Рет қаралды 14,929
मोदी लाटेत स्वतःचा नेवासा हा बालेकिल्ला शाबूत ठेवणे सोप्पे नव्हतं. 2014 ला झालेली चूक सुधारुन, या माणसाने 2019 ला अपक्ष लढून थेट विजयी होत शिवसेनेतून मंत्रीपद मिळवलं. नुसतं मिळवलंच नाही, तर मिळालेलं जलसंधारण खातं, हे 'पाणीदार आमदार' स्वतःच्या बिरुदावलीला शोभेल असं संभाळलंही. शिवसेनेतील तोडफोडीनंतर हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहिला. ज्यांनी मंत्री केलं, त्यांच्याशी कृतज्ञ राहिला. यशवंतराव गडाखांनी मला आ. शंकरराव गडाखांसारखा लढणारा सैनिक संकटकाळात दिला, असं स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले होते. शंकरराव गडाखांच्या बालेकिल्ल्याची, अर्थात नेवासा तालुक्यातील येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर नेमकी काय आहे स्थिती, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...