Рет қаралды 297,622
देवगिरी. जणू इंद्राची अंबारी. साक्षात देवतांच्या राजाच्या सुरक्षेसाठी ज्या उच्चतम कोटीची सुरक्षा यंत्रणा राबवून दुर्गकोट उभारावा त्याच.. किंबहूना त्याहून काकणभर जास्तच काळजी देवगिरी उभारताना घेण्यात आली आहेत. आज जो दुर्गम दुर्ग देवगिरी आपण पाहतो आहोत तो उभा राहायला दोनशेहून अधिक वर्ष खर्ची पडलीयत. देवगिरीवर खिळ्यांचे दरवाजे आहेत, पिरॅमीड स्ट्रक्चर्स असलेले बुरुज आहेत, वॉचटॉवर्स आहेत, खासा हत्ती हौदेय.. इतकंच कायतर.. सुस्थितीत असलेला खंदक, भयानक अतिभयंकर अंधारी मार्ग, आणि नुसत्याच भुयारी वाटा.. डोळ्याचं पारणं फिटून मेंदूला अक्षरशः मुंग्या आणण्याची किमया देवगिरी साधतो. देवगिरी किल्ल्याच्या प्रत्येक पावलावर जर तुम्हाला ‘स्ट्रॅटेजी’ राबवलेली दिसली नाही ना तर तुम्ही म्हणाल ते मी हरेन.. चला तर, देवगिरी उलगडायला सुरुवात करुया. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे, छत्रपती #संभाजीनगर येथे वसलेल्या यादवांच्या #देवगिरी वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
#roadwheelrane #gadkille #devgirifort #devgiri #shivajimaharaj #sambhajinagar
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane