Рет қаралды 243
१४ ) इंटरनॅशनल प्रवास
१४ ) लग्न झाल्यापासून अमित-अमृता भारतात गेले नव्हते. घरची आठवण यायची, पण इलाज नव्हता. अमृताच्या classes मध्ये पैसे खर्च झाले होते. आता पालकांना बोलवायचं म्हटलं, तरी तिकिटं काढणं शक्य नव्हतं. मग ?
मित्रांपैकी ज्या कोणाचे पालक येतील,त्यांच्याबरोबर वेळ घालवून, लाड करवून घेऊन समाधान मानायचे. शिवाय video calls होतच असायचे. सगळ्यात पहिले गुरमीत चे आई-वडील आले. हा त्यांचा पहिलाच विमान प्रवास. ऐका त्यांची गंमत आता
दिलबाग आणि मोना,लागले तयारीला
गुरमीत म्हणाला होता“ या आता अमेरिकेला “
अभिमानाने सांगू लागले सगळ्यांना
मुलाने आम्हाला बोलावले आहे अमेरिकेला
पहिली पायरी visa मिळवणे
Documents पाठवले गुरमीतने
एजन्ट कडे submit केले दिलबागने
आता interview ची वाट पाहणे
अबब !!! सहा महिने interview नाही ?
गुरमीत तर म्हणाला मिळेल आठवडयानी
तुसी लकी हो दिलबाग, मोनाजी !
सहा महिने wait म्हणजे काहीच नाही
Corona मुळे visa साठी लाईन आहे मोठ्ठी
अमेरिकेला जायची घाई असली, तरी इलाज नाही !
अच्छा ! कसं करायचं गुरमीत आता ?
थांबायचं ! दुसरं काय करणार आता ?
हा पहिलाच विमानप्रवास ना तुमचा ?
अनायासे वेळ आहे सहा महिन्यांचा
तर एक डोमेस्टिक ट्रिप करून टाका
तेवढाच एक अनुभव विमानप्रवासाचा !
दोघंही हो हो म्हणाले
पण त्यांना अजिबात नाही पटले
उगीचच पैसे खर्च करायचे ?
मुलगा देतो म्हणून काय झाले ?
आपण तसे अजिब्बात नाही करायचे
एकदम international च जायचे !!
interview चा दिवस उजाडला
दोघेही पोचले embassy ला
इंग्रजी भाषा येत होती त्यांना
म्हणून दुभाषी दोघांनी नाकारला
पिनड्रॉप शांतता पाहिली
आणि टेन्शन ची सुरुवात झाली
दुभाषी न घेऊन चूक तर नाही केली ?
पण आता काय ? ती संधी तर हुकली !
काचेच्या आतून अमेरिकन बोलत होता
काचेच्या बाहेर स्पीकर होता
त्याच्या तोंडापासून माईक जरा जरी हलला
काहीच ऐकू येत नव्हतं बाहेरच्यांना
Yes - no, आपले सुरु होते ,
तोंड कोरडे पडले होते
पासपोर्ट,documents करेक्ट होते
शिक्का मारणे, तेवढंच बाकी होते
हुश्श !! झाला बाबा visa एकदाचा
आता शोध घ्यायचा काउंटर चा
अवकाश फक्त चेक भरण्याचा
कि मग मार्ग मोकळा अमेरिकेचा
मार्ग मोकळा इंटरनॅशनल प्रवासाचा
मार्ग मोकळा इंटरनॅशनल प्रवासाचा