फर्माईश : माझ्या मित्रा | Spruha Joshi | Marathi Poems

  Рет қаралды 91,200

Spruha Joshi

Spruha Joshi

2 жыл бұрын

For Brand Collaborations & Partnerships drop an email to: teamspruhajoshi@gmail.com
खादाडी Playlist : shorturl.ae/TqKYC
गंमत गाणी Playlist : shorturl.ae/GNnXC
_______________________________
माझ्या मित्रा
ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
कितीदा पाह्यलेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही !
आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही.
हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?
स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
तर मग तू कोण असशील ?
मित्र असशील माझ्या मित्रा !
- अरुणा ढेरे
तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi #Food #Travel
_________________________________
Credits
________________________________
Produced By :
Spruha Joshi
Nachiket Ashok Khasnis
Location Partners :
Tushar & Chiranjivi Kothawade, Studio Infinity
Filming & Production Stills :
Angad Joshi
Shubhankar Havele
Editors :
Soham kurulkar
Yogesh Dixit
Tanishq Mohite
Hair & Makeup: Bhagyashree Patil
Styling : Tanmay Jangam
Costumes: Cotton Village
Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
___________________________
About Spruha Joshi :
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 341
@bhartikumbhar4781
@bhartikumbhar4781 Жыл бұрын
खूप सुंदर कविता.. खूप छान विषय.. खूप छान सादरीकरण... " नुसतंच काय जगायचं.. जग कवितेतून बघायचं.. "😊
@ishavadodkar1159
@ishavadodkar1159 2 жыл бұрын
अरुणा ढेरे या माझ्या पण खूप लाडक्या लेखिका, कवयित्री आहेत. सध्या मी त्यांचं जाणीवा जाग्या होताना हे पुस्तक वाचतेय. आणि खरच खूप ओघवती आणि अभ्यासपूर्ण लेखन त्याच असत. आजची तुमची कविता सादरीकरण अप्रतिम.
@shobhanabhalearao460
@shobhanabhalearao460 Жыл бұрын
खुप छान कविता आणि सादरीकरण... अभिनंदन स्पृहा....
@vilaspundle4766
@vilaspundle4766 Жыл бұрын
छान कविता सृहा ताई
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Ай бұрын
डॉ अरुणा ढेरे माझ्या आवडत्या लेखिका आहेत.त्यांच्या या कवितेचे सादरीकरणही सुंदर.. खरं तर मला अभिनेत्री स्पृहा पेक्षा कवियित्री स्पृहाच आवडते..
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
👌👌अरुणाताईंची खूप सुंदर कविता ऐकायला मिळाली. मैत्री म्हणजे निखळ नाते विश्वासाचे, आधाराचे व नितळ प्रेमाचे. स्पृहा नेहमीप्रमाणेच सुंदर सादरीकरण!!👍
@shubhangivaidya1812
@shubhangivaidya1812 Жыл бұрын
अप्रतिम हदयस्पर्षी
@kaumudipundikar9028
@kaumudipundikar9028 2 жыл бұрын
मैत्री सोबत इतर नात्यांची व्याख्या पण किती अचूक केलीय...♥️
@shantagaikwad4177
@shantagaikwad4177 2 жыл бұрын
सुंदर मैञी, निरपेक्ष, स्वच्छ, प्रेमळ, आपुलकीच्या स्नेहपूर्ण सुंदर नात्यांचा सुगंध अक्षयी.धन्यवाद स्पृहा. Very nice presentation. Love u so much!!!
@ganeshrajguru
@ganeshrajguru 2 жыл бұрын
मॅम खुप छान होती कविता अशी मैत्री खूपच निथळ आणि निरागस असते अशी मैत्री मिळणे भाग्याची गोष्ट असते...🙏🙏🙏
@prathameshthakur5822
@prathameshthakur5822 6 ай бұрын
ज्याच्या कडे आवाज देता बरोबर येणारा मित्र किंवा मैत्रिणी आहे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती
@neetagaikwad9920
@neetagaikwad9920 2 жыл бұрын
मैत्रीच्या सुंदर निखळ नात्याचं अप्रतिम वर्णन आणि अतिशय सुंदर सादरीकरण ❤️🙏
@gauravlute1481
@gauravlute1481 2 жыл бұрын
मैत्रीला अत्यंत सुंदर लळा लावणारी अप्रतिम कविता. इतकं प्रचंड‌ विश्र्वासाचे धागे घट्ट मैत्रीच्या नात्यांना बांधणारी कविता आहे. खूपच सुंदर ❤️👌👌
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 4 ай бұрын
सुंदर प्रासादिक व रसाळ वाणीतून सादरीकरण❤
@sagarshinde4393
@sagarshinde4393 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण... अर्ध्यावर फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नकोस... हे मित्रा ...आपली साथ आहे जन्माची अशी अर्ध्यावर सोडू नकोस...!!!
@sujatababar7645
@sujatababar7645 2 жыл бұрын
I am speechless
@manoramaghatge6066
@manoramaghatge6066 Жыл бұрын
Rama ghatge khup sundar kavita ahe dhanwad
@sanjaykarnik6096
@sanjaykarnik6096 3 ай бұрын
खूप छान कविता , आणि तिचे सादरीकरण.❤
@anusayapotdar3845
@anusayapotdar3845 3 ай бұрын
खरंच खूपच निखळ नी निरागस मैत्री च हे नातं ज्यांना लाभल खरंच अहो भाग्यम!
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 Жыл бұрын
अरुणा ढेरे हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि तितक्याच माझ्या मनाच्या जवळच्या आहेत. एकमेकांच्या विकासाला पूरक ठरते ती मैत्री गुण दोषा सकट एकमेकांना स्वीकारते ती मैत्री...... छान सादरीकरण एक फर्माईश इंदिरा संत यांची 'कुब्जा' कविता सादर करशील का?
@marathikavitashobhadalvi6826
@marathikavitashobhadalvi6826 3 ай бұрын
अप्रतिम काव्य आणि सादरीकरणही सुंदर
@user-st6kc1uf2i
@user-st6kc1uf2i 2 жыл бұрын
खूप सुंदर कविता. काही जुन्या मैत्री डोळ्यांसमोर लख्ख पणे उभ्या राहिल्या. Nostalgic करून गेली कविता. Thank you स्पृहा
@madhukaryesane6715
@madhukaryesane6715 8 ай бұрын
स्पृहा तुमचं कविता प्रेम मला खूप भावतं. इतका भावनिक विकास होण्यासाठी तुमच्या बालपणी कोण कोणते संस्कार तुमच्यावर झाले असतील याचा मी विचार करतो. खूप छान. शुभेच्छा...
@atharvabhatade9853
@atharvabhatade9853 Жыл бұрын
अरुणा ढेरे मलाही खूप आवडतात आणि खास गोष्ट म्हणजे मी स्वतः त्यांना भेटलो आहे.१०वी चा वर्गात असताना एका धड्यापासून वाचायला सुरुवात केली. खरंच खूप सुंदर लिहितात त्या...♥️👌😍
@sandhyapandit1624
@sandhyapandit1624 Жыл бұрын
आपला चॅनल फार छान आहे. कोणाबरोबर शेअर केल्यास त्या व्यक्तीला पण आनंद देणारा.
@girijamahamuni2327
@girijamahamuni2327 2 жыл бұрын
खरंच...गारुड घालतेय ही कविता मनाला...❤️ स्पृहाताई ...द.मा.मिरासदार यांची 'रिस्क' नावाची गमतीदार कविता फर्माईश च्या भागात ऐकायला आवडेल...😊😊
@sachinshinde8283
@sachinshinde8283 5 ай бұрын
Hii Spruha khup chaan Kavita Ani khup chaan Saadarikaran . Nice.
@smitatapadiya5474
@smitatapadiya5474 Жыл бұрын
Khuppach Chhan Spruha.kavita khup chhan asanyasobat tuzya wachnyachi style awesome..Tuzya wachnyamulech tya kavitela artha ala ahe.yess.
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 жыл бұрын
Spruha kiti sunder kavita aahe Aruna Dhere hyanchi ,arth kiti chan aahe ani tujha sadarikaran apratim.👍🏻
@anjalikonkar2983
@anjalikonkar2983 4 ай бұрын
ही फार सुंदर आणि सच्चा मैत्रीबद्दल बोलणारी कविता आहे. खूप छान वाचलीस स्पृहा.
@namdevpp
@namdevpp 2 жыл бұрын
खुपच सुंदर अर्थबोध आहे या कविताचा.. धन्यवाद स्पृहा...
@user-nf4cy7ut1r
@user-nf4cy7ut1r 3 ай бұрын
Wah क्या बात है Aruna ताई कविता छान पणे मा टली
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 жыл бұрын
Sundar kavita,apartim sadrikaran, uttam content.
@jyotiupadhye8402
@jyotiupadhye8402 Жыл бұрын
खुप छान कविता आणि स्पृहा सादरीकरणहु छान
@prabhasonawane5346
@prabhasonawane5346 3 ай бұрын
सुंदर कविता ❤ सुंदर सादरीकरण
@smitasaraf7950
@smitasaraf7950 2 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करते ही कविता
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी शब्द रचना आणि अप्रतिम सादरीकरण.👍👌💐
@dadak3141
@dadak3141 2 жыл бұрын
माझी आवडती कविता स्पृहा... का ते नको विचारू...☺️🙂
@pallavinagwade3708
@pallavinagwade3708 Жыл бұрын
खरच खुप खुप सुंदर कविता.
@vaishnavibhogale7399
@vaishnavibhogale7399 2 жыл бұрын
खूपच छान,,अप्रतिम सादरीकरण...👌☺️
@sanjaykumar-jl8xt
@sanjaykumar-jl8xt Жыл бұрын
खरा मित्र हा काळजाच्या आतला एक असा भाग जो आपल्यापासून वेगळा असून कुण्या एका वेगळ्या मित्ररूपी व्यक्तीजवळ सुखरूप असतांना तो ज्या ज्यावेळी आपल्याला भेटतो त्या त्या वेळी आपल्याला पूर्णत्वाचा सुखमय जिवंत आभास होतो... निस्वार्थ, निरागस, आपुलकी, आदर, ओढ, उणीव ह्या सगळ्या भावना जिथे विरतात आणि तो त्या सर्व अपेक्षेवर खरा उतरतो जी आपल्या आतली असते.... ☘️आम्हा सर्वांच्या लाडक्या स्पृहा ताई ☘️ आपण सदर केलेली कविता खुप खुप आवडली. खुप खुप आभार...🙏🙏
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 5 ай бұрын
चतुरस्त्र लेखिका ,साहित्यिका व कवीयत्री डाँ अरूणाताई ढेरे यांना प्रणाम व धन्यवाद!
@prachisadhu2182
@prachisadhu2182 2 жыл бұрын
Kharach Khup Sundar Kavita!!! Lucky to have a asa MITRA !!
@kiranbankar.baramati.892
@kiranbankar.baramati.892 2 жыл бұрын
सुदंर सादरीकरण. सुदंर कविता👌👌👏👏
@user-gq5cm6nc4r
@user-gq5cm6nc4r 2 жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण !
@SandeshMane
@SandeshMane 2 жыл бұрын
Apratim 😍😍 tachkan bharun ale dole 😍
@akshaykadam8779
@akshaykadam8779 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण👌🏻🌹
@anuradhakhedekar8713
@anuradhakhedekar8713 Жыл бұрын
अप्रतिम कविता व अप्रतिम सादरीकरण!!
@swarupapatil2852
@swarupapatil2852 Жыл бұрын
Best heard poem for friend .....which express the real friendship 👌😍
@rajeshjoshi7023
@rajeshjoshi7023 Жыл бұрын
वा!!! खूपच छान कविता मैत्रीवर 🙏❤️😘
@manasiphadke7247
@manasiphadke7247 Жыл бұрын
Arti sunder spruha👌👍
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 8 ай бұрын
अगं, चंदन,केशर,यांचा सुवास भरून भारून गेलेल्या देवघरात सायंकाळी सुंदर लख्ख सम ई स्नेहपूर्ण संथ तेवत असावी आणि पहाणार्‍या मनाचा गाभारा व्हावा अशी अरूणा आणि तिची कविता मला वाटते. शांत, तेजस्वी. होय ना गं.
@rashmisp1
@rashmisp1 2 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण अणि सुंदर कविता
@sagarmachale173
@sagarmachale173 2 жыл бұрын
खूप छान कविता आणि सादरीकरण..... ❤️
@naradmrunmai68
@naradmrunmai68 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर शब्द आणि सादरीकरण,
@pranalipradhan7428
@pranalipradhan7428 Жыл бұрын
सुंदर कविता व अप्रतिम सादरीकरण.
@krishijyot805
@krishijyot805 2 жыл бұрын
अप्रतिम कविता..❤️
@wishwas2610
@wishwas2610 2 жыл бұрын
Wow Spruha! What a gem!
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 2 жыл бұрын
सुरेख कविता.. सुरेख सादरीकरण..
@kaumudipundikar9028
@kaumudipundikar9028 2 жыл бұрын
मला गोविंदाग्रज यांची प्रेम आणि मरण ही कविता तुझ्याकडून ऐकायची आहे... ही कविता खूप खास आहे माझ्यासाठी.... please 🥺
@shubhadavyas8968
@shubhadavyas8968 2 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि सादरीकरण सुद्धा!
@rajendradongare8322
@rajendradongare8322 Жыл бұрын
Khup sunder..touchy
@advsmitabhosale7828
@advsmitabhosale7828 2 жыл бұрын
वा स्पृहा.....कविता खूपच भावली,तुझ्या सादरीकरणाने अजुन खुलली
@pratikshagawai6186
@pratikshagawai6186 Жыл бұрын
अप्रतिम मांडलय मैत्रीचं सौंदर्य ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@meghaghotekar7466
@meghaghotekar7466 Жыл бұрын
Khupch mst....tumch sadarikaran👏👏
@akshaydhakate7232
@akshaydhakate7232 Жыл бұрын
अरुणा ताईच लेखन आणि शब्दांची मार्मिक खूप अथांग आहे..त्यांची बोलण्याची शैली खूप मार्मिक आहे.92 वें साहित्य संमेलन यवतमाळ येथे झाले तेव्हा त्या आध्यक्ष म्हणून लाभल्या त्यांच्याशी संवाद साधता आला ..
@user-fi1rx2zi5w
@user-fi1rx2zi5w 2 жыл бұрын
अप्रतिम कविता आणि तितकंच सुंदर सादरीकरण
@udaypatil7477
@udaypatil7477 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता... अप्रतिम सादरीकरण...💐
@vaishnavipatil8052
@vaishnavipatil8052 2 жыл бұрын
अप्रतिम सृहा ताई
@neelawalawalkar7522
@neelawalawalkar7522 2 жыл бұрын
खूप छान कविता आणि सादरीकरण उत्तम
@subhashgawai3212
@subhashgawai3212 2 жыл бұрын
सुंदर कविता.अप्रतीम सादरीकरण.
@gaurighule2986
@gaurighule2986 2 жыл бұрын
Atishay sunder kavita aani sadarikaran suddha 👌👌
@maithilipingle9966
@maithilipingle9966 2 жыл бұрын
खूपच सुंदर…कविता आणि तुझं सादरीकरण……👌🏻👏🏻
@pandurangchate8115
@pandurangchate8115 2 жыл бұрын
अरुणाताईंची अतिशय अर्थपूर्ण अशी कविता आहे. स्पृहा तु उत्तम अभिनेत्री तर आहेसच. पण त्यापेक्षाही एक मोठी कवयित्री म्हणूनच नावारूपाला येत आहे. खूप खूप सुंदर. कविता आवडली...अप्रतिम!
@priyashaikh7709
@priyashaikh7709 Жыл бұрын
अप्रतिम solid kavita aahey
@tejalchaudhari3421
@tejalchaudhari3421 2 жыл бұрын
Ekdum perfect 👌👌👌
@sayeekulkarni1901
@sayeekulkarni1901 8 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण. आणि अरुणा ढेरे यांच्या कविते बद्दल बोलणे यासाठी मी खूप छोटी आहे असा एक खरा मित्र आहे हे माझे सौभाग्य आहे
@nitinvaidya3013
@nitinvaidya3013 2 жыл бұрын
सही कविता . सुंदर सादरीकरण .
@veenamusic...2225
@veenamusic...2225 Жыл бұрын
खूप खूप 🌺🌺सुंदर #वीणा म्युझिक मैफिल शब्द सुरांची
@smitabhoir3097
@smitabhoir3097 2 жыл бұрын
खुप सुंदर....अप्रतिम सादरीकरण
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
खुप खुप छान कविता असे मित्र आपल्या आयुष्यात सदैव हवे
@vaishalinemade3228
@vaishalinemade3228 10 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण....मैत्री म्हणजे एक विश्वासाचे,आपुलकीचे, आधाराचे व नितळ प्रेमाचे घट्ट नाते....अर्ध्यावर फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नकोस....हे मित्रा!! आपली साथ आहे जन्मांची अशी अर्ध्यावर सोडू नकोस...!!❤
@mandakinikulkarni3931
@mandakinikulkarni3931 2 жыл бұрын
खूपच सुंदर कविता 👍👍🌹💐
@SurekhaJawake
@SurekhaJawake 12 күн бұрын
Khup channn. ❤
@jaivantshetye5620
@jaivantshetye5620 2 жыл бұрын
खुप सुंदर कविता धन्यवाद स्पृहा ma'am.
@mandarkhare3194
@mandarkhare3194 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सोज्वळ कविता आणि सादरीकरण देखील निर्मळ
@ramlingpatale8898
@ramlingpatale8898 Жыл бұрын
खुप च छान कविता...माझ्या मित्रा. ऐक ना..
@RoshanNavhate
@RoshanNavhate Жыл бұрын
स्पृहा मॅडम, तुम्हचं मराठी मला खूप आवडत.मी UPSC चा अभ्यास करता करता कधी भावनिक झालो की तुमच्या शब्दातून व्यक्त झालेली कविता ऐकतो.. नंतरच मला खूप प्रसन्न आणि अल्हाददायक वाटतं... तुमच् व्यक्तिमत्व आणि शब्दांची ठेवणं खूप प्रभावशाली आहे❤
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 2 жыл бұрын
खूप मस्त कविता 👌
@monalijoshi5207
@monalijoshi5207 Жыл бұрын
Khup Sundar kavita ahe
@snehapandit3104
@snehapandit3104 2 жыл бұрын
अप्रतिम कविता...खूप सुंदर काव्य वाचन! नक्कीच शेअर करतेय.
@Angel_Vaishu
@Angel_Vaishu 10 ай бұрын
खूप सुंदर कविता अरुणाताईंची...आणि तितकंच सुंदर सादरीकरण...👏👏
@padmajachoudhari4713
@padmajachoudhari4713 2 жыл бұрын
खूप सुंदर कविता...
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 2 жыл бұрын
Sundar sadarikaran👌👌
@ishwarijori2388
@ishwarijori2388 2 жыл бұрын
सुंदर ❤️❤️
@meenalbhate6872
@meenalbhate6872 2 жыл бұрын
अप्रतिम ,फार सुंदर अर्थ सांगीतला आहे ,तुम्ही .
@mahamovie2480
@mahamovie2480 2 жыл бұрын
Awesome 👍 खरंच
@user-ju3jq4vx3j
@user-ju3jq4vx3j 7 ай бұрын
❤ शब्द मनाचा ठाव घेतात.. 👍सर्वोत्तम सादरीकरण..
@suwarnananoti7542
@suwarnananoti7542 2 жыл бұрын
माझी आवडती कविता आणि तिचे अप्रतिम सादरीकरण !
@sampradachatap9868
@sampradachatap9868 2 жыл бұрын
खुप सुंदर कविता आणि सादरीकरण 😊
@user-hi8qp1gi1j
@user-hi8qp1gi1j 8 ай бұрын
Khup sundar👍👍👌👌
@nandinipatil9302
@nandinipatil9302 2 жыл бұрын
खूप गोड..👌
@mitalidhole4452
@mitalidhole4452 2 жыл бұрын
khup sundar spruha tai
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 3,2 МЛН
Fathers Day | Sankarshan Karhade, Amruta Khanvilkar, Shreya Bugde 'बापमाणसा'बद्दल भरभरुन बोलले
9:15
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 19 М.
Turning Point | Crescent | Mukta Barve | Omkar Govardhan | Marathi Digital Film
9:26
Crescent Mutual Fund Distributors
Рет қаралды 837 М.
Episode 119 | Aruna Dhere | Kavita | Marathi Kavita | Popular |
7:15
ती (Ti) | Spruha Joshi | Marathi Kavita | Poems | Woman's Day
1:41