संत तुकाराम महाराज बीज - नित्यपाठाचे बारा अभंग - विठ्ठलाचे अभंग - Sant Tukaram Maharaj- 12 Abhanga's

  Рет қаралды 929,713

Bhakti Marathi

Bhakti Marathi

Жыл бұрын

Title - Sant Tukaram Maharaj - 12 Abhanga's
Singer - Mahesh Hiremath
Copyrights - Bhakti Vision Entertainment
00:01 - जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
04:01 - अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥
08:07 - उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥
बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥
11:04 - जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥
14:32 - ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥
आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
वर्णियेले एका गुणनामघोषं । जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५॥
17:54 - दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥
21:30 - ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥
घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥
24:29 - भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥
28:10 - मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥
साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥
31:26 - गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥
निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥
35:52 - दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥
लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥
त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका महणे ॥५॥
39:22 - सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥
पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥
विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥
सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥
42:48 - चार कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितले हे तुका कथुनियां गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेभावे ॥४॥
जीवेभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥
Must Watch Videos:
►10 Santanche Abhang - • १० संतांचे अभंग : अनंत...
►13 Mahadev Bhaktigeete - • टॉप 13 महादेवाची गाणी ...
►20 Swami Samarth Aarti • Swaminchi Nitya Seva A...
►10 Dattachi Gani - • Top 10 निघालो घेऊन दत्...
►10 Vitthal Bhaktigeete - • एकादशी स्पेशल : चंद्रभ...
►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 1...
►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय ...
►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fa...
►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra ...
►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam ...
►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | N...
►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu...
►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Shree Mahalakshmi Supr...
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE

Пікірлер: 189
@mahadevkulye9789
@mahadevkulye9789 Жыл бұрын
Ase abhang shodhun pn sapdat nahi Atishay Sundar abhang thank you available kelyabaddal 👌🙏
@sopanrakate3203
@sopanrakate3203 Жыл бұрын
जिवनाचं सार हे कशात आहे ते तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे.🌹जय हरी विठ्ठल 🌹
@Sanatani_power476
@Sanatani_power476 Жыл бұрын
फार सुंदर जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई
@shankargalphade7384
@shankargalphade7384 16 сағат бұрын
कशि लाभली आहे भक्ती परंपरा , सर्व गुण्यांगोविनदाने राहत होते .आता पर्यंत खासदार obc समाज निवडून देतो.खालच्या पातळीवर obc समाज राजकारणात राहीला तर काय फरक पडतो .हे सर्व राजकारणी लोकांचे कट कारस्थान आहे .आपण वारकरी समुदाय यातच जिवन भर आनंदी राहू शकतो .
@ruchiramore5442
@ruchiramore5442
खरा परमार्थ या अभंगात आहे .संसारात राहूनही परमार्थ कसा करता येतो हे श्रीमंत तुकाराम महाराज सांगत आहेत. शतशः प्रणाम
@jayasutalekar9314
@jayasutalekar9314 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@parashrammagar5290
@parashrammagar5290
जय जय रामकृष्ण हरी...कलीयुगात संत हेच देव आहेत.. मात्र त्यांचे अभंगानुसारच आचरण, वर्तन असलेले संताचे चरणी नतमस्तक होऊ या.... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही
@AashrubaSolanke-mj7jf
@AashrubaSolanke-mj7jf
आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात कारण संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे
@arunoparnav3659
@arunoparnav3659
आम्ही फडणवीसला स्वीकारले नाही, महाराष्ट्र या माणसाला बारभाई कारस्थानी म्हणून ओळखणार
@KailasPanchal-ph9cu
@KailasPanchal-ph9cu 21 күн бұрын
Khup dhyanwad abhag takle badl Ashe abhag aiklya ne sharirat urza niraman hote
@rajusapkal5777
@rajusapkal5777 21 күн бұрын
खूप छान अभंग आहेत मन प्रसन्न झाले
@pundalikgsavant9419
@pundalikgsavant9419 Жыл бұрын
इतकी शांती प्राप्त झाली आहे मला की हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही . धन्य झालो हे अभंग ऐकून .
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 2 сағат бұрын
Very nice bhakti songs in nice voice, thanks for having on you tube
@surendrasakore8805
@surendrasakore8805 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे महाराज तुमचा मन प्रसन्न झाले 🙏🏻🚩
@prakashkshirsagar5927
@prakashkshirsagar5927 Жыл бұрын
फारच सुंदर
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 12 сағат бұрын
Nice bhakti songs/abhangs in nice voice of Mahesh Hiremath, thanks for having on you tube.
@ashokwatekar2888
@ashokwatekar2888
राम कृष्ण हरी...पांडुरंग हरी...
@shivajimulik9347
@shivajimulik9347 Жыл бұрын
जगावे कसे या अभंगातून गायिले आहे छान। 🎉राम कृष्णा हरी।
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌च अभंग तुकोबांचे ... जय जय जय तुकामाऊली कीं जय जय जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏👏👏👏👏
@hemlatamayekar4699
@hemlatamayekar4699 21 күн бұрын
खूप छान अभंग झाला होता आता धन्यवाद
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 14 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Circle?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН