अतिशय सुंदर अभिनय सर्वांचा.खूप छान उत्सुकता पूर्ण वेगळा चित्रपट आहे. धन्यवाद
@sakshibadarayani87878 ай бұрын
बापरे!! जबरदस्त अभिनय, नाट्य, वळण आहे कथानकाला....थोडक्या वेळात, कमीत कमी साधने वापरून केलेला चित्रपट👏👏👏✨👌👌🙌💫 ऋचा आपटे ची संवादफेक लाजवाब🎉🎉शरद जींचा अभिनय तर उत्तमच😎👌👌👏👏✨
@priyanikam260710 ай бұрын
क्या बात है! कथा ,अभिनय, सादरीकरण,शेवट सर्व सुरेख.सर्वांचे अभिनंदन.रटाळ ,बुद्धीला न पटणार्या सिरीयल पहाण्यात पेक्षा हे पहाताना आनंद मिळाला.अप्रतिम .
@udaychitnis190410 ай бұрын
कमालीची सुंदर फिल्म! फक्त संवादाच्या आणि अप्रतिम अभिनया च्या जोरावर तुम्ही प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवता..! ग्रेट!
@ksawool10 ай бұрын
पोंक्षे सर नेहमी प्रमाणे जबरदस्तच. पण पोंक्षें सारख्या प्रचंड अनुभवी नटासमोर जराही न डगमगता कसलेला अभिनय करणं यासाठी ऋचा चं विशेष कौतुक.
@amitrahalkar827010 ай бұрын
अप्रतिम चित्रपट , अगदी खुर्चीला खिळून राहिलो . बऱ्याच वर्षांनी मी आज एक चित्रपट सुरवातीपासून अखेरपर्यंत पाहिला. आभारी आहे तुमचा ह्या सुरेख सादरीकरणासाठी 🙏
@amitbarve1369 ай бұрын
same here
@kulkarnikp910 ай бұрын
मी नथुराम बोलतोय हे नाटक आम्हाला परत पाहता येणार नाही याची खंत आहे. "हिमालयाची सावली" या येऊ घातलेल्या आपल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपणासही उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हि सदीच्छा.
@dr.bharatipatil30745 ай бұрын
Oh my god.......what a fantastic movie.....ashya ....Marathi movies.....pahun......atyanand.....hoto......beautiful......movie......yala mhantat......chitrpat......yala mhantat....abhinay......kiti kami kharchacha set......pan.....output.....jabardast.......Din ban gya.......aajcha divas......safal...zala....asa.....atiuchh darjacha chirtpat pahun......Thanks a lot to everyone of you who is directly or indirectly associated in making of this movie💐👌👍👏👏👏👏🙏
@omkarhirve645610 ай бұрын
सव्वा तास जागेवर खिळून राहिलो. खूपच सुरेख चित्रपट आहे आणि आजच्या काळाशी सुसंगत आहे. शरद पोंक्षे यांची नजर, शब्दफेक उत्तम. ऋचा आपटे हिने भूमिका उत्तम निभावली आहे. प्रसाद सावतळकर यांचे कथानक सुरेख आहे. बाकी शब्दांची मांडणी अप्रतिम, छायाचित्रण करताना काहीच कसर ठेवलेली नाही. खूप दिवसांनी मराठीत असा हृदयाला ठाव घालणारा चित्रपट पाहिला. पूर्ण चमुचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन आणि आभार.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dinkarprabhudesai663810 ай бұрын
जबरदस्त ! साऱ्यांच काम सुरेख.
@AshaPanchakashariАй бұрын
खरच यार काय movie hota...evdha सुंदर बापरे 😢🎉❤अरे खरच पाहून घ्या movie ...suspence tr ahech bro याच्यात 🎉 सुंदर सुंदर सुंदर ❤
@shobhatulve257810 ай бұрын
ऋचा आपटे.सुंदर अभिनय.अनपेक्षित शेवट.फारच सुंदर कथानक.
@VeenaShirur10 ай бұрын
एक अप्रतिम कलाकृति पाहिल्याचं समाधान लाभलं! केवळ शब्दांतून सर्व दृश्ये मनःचक्षू समोर साकारली गेली! पटकथा मनाची चांगलीच पकड घेणारी आहे. दिग्दर्शनही कथानकाला अगदी अनुरूप. पोंक्षेंच्या अभिनया बद्दल आम्हा पामरंनी काय बोलाव बरे! कौतुकाने पहात रहणेच बरे! ऋचा आपटेने ही अतिशय सुरेख संयत कथेला सजेसाच उत्तम अभिनय केलाय! व्वा खूपच छान!!
@priteshkhamkar397510 ай бұрын
सुंदर सिनेमा, एकतर शरद पोंक्षे सर, हयात अर्धी बाजी जिंकली. लेखाला आणि त्याच्या विचाराला लाख सलाम.
@arunachoudhari878010 ай бұрын
अप्रतिम चित्रपट 🙏🙏रचना आणि शरद पोंक्षे यांचा सुंदर अभिनय , संवाद 👌👌
@chintamanipalekar249110 ай бұрын
उत्तम कथानक. मी तुमच्या अभिनयाचा चाहता. मी सामान्य तुम्हाला किंवा तुमच्या अभिनयाला प्रमाणपत्र देण्याएव्हडा मोठा नाही. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो. तुमचे चित्रपट आणि नाटकं पाहायला मिळोत.
@vidyasammannavar494310 ай бұрын
असा चित्रपट किती तरी. वर्षांत पहिला नव्हता. चित्त खिळवून ठेवले. अद्भुत असे पाहायला मिळाले.
@malleshidongare797710 ай бұрын
apratim aahe chitrapat💯💯❣❣
@vidyavaidya992810 ай бұрын
मस्तच.. खिळवून ठेवले... शरदजी तुम्ही तर उत्तम अभिनेता आहातच पण ऋचाचे काम पण छानच झाले....
@dipalishedge896410 ай бұрын
खूप सुंदर जमलं आहे सगळं, शरद आपण उत्तम अभिनय करताच पण ऋचा चा अभिनय देखील कमाल झाला आहे....सगळ्या टीम च अभिनंदन आणि खूप कौतुक
@Maithilicoaching10 ай бұрын
उत्तम कथा, संवाद व अभिनय. "मरण्यापेक्षा कठीण आहे कटु घटना विसरणं" "आपली कर्म कधी आपली पाठ सोडत नाहीत." "न्याय या गोष्टीचा अर्थ खुप व्यापक आहे" हि वाक्य तंतोतंत पटली. धन्यवाद शरद सरजी🙏
@chintamanipalekar249110 ай бұрын
खरं आहे. एकाच वाक्यात खूप काही सांगितलं आहे अन् सामावलेले आहे.जीवन अर्थपूर्ण आहे.
@Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng10 ай бұрын
🙏🙏
@vaibhaviketkar332010 ай бұрын
कथेचे उत्तम सादरीकरण, मला ऐकू कमी येते पण subtitles मुळे समजण्यास जास्त सोप्पे जाते, subtitles साठी धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेवटी पाठीशी घालणारा त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोच हे त्रिवार कटू सत्य 🙏🏻🙏🏻
सुंदर रहस्यमय चित्रपट.मराठी मध्ये आता असेच सिनेमे यायला पाहिजे.सर्वांचा अभिनय सुंदर.पोंक्षे सर नेहेमी प्रमाणेच उत्कृष्ट पण रचानाचे काम पण मस्त.
@srk.priyarvi36910 ай бұрын
शेवटच्या सिन नंतर 2 मिनिट अस झाल की,"काय हिनी?" मला शरद पोंक्षे हे पहिल्यापासूनच खरंच खूप आवडतात.कमाल माणूस आहे.मला जर त्यांना कधी भेटता अल तर आवडेल मला.
@rashmipotnis862210 ай бұрын
सावरकर ऐकून ऐकून तुमची खूप मोठी मी फॅन झाले or आहे. तुमची बोलायची शैली अति सुंदर आहे. स्पष्ट मराठी ऐकायला छानच वाटतं. सर्व अभिनया प्रमाणे हा ही सुंदर आहे. ऋचा पण तोडीस तोड आहे. खूप मस्त सिनेमा आहे.
@TanujaVijay511510 ай бұрын
आपले कर्म आपली कधीच पाठ सोडत नसतात....सुंदर सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखेच आहे हे... उत्तम अभिनय शरद जी आणि रूचा तुमचे अभिनंदन....बऱ्याच दिवसांनी उत्कृष्ट संवाद ,कथा दिग्दर्शन पाहिल्यामुळे आनंद झाला.... शरद जी आपण उत्तम अभिनेते आणि एक सुंदर व्यक्तिमत्त्व आहात..... मला आपल्या अस्तित्वाचा आणि अमृत वाणीचा गर्व आहे.... धन्यवाद .....🙏
@prashanttiwari384210 ай бұрын
क्या बात! अप्रतिम कथा, दोनच पात्र..यावरून कळतं खिळवून टाकणारी कथा असल्यावर कसलाच तामझाम गरजेचा नसतो! फार सुंदर नि अप्रतिम❤️👏🏻👌🏻
@ananddeo352810 ай бұрын
चार कलाकारांमध्ये, खरं म्हणजे दोनच कलाकारांमध्ये उत्तम सादरीकरण. वेगळाच विषय हाताळला आहे. खूप छान वाटलं
@deepakapte874810 ай бұрын
एका मागोमाग एक , अनपेक्षित वळणं घेणारी , रोमांचक रहस्यकथा ! शरद पोंक्षेना , अभिनयातला , शब्दफेकीतला मुकुटमणी म्हणता यावा असा चित्रपट !
@advaitthakur993410 ай бұрын
उत्तम कथा, तो अपघात आमच्या डोळ्यासमोर उभा केलाय दोघांनी. संवादही उत्तम . ❤
खुपच विस्मयकारी धक्का देनारा शेवट! .....संदेश ... कर्म कधी पाठ सोडत नाहीत...शरद पोंक्षे विलक्षण ताकदी चे कलाकार तर आहेच,त्रीचा आपटे यांचे सुध्दा उत्तम अभिनय!.….फार सुंदर पिक्चर.
@AK-hb5hy10 ай бұрын
फारच विलक्षण अनुभव ! पोंक्षे सर आपल्या अभिनयाला खरोखरच तोड नाही
@sugandhaniphadkar57008 ай бұрын
सुंदर कथानक, सुंदर दोघांचा अभिनय, जबरदस्त, खुप आवडली कथा
@himanshutillu801310 ай бұрын
अतिशय दर्जेदार कलाकृती! गोष्ट आणि अभिनय केवळ अप्रतिम! शरदजी करत आहेत म्हणजे प्रश्नच मिटला!
@sharvarikargutkar478610 ай бұрын
जबरदस्त सस्पेन्स आणि शेवटचा धक्का!!! अप्रतीम मांडणी, उत्कृष्ट अभिनय...ऋचा आपटे उत्तम 👌👌 अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारे डायलॉगस्...सारंच उत्तुंग!!
@vijayaraut616810 ай бұрын
अप्रतिम कथानक.. तरीही माणूस म्हणून एक खूप प्रकर्षाने वाटतं.. जर अपघात, घातपात पूर्व वैमनस्यातून घडले तर कदापि माफ केलं जाऊ नये... जगातील न्यायालयातून सुटलात तरी कर्म पाठ सोडणार नाही जन्म जन्मांतरीचे भोग बनून फेडावे लागतील.. माणसाने स्वतः कडून तरी प्रयत्न करावा सतत माणुसकी जपण्याचा..🙏
@nikhilp59259 ай бұрын
अतिशय छान शेवट. छान परफोर्मन्सेस. 2 महीन्यान पूर्वी भारताबाहेर तीनवेळी भेट झाली. उत्क्रुष्ट अभिनेते, हिंदुंचे अभिमान शरदजी.
@prakashmaharashtra10 ай бұрын
मी आताच बघितला चित्रपट. अत्यंत सुंदर कलाकृती. रचना दिसायला तर सुंदर आहेच पण तेवढाच सुंदर तिचा अभिनय आहे ❤️
@anilkamlajkar904910 ай бұрын
शरद पोंक्षे एक उत्तम अभिनेता आहे आणि काय खिळवून ठेवलाय प्रेक्षकांना सस्पेन्स काय भारी आहे चित्रपटात.
@radhikajoshi599010 ай бұрын
सुंदर अभिनय दोघांचीही .स्टोरी मस्तच!,शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा.
@shirishchitale11410 ай бұрын
अप्रतिम. खुप छान चित्रपट . वेगळे आणि खिळवून ठेवणारे कथानक, शरद जी तुमचा अभिनय तर नेहमीच नंबर वन, आणि ऋचा चा सुद्धा सुरेख.
@ravindranene850010 ай бұрын
शरद पोंक्षेजी एक नितांत सुंदर चित्रपट बघीतल्याच समाधान झाल.एकूणच उत्सुकता शेवट पर्यंत ताणून राहीली होती व शेवट तर अत्यंत अनपेक्षित होता.कमालीचा सुंदर चित्रपट. रविंद्र नेने वाशी.
@hanamantmane224210 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट फक्त दोन अभिनेते एकाच खोलीत पूर्ण चित्रपट तरीही शेवटपर्यंत न थांबता सिनेमा बघितला अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
@Atmakeeawaz10 ай бұрын
उत्कृष्ट - कथा पात्र अभिनय पार्श्वसंगीत इत्यादी सर्वच !
@yashwantdatar555410 ай бұрын
☀जबरदस्त ! कथानक आणि अभिनय अप्रतीम , मस्तचं , उत्तम , शेवट पर्यंत खिळवून ठेवणारं .....
@amrutakhanolkar52759 ай бұрын
अप्रतीम सिनेमा 👌👌दोघांचेही अभिनय लाजवाब 👏👏... कथानक चं सुंदर आहे.... निव्वळ अप्रतीम 👌
@shilpaapte95810 ай бұрын
बापरे! किती दिवसांनी अशी कलाकृती बघायला मिळाली शेवटपर्यंत खिळवून ठेवलं😮😮😮😮
@pratibhadiwan815410 ай бұрын
अति़शय सुंदर विषय अभिनय दिग्दर्शन स्रर्वच खूप छान.
@ganeshkulkarni58899 ай бұрын
सुंदर. कॅची.खिळवुन ठेवणारी. अभिनयात शाम पोंक्षे समोर समर्थपणे अभिनय करणारी अभिनेत्री. ब-याच दिवसांनी पाहण्यास मिळालं एक सुंदर कथानक, समर्थ अभिनय.
अप्रतिम! अचानक धक्का... मराठी चित्रपट, मराठी कलाकार का इतका श्रेष्ठ याचं उत्तर प्रत्येक भाषिकानं कधीतरी अशा दिग्गज मराठी कलाकारांना भेटाल्यावर , मराठी चित्रपटाना बघितल्यावरच मिळेल. इतकं अनपेक्षित वळण! इतका भयचकित अभिनय! वाह!!🙏🏼
शरदराव, तुम्ही अभिनय करता आहात हे पटतच नाही. अतिशय नैसर्गिक होते
@dattatrayashembekar271310 ай бұрын
सुंदर चित्रपट आहे. सर्वांची कामेही छानच आहेत. शेवटचा ट्विस्ट तर जबरदस्त
@shridharkulkarni98559 ай бұрын
अप्रतिम व्यवहार, आपल काम आपणच पुर्ण कराव अविनाश सारख, शरद पोक्षे नी अविनाश ची भुमिका अतिशय चागंल्या पद्धतीने पार पाडली शरद पोक्षे जी धन्यवाद, perfect deal........ नथुराम गोडसे ची आठवण येते
@ashagiri430110 ай бұрын
लखेन ऊत्कृष्ट .दोघांचा अभिनय अप्रतिम . शेवट मात्र एकदम अनपेक्षित.
@kailaskhareofficial770310 ай бұрын
Climax कमाल आहे चित्रपटाचा... ग्रेट... 👌🏻👌🏻👌🏻 शरदजींच्या अभिनयाला तर तोडच नाही.. नेहमीप्रमाणेच भेदक नजर..आणि जबरदस्त संवादफेक...क्या बात हैं..!!!👌🏻👌🏻♥️♥️
@smitagadgil758610 ай бұрын
कमाल रहस्य... अप्रतिम फिल्म!!शरदजी तर...शब्दच नाहीत.
@BirdwatcherShilpa9 ай бұрын
कायदा काय चीज ...त्यातील खाचा खोचा दोघांच्या संभाषणातून फारच छान पद्धतीनं मुद्देसूद लिखाण.
@surekhashaha637310 ай бұрын
शरद जी उत्तम कलाकार आहेत सर्वात जास्त अभिनय रुचाने केलाय तोडीस तोड ...अगदी वकीली प्वाईंट जबरदस्त मांडले ...
@vinodpatil277010 ай бұрын
Perhaps this could only film in the world with 2.5 characters without scene location without any vulgarity. Just cannot imagine what I have seen now...admire Sharad sir.. truly unbelievable
@prakashdeshpande558910 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे, अभिनंदन आणि धन्यवाद
@lidwinamascarenhas78544 ай бұрын
Superb directon.. Superb performance....suberb movie......5 star rating
@ashleshalele605010 ай бұрын
खूप छान सादरीकरण, संवाद. नवीन अभिनेत्री चा अभिनय नक्की च वाखाणण्याजोगा. मस्त च. 👍👍👍
@cancer468410 ай бұрын
She is rucha apte, kshitish date's wife. Not so famous, but known for reels video and acted in dil dosti, tuzhyat jeev rangla as supporting actress.
@shakuntalakashetti752210 ай бұрын
😮 hmm😂 😂😂@@cancer4684 😂
@prajaktadeodhar13667 ай бұрын
खिळवून ठेवणारे कथानक, दोघांचाही अभिनय सुध्दा अप्रतिम आणि शेवट सुध्दा तेवढाच कलाटणी देणारा.
@sampadabhatwadekar238710 ай бұрын
माझे खुप आवडते कलाकार श्री शरद पोंक्षे . नथुराम पाहिलय अप्रतिम कलाकृती.👌👌👌
@asmitadixit861210 ай бұрын
मस्त आहे film. ऋचा आपटे, सुंदर अभिनय 🎉 धन्यवाद
@ashokaher609010 ай бұрын
अत्यंत प्रतिभावान पोंक्षे, आणि कलाकारांनी उत्कृष्ट सिनेमा❤ दिलेला आहे , खुप छान, गुंतवून ठेवतो
@arvindkulkarni543910 ай бұрын
अप्रतिम मस्तच शरदजी. उत्तम. अभिनय नमस्कार.
@sumukh11210 ай бұрын
एखादा चित्रपट आपणास नावाने समजत नाही तरी त्या वरून निश्चित आपणस कथेची कल्पना येत नाही . पण कथा कोठे नेते आणि कोठे जाऊ शकते हे चित्रपट बरोबर जमवतो असे वाटते . अनेक दिवस असा खास वेगळा चित्रपट पाहायचे होते तो अशा माध्यमातून मिळाला.
@shubhasathe171010 ай бұрын
कथा, सादरीकरण, अभिनय, संवादफेक.... सगळंच अप्रतिम!!!! पोंक्षे सर मनःपूर्वक अभिनंदन!!! रचना हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे पण अभिनंदन!!@
@meerapathak238610 ай бұрын
😊
@itsvpk1110 ай бұрын
अतिशय उत्तम, खिळवून ठेवणारा चित्रपट.. आम्ही सहपरिवार बघितला.. आता परत बघणार आहे 😊😊
@sangeetakulkarni877010 ай бұрын
Excellent film .Sharad Ponkshe ,too good.❤
@vaishnavichaphekar877910 ай бұрын
खूप दिवसातून इतकी कमाल शॉर्ट फिल्म पाहिली
@rupalikambli75524 ай бұрын
दोघेही त्याला चांगलेच ओळखतात , आपण त्याचे गुन्हेगार आहोत हे माहीत असताना अनोळख्यासारखे कसे एकमेकांशी बोलतात ? त्याला पाहिल्या पाहिल्या जमीन सरकायला पाहिजे होती तिच्या पायाखालची ... कमाल आहे लेखक आणि दिग्दर्शकाची !!
@harshalchougule964910 ай бұрын
3 अभिनेते फक्त, त्यातही दोन प्रमुख मस्त KZbin वर आसून ही चित्रपट गृहात आहोत असे वाटते very nice 👍👍👍 bollywood,south industri should learn how to make film.
@prasadsanwatsarkar64129 ай бұрын
छानच चित्रपट.. निदान मराठीत तरी जरा वेगळा विषय... काही गोष्टी अंदाजाने ओळखू येतात पण शेवट मात्र अकल्पित 👍 अभिनंदन टीम 🙂
@Soundswell4810 ай бұрын
काय आहे, बऱ्याच दिवसांनी एक छान सिनेमा पाहिल्याचं समाधान मिळालं. कथा, संवाद, दिग्ददर्शन सारचं सुंदर. शेवटी जे व्हायचं ते होतचं. शरद जी,कमालीचा अभिनय, संवाद वा! ऋचा ग्रेट ,तिचं बोलणं अभिनय आवडले . अभिनंदन।🎉🎉
@kshama203210 ай бұрын
खूप च छान कथा,शरदजी तर मोठे कलाकार आहेत पण ऋचा आपटे नी अप्रतिम काम केलं🎉
@shraddhanivande88166 ай бұрын
अप्रतिम , कथानक खूपच जबरदस्त, शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी कथा, शरद पोक्षेंचा शेवटचा डायलॉग 👍👏🏻🙏
@AshaPanchakashariАй бұрын
सुंदर स्पष्ट भाषा वाह ❤🎉😊
@sushmakulkarni817110 ай бұрын
सुंदर ...काय सुरेख..कथानक.जबरदस्त कलाकार❤
@_SamruddhiShukla10 ай бұрын
निव्वळ स्तब्ध करणारी सुरेख कलाकृती, अशीच नवनवीन पाहायला आवडेल या वाहिनी वर 🧿🌸
@vishnukhanke78812 ай бұрын
Ohhhh..my God..ohhh..my God...मी ही एक Criminal Lawyer आणि अभिनयाचा छंदही जोपासला आहे...अगदी न हलता मी एकाच बैठकीत पाहिली ही फिल्म ..आणि शेवटी आसवांना वाट मोकळी करून दिली...Great..Sharadji Ponkshe, Richa Aapte...अक्षरशः खिळवून ठेवलंत....
@shobhanakale298010 ай бұрын
कमाल आहे लघुपट , फारच सुंदर !
@truptikulkarni2895 ай бұрын
छान कथा, लेखन संवाद व अभिनय .. दोघांचा अभिच कौतुकास्पद👌👌👏👏
@ranjanasonawane949310 ай бұрын
अप्रतिम, हिमालयाची सावली ह्याची वाट बघतोय
@anvitaphansalkar738510 ай бұрын
उत्तम कथा,युक्तीवाद ,आणि संपूर्ण फिल्म छान.....प्रसाद आणि पूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@prasadsatawalekar335310 ай бұрын
thanks a lot! 😊
@sidmitragotri537510 ай бұрын
धन्यवाद
@mukundbhandare310510 ай бұрын
शेवट पर्यंत सस्पेन्स राखण्यात आला आहे ,सर्वच मस्त ,असेच वरचेवर लिहित जा
@anitamore484410 ай бұрын
अतिशय सुंदर , शरद पोंक्षे यांना नाटक चित्रपट यामध्ये पाहणे म्हणजे पर्वणीच, काही दिवसापूर्वी सरकारने एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला (हिट अँड रन) पण ट्रक चालक आणि बरेचजण संप करून जनतेचा जीव मेटाकुटीला आणून हा कायदा मागे घ्यायला लावला. खुप रेलटेड वाटते, हा चित्रपट पाहून तरी लोकांना कळायला हवे हा कायदा असणे किती गरजेचे आहे, अपघात हे होतातच पण पळून जाणे हा उपाय नाही, आणि असे हे कायदे वापरून गुन्हेगार मात्र सुटूच शकतो. बाकी चित्रपटाची ' रचना ' उत्तमच .
@bhaktikale2110 ай бұрын
शरद पोंक्षेंचा कमाल अभिनय. ऋचाचा पण सुंदर अभिनय. कथानक जबरदस्त
.. अतिशय सुंदर लिखाण, अप्रतिम सुंदर अभिनय , ऊतम रचना
@pkpicturesstudio56539 ай бұрын
khup sundar chitrapat.... apratim locations ani acters khup kami aahet he kadhich janavl nahi shevat paryant .... great work rachana team
@pallaviparandekar60019 ай бұрын
फारच सुंदर खिळवून ठेवणारे कथानक आणि अभिनयाच्या बादशहाबद्दल त्रास बोलायलाच नको.कसलीही झगझगीतपणा नसूनही अभिनयाच्या जोरावर सुंदर कलाकृती साकार करण्यातलं कसब अप्रतीम. रचना सकार करणारी ऋचाही कुठेच कमी पडली नाही .शेवट अतिशय अनपेक्षित. भरकटलेल्या मालिका बघायला आवडत नाहीत. शरद पोंक्षे नाव ऐकून आणि त्यांचा फोटो बघून सहज बघावे म्हणून लावले आणि सव्वा तास खिळवून ठेवले या सहजसुंदर अभिनयाने. खूप खूप अभिनंदन आपल्याबरोबर ऋचा या अभिनेत्रीचे पण.
@pranalideobhakta51866 ай бұрын
अप्रतिम.खूप दिवसांनी इतकी सुरेख कलाकृती बघितली.दोघांची कामे तोडीस तोड.धन्यवाद.
@naynadoshi75839 ай бұрын
Atishay sunder, speechless experience, uttam film baryach varshani eksandh pahili
@RatiAthavale10 ай бұрын
अप्रतिम चित्रपट अभिनय अप्रतिम नवीन असूनही। ऋचा भाग्य तुझे उत्तम कलाकार सोबती काम करण्याची संधी मिली