No video

मुलं जाणून घेताना | मुलांशी अनौपचारिक गप्पा | आनंददायी शिक्षण | संवाद कौशल्य

  Рет қаралды 1,561

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

लेकरांना आपलंसं करायला हवं. त्यांच्यासोबत लहान होऊन गप्पा मारल्यानंतर खऱ्या ती खऱ्या अर्थाने अभिव्यक्त होतात. त्यांच्या मनातील प्रांजळ, नितळ, निरागस भावना बाहेर पडतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला सखोल माहिती होते. चिकू हा जून २०२४ मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारा चिमुकला. तो शाळेत पहिल्यांदाच आला. वर्ग पूर्व तयारीच्या वर्गासाठी त्याला शाळेत आणलं. त्याला शाळा सहज वाटावी यासाठी त्याच्यासोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. चिकू सोबत बोलताना खूप मज्जा आली, खूप हसलो तर काही वेळा अंतर्मुखही व्हायला लावलं. आई-वडिलांसोबत बैलही कारखान्याला गेले आहेत हे तो किती सहज होऊन सांगतो आहे. स्वतःच दुःख लपवून आनंदी कसं जगायचं हेच ही परिस्थिती या लहानग्यांना शिकवत आहे. किती वाईट असतं पोटच्या गोळ्याला घरी ठेवून ऊस तोडणीसाठी स्थलांतर होणं. आई-वडिलांना किती अवघड जात असेल. इथला संघर्ष कधीच संपत नाही. आयुष्याचं दुसरं नाव संघर्ष आहे. विविध पातळयांवर जाऊन सातत्याने मानवी जीवनात संघर्ष चालू असतो. लहानगा चिकूही त्यातून सुटला नाही.
लेकरांमध्ये खूप मजा येते. चिकू सोबत गप्पा मारल्यानंतर चिकूलाही शाळा शिक्षक आपलेसे वाटू लागले. आपल्या मताला इथे आदर आहे. आपले आस्थेवाईकपणे कोणीतरी चौकशी करत आहे त्यामुळे तोही शाळेत रमला. पंधरा दिवसांपूर्वी काढलेला हा व्हिडिओ पाठवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जगण्यातील निरागसता आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल. सर्व काही आपल्याकडे असून सुद्धा आपण निराश होतो हताश होतो मात्र ही लेकरं आपल्या जगण्याची प्रेरणा बनत आहेत. थोडं त्यांच्यासारखं होऊन जगूयात.
वर्ग पूर्व तयारी | दाखल पात्र मुलांची शाळा | इयत्ता पहिली |#गप्पा #अनौपचारिकगप्पा #अभिव्यक्ती #वर्गपूर्वतयारी #पहिली #धनगरवस्ती #लहूबोराटे #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach #lahuborateteachshorts #Dhangarwasti #learnwithfun #viralshorts #viralvideo #viralreels

Пікірлер: 7
@mohammadjabir1574
@mohammadjabir1574 5 ай бұрын
खूप छान सर मुलांसोबत अशा मनमोकळेपणाने गप्पा केल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जवळीक निर्माण होते, व दैनंदिन अध्यापन सोपे होते.
@Kavitapatil8368
@Kavitapatil8368 5 ай бұрын
भारी हा सर असं असेल तर मुलं हासत हासत येतील शाळेत
@Kavitapatil8368
@Kavitapatil8368 5 ай бұрын
पोरगं फार हुशार आहे
@mymarathischool9135
@mymarathischool9135 5 ай бұрын
अनौपचारिक खुप छान गप्पा पद्धत..
@dr.shashikiranraod.kolekar4578
@dr.shashikiranraod.kolekar4578 5 ай бұрын
सन्माननीय लहुजी बोराटे सर, आपण लहान मुलांना खूप छान पद्धतीने शिकवत आहात. अशाच पद्धतीने मुलांना शिकवले तर भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबाच्या स्वप्नातील भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. असे मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप प्रामाणिक कष्ट असावे लागतात, इच्छा असावी लागते. सर नक्कीच तुमच्या अशा प्रकारच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीने मुले खूप मोठी होतील, संस्कारी होतील आणि त्या मुलांच्या माध्यमातून आपल्याला पुण्य आणि आशीर्वाद मिळेल. आपणास अशाच प्रकारच्या शैक्षणिक, मनोरंजक, संस्कारी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@Gourav_Patil7963
@Gourav_Patil7963 5 ай бұрын
4:14pillay😂
@Gourav_Patil7963
@Gourav_Patil7963 5 ай бұрын
purgi hy leka😅😂 3:25
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 27 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 2,3 МЛН
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
वेळेनुसार बदलायला शिका ! प्रेरणादायी व्याख्यान | Ganesh Maharaj Shinde Motivational Speech
16:19
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 1 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН