Рет қаралды 231,197
#BolBhidu #BishnoivsBambiha #IndiaCanadaIssue
कॅनडात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ चर्चेत आली आहे. रॉ सारखी संघटना चर्चेत येण्यामागं दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. पहिलं म्हणजे भारतानं दहशतवादी घोषित केलेल्या हरदीप निज्जरची जून महिन्यात हत्या झाली, या हत्येसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताला जबाबदार धरलं आणि कॅनडामध्ये रॉ साठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर हत्येचा आरोप केला. कॅनडाकडून रॉच्या या अधिकाऱ्याचं नावही लीक झालं. दुसरं म्हणजे ज्या सुक्खा दुनेकेची गॅंगवॉरमध्ये हत्या झाली तो खलिस्तानी चळवळीशी निगडित होता, त्यामुळं त्याच्या हत्येनंतरही रॉ नंच बिष्णोई गॅंगला हाताशी घेऊन सुक्खाचा गेम केल्याचं बोललं जाऊ लागलं.
पण भारताच्या गुप्तचर यंत्रणा गुंडांना हाताशी घेऊन इतर गुंडांचा गेम करतायत, या चर्चा होतायत कारण इतिहासात अशा घटना घडल्या होत्या, जेव्हा भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी देशविरोधी कारवाया करणाऱ्या गॅंगस्टर्सला संपवायला भारतातल्याच नामचीन गुंडांची मदत घेतली होती. या घटना नेमक्या कुठल्या ? हे गॅंगस्टर्स नेमके कोण ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/