Рет қаралды 505,189
नमस्कार मित्रांनो🙏🙏
मी तुमचा सेंद्रिय मित्र आण्णासाहेब जगताप नवनवीन माहिती घेऊन येत असतो
👉मित्रांनो आज आपण सेंद्रिय/ जैविक युरिया,भुसुधारक,जीवणुवर्धक कसे तयार करायचे ते पहाणार आहोत
👉यासाठी लागणारे साहित्य 👇
👉प्लास्टिकचा ड्रम 20 लिटर पाणी मावेल असा
👉गोमूत्र 10 लिटर
👉देशी गाईचे शेण 2 किलो
👉काळा गुळ 2 किलो
👉वरील साहित्य आपण घेतलेल्या ड्रममध्ये चांगले मिक्स करुन घ्यायचे आहे
हे मिश्रण फक्त 24 तास एकत्र ठेउन दयायचे आहे
म्हणजे एक दिवस पूर्ण
24 तासानंतर हे औषध तयार होते
👉तयार झाल्यावर हे औषध पिकावर फवारणीसाठी एक पंपाला (16 लिटरच्या) 200 मिली किंवा एका लिटर पाण्यासाठी 15 मिली घेता येते
👉ड्रीपणे किंवा पाटपाण्यातून देण्यासाठी हे तयार झालेले औषध 200 लिटर पाण्यात मिक्स करून एका एकरसाठी वापरता येते
👉हे टॉनिक जास्तीतजास्त एकच आठवड्यापर्यंत चांगले किंवा परिणामकारक रहाते त्यामुळे एका आठवड्यातच वापर करायचा आहे
👉पीक 21 दिवसाचे झाल्यावर दर 10 दिवसाच्या फरकाने 4 ते 5 वेळेस वापर केल्यास याचा खूप चमत्कारिक परिणाम दिसतील
👉फायदे:-👇
पिकाचा पिवळेपणा नाहीसा होतो🌾
पिकाला काळोखी कायम राहते🌴🌳
जमीन भुसभुशीत रहाते 🍋🍍
जमिनीत जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढत जाते व सुपीक बनते
👉हे भुसुधारक सर्व पिकासाठी वापरता येते
👉खबरदारी👇
या जीवणुवर्धकाची फवारणी पीक फुलोरा अवस्थेत असताना करायची नाही
यासाठी ड्रीपणे,ड्रीचिंग किंवा पाटपाण्यातून देता येते
ड्रीचिंगसाठी 16 लिटरच्या पंपाला 2 लिटर वापर करायचा आहे
👉मित्रांनो मी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्यालाही विनंती करतो की हा संदेश जास्तीतजास्त शेतकरी बांधवांना पाठवून स्वावलंबी बना व बनवा,धन्यवाद
तुमचाच सेंद्रिय शेतकरी मित्र आण्णासाहेब जगताप🙏🙏
🍁सेंद्रिय शेती कशी फायद्याची, आणि प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी कसा बनेल हाच कायम प्रयत्न
खालील लिंकवर या विषमुक्त शेती पिकवा👇Thank you for your message,👇🍀🍁 दुर्मिळ गावरान बियाणे मिळेल 🍁सेंद्रिय शेती कशी फायद्याची, आणि स्वावलंबी प्रत्येक शेतकरी बांधव कसा बनेल हाच कायम प्रयत्न खालील लिंकवर या विषमुक्त शेती पिकवा👇
📡You tube channal👇 / दिशासेंद्रियशेती
📒 Facebook page👇 m.facebook.com...
🤝Facebook group👇 / 284694456