चालण्याची नको एवढी कौतुके थांबणेही अघोरी कला यार हो! - सुरेश भट भट साहेबांचा शेर आठवला हे ऐकून... अतिशय महत्वाची आणि अवघड प्रक्रिया सहज उलगडून दाखवली आहेस दादा!🙌❤
@SundeepGawandeАй бұрын
हा अजगर खरंच भीतीदायक होता. एक कवी म्हणून या स्थितीतून दोन-तीनदा तरी गेलेलो असल्यामुळे तुझ्या त्या असहाय अवस्थेतील सहवेदना पुरेपूर अनुभवता आली.🙂🙂
@prathamesh36Ай бұрын
अप्रतिम... एक कवी म्हणून तुझ्या प्रत्येक शब्दाशी सहमत आणि सहवेदनेची जाणीव
@bpos1000Ай бұрын
अप्रतिम मांडणी... साधारण ४०-५०शी नंतर अनेक कलाकारांना हा न सुचण्याचा ब्लँक अनुभव अनेकदा येतो... त्यापैकी मी ही एक... धन्यवाद... ❤
@pritampatil3151Ай бұрын
Ekdum masta episode 😊 Thanks
@shubhangipurohit5693Ай бұрын
फार फार आवडलंय! दीर्घकाळ स्मरणात राहील असं काहीतरी ऐकायला मिळालं आहे. न सुचण्याचा अनुभव आता भितीदायक वाटणार नाही. त्याचं पण महत्त्व लक्षात आलं!🙏
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद! असंच ऐकत रहा आणि कळवत रहा! उत्तम दाद मिळणं हा एका अर्थानं न सुचण्यावरचा चांगला उपाय असतो!
@kalpanasatheАй бұрын
खूप च छान बोललास कौशल....अगदी मनापासून सहज सोप्या भाषेत ....मार्मिक. अजगर आणि बाईची गोष्ट....तू पुढे बोलत गेलास तसं तसं मनात खूप रेंगाळत होती आणि अगदी संबद्ध आहे हे जाणवत राहिलं. तुला मनापासून शुभेच्छा 💐
@kaushalsinamdarАй бұрын
मनापासून धन्यवाद, कल्पना! ऐकत रहा आणि तुझी प्रतिक्रिया अशीच कळवत रहा.
@abhijeetkorde1814Ай бұрын
अगदी मोजक्या शब्दात लाखमोलाचा सल्ला दिलास..❤ कंटाळा आलेला असणं हे एक सृजनशीलतेचं जिन्नस असतं असं म्हणतात ते खरं आहे, असं तुझं ऐकल्यावर वाटतं😂
@kaushalsinamdar29 күн бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽
@kulkarnimgАй бұрын
Hibernation चाच विचार छान पद्धतीने सांगितले आहे.. ह्या अवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्यास आशेचे किरण तसेच गोठलेल्या जाणिवा पुनरपि समोरच प्रसवतात..मनाच्या शैथिल्याची एक क्रिया.. फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण कशी भरारी घेऊ शकतो हे फारच छान सांगितले आहे.. शब्दच आपल्याशी संवाद करु इच्छितात..फक्त आपण त्यांना गोंजारत त्यांच्याशी लडिवाळ पणे बोलले पाहिजे..
@ketakivaidya-music9711Ай бұрын
खूप छान अनुभव सांगितला तुम्ही... अजगर मात्र खरंच भीतीदायक आहे... माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला असा अनुभव अनेकदा येतो..पण तो हाताळायचां कसा हे कधी कधी समजत नाहीं. आज ह्या निमित्ताने हा intake चा काळ आहे ह्याची जाणीव झाली...thank you 😊🙏🏻
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद केतकी. प्रत्येक कलाकाराला या एका अवस्थेतून जावं लागतंच. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!
@anitajoshi2477Ай бұрын
काय सुंदर वर्णन केलं आहेस , काही न सुचण्याच्या स्थिती चं !,गृहीणिलाही स्वैपाकघरात गेल्यावर असं कधी तरी होतंच फार छान, पुढच्या भागाची वाट पाहत आहे. अनिता जोशी, शैला आत्या ❤❤
@kaushalsinamdarАй бұрын
मनापासून धन्यवाद, शैला आत्या🙏🏽
@sheelab1009Ай бұрын
काही सुचत नाही म्हणताना कसे re तुला सुचत जाते कौशल.?कमाल आहे तुझी. तुझ्या vayachya मानाने तुझा मेंदू एकदम fast काम करतो .कौतुक वाटते मला नेहमीच. बोटे बधिर होत असल्यामुळे टाइप करणे कमी करते. पण राहवत नाही. तुझे मला नेहमीच खूप म्हणजे खुप कौतुक आहे. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो❤
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद मावशी! 🙏🏽
@vijaynikam8925Ай бұрын
अजगर आवडला. अनुभव कथनाला ही उत्तम चाल असल्याचं जाणवलं!
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद विजय! तुझे या अवस्थेतले अनुभव ऐकायला आवडतील.
@मीमराठी-त8घАй бұрын
काय राव असं घाबरवत नका जाऊ हो 🙏 . अंगावर काटा आला, अजगराची गोष्ट ऐकून 😊
@kaushalsinamdarАй бұрын
😊
@sharmilaranade2198Ай бұрын
किती सुंदर बोलला आहेस, कौशल! न सुचण्याचा काळ कारणी लावता आला पाहिजे म्हणजे जमिन पुढील पिका साठी अधिक सुपिक होईल!
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद शर्मिला!
@acesec8008Ай бұрын
Well said Kaushal da,what patankar dada said is absolutely dot on...keep studying...and whenever one get stucks....take a brake and watch it from distance...that is what I do in my work though not musical.❤
@kaushalsinamdarАй бұрын
Yes. This applies to everybody! Thanks for watching!
@udaykadam7294Ай бұрын
Apratim episode
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद उदयजी! जरूर शेअर करा!
@vinaylohotekar1934Ай бұрын
चांगलं वाटतय ऐकायला
@kaushalsinamdarАй бұрын
धन्यवाद विनयजी!
@kirandatey4187Ай бұрын
There’s so much to learn from this video. Thank you Kaushal. Absolutely loved listening to your deep thoughts, critical and precise analysis. Creativity can be a challenge sometimes 😊 Enjoy your tea ❤
@kaushalsinamdarАй бұрын
Thank you so much! Please do let me know when you are in India next and we can have that cup of tea together!
@sameerjirankalgikar3590Ай бұрын
खूपच छान सांगितलं कौशलजी. क्रीएटीव्ह ब्लॉककडे किंवा खरं तर प्रत्येक गोष्टीकडे कलाकाराला असंच वस्तुनिष्ठ पद्धतीने बघता आलं पाहिजे, नुसतंच भावनिक होऊन नाही. तुमचे एपिसोड्स पाहिले की मला प्रश्नांची उत्तरं मिळतातच पण मनात अजून प्रश्न तयार होतात. त्यामुळं हा दर वेळेला प्रश्न विचारतो म्हणून प्लीज आगाऊ समजू नका. यावर अजून सखोल विचार केला की जाणवलं, क्रीएटीव्ह ब्लॉक म्हणजे तरी नक्की काय? ही खरोखर न सुचण्याची अवस्था आहे की एखादं काम सतत करून ते करण्याचा आलेला कंटाळा किंवा आता सगळे ऑपशन्स संपले असं वाटणं? विशेष करून जे पूर्ण वेळ कलाकार म्हणूनच काम करतात किंवा तो ज्यांचा व्यवसाय असतो त्यांच्या बाबतीत हे होणं खरंच स्वाभाविक आहे. हेच अजून वेगळ्या शब्दात विचारायचं तर, जसं बुद्धी आणि प्रतिभा यातला फरक पटकन ओळखणं आणि सांगणं जितकं अवघड तितकंच क्रीएटीव्ह ब्लॉक आणि तोच तोच पणा यातून आलेला कंटाळा यातला फरक ओळखणं कठीण असं म्हणता येईल का?
@kaushalsinamdarАй бұрын
तोचतोपणा येणं हे क्रिएटिव्ह ब्लॉकचंच चिन्ह आहे. काही लोकांना ‘आपल्याला हा ब्लॉक आलाय’ हेच उमगत नाही. ते मात्र वर्षानुवर्षं तेच ते करत राहतात.
@sameerjirankalgikar3590Ай бұрын
ही स्थिती अजून भयानक म्हणायला हवी
@kaushalsinamdarАй бұрын
@@sameerjirankalgikar3590 खरंय!
@shantanukelkarАй бұрын
वाह दादा...अजून एक गर्द खोल विवेचन! काही ना सुचण्याबद्दल पण एवढं कसं सुचतं! काही न सुचण्याच्या काळात "तुम्हाला काय वाटतंय यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं"....फार भिडलं हे! असं तटस्थपणे स्वतःकडे प्रत्येक परिस्थितीत पाहता आलं पाहिजे! ... खूप काही शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून ...तुम्ही सांगत रहा...आम्ही शिकत राहतो... 🙏