Рет қаралды 756
#fort #pune #shivajimaharaj #sahyadri #maharashtra #mahadev #oneday #fort #fortinmaharashtra #near #pune #malhargad #saswad #pune #last #fort #easy #trek #trekking #sahyadrisukh #सह्याद्रीसुख #maharashtra #places #maharashtra #trekking #vlogs
मल्हारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.पुणे शहराजवळील सासवड या गावानजीक हा किल्ला आहे.
पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीवराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो.
या किल्ल्याची बांधणी मराठा चे सरदार भीमराव पानसे यांनी केली.भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.गडाचे बांधकाम मराठांच्या तोफखान्याचे सरदार श्री भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन १७५७ ते १७६० या तीन वर्षात बांधून पूर्ण केले.
कसे जावे?
स्वारगेट -- कात्रज --खडीमशीन चौक --बोपदेव घाट--सासवड -सोनोरी (मुख्य प्रवेशद्वार ) किंवा झेंडेवाडी (दिंडी दरवाजा )--किल्ले मल्हारगड (35-40 किमी )
खर्च?
200-300 रुपये पेट्रोल
50-100 रुपये नाश्ता -
वेळ?
जाणे -येणे 1-2 तास
Music:Views
Musician:Ikson
License:ikson.com/trac...