My Book Shelf : 'अनुनाद' आणि 'मध्यरात्रीनंतर चे तास' | Spruha Joshi Poems

  Рет қаралды 10,708

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

अनुनाद आणि मध्यरात्रीनंतर चे तास या दोन खूप सुंदर पुस्तकांबद्दल काही गोष्टी ह्या व्हिडिओ मध्ये share करते आहे.
तुम्हाला कसा वाटतं ते नक्की कळवा आणि हो , चॅनेल ला Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi #Books
__________________
Credits
___________________
Edit:
Angad Joshi
Costumes:
Kriva Studio
Special Thanks:
Dr Alka Ranade
Anurag Pathak
Pornima Khadke
Soham Kurulkar
Created By :
Nachiket Ashok Khasnis
_______________________
About Spruha Joshi :
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
For More Updates :
Facebook : / spruhavarad
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad
Email : team@brewbackers.com
______________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 87
@dr.sadanandpatil8644
@dr.sadanandpatil8644 2 жыл бұрын
अनुनाद पुस्तकं ऑनलाईन कोठे व कसे मिळेल.
@GSKHappyLearning
@GSKHappyLearning 2 жыл бұрын
Tai अनुनाद पुस्तक कुठे मिळेल , ऑनलाईन विकत घ्यायचे आहे , अमेझॉन वर kindle वर च दिसले, मला hardcopy हवी आहे...
@priyankabarde2396
@priyankabarde2396 2 жыл бұрын
Spruha tai zakass pustk pareechay
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
स्पृहाताई, तु हे पुस्तक नक्की वाच. ट्यूॅजडेज विथ मॉरी - Tuesdays With Morrie मुळ लेखक : मिच अल्बम मराठी अनुवाद : कीरण नारायण मोघे इंग्रजी प्रकाशन : स्पिअर पब्लिकेशन मराठी प्रकाशन : मंजुळ पब्लिशींग हाऊस पृष्ठ संख्या : २१८ | किंमत ₹ २९९/- मुल्यांकन : ४.३ | ५ बाबूमोशाय “जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” असं एखाद्या आजारग्रस्त माणसाने सोडाच पण आपल्या सारख्या धडधाकट माणसाने का होईना म्हणायला आणि जगायला हवं अशी बॉलीवूडचा आनंद सिनेमा बघितल्यानंतर आपसूकच आपली सगळ्यांकडून एक अपेक्षा होऊन गेलेली आहे. हे म्हणनं, ऐकणं आणि बघणं जेवढं सोपं आणि छान आहे तितकच प्रत्यक्षात उतरवताना मात्र कठीण काम आहे पण अर्थातच असाध्य नाही. पण तरीही सतत एक प्रश्न आपल्या डोक्यात येत राहतो की, खरंच आनंद बाबूमोशायला म्हणतो तसं ‘लार्जर दॅन लाईफ’ जगू शकत असेल का कोणी?, खरंच स्वतःचं मरण समोर दिसत असतानाही राहू शकत असेल का कोणी आनंदी? आणि एक दिवस अचानक आपल्याला कळतं की दूर कोण्या एका देशात, कोणी एक आयुष्यावर ‘निरागस’ प्रेम करणारा शिक्षक मरणाच्या दारात उभं असताना खरंच बॉलीवूड मधल्या आपल्या आनंद सारखं किंबहुना त्यापेक्षाही लाखपटीने जास्त चांगलं जगतो त्याहीपेक्षा म्हणता येईल की जास्त चांगलं जगायला शिकवतो; आणि हे सगळं त्या शिक्षकाचा कोणी एक विद्यार्थी त्याच्या लेखणीने मांडतो आणि ते पुस्तकरूपात आपल्या हातात येतं आणि याआधी कधीही जितकं भावलं नसेल तितकं ”जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए” हे वाक्य आपल्याला भावतं. तर हा दूर कोण्या एका देशातला आयुष्यावर निरागस प्रेम करणारा आणि मरणाच्या दारात उभा असलेला शिक्षक म्हणजे मॉरी आणि त्यांचा कोणी एक विद्यार्थी म्हणजे मिच (Mitch) आणि मिचने आपल्याला त्याच्या लेखणीतून जो पुस्तकरूपी ठेवा दिलाय तो म्हणजे ‘ट्यूॅजडेज विथ मॉरी’ हे पुस्तक! ”We are Tuesday people” असं म्हणत मॉरीच्या शेवटच्या काळात दर मंगळवारी मिचने त्यांच्या सोबत मारलेल्या गप्पा म्हणजे हे पुस्तक आहे. आपल्या जवळच्या आणि आवडत्या शिक्षकाला ALS सारखा आजार झालाय हे काळताच गेल्या कित्येक वर्षात स्वतःच्या आयुष्यात प्रचंड बिझी, सक्सेसफुल आणि अर्थातच स्वतःसाठीही थांबायला उसंत नसलेला मिच त्याच्या ‘कोच’ बाबतची ही माहिती कळताच अचानक थांबतो. कॉलेज सुटल्यानंतर आजपर्यंत इतक्या वर्षात आपल्या कोचशी त्याचा काहीच संपर्क नसतो तेव्हा आता त्यांना भेटायला जावं की नाही?, ते आपल्याला ओळखतील की नाही? आणि मुळात एवढ्या बिझी शेड्यूल मधून त्यांच्यासाठी वेळ काढून जायला हवं की नाही? असे असंख्य प्रश्न मनात घेऊन मिच अखेर त्याच्या कोचला एकदा भेटायला जातो आणि नंतर ते असेपर्यंत सतत न चुकता दर मंगळवारी तो सतत त्यांना भेटतच राहतो. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्टावर लिहिलंय तसं ह्या पुस्तकात तुम्हाला ‘An old man, a young man and life’s greatest lesson’ ह्याविषयी वाचायला मिळतं. हे पुस्तक दिसायला जेवढं छोटं आणि वाचायला जेवढं सोप्प आहे तितकच आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रश्नाचं (‘what is meaning of life?’) उत्तर देणारही आहे. दर मंगळवारी प्रेम,लग्न,पैसा, भावना, कुटुंब, मृत्यू इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर मारलेल्यया सहज आणि साध्या गप्पा आपल्याला खरंच आयुष्याचे खूप मोठे धडे देऊन जातात. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे मरण समोर असताना त्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सामोरं जायची एका सामान्य माणसाची धडपड आहे; पण तीच सामान्य धडपड मॉरींनी त्यांच्या विचारांमुळे असामान्य केली आहे. तुम्हाला हे सगळं वाचून वाटेल की हे पुस्तक कदाचित एक उदासीनतेची लकेर तुम्हला देईल पण विश्वास ठेवा पूर्ण पुस्तक वाचताना एक स्मित कायम तुमच्या मनात असेल; आयुष्याचा अर्थ नव्याने कळालेलं स्मित, नात्यांचा नव्याने अर्थ उलगडलेलं स्मित,आयुष्यात काहीतरी चांगलं करायची वेळ गेलेली नाही ह्या जाणीवेचं स्मित, एका गुरु शिष्याच्या निरपेक्ष नात्याचा अनुभव घेतलेलं स्मित आणि सर्वात शेवटी हे पुस्तक वेळेत आपल्या हाती पडलं ह्यासमाधानचं स्मित! तेव्हा लवकरात लवकर हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा.
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
फार सुंदर 🙂❤
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
फार सुंदर 🙂❤
@prachijoshi3820
@prachijoshi3820 2 жыл бұрын
मध्य रात्री नंनतरचे तास आता चालू केलं वाचायला. Thank you for recommending
@sujatakhare5543
@sujatakhare5543 Жыл бұрын
मी कोल्हापुरचीच आहे. माझी सोनालीशी चांगली ओळखही आहे.सोनाली खरच उत्तम लेखिका आहे.तिचा interview ऐकायला नक्कीच आवडेल.
@rakshandasonje6101
@rakshandasonje6101 2 жыл бұрын
राजीव पुरुषोत्तम पटेल यांच्या अध्यात्मिक आणि वैदिक संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कादंबऱ्या नक्की वाचा. मी वाचलेल्या कादंबऱ्या- वैदिक आणि याज्ञवल्क्य.
@tanvigawde8634
@tanvigawde8634 2 жыл бұрын
Tai tu Kaalkallol hey pustak Nakki Vachun bagh.
@मोकळंमन
@मोकळंमन 2 жыл бұрын
Maz aaj "अंबानी & सन्स" झाल वाचून. "हाॅमिश मॅकडोनाल्ड" यांच साकेत प्रकाशन Atta उद्या किंवा 2 3 दिवसामधे "The Secret" "हीरो" "रॉन्डा बर्न" Start krnar... "अनुनाद" आणि "मध्यरात्रीनंतर चे तास" वाचायला नक्कीच आवडेल. Chan Explane kel so... Nkki nkki milale ki read krnar
@gahininathnelwade9868
@gahininathnelwade9868 2 жыл бұрын
Thank you
@nandkishorlele5888
@nandkishorlele5888 2 жыл бұрын
आपलं निवेदन यातून ही पुस्तकं लवकर वाचायला हवीत अशी उत्कट इच्छा होते आणि पुस्तकांचं वैविध्य लक्षात घेता जरी पुस्तक लगेच नाही हाती आलं तरी ते पुस्तक dairy त लिहून ठेवल्याने पुस्तकांच्या दुकानात ती विकत घेताना, अथवा वाचनलायातून आणताना खूप उपयोग होतो.किती आभार मानू ही साहित्य सेवा म्हणजे सरस्वतीची सेवा आहे.आमच्याकडे साहित्यिक चर्चा/ कट्टा व्हॅटसप ग्रुप वर हे video आम्ही share करतो.
@nandkishorlele5888
@nandkishorlele5888 2 жыл бұрын
dairy च्या ऎवजी डायरी असं कृपया वाचावं.
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
🙂🙏🏻
@prajyotdeshmukh2673
@prajyotdeshmukh2673 2 жыл бұрын
आज समजलं की सोनाली नवांकुळ यांनी अनुवाद केलेले 'मध्यरात्री नंतरचे तास' या पुस्तकाची दखल MPSC ने का घेतली असावी. combine 2021 विचारलेला प्रश्न फक्त पुरस्कार पुरता मर्यादित नव्हता . तर या पुस्तकाची ओळख , जाणीव सर्वाना व्हावी असेही असू शकते. Thank you 😊🙏
@Priya-ss7hc
@Priya-ss7hc 2 жыл бұрын
खरय...❤
@advitaanimasti....majja...5103
@advitaanimasti....majja...5103 Жыл бұрын
Hi spruha... mi tuze books che recommendation baryapaiki follow krtey... tyat Tandav, Wonder hi mala khupach awadli... tula ek suggest karaycha hota... 'marubhumitil mrudgandha' he Dr Shrikant Mundargi yancha pustak tu vachla ahes ka? Aslyas tyacha review dilas tr chhan hoil aani nslyas ekda vachun bgh.. kharch chhan ahe... Waris Diery ya eka super model chi biography ahe... Riya publications cha ahe..
@pratikdeshpande3304
@pratikdeshpande3304 2 жыл бұрын
Spruha tai khupach sundar hota ha video aani ti donhi books mala aataa vachaychich aahet.... Dr.Pratik Deshpande
@PalSInBeautifulWorld
@PalSInBeautifulWorld 2 жыл бұрын
👌❤👌❤स्पृहा या उपक्रमाद्वारे अनेक नवनवीन पुस्तके आणि लेखक यांच्याशी आपोआपच ओळख होत आहे. स्पृहा तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नासाठी तुझे खुप खुप आभार 👌❤👌❤
@niveditamahanur796
@niveditamahanur796 2 жыл бұрын
Khup chhan ahet pustak .... Madhyaratrinantr che tas...
@apurvadeshmukh9739
@apurvadeshmukh9739 2 жыл бұрын
He pustak mala kuthe milel? Paperback not available on Amazon
@prajaktaghareganpule2101
@prajaktaghareganpule2101 2 жыл бұрын
Khup mast... Hi donhi pustak vachaylach nakki avadtil.... E-books available ahet ka.... Me sadhya abroad la ahe tyamule Marathi pustancha vachan kami zalay Thoda guidance milala tr chan hoil
@nehalimaye5974
@nehalimaye5974 2 жыл бұрын
Anunad is available on Amazon kindle in ebook form 😊
@prajaktaghareganpule2101
@prajaktaghareganpule2101 2 жыл бұрын
@@nehalimaye5974 oh... That's great.... Khup khup thank you Neha tai
@nehalimaye5974
@nehalimaye5974 2 жыл бұрын
धन्यवाद, ई बुक Amazon वर उपलब्ध आहे😊
@ganeshgodawale6640
@ganeshgodawale6640 2 жыл бұрын
पुस्तक कुठे आणि कसे उपलब्ध होणार
@arunsatam
@arunsatam 2 ай бұрын
खूप छान परीक्षण
@harishuike5965
@harishuike5965 10 ай бұрын
अत्यंत उपयोगी असा उपक्रम ❤
@sanglifood
@sanglifood 2 жыл бұрын
मी तुमचा सर्वात मोठा fan आहे..🤗🤗
@dikshabhosale6805
@dikshabhosale6805 Жыл бұрын
Anunad he book kute bhetel mala please sanga
@dattasudrik4781
@dattasudrik4781 2 жыл бұрын
*my book self* मधून आम्हाला विविध पुस्तके आणि लेखक/लेखिका यांच्याविषयी माहिती मिळत आहे. पुस्तकांद्वारे प्रेरणा मिळत आहे.आणि तू ज्याप्रकारे माहिती present करते, ती तुझी पद्धत खूप छान आहे.👍
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 жыл бұрын
Hie स्पृहा ,,,मी कोल्हापूर मध्ये रहाते,,,मला वाटत सोनालीताई सुद्धा कोल्हापूर मध्ये रहाते ,,,, सगळ्यात आधी मी हे पुस्तक आणते ,,आम्ही म्हणजे मी आणि माझे अहो आम्ही दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत ची पुस्तक विकत घेतो ,,,व ज्यांचे वाढदिवस किंवा काही कार्यक्रम असतील तर पुस्तक किंवा एखाद रोप भेट देतो ,,तर कोल्हापूर मध्ये मेहता किंवा राजहंस प्रकाशन मधून पुस्तक घेतो तेव्हा हे पुस्तक मी नक्की विकत घेऊन वाचते नक्की ,,,,,,बाकी तुझ्याकडे बघून एक प्रकारची शांतता वाटली ,,,,,,तू एक समाजभान असणारी कवियत्री आणि अभिनेत्री आहेस अशीच रहा नाहीतर जाणिवा बोथट झालेले खूप लोक अवती भवती आहेत त्यांच्याकडे बघितल्यावर मन विटत पण तुझ्याकडे बघून ,,,,मन अगदी निवून गेलं ,,खूप बरं वाटलं ,,,तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा🙏🙏🙏🌷🌷🌷💐💐💐😘😘😘😘loves you lot
@शालेयअभ्यास
@शालेयअभ्यास 2 жыл бұрын
बारकोडचा वापर प्राथमिक शिक्षणातील पाठ्यपुस्तकात असतो...छान रितीने पुस्तक परिक्षण केलेय स्पृहाताई🙏
@meenawalanju5452
@meenawalanju5452 2 жыл бұрын
व्हिडिओ आवडला. धन्यवाद
@dipeekarawal5982
@dipeekarawal5982 2 жыл бұрын
Are vah ha barcod cha prayog mustach….
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
द डायरी ऑफ मेरी बर्ग मुळ लेखक : मेरी बर्ग डायरी संपादन : एस. एल. श्नाइडरमन, सुसान पेंटालिन मराठी अनुवाद : शोभना शिकनीस पृष्ठ संख्या : २२८ | किंमत ₹ १८०/- 29 ऑगस्ट 1939 रोजी दुसरे महायुद्ध घोषित झाल्यानंतर मेरी बर्ग अवघ्या पंधरा वर्षांची होती जेव्हा ती तिच्या कुटुंबासह लोडा येथे गेली होती. जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा परिस्थिती गोंधळलेली होती आणि जर्मन लोकांनी शहरावर बॉम्बफेक सुरू केली होती. इतर हजारो ज्यूंप्रमाणेच बर्ग कुटुंबानेही वॉर्सा येथे जाण्याचा निर्णय घेतला. हा एक भयंकर प्रवास होता आणि त्यांनी आगीने वेढलेली गावे, रस्त्यावर मरणारे लोक, धूळ आणि धुराचे ढग, अन्न आणि पाण्याची घाण आणि दळणवळणाचे कोणतेही साधन पाहिले नाही. कुटुंब वॉर्सा येथे पोहोचल्यानंतर, बॉम्बस्फोट सुरूच होते. वॉर्सा शहराला अन्नधान्याचा पुरवठा संपुष्टात येत होता आणि शेवटी शहराला वेढा घातला गेला. ती खूप हुशार होती आणि तिच्या डायरीमध्ये तिची रेखाचित्रे, तिच्या शिक्षकांची, तिच्या मैत्रिणींची आणि काही ग्राफिक घटनांचा समावेश होता जसे की निराधार मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधत आहेत इ. एस. एल. श्नाइडरमन, सुसान पेंटालिन यांच्या सहाय्याने, मेरी बर्गच्या डायरीवर काम केले. संशोधन केले, संपादित केले आणि नंतर ते इंग्रजीतही प्रकाशित झाले… मेरी बर्गची डायरी वाचताना, विश्वास बसणं कठीण असा इतिहासाचा काळाकुट्ट कालखंड वाचकांच्या डोळ्यांपुढे अक्षरश: जिवंत होतो, कमालीचा अस्वस्थ करतो. अस्थिर, संभ्रमित अवस्था, उपासमार, रोगराई आणि मृत्यू ह्यांचे भोवताली तांडव; या सगळ्या परिस्थितीत, मेरी बर्गने कोणत्या अंत:प्रेरणेने तिच्या बारा छोट्या वह्यांत सातत्याने घटनांची नोंद केली असेल? चिखलातून कमळ उमलावं, तशी मेरी बर्ग या विनाशकारी परिस्थितीत देखील आशावाद न सोडता तग धरून राहिली. तिच्या सुदैवाने अमेरिकेला पोहोचल्यावर तिची डायरी संशोधित आणि संपादित होऊन पुस्तकरूपात प्रकाशित झाली. इतर अनेक भाषांत प्रकाशित झालेल्या "द डायरी ऑफ मेरी बर्ग' या आत्मकथनाचा मराठी अनुवाद प्रकाशित होऊन तो वाचकांपर्यंत पोहोचणं, हा मराठी साहित्य प्रवासातील एक वौशिष्ट्यपूर्ण "माईल स्टोन'' ठरावा.
@manisha.bhosale.739
@manisha.bhosale.739 3 ай бұрын
Chan upakram 😊❤❤
@abolimarathi
@abolimarathi 2 жыл бұрын
सगळ्यात आधी, स्पृहा तुझे खूप खूप आभार तू तुझ्या काव्य वाचन आणि my book shelf ने खूप प्रेरणा देत आहेस काही वर्षांपूर्वी वाचनाची खूप आवड असणारी मी सगळ्या तडजोडी करत राहिले आणि वाचन मागेच राहील तुझ्या या नविन उपक्रमांनी पुन्हा कुठे तरी मी सापडत चालले आहे तुझी ओघवती भाषा आणि त्यातून मिळणारी माहिती आणि ज्ञान मंत्रमुग्ध करत. My best wishes for each n every video 😊
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
Thanks Poonam.. More power to us 🤗
@Only_Khaki2.0_435
@Only_Khaki2.0_435 2 жыл бұрын
Madam tumhi pn ek book liha n
@amollyricswrld...1819
@amollyricswrld...1819 2 жыл бұрын
अप्रतिम खूपच छान👌👌
@jasondunn451
@jasondunn451 2 жыл бұрын
😪 pr໐๓໐Ş๓
@joshipriyankaj
@joshipriyankaj 2 жыл бұрын
@Spruha Joshi मराठी पुस्तकामधे 'बारकोड' चा उपयोग अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी 'सिंफनी' या पुस्तकात केला आहे.
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
Oh that's great to know.. मी वाचलं नाहिये. माझ्या यादीत add करते हे पुस्तक 🙂🙏🏻
@shwetatakalkar
@shwetatakalkar 2 жыл бұрын
खूप छान , एका महिन्यात कमीत कमी एक पुस्तक वाचण्याची जी संकल्पना सांगितली ती खूप छान . नुसत छान म्हणणार नाही तर मी पण मनात ठरवते की , महिन्यात एक तरी book read करेन.
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
गंधाली लेखक : रणजित देसाई पृष्ठ संख्या : १६८ | किंमत : ₹ १८०/- प्रकाशन : मेहता पब्लिशींग हाऊस रणजित देसाई यांचे 'गंधाली' हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींवर आधारित कथांचा संग्रह आहे. नावाप्रमाणेच प्रत्येक कथेला स्वतःचा असा सुगंध आहे. ऐतिहासिक स्नेहबंधावर आधारलेल्या या पुस्तकात विराणी, अशी रंगली प्रीत, अशी छेडली तार, असा रंगला विडा, नक्षत्रकथा या पाच कथांचा संग्रह आहे. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं हे असे सूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे. सती झालेली, पण जाता-जाता इतरांची आयुष्य उजळणारी पुतळाबाई आहे, तर स्नेहाने मुत्सद्यांची ह्रदय जिंकणारी बुद्धिमान कलावंतीण माहेरलका आहे. या कथांमधून प्रेमाचे वेगवेगळे पोत रणजित देसाई आपल्यापुढे ठेवतात. गंधाली म्हणजे सुगंधी द्रव्य ठेवण्याची पेटी. शब्दांना गंध नसतो म्हणतात पण या गंधालीतील कथा वाचून प्रत्येक रसिक मनात स्नेहाचा सुगंध दरवळतो.
@manishakulkarni3911
@manishakulkarni3911 2 жыл бұрын
सोना ने इतके सुंदर अनुवादित केले आहे हे पुस्तक की " प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट ' आणि यातले सलमाचे लिखाण म्हणजे घराघरात बायका मनातच बोलत असतात असे सगळे अनुभव ! फार फार वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकाची पुनः आठवण दिली 👍
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
टु सर, विथ लव्ह लेखक : इ. आर. ब्रेथवेट मराठी अनुवाद : लीना सोहोनी पृष्ठ संख्या : २०८ | किंमत‌‌ : ₹ १८०/- प्रकाशन : मेहेता पब्लिशींग हाऊस 'टू सर विथ लव्ह' ही एका कृष्णवर्णीय शिक्षकाची म्हणजे लेखकाचीच कथा... ब्रेथवेट हे एक कृष्णवर्णीय तरुण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर होते. दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्स मध्ये ग्राउंड क्रू मध्ये काम करून नंतर एका गलिच्छ अतिदरिद्री वस्तीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्या वस्तीत दलाल, वेश्या, अमली पदार्थ, खून, मारामाऱ्या यांचे साम्राज्य होते. या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचे वर्ग त्यांना मिळाले. अतिशय ओंगळवाणी, व्यसने करणारी, अस्वच्छ राहणीमान असलेली, मुलींशी शारीरिक लगट करणारी, शिक्षकांना मानसिक त्रास देणारी मुले या वर्गात होती. ब्रेथवेट यांनी माघार घेतली नाही. त्यांनी या मुलांवर खूप मेहनत घेतली. या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला. सरांशी गुंडगिरी करणारी ही पोरं त्यांना सर म्हणून आदराने हाक मारू लागली. याचबरोबर गलिच्छ वस्तीत वाढलेल्या पोरींना मिस म्हणून हाक मारायलाही सरांनी त्यांना शिकवलं. स्वच्छ राहायला शिकवलं. त्याचबरोबर शेक्सपियर वाचायलाही शिकवलं. एका ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाच, द्वेषाचं, तिरस्काराच रूपांतर प्रेमात केलं. त्यांच्यात आत्मसन्मान आणला. आत्मविश्वास निर्माण केला. एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांविषयी वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कथा अनेक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक दिशादर्शक आहे.
@chandrakantmore2953
@chandrakantmore2953 2 жыл бұрын
हि दोन्ही पुस्तकं नक्कीच वाचणार...
@ajay1712
@ajay1712 2 жыл бұрын
फारच सुरेख माहिती. आमच्या सारखे लोक वाचू लागले हेच तुमचे यश. लगे रहो
@poojatendulkar6157
@poojatendulkar6157 2 жыл бұрын
Nice video. Me recently Adrian mole navach pustak vachla (pahila bhag) Ani I think te tula hi aavdel
@pritishivarkar5401
@pritishivarkar5401 2 жыл бұрын
ल. म. कडू यांनी 'खारीच्या वाटा' book nkki vach...khup sundar aahe
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 2 жыл бұрын
मध्यरात्रीनंतरचे तास हे पुस्तक मी नक्की वाचीन
@kartikeybapat
@kartikeybapat 2 жыл бұрын
स्पृहा, अभिनेत्री प्राजक्ता माळीचं "प्राजक्तप्रभा" हे कवितांचं पुस्तक मी वाचलं. ते तू पण वाचावं अशी माझी इच्छा आहे. त्या पुस्तकामधील "कला" हि कविता जर तू सादर करू शकलीस तर मजा येईल. आभार, कार्तिकेय बापट
@ishavadodkar1159
@ishavadodkar1159 2 жыл бұрын
नमस्कार. स्पृहा तुमच्या Book Shelf या नविन संकल्पनेबद्दल खूप खूप शुभेच्छा. खूप प्रेरणा मिळतेय पुस्तक वाचण्यास. मी सध्या `सानिया` म्हणजेच सुनंदा कुळकर्णी यांचा 'अशी वेळ' हा कथासंग्रह वाचतेय. स्त्री जीवनाचे विविध पैलू अगदी सहज मांडले आहेत त्यांनी.
@cancer4684
@cancer4684 2 жыл бұрын
Spruha tu Sundar actress ahes. Very versatile with unique identity. One request, nuktech ramesh deo expire zhale. Tyanche ya sukhano ya or seematainche suvasini bookbaddal sangshil ka? 🙏👈
@-kavyasaribyprajakta5026
@-kavyasaribyprajakta5026 2 жыл бұрын
मध्यरात्रीनंतर चे तास. आजच वाचून संपवलं. जबरदस्त पुस्तक आहे. Highly recommended
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 жыл бұрын
Traditional reading as well as hi tech reading with Bar code by Anuvad good idea
@rangoli335
@rangoli335 2 жыл бұрын
Hi Spruha, mi Aarti ingole. Mi mrutyunjay kadambri aikli storytell vr. Khupach chhan mandli aahe. Tu pls tuzya channel vr hya kadambri bddl bol. Thank u..
@swatigawai6776
@swatigawai6776 2 жыл бұрын
Khup chhan
@priyankahowal
@priyankahowal 2 жыл бұрын
Thanks for the book suggestions spruha tai and please mention about each books title and its author in the description box as 1) Anunad- author- Neha Limaye and so on, once again thank you:) and keep up the good work you do!:) Always!! :)
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 жыл бұрын
Spruha superb you always fantastic !!
@hemantvaidya7470
@hemantvaidya7470 2 жыл бұрын
सुंदर सांगितलं आहे , जूरुर वाचेन दोन्ही पुस्तकं
@prakashwaghmare1530
@prakashwaghmare1530 2 жыл бұрын
Spruha ji good evening
@rutujakhilekar7964
@rutujakhilekar7964 2 жыл бұрын
Khupch sunder tai.....👌👌
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
Khup chhan....
@rohinigame
@rohinigame 2 жыл бұрын
खुपच छान दिदि❤
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 жыл бұрын
Hat's of to Salma as well as Sonali Tai and congratulations for getting " Sahitya Akkadami purskar "
@सुवर्णयुगरांगोळी
@सुवर्णयुगरांगोळी 2 жыл бұрын
Khup khup chan
@pranalimagi9984
@pranalimagi9984 2 жыл бұрын
❤❤❤❤❤
@sarangjoshi294
@sarangjoshi294 2 жыл бұрын
Hi Spruha, Very nice information about books. It will be very helpful if you let us know from where we can get this book online cause now days it's very difficult get find such shop and get know about good book.
@sandhyakulkarni3441
@sandhyakulkarni3441 2 жыл бұрын
Wa wa,thnx spruha👌👍💐
@vambulge
@vambulge 2 жыл бұрын
Presented every aspect of book in such a beautiful way. It will definitely make peoples to start reading again...
@mandakinimakode9953
@mandakinimakode9953 2 жыл бұрын
👍
@Pallavi-Gore
@Pallavi-Gore 2 жыл бұрын
Neha hearty Congratulations! You have struck the right notes! Kudos
@nehalimaye5974
@nehalimaye5974 2 жыл бұрын
Thanks a lot 😊
@pradnyajayashri
@pradnyajayashri 2 жыл бұрын
मध्यरात्री नंतरचे तास आवडलं♥️
@Sunakshi_1504
@Sunakshi_1504 2 жыл бұрын
Too good ❤
@kumodgurav
@kumodgurav 2 жыл бұрын
Spruha#खूप छान
@sureshagashe1862
@sureshagashe1862 2 жыл бұрын
खूपच छान.
@rutujakhilekar7964
@rutujakhilekar7964 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Uttam mam
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Chan mam
@suvarnakalange5964
@suvarnakalange5964 2 жыл бұрын
👌👌👌👌🌹
@tanajishinde8829
@tanajishinde8829 2 жыл бұрын
शुभ संध्या 💐💐
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 43 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН