eating sugar, vitamins, milk, extra proteins send wrong signals to the body it looks for growth. But the normal cells, as per their contract won’t grow beyond a design hence non conforming cells start growing
@Paramarth-h2g Жыл бұрын
प्रेरणादायी
@pratimakeskar Жыл бұрын
अतुल परचुरे तुमच्या कॅन्सरशी लढाईत तुम्ही असामान्य धैर्य दाखवले,तुमचे कुटुंबीय,मित्र,सुहृद यांनी तुमची घेतलेली काळजी हे सगळं अद्भुत आहे..... मी स्वतः दोनदा लढले आहे या दुखण्याशी,स्वतः पेशंटने positivity दाखवली तर डॉक्टर लोक ही खूप जोमाने काम करतात..... तुमची आई म्हणजे साक्षात देव आहे, पोटचं पोर कशाशी झगडतं आहे हे तिला माहीत असूनही ती घट्ट उभी राहिली आहे,तुमची बायको,लेक ही सगळी लोकं तुमची संपत्ति आहे......तुम्ही पुन्हा पहिल्या सारखे होणार आहात......🙏🙏🫡🫡
@Aditya-d1h5pАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😭 तुमचा हा interview तेव्हा पाहिलेला, आज निधनाची बातमी आल्यावर पाया खालची जमीनच सरकली.😭😭😭
@rishik693 Жыл бұрын
Learnt lot of things from this podcast ...hats off to atul sir for your dedication and positivity..your story is really inspiring for many...and salute to your mother and entire family and friends...🫡
@anurabelwalkar7441Ай бұрын
आज अतुल सर आपल्यात नाहीत... पण त्यांनी जे काम केलंय ते नेहमी स्मरणात राहील आणि ही मुलाखत प्रेरणादायी आहे. खूप छान बोलले अतुल सर.
@kiranmahajan7589 Жыл бұрын
Great.... मुलाखत....मी पुन्हा पुन्हा ऐकली.... पाठवली..... डोळे कितीदा भरून आले... सलाम..... सलाम....अतुल ला.... especially तुला....तू छान माणूस निवडलास....माणूस जमिनीवर येतो.....
@yaminitilak213 Жыл бұрын
सकारात्मक विचार करण हेच आपल्या हातात आहे आणि आपली श्रध्दा ही तितकीच महत्वाची आहे...यश हे मिळणारच ....🎉
@anilkamble3602 Жыл бұрын
" Life is full of uncertainties, You have to face any situation in Life with courage " Well said Atul. Happy to see you after recovery from Cancer. I wish you good health and long life. An excellent and heart touching interaction with Atul by the interviewer. Lot of things to be learnt from this interview. Disasters come and go, we have to be stable with positive mind set. Thanks this Digital platform. 🙏🙏🙏.
@padmajain8765 Жыл бұрын
Dear Atul sir Just I heard your interview Actually we are your neighbour in Raghucul. My son Sujit & sonali jain staying 1401 I am in Pune. When I will be there hopefully u will meet.GOD BLESS U FOR YOUR FURTHER PROCESS. PADMA JAIN .
@omkar-zp6yr Жыл бұрын
Atul dada, khoop kahi shikavlas..kalat ani nakalatahi. Tuzya kutumbatlya tinhi maulinna salaam. Dolyat pani ala pan karuneni nahi tar anandani. Khoop dhanyawaad tula. Swami tula nirogi ani dirghyushi karot. Tuzyasarkhya mansanchi garaj ahe amhala.
@rajeshkaujalgikar4965 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी मुलाखत.अतुलजी परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
@manishatamboli1590 Жыл бұрын
खुप सकारात्मक व्यक्ती,hats off to you sir 🙏
@dineshthankar4865 Жыл бұрын
तुम्ही कॅन्सर विरुद्ध दिलेला लढा अतुलनीय. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपल्या कुटुंबियांना अनेक शुभाशीर्वाद.
@aratinarvekar6457 Жыл бұрын
अतुल परचुरे यांचे पुढील आयुष्य आरोग्य दायी असो दीर्घायुष्य मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@alkamandke3109 Жыл бұрын
बापरे काहीच माहित नव्हतं आणि एकावर एक आश्चर्य आणि मानसिक चढ उतार ..डॉ चांगला आणि स्पष्ट संवाद करत नाहीत चूक मान्य करत नाहीत याचे खूप वाईट वाटले ...सकारात्मक विचार असणे हा फार मोठा कौतुकाचा आणि दुर्मिळ गुण तुमचा आणि तुमच्या संबंधातील सर्वांचा हा च खूप महत्वाचा भाग तुम्ही बरे होण्यामागचा असे वाटले ..तुमचे ,तुमच्या आईंचे आणि सोनियाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !हा interview घेऊन हे सर्व आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दलही आभार !🙏
@suchith9327Ай бұрын
मी आज ही मुलाखत बघितली अणि पूर्ण episode अश्रू ओघळत होते.......भयंकर आहे ..मधेच atul म्हणाला आता झालोय मी बरा .आत्ता काही होणार नाही रे. ....देवाने पण काय क्रूर थट्टा केलीय.......
@jyotighadi264 Жыл бұрын
अतुल तुमच्या मुलाखतीमुळे अनेकांचा आत्मविश्वास वाढविला आहे.
@shubhashripathak2348 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायक interview. परमेश्वर आपल्याला खूप सुखी आणि निरामय आरोग्य देवो!
@bhajananjali1 Жыл бұрын
अतुल.. सोनिया.. कमाल आहात तुम्ही.. तुम्हाला मनापासून सलाम आणि पुढील आनंदी आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा - विजय मिश्रा 🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹
@manali_anurag Жыл бұрын
Best interview watched till date.. hat's off to Atul sir, his family n all.. thank you saumitra dada for this video.. looking forward for such great conversation to fulfill our lives..❤
@suhasinichavan9758 Жыл бұрын
खुप च सुंदर आणि आपली जी मनाची जी ताकद आहे तिच खरी जगण्याची उमेद देते की मला काहीच झालं नाही हेच तर जीवना च गमक आहे तेव्हा अतुलजी God Bless U N Family आणि आता आपण परत नविन जोमाने कामाला लागा हिच सदिच्छा
@ShrutiSruthiMM Жыл бұрын
Atul Sir, tumcha positive attitude aavadla mala khoopach.. Aani tumchi family great aahe.. Ek kadak salaam.. :-)
@krishnamensi9078 Жыл бұрын
अतुल साहेब तुम्ही खुप लवकरच पूर्ण बरे व्हाल यात काही शंका नाही तुम्ही एक सेलिब्रेटी आहात त्यामुळे तुम्हाला खूप लोकांचा आधार मिळाला तो तुम्ही घेतला नाही तो भाग वेगळा परंतु सगळी सोंग घेता येतात पण पैशाच सोंग घेता येत नाही एखाद्या गरीबाला असा आजार झाल्यास त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही सरणावर जळत असताना एवढेच कळले जगण्याने छळले होते मला पण मरणाने मुक्त केले
@Donaldasdf Жыл бұрын
Khar Aahe......😭
@suvarnak5876 Жыл бұрын
True
@sonalimeherkar968 Жыл бұрын
Agdi barobar
@anjalinikam4731 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आयुष्यातली पॉझिटिव्हिटी आपल्याला किती चांगल्या वळणावरती नेऊन सोडते याचे अत्यंत सुंदर असे उदाहरण. अतुल दादांचा हा आदर्श सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल. अतुल दादा तुम्हाला येथून पुढचे आयुष्य आरोग्यदायी व आनंदी जावो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@leenamane5824 Жыл бұрын
Plz multi-speciality hospital madhe Jatana jara japun
@leenamane5824 Жыл бұрын
Khupch प्रेरणादायी मुलाखत
@anilmore9231 Жыл бұрын
अतुल जी,नमस्कार. आज तुमची मुलाखत बघितली.तुमच्या या मुलाखतीमुळे कित्येक जणांचा आयुष्याकडे कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून जगण्याची एक नवी उमेद मिळाली आहे. आपली झुंज, सकारात्मक विचार कायम लक्षात राहतील. मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या उत्तम दीर्घायुष्या साठी त्या अज्ञात शक्तीकडे प्रार्थना.
@ashwinikulkarni314 Жыл бұрын
सर तुम्ही ज्या पॉझिटिव्ह एनर्जी ने कॅन्सर शी दोन हात केलेत ऐकून खूप छान वाटले,तुम्हाला ह्या आजारात काय काय व किती किती सहन करायला लागले आहे हे मुलाखती मधून समजते ,कुठेतरी श्रद्धा ठेवा ,मार्ग सापडतो हे वाक्य खूप प्रेरणा देऊन गेले तुमचे पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो ही श्री अंबाबाई चरणी माझी प्रार्थना करते🙏🙏🙏
@prashantdeshpande8177 Жыл бұрын
Great Recovery Atulji. Highly positive approach towards living the life. Unbelievable Support from family members.Get well soon. 🌹🌹🙏🙏
@vrushalic3389 Жыл бұрын
कालच कपिल शर्मा चा शो बघितला ..तु खुप बारीक झालास डाएट केले वाटत असे वाटले .पण असा विचार चुकून ही आला नाही .आणी नेमका हा विडिओ समोर आला.तु आमचा आवङता अभिनेता ऐकुन वाईट वाटले पण आता बरा झालास हे ऐकून खुप छान वाटले .खुप खुप शुभेच्छा.
@cjoshi6135 Жыл бұрын
This is such an important episode. Thank you for telling it like it is and doing that on camera.
@sharmilaphatarpekar9819 Жыл бұрын
.
@Akrebhakti Жыл бұрын
यामधून एक च शिकायला मिळते..... The mind is everything what you think you become❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@maheshtamhane2230 Жыл бұрын
Atul saaheb, You are inspiration for many who are fighting with cancer. Best wishes to you and your family.
@aditikulkarni8815 Жыл бұрын
अतिशय उत्तम घेतलेली मुलाखत आणि उत्तरंही.. अनुभवकथन .. Very inspiring ..
@renugandhi2204 Жыл бұрын
Very very positive attitude of Mr. Parchure is very inspirational for one and all. I guess the best interview to watch when one is going through a low phase in life !!! Thnx for interviewing such an inspirational n brave person!!! God bless u Mr. Parchure n wish u a long, happy n healthy life!!!
@prasadmulay8311 Жыл бұрын
Hats off to Atul and his courage .. very positive interview..Great solid support of Sonia and family
@anaghachandwadkar4529 Жыл бұрын
माझ्या आईला झाला होता ब्रेसकॅन्सर जेव्हा सोनो ग्राफि केली आणि आमच्या फॅमिली डॉक्टरानी सांगितल तेव्हाची आठवण झाली खरच खरच खुप भयानक असते ते सहन करण😢
@maheshmuthe99 Жыл бұрын
खरंच खूप प्रेरणादायी होत्या ह्या गप्पा. अतुल सर तुम्ही खरंच एक मत्तबर व अस्सल कलाकार आहात. तुमचे व तुमच्या परिवाराचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे समृद्धीचे व उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼