Рет қаралды 207,716
शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचं कथन अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'लोकसत्ता'चे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर लिखित 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. महाराष्ट्राची जडण-घडण उलगडून दाखवताना त्यांनी 'डेक्कन आफ्टर शिवाजी' या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं, याची मांडणी करताना हे विधान केलंय. त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या तर मराठा इतिहासाच्या काळजावरची ही जखम पुन्हा भळभळू लागली आहे. इतिहासातल्या घटनांविषयी असं छातीठोकपणे सांगता येतं का? संभाजी महाराज आणि सोयराबाईंचं नातं नेमकं कसं होतं? शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर काय नाट्य घडत होतं? सोयराबाईंनी संभाजी महाराजांविरोधात कट रचले होते का? सोयराबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला? याबद्दल इतिहासात काय पुरावे आहेत? इतिहासकारांची काय मतं-मतांतरं आहेत? आणि त्याबद्दल कुबेरांचं काय म्हणणं आहे? या प्रश्नांची उत्तरं ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
लेखन आणि निर्मिती - प्राजक्ता धुळप
व्हीडिओ एडिटिंग- राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi