महाराष्ट्राची ग्रामीण जीवनशैली सातासमुद्रापार नेणाऱ्या जोडप्याची गोष्ट Ft.

  Рет қаралды 922,903

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Жыл бұрын

ही गोष्ट आहे एका अशा जोडप्याची ज्यांनी आपल्या मातीत काहीतरी नवीन घडवण्यासाठी मुंबईहुन गावाकडे स्थलांतर केले. शहरातली lifestyle सोडून गावातील पारंपारिक जीवन, महाराष्ट्रीयन पाककृती, इथली समृद्ध संस्कृती, स्थानिक कला यांना जगासमोर वेगळ्या पद्धतीने मांडणे या उद्देशाने सुरू केलेलं एक आगळं वेगळं KZbin channel... @RedSoilStories म्हणजेच लाल मातीतल्या गोष्टी.... शाश्वत जीवनाच्या शोधात एक कलात्मक रित्या केलेला प्रवास; शहरी जीवनाच्या गर्दीपासून दूर. आधुनिकीकरणाच्या मागे लागलेल्या पिढीला पुन्हा ग्रामीण भागातील शाश्‍वत जगण्‍याचा मार्ग दाखवण्‍याचे, इथल्या culinary art ला asthetically सुंदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य, इथल्या नद्या, डोंगर , दऱ्या, धबधबे, इथली माती, त्यात उगणारी पिके हे सगळेच एक कथा सांगतात... आणि ह्याच कथा आपल्यासाठी घेऊन हे जोडपं दर आठवड्याला भेटायला येत...
"Red Soil Stories" हे फक्त एक you tube channel नसुन ग्रामीण जीवन आणि हे न अनुभवता येणाऱ्या शहरातल्या तमाम लोकांसाठी बनवलेला साकव आहे... मी सुद्धा शिरिष आणि पूजा ला भेट देऊन त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या venture बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सोबत Red Soil Stories channel साठी एक व्हिडिओ सुध्दा शूट केलाय... जो तुम्ही त्यांच्या चॅनेल वर पाहू शकता... Red Soil Stories channel ला भेट देऊन नक्की तुमचा अनुभव कळवा🙏❤️
/ redsoilstories
redsoilstories?...
Instagram👆🏼
profile.php?...
Facebook
Email id - mail.redsoilstories@gmail.com

Пікірлер: 795
@savitakubal3732
@savitakubal3732 Жыл бұрын
खूप आवडलं मी पण जन्मापासून 25 वर्ष अगदी सुखासमाधानाने मुंबईत राहिली आहे पण 31 वर्षांपूर्वी लग्न होऊन गावात,सिंधुदुर्ग मध्ये आली,अगदी पहिल्यांदा शेणात हात घालून जमीन सारवली,विहिरी चं पाणी काढल,मातीच्या घरात राहिली, पूर्णपणे ह्या जीवनात समरस झाली,पण वाईट वाटतं की इकडे त्याच कोणाला काही पडलं नाही,30 वर्षात खूप बदललं सगळं,सगळ्यांना स्लॅब ची,सिमेंट ची घरं पाहिजेत,प्रत्येक घरात अगदी tv, फ्रीज पासून , मॉडर्न kitchen पर्यंत सगळ्या सुविधा हव्यात,आणि आहेत मी अजूनही ह्या सगळ्या पासून लांब राहिले,म्हणून मला गावढंळ समजतात गावातली माणसं, आपलं असलेलं 50% मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे ,no support
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar 3 ай бұрын
खरे आहे, स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळत नाही.
@HimmatBhoir
@HimmatBhoir 2 ай бұрын
{मातीचं घर वाचवायचा प्रयत्न आहे} .... Matichya gharacha video asel tar link share kara. Baghayla avdel mala
@abhishekpadwal4067
@abhishekpadwal4067 Ай бұрын
Kuch to log kahenge,logo ka kaam he kehana Pan tumhi tumachi life style enjoy Kara tyanchyapeksha jast samadhanani jagal
@bharatpagire2117
@bharatpagire2117 Жыл бұрын
🌻कोकणा सारखे सूख कुठेच नाही,,,,! असे सर्वच म्हणतात...! 🌻मग कोकणात लोकं थांबायला का मागत नाहीत? 🌻 कोकणी माणूस खूप मेहनती आहे...! 🌻 मग तीच मेहनत तो गावी का करत नाही...? 🌻 शहरात जाऊन मेहनत करून काहीच साध्य झाले नाही की मग गावी जातो... तेव्हा ताकत व वय संपून गेलेले असते... 🌻 मुंबईची आयुषयभराची कमाई म्हणजे ४ भिंतीची खोली... या पेक्षा काही नाही.. पण त्या खोलीत फक्त रात्री ९ ते सकाळी ६ एवढा वेळच आपण राहतो.. बाकी वेळ आपला ट्रेन व ऑफिस यामधेच जातो ... 🌻 गावी राहण्यासाठी पुढची पिढी कदापी तयार होणार नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे कारण.. त्यांना गावी राहण्यासाठी काहीच आपण करून ठेवलेले नाही 🌻 कोकणातली मुख्य समस्या.. १) पाणी, (उन्हाळी शेतीसाठी पाणी नाही) २) पाऊस खुप आहे पण ते पाणी सगळे समुद्रात वाहून जात असल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही... ज्या दिवशी ते पाणी आपण साठऊन उन्हाळी शेतीसाठी ठेऊ त्या दिवशी कोकण खरे सुखी होईल... ३) त्या पाण्यावर पैसा येईल अशी शेती करावी पारंपरिक शेती नको तर त्यातून आपल्याला लाखो रुपयांची रक्कम हातात येईल अशी शेती करावी... आणि हे शक्य आहे.. फक्त पाणी पाहिजे व योग्य नियोजन... 🌻 एकदा सर्वांनी अवश्य विचार करून बघावा वेळ अजून ही निघून गेलेली नाही.. काही लिखाणात चूक असल्यास क्षमा असावी..💚💚
@amitkharat07
@amitkharat07 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rupalikadam3551
@rupalikadam3551 Жыл бұрын
तुमचा शब्द न शब्द खरा आहे 👍👍
@Maheshshetye02
@Maheshshetye02 Жыл бұрын
खूप सुंदर बोललात. अगदी खरे आहे.
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन आहे 👍
@rahulmalekar252
@rahulmalekar252 Жыл бұрын
❤️
@umanatu2825
@umanatu2825 Жыл бұрын
धन्यवाद प्रसाद 🙏 शहरी जीवन सोडून तरुण वयातच ग्रामीण जीवनाला आपलंसं करुन हे शिवधनुष्य सक्षमपणे पेलु इच्छिणारी पूजा खरंच दूर्मिळ. God bless you dear Pooja!!
@dnyandagawas3678
@dnyandagawas3678 3 ай бұрын
तुमचे Red soil stories channel मी बघते,ते खुपच inspiring आहे .मी आणि माझे पती आम्ही पण कोकणात 2000 सालापासून राहतो.आम्ही मुंबई त 20 वर्षे नोकरी केली.तरीपण कोकणात आल्यावर मनःशांती मिळाली.
@rajanlad6476
@rajanlad6476 Жыл бұрын
लाल मातीतील गोष्ट....वां, मी प्रथमच म्हणजे रानमाणूस नंतर प्रथमच कोकणांतील युट्यूब चॅनलचं अगदी मनापासून समर्थन करतोय, रानमाणूस आणि रेड साॅईल स्टोरी या दोन्हीं चॅनल्सला अगदी मनापासून शुभेच्छा.
@sairmaharashtrachi
@sairmaharashtrachi Жыл бұрын
आपल्या मातीशी नाते जोडणाऱ्या माणसांना प्रकाश झोतात आणण्याचे खुप छान काम करत आहेस तू भावा त्यासाठी तुझे मनपुर्वक आभार🙏🙏
@nehabagwe6887
@nehabagwe6887 Жыл бұрын
अगदी खर बोललात तुम्ही,तुमचे व्हिडिओ बघून खरंच गावी असल्याचा अनुभव,आनंद मिळतो
@pravinbhosale2807
@pravinbhosale2807 Жыл бұрын
खरंच ग्रेट ..... तुम्ही तिघेही आदर्शवत आहात ..... आणि ही बेटी जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी आहे हे खरंच वेगळेपण आहे ...... तुम्ही सर्व एकत्र आलात तर आपला निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा मोहराने बहरून जाईल ......
@matoshrialloyspvtltd6023
@matoshrialloyspvtltd6023 Жыл бұрын
खूप छान काम करताय आपल्यासाठी व आपल्या माती साठी ग्रेट सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच निरंतर प्रगती करत रहा आपला गाव आपला तालुका जिल्हा राज्य देश खूप खूप शुभेच्छा
@LotusArtnDesign
@LotusArtnDesign Жыл бұрын
आर्टिस्ट आहे म्हणूनच एवढे क्रिएटिव्ह व्हिडिओज आहेत 👌🏻👌🏻👌🏻शुभेच्छा!
@priyaulhassalvi2140
@priyaulhassalvi2140 Жыл бұрын
Villege name please
@chanchalsherekar3708
@chanchalsherekar3708 Жыл бұрын
@@matoshrialloyspvtltd6023 j
@chanchalsherekar3708
@chanchalsherekar3708 Жыл бұрын
@@matoshrialloyspvtltd6023 ppl
@vandanasutavane5736
@vandanasutavane5736 Жыл бұрын
तुम्हा दोघांचे खूप कौतुक व अभिनंदन
@vinayakmone3790
@vinayakmone3790 3 ай бұрын
खरच निसर्ग भरभरून देतो घेणाऱ्यान कस घ्याव याच उत्तम उदाहरण आहे रेड सॉईल स्टोरी गावाला येऊन राहण हा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 Жыл бұрын
मीत्रा तुझ नाव प्रसाद आहे हा प्रसाद तू सगळ्यांना देवाचा प्रसाद समजून वाटून देवा सर्वानाच सुखी ठेव अस तू तुझ्या कृतीतून तू लोकांपर्यंत पोहचवत आहे खुपच सुंदर 🙏👌✌️👍
@user-it1lo5of8o
@user-it1lo5of8o Жыл бұрын
Thanks prasad tuze kokanavarche prem pahun abhiman vatat0
@rajeshkamath3350
@rajeshkamath3350 Ай бұрын
I too am an born and brought up in Bombay man, living peacefully in dharwad. So, liked your decision.😊😊
@madhukarmithbavkar1546
@madhukarmithbavkar1546 Жыл бұрын
छान. देव आपणास सदैव सुखी ठेवो , अशी प्रार्थना करतो धन्यवाद.
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 Жыл бұрын
खूपच छान,तुमचे विचार ऐकून खूप खूप आनंद वाटला,ऐव्हढी शिक्षण घेतलेली मुलगी सर्व सोडून गावात येते ही खूप कौतुकाची बाब आहे,तुमचे इतरही व्हिडिओ मी पाहिले आहेत, तुम्ही जेवण खूप छान करता, तुम्ही या चालू केलेल्या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा,keep it up
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 5 күн бұрын
खूपच छान अगदी खूपच अभिनंदन तुमचे.. आणि तुमचे आपल्या मातीबद्दल असलेला जीवाळा पाहून खूपच छान वाटल..नक्कीच तुम्हांला खुप सारे यश लाभुदे..
@pravinmayekar6169
@pravinmayekar6169 2 ай бұрын
अगदी खरं आहे... आज खरोखर आम्ही विचार करतो आहे गावी जाऊन settle ह्यायचं.... Thanks to प्रसाद आणि ह्या couple..
@shwetathakur4652
@shwetathakur4652 2 ай бұрын
खुप छान आहे कल्पना तुमच्या भविष्यातील सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे हिच सदिच्छा
@satishbelekar4991
@satishbelekar4991 Жыл бұрын
प्रसाद तू खूपच सुसंस्कृत सुंदर आणि प्रेमळ माणूस आहेस, कोकण विषयी असणारी तळमळ आणि मातीशी असलेली नाळ ह्याचा एक संगम आहेस तू , proud of you brother 🙏❤️,
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
प्रसाद तुझं अभिनंदन की तुझ्या माध्यमातून आम्हाला या उभयतां चे नविन व्हिडिओ बघायला मिळाले जे कोकणात येवुन आपल्या मातीतील जीवन शैली अनुभवत आहेत.. खरोखर तुम्ही आदर्श ठेवला आहे आपल्या कोकणातल्या पिढी समोर.. जीवन जगणे ही एक कला आहे.. आणि ते कसे जगावे हे ज्यांनी त्यांनी ठरवावे... भौतिक सुखाच्या पाठी आपण धावुन आपण आपल्या आयुष्यातले मोलाचे क्षण च विसरून जातो, अनुभवत नाहि... छान तुमच्या या नवीन वाटचाली साठी आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा..
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 11 ай бұрын
Tumcya sarkhe saglech rahayla lagle tar nature chi hani honar nahi khup chaan aahat tumhi
@SudhirRasal-qo5hq
@SudhirRasal-qo5hq Жыл бұрын
कोकण आपले स्वर्ग आहे जगाचा पाठीवर
@geetasakpal3910
@geetasakpal3910 Жыл бұрын
प्रसाद ह्या red soil stories साठी मी प्रतिक्रिया तर दिल्याचं आहेत परंतु तुझं सुद्धा कोकणी रानमाणूस ह्या चॅनल वर तुझं कोकणाविषयीचं प्रेम आणि त्याविषयी अतिशय प्रगल्भ ज्ञान, जाण आणि माहिती असणारा प्रसाद गावडे बारसु बद्दल बोलताना ऐकून मी थक्कच आणि कोकण प्रेम पाहून भावूकही झाले. तुझ्याही येणाऱ्या प्रत्येक एपिसोडसाठी आणि कामासाठी खूप खूप शुभेच्छा
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 3 ай бұрын
प्रसाद दादासाहेब तर खूपच लाडका आहे.कोकणाचा जीव की प्राण आहेस. कोकणाबद्दल तुला खूपच आपुलकी आहे हे तुझ्या विचारातून समजतेय. मी दापोलीतील कोकणाचीच एक कन्या आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही तिघेही कोकणातील संस्कृती जपत आहेत याचा खूप आनंद झालाय. पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छापत्र...!! असेच तुमच्याकडून सुंदर प्रेरणादायक कार्य घडत राहुदे .....!!
@madhu_soso
@madhu_soso Жыл бұрын
There story is very inspiring. खूप शहरी माणसांची स्वप्ने अशी असतात, पण ती खरे होण्यासाठी शहर सोडण्याची हिम्मत नसते. तुम्हाला hats off.... आणि, त्या सगळ्याला adapt करणे हे absolutely commendable आहे
@sanjaypatekarvlogs4122
@sanjaypatekarvlogs4122 4 күн бұрын
Sub केले दादा खरंच अभिनंदन मराठी माणूस आपल गाव खरच जपल पाहिजे
@mahendramane299
@mahendramane299 Жыл бұрын
खुप छान असा उपक्रम आहे. मी दुबई मधुन तुमचा प्रोग्राम पाहतो आहे. मला तुमचा अभिमान आहे. असेच व्हिडिओ अपलोड करा. धन्यवाद.
@sanjayghone6624
@sanjayghone6624 Жыл бұрын
खरोखर आपण दोघंही उच्च शिक्षित असून कोकणात जाऊन लोकांन पुढे आदर्श आहात. आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपण करत असलेल्या उदयोगास आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. 💐👍
@shailaapte6136
@shailaapte6136 Жыл бұрын
तरीच म्हटलं... हे ज्या पद्धतीने बनवलंय👌👍.रानमाणूस लाल पण सलाम...दुसर्याच्या चांगल्या कामाची दाद देणं याला मोठं मन लागतं
@miparab
@miparab Жыл бұрын
प्रसाद कोकण सन्मान तुला भेटावा अशी मना पासून इच्छा होती.... असो तुझं कोकणा प्रती प्रेम हाच कोकण सन्मान....
@user-er3fj7ip8y
@user-er3fj7ip8y Ай бұрын
Ho tula betav
@jyotizore4350
@jyotizore4350 Жыл бұрын
तुम्ही ,खरं आयुष्य जगताय👌👌तुमच्या निर्णयाचा हेवा वाटला, प्रेरणा मिळाली,😊😊
@cricketworld4894
@cricketworld4894 Жыл бұрын
अभिमान आहे यांचा।कोंकणाला आशा लोकांची गरज आहे।
@jyotsnadhuri6754
@jyotsnadhuri6754 Жыл бұрын
मला तुमचा हा निर्णय आवडला आणि छानच जीवनशैली दाखवतात येणाऱ्या काळाला तुमचा सारख्याची आवश्यकता आहे
@kishoreesaitawadekar1132
@kishoreesaitawadekar1132 Жыл бұрын
तुम्ही खूप ग्रेट आहात कारण तुम्ही जो गावी राहण्याचा विचार केलात तो खूप सुंदर आहे, तुम्ही हया मुंबईच्या धावापलीतुन बाहेर पडू न एक छान आयुष्य जगत आहात आणि असच प्रत्येक कोंकणी माणसाने आपल्या मातिला धरूंन राहिल पाहिजे तरच आपल्या येनार्या पीढ़ीला आपल्या मातीची ओलख राहिल आणि आपल्या मातीची आवाड ही होई, आणि त्याना आपल्या पणजी आजी लोक कस जगत होते त्यांच्या कालात हे जवलून बघाता येईल
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Ай бұрын
प्रसाद फारच सुंदर वीडीओ बनवला धन्यवाद. 👌👌🙏🙏
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
प्रसाद मस्तच आपल्याला जे आवडतं ते मनापासून केलं की त्यात आनंद मिळतो हे या जोडप्याने दाखवून दिल तू त्यांना हायलाईट केलंस त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
@vikasdabir
@vikasdabir Жыл бұрын
ह्यांना जीवन कळले हो.आजच्या तरुणाईला तुम्ही जोडप्याने आदर्शवत जीवन दाखवित आहात.ब्रह्मचैतन्य सदिच्छा.
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 Жыл бұрын
Sundar jivanshaylee.🙏💐👌
@malatighorpade2939
@malatighorpade2939 Жыл бұрын
पूजा आणि शिरिष , तुमचं खरंच कौतुक वाटतं...!! तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा..!!!
@nandanasalvi
@nandanasalvi Жыл бұрын
खुप खुप छान! हे असे contents आहेत सगळ्या पुरस्कारांच्या लायकीचे! तू आमच्या साठी, भविष्य पिढीसाठी जे काही करत आहेस, त्यासाठी तुला आजन्म पुरस्कार दिले, तरी हे ऋण उतरू शकणार नाही आम्ही🙏
@kalpanashilwane668
@kalpanashilwane668 Жыл бұрын
खरच तुम्ही दोघं दोघं मला खूप आवडते दोघं छान आहेत एवढं खेडेगावात राहता तुम्ही
@shradhagaonkar2474
@shradhagaonkar2474 Жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणाऱ्याआणि मातीशी नाळ जोडून अपार कष्ट करणाऱ्याया जोडप्यासाठीतुझा मोलाचं मार्गदर्शन देऊनआणि कौतुक करूनतुझ्या मनाचा खूप मोठेपणा दिसून आलानवीन लोकांच्या प्रवासासाठीतुझा मदतीचा हात नेहमीच पुढे असतोत्याबद्दल धन्यवादअसेच चांगले कार्य तुझ्या हस्ते नेहमी घडत राहोआणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@raghunathsabale4932
@raghunathsabale4932 Жыл бұрын
तुमचे आपल्या गावाविषयी विचार फार great आहेत best luck ताई for your redsoilstories ☺️
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खूप खूप छान आहे मी गावला गेलं नैसर्गिक वातावरणात जे सामाधन मिळेल तेवढे कोठे नाही आपण नैसर्गिक साधनसंपत्ती जवळ येत आयुष्यात कोठे धावपळ नाही आयुष्य एकदम समाधान मिळतं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासारखं सुख कुठे आहे का . मुंबईमध्ये रंगबिरंगी आयुष्य आहे. त्यामध्ये पैसा पैसा फक्त दिसतो दिसतच नाही त्या पैशाच्या पाठीमागे पळता पळता आयुष्य निघून जातात काही मिळत नाही सुखाची जेव्हा आनंद मिळतो तेव्हा खूप खूप आजार लागलेले असतात. जेव्हा आजार होतात तेव्हा कळतं की आपण काय मिळालं पैसा करून आणि काय सुख मिळालं
@motivationshortsvalavj792
@motivationshortsvalavj792 Жыл бұрын
Khup Chan video ahe
@jayprakashnarkar9012
@jayprakashnarkar9012 Жыл бұрын
छान.सुंदर.साधं.निसर्गाचा सुंगध.आणि रंग आहे.
@jyotsnakhamkar3854
@jyotsnakhamkar3854 Жыл бұрын
खूप सुंदर सुरेख छानच
@sachinthakur-ex8yi
@sachinthakur-ex8yi Жыл бұрын
प्रसाद तुला follow करता करता मलापण अचानक pop up आला होता पण त्यांच्या लोकल receipe bhagat गेलो आणि फार पूर्वी पासून follow करत आहे प्रसाद u all r doing great job
@MsBlueshark
@MsBlueshark Жыл бұрын
Kiti sunder!!!
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Жыл бұрын
वा.फारच छान वेगळेपण जपणारा व्हिडिओ.तुझं तसंच या कपलचं खुप/ खुप कौतुक.अशा लोकांना खुप प्रसिध्दी मिळाली पाहिजे.यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.बाळांनो खुप छान काम करताय.तुमचं अभिनंदन.तुमच्याकडे भेट द्यायची झाली,तर कसं यायचं? कळेल कां?
@sudhakarwate7294
@sudhakarwate7294 Жыл бұрын
Excellent unique turn in life by enjoying kokan stay instead of routine boring life hearty congrats to their wo rk,,Sudhakar Wate,Architect
@user-tn2qy2mw4f
@user-tn2qy2mw4f Жыл бұрын
Khup sunder video v khup changle vichar
@SALKARSHAILESH
@SALKARSHAILESH Жыл бұрын
Khoopach sundar ... khoop saarya shubheccha...
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 Жыл бұрын
तुम्ही खरं आणि सुखी आयुष्य जगत आहात.. खुप खुप.शुभेच्छा
@madhurimhatre1023
@madhurimhatre1023 3 ай бұрын
ताई मला तुमचा चैनल बघायला खूप आवडतं आणि सतत मी तुमच्या रेसिपीज बघत असते पण मी स्मार्ट टीव्ही वरती बघत असते ते मला लाईक करायला येत नाही तुमचं चैनल बघितले की मी कोकणातच आहे असे मला वाटते खूप आवड आहे माझा स्वतःचा आयुर्वेदिक मेडिकल आहे मी अशी सगळीकडे फिरत असते औषध गोळा करण्यासाठी जुन्या सगळ्या आठवणी जाग्या होतात त्याबद्दल धन्यवाद
@devdaschavan926
@devdaschavan926 Жыл бұрын
प्रसाद ऊतम ठीकानि पोहचला योग्य मार्गदर्शन ऊतम जोडप्यातील विचार मातीत मिसळून मातीसाठी काम करण्याची तयारी खुपच भारी वाटले नमस्कार 🙏
@vivekthakare6734
@vivekthakare6734 Жыл бұрын
खुप छान वीडियो आणि स्टोरी 💐💐👌👍👍
@priyakadam
@priyakadam Жыл бұрын
खूप अभिमान वाटतो आहे तुम्हा दोघांचे, मलाही असेच जगायला आवडेल. All the very best to your work
@shailabagwe393
@shailabagwe393 Жыл бұрын
अप्रतिम,खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
@priyankakadam83
@priyankakadam83 Жыл бұрын
Shirish ani pooja very proud of u both....khup inspire aahat tumhi new generations la...long way to go....keep doing more videos....my best wishes are always with u...
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 9 ай бұрын
प्रसाद खरंच तुम्ही तिघंही आदर्शवतच आहात. मनस्वी अभिनंदन. पण हे नेमकं कोणतं गांव आहे?
@sonalijadhav7184
@sonalijadhav7184 Жыл бұрын
प्रसाद दा तुझ्यामुळे आणि अश्या लोकांमुळे कोकणातलं असल्याचे अभिमान आहे.great
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Жыл бұрын
नक्की.फुल सपोर्ट.काय सुंदर जागा आहे..वा!
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ ग्राफी केली आहे तुला घेऊन जाईल तो खूप छान जेवण बनवात असं आयुष्य जागचा प्रयत्न केला पाहिजे नैसर्गिक वातावरणात माती भाडीत जेवण बनवायला वेगवेगळ्या टेस्ट येत असेल माझ्या आयुष्यात असं जगणार मी एकटाच आयुष्य
@aniketkolambekar8107
@aniketkolambekar8107 10 ай бұрын
Great mala pratek vakya made sahare ale and i am very much inspired.... Thank you🙏🙏
@devdaschavan926
@devdaschavan926 Жыл бұрын
खरच ऊतम आज जे जिवन व्यतीत करत आहेत ते ऊतम मार्गदर्शन आहे तरून पिढीतील लोकांवर मनापासून प्रेम करून विडीओ बनवावेत
@kokanvaibhav2264
@kokanvaibhav2264 Жыл бұрын
अरे,काय हे ,यू आर ग्रेट कोकणी माणूस, आम्हां शहरातील लोकांना सुध्दा असेच काही तरी करावे असे वाटत असते,मात्र अनेक अडचणी असतात.मात्र तुम्ही खूप धाडस केलं, तुमचं खरंच अभिनंदन ! आम्ही तू तुमच्यात आम्ही पाहतो .
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka Жыл бұрын
सुंदर Very inspirational 👌👌👌😀
@Anushka_Vengurlekar
@Anushka_Vengurlekar 5 ай бұрын
फारच छान
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Khupch sundar mahiti.
@udayadhatrao6304
@udayadhatrao6304 Жыл бұрын
खरच तुम्ही खुप असामान्य अहात उत्तरोत्तर उत्तरोत्तर आपली तिघांची प्रगती होवो ही देवाकडे प्रार्थना
@manasimukhare3345
@manasimukhare3345 Жыл бұрын
खूप छान , मला तर हा सेट वाटला मी 1 विचारलं पण होत, कोकण इतकं सुंदर आहे हे आता कळल
@ujwalak4204
@ujwalak4204 Жыл бұрын
Kiti sunder nisarg watawaran🙏👍🏻
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын
खुप छान काम करंत आहेत हे दोघे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा
@Nana_Rajgad
@Nana_Rajgad 10 ай бұрын
खूप छान ! 👌👍
@manishabhoirkar7502
@manishabhoirkar7502 Жыл бұрын
Khup chan ahe
@sushamapathak6369
@sushamapathak6369 Жыл бұрын
खरच खूप चांगला प्रयत्न आहे खूप खूप शुभेच्छा
@vj7465
@vj7465 Жыл бұрын
Khup chhan...👌
@vilassawant8286
@vilassawant8286 Жыл бұрын
फार छान
@sunetramainkar5138
@sunetramainkar5138 Жыл бұрын
Bhari....khup bhari
@aaratisawant6699
@aaratisawant6699 10 ай бұрын
खरच खुप मस्त केलांत की तुमी दोघांनीही गावीच्या निस॔गाची निवड केलात कारण या सर्व॔ गोष्टीची तम्हा दोघांनाही आवड आहे ते अगदी छान झाले आणि खरच मुंबईच्या जगात राहुन दगदग ताण आजार प्रदुषण या शिवाय आता तिथे काहिच राहिले नाही त्यापेक्षा आपले गावच चांगले आणि मस्त तुम्हा दोघांना खुप खुप प्रेमळ शुभेच्छा मस्त लाईफ जगा ❤
@sandhyashah9374
@sandhyashah9374 Жыл бұрын
All the best wishes to both of you !! God bless you ! Proud of you as I am also from Konkan 👍keep it up
@user-le6ct5zu3v
@user-le6ct5zu3v Жыл бұрын
आज समाज्याला तुम्हच्या सारख्या माणसांचा आदर्श 🙏
@shravanikadam8084
@shravanikadam8084 Жыл бұрын
खूप सुंदर विचार🙌🙌🙌
@sugandhabait3751
@sugandhabait3751 Жыл бұрын
लाल माती..... कोकण ऐकुन मन प्रसन्न झाले अशाच छान छान गोष्टी सांगा
@sharwarimhatre4389
@sharwarimhatre4389 Жыл бұрын
हॅलो प्रसाद, पूजा आणि शिरीष, तुमचा हा व्हिडीओ खूपच आवडला, प्रसाद तुझे तर सगळेच व्हिडिओ आम्ही बघतो, ज्या तळमळतेने तू कोकणासाठी काम करतोयस, कोकणातलं निसर्ग सौंदर्य लोकांसमोर आणतोयस, तिथल्या दुर्मिळ वनस्पती जपण्याचा प्रयत्न करतोयस ते खरंच कौतुकास्पद आहे, आणि आता पूजा आणि शिरीष तुझ्या जोडीला आहेत, खरंच खूप छान वाटतंय, पूजा तुझं स्वयंपाकघर तर इतकं सुंदर आहे, साधं स्वच्छ आणि नीटनेटकं, ती सारवलेली चूल, मातीची भांडी, फडताळातल्या बरण्या अगदी बघत राहावंसं वाटतं, राजा आणि मोगलीही आम्हाला खूप आवडतात, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा
@r.n.bansode
@r.n.bansode Жыл бұрын
मला प्रसाद दादाचे सगळीच व्हिडिओ आवडतात आणि आज प्रसाद दादाला तुम्ही सुद्धा आवडलात म्हणजेच आम्हा सर्वांना आवडलात
@sachinkhambe113
@sachinkhambe113 Жыл бұрын
खरचं great channel red soil
@purvadalvi5301
@purvadalvi5301 Жыл бұрын
Shirish & pooja i will proud of you thanks
@nehamohite8549
@nehamohite8549 Жыл бұрын
Great 👍watching beautiful nature with Pooja & Shirish 😘😘
@user-ei8ln3ox1f
@user-ei8ln3ox1f 14 күн бұрын
Khup sundar tumhi gret aahat balpanichi aathavani m😮atitya bhandya til culivarche jevan majhi juni aathvan jagi kelit thank pooja and shirish
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 Жыл бұрын
खूप छान........ तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा........
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ छान माहिती दिली आहे सर्वांचे मनापासून स्वागत आहे 👌👌
@deepagupte6955
@deepagupte6955 Жыл бұрын
Amazing couple and beautiful videos and great recipes.
@geetathakare5797
@geetathakare5797 Жыл бұрын
छानच
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 Жыл бұрын
👌👌खरच खुप प्रभावित केलेत. वाईटातून चांगलेच होते याचे ऊदाहरण तुम्ही दाखवून देत आहात. कोरोना कालखंड वाईटच होता पण त्यातुन तुम्हास नवीन दिशा मिळाली. आणि हेही खरे आहे कि गावात रहायची आवड असायला हवी ओढुन ताणुन नाईलाज म्हणून गावी आलो यात अर्थ नाही. आवड तुम्हास इथवर घेऊन आली. यामुळे इतर सुशिक्षित तरुणांना inspiration नक्कीच मिळेल तेही अक्षरशा गाव घर विसरलेत त्याना ओढ लागेल. आणि तसे झाले तर कोकण परत सुजलाम सुफलाम होईल. तुमच्या प्रयत्नास भरघोस यश लाभो अशा शुभेच्छा व आशीर्वाद. 👌👍🙏🙏
@deepalimundye4704
@deepalimundye4704 Жыл бұрын
Khup khup shubhesha
@deepapawase3114
@deepapawase3114 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर घर आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहून तुम्ही स्वर्ग सुख अनुभवत आहात तुमचा जीवन प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा मला देखील निसर्गा मध्ये राहायला खुप आवडते मी पण कोकणातली आहे धन्यवाद जय सदगुरू 🙏
@makarandpitre6638
@makarandpitre6638 Жыл бұрын
Great video
@jyotitergaonkar6224
@jyotitergaonkar6224 Жыл бұрын
खूप छान उपक्रम राबवत आहात पूजा ताई आणि दादा..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐
@Mbd6973
@Mbd6973 Жыл бұрын
Congratulations to you both 🎉 i can relate myself with you both as I am waiting to go and enjoy myself with the nature which God has blessed us with 🙏 Happiness and success is where your ❤️is 🙏 can see success and happiness on your face 🎉 God bless you all 🎉
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 11 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 25 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 6 МЛН
THE FLOOR IS LAVA 🌋🔥! Blippi Watch Out! #blippi #shorts
0:55
Blippi - Educational Videos for Kids
Рет қаралды 24 МЛН
Когда ты младший в семье
1:00
Ерболат Жанабылов
Рет қаралды 4,3 МЛН
❗малой пива, захотел а получил..😅 #pov #story
0:47
Перезаливы Skeepoffa
Рет қаралды 2,8 МЛН
Медвежий папа
1:00
Timminator
Рет қаралды 7 МЛН