वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentary

  Рет қаралды 393,573

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

निसर्गाचा हिरवा शालू नेसलेली आमची वसई म्हणजे पाहताक्षणी प्रेमात पडावं असं ठिकाण. वसईची केळी तर सुप्रसिद्धच आहेत. कित्येक दशकांपासून वसईच्या केळ्यांना मुंबई व महाराष्ट्राभर मागणी आहे. वसईतील केळी, रसायनं न वापरता भट्टीचा वापर करून पिकवून मुंबईला नेऊन विकण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू होता. एकेकाळी हा व्यवसाय इतका फोफावला होता की कित्येक वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळ्याच्या वखारी होत्या. मात्र आता हा पारंपरिक व्यवसाय करणारे फक्त श्री. मायकल तुस्कानो (वय: ७४ वर्षे, राहणार: घोसाळी, नंदाखाल) हे एकमेव उरले आहेत.
ह्या कामासाठी लागणारी प्रचंड अंगमेहनत व वेळखाऊ पद्धत ह्यामुळे आता ह्या व्यवसायात नवीन कुणी येताना दिसत नाही. मायकल काका गेली ६० वर्षे अविरतपणे हा व्यवसाय करत आहेत.
आज मी त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ह्या दिनचर्येत सहभागी होऊन त्यांचा केळी विकत घेऊन, ती झाडावरून काढून, पिकवून मुंबईला नेऊन विकण्यापर्यंतचा दिनक्रम चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रचंड मेहनतीला कुठेही कात्री न लावण्याची खबरदारी घेतल्याने ही चित्रफीत बऱ्यापैकी लांबली आहे मात्र त्यांच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येला केलेला तो एक सलाम आहे असे मी मानतो. तुम्ही देखील आवडीने ही चित्रफीत पाहाल अशी आशा आहे.
धन्यवाद!!
0:00 प्रस्तावना
1:29 केळ्यांची निवड व कापणी
11:44 केळी पिकवायची पारंपरिक पद्धत
11:58 कुक्कुटपालन
20:34 केळ्यांची बांधणी
29:27 विरार ते दादर रेल्वे प्रवास
34:07 दादर स्टेशन ते हिंदू कॉलनी पायी प्रवास
37:39 केळीविक्री व ग्राहकांचे अभिप्राय
44:56 इराणी हॉटेलात नाश्ता
45:13 दादर ते विरार रेल्वे प्रवास
45:54 मायकल काका व त्यांच्या सहचारिणीचे आभार
#vasaichikeli #vasaiculture #haritvasai

Пікірлер: 2 900
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
मंडळी, मला कल्पना आहे की हा व्हिडीओ मोठा आहे व आपणापैकी बऱ्याच लोकांना पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुरेसा वेळ नसणार म्हणून खालीलप्रमाणे व्हिडिओची विभागणी आपल्यासाठी दिलेली आहे. ०१:२९ ते ११:४३ केळ्यांची निवड व कापणी ११:४४ ते १९:५७ केळी पिकवायची पारंपरिक पद्धत १९:५८ ते २०:३३ कुक्कुटपालन २०:३४ ते २९:२६ केळ्यांची बांधणी २९:२७ ते ३४:०६ विरार ते दादर रेल्वे प्रवास ३४:०७ ते ३५:४८ दादर स्टेशन ते हिंदू कॉलनी पायी प्रवास ३७:३९ ते ४४:३४ केळीविक्री व ग्राहकांचे अभिप्राय ४४:५६ ते ४५:१२ इराणी हॉटेलात नाश्ता ४५:१३ ते ४५:५३ दादर ते विरार रेल्वे प्रवास ४५:५४ ते ४६:५० मायकल काका व त्यांच्या सहचारिणीचे आभार
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 4 жыл бұрын
Me time kadun tuza vidio purn bhagate. karan me samvedi brahman samajatali ahe. maza intercast marriage zala ahe. hya mazya old memories ahet. so mala tuze sagale vidio avadatat.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभनाजी. तुमच्या कमेंट्स आम्हाला नवनवीन व्हिडीओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.
@sachinjadhav3154
@sachinjadhav3154 4 жыл бұрын
तुमचे खुप खुप आभार.
@prafullgovilkar00
@prafullgovilkar00 4 жыл бұрын
camera thodda changla vapra baki tumche sagle video chhan asatat
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@sachinjadhav3154 धन्यवाद, सचिन जी.
@rekhalopes8454
@rekhalopes8454 4 жыл бұрын
सुनील, आमच्या नानाच्या जीवनावर आधारित वसईचा केळीवाला हा माहितीपट बनवून तुम्ही नानाच्या कामाचा गौरव करून त्याना विश्वपरिचीत केले आहे, म्हणून आम्ही *ख्रिस्तविराज* आणि *समृद्धी* कुटूंबीय आपले सदैव ऋणी आहोत. नानाने ह्याच व्यवसायातून आम्हा पाच भावंडांचे संगोपन, शिक्षण, लग्ने करून स्वत:चे घरही बांधले. नानाचा हा व्यवसाय आजही अविरतपणे चालू आहे, आणि त्यांच्या ह्या कामाचा आम्हा दोन्ही कुटूंबांना रास्त अभिमान आहे. सुनील पून्हा एकदा आमच्या बय (आजी) कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून तुमचे मनस्वी आभार. रेखा
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
रेखाबाय, नानाला खरोखर सलाम हाय. तो ग्रेट हाय. त्याव आपल्या आख्ख्या समाजाला अबीमान हाय. आबारी.
@smitabandivadekar4742
@smitabandivadekar4742 4 жыл бұрын
आम्ही विरारलाच राहतो. *आपण खुपच भाग्यवान आहात की...काकांसारखे पालक आपणांस लाभले..त्यांना कधीच अंतर देऊ नका. *अगदी पूर्ण व्हिडिओने जागीच खिळवून ठेवलं. खरंच कमेंट्स करण्यासाठी शब्दच उरले नाहीत. ओठातले शब्द ओठातच स्थिरावले. ह्या वयात एवढं थोर, मेहनती व्यक्तिमत्त्व...काकांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. *आपल्या सुंदर आवाजात अगदी आपल्या प्रामाणिक मेहनतीने ज्या भाऊंने हा व्हिडिओ बनविला त्यांचेही खूपच कौतूक आहे. आजच्या तरूणांनी खरोखरच हा मार्गदर्शनापद व्हिडिओ जरूर पहावा..ही गरज आहे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@smitabandivadekar4742 जी, तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांसाठी धन्यवाद.
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
मायकल काका तुमचे वडील आहेत ही फारच सौभाग्याची गोष्ट आहे.
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 4 жыл бұрын
नानांचा आदर्श घेण्यासारखा आहे .तुम्ही ते लिहून कृतज्ञता व्यक्त केलीत .अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत .
@sangitasarang3551
@sangitasarang3551 4 жыл бұрын
डोळे भरून आले हो संपूर्ण विडीओ पाहुन खरंच आजच्या काळात ही एवढी मेहनत कोणाला ही न झेपणारी आहे ..सो काकांना पुन्हा एकदा साष्टांग दंडवत .ग्रेट,ग्रेट, आणि ग्रेटच 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो संगीताजी. काकाजी मेहनत ह्या वयात घेत आहेत ती आपल्याला जमणे कठीण आहे. मी काहीही वजन न घेता त्यांच्यासोबत फिरलो तरी खूप थकलो, मात्र काका इतकं वजन वाहूनही थकले नव्हते. सलाम आहे त्यांना, धन्यवाद.
@govindagunjalkar3176
@govindagunjalkar3176 4 жыл бұрын
काका ग्रेट आहेत.
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 11 ай бұрын
काका सलाम तुमच्या मेहनतीला.🙏❤
@dhananjaydorle5789
@dhananjaydorle5789 3 жыл бұрын
कुठल्याही शासकीय पुरस्काराचा खरा मक्तेदार ....very motivating ....सलाम Michel काका धनंजय नागपूर
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, धनंजय जी
@atulraykar3107
@atulraykar3107 2 жыл бұрын
होय भाऊ बरोबर तुमचे, पण दुःख आहे भारतात चमचेगिरीलाच पुरस्कार मिळतो
@sujataloke5186
@sujataloke5186 Жыл бұрын
माहिती पट पाहून डोळे तर पाणावले पण अतिशय मेहनती मायकल काका ह्या वयात केवढे ते कष्ट..आपण विचारच करू शकणार नाही. सलाम त्यांच्या मेहनतीला 🙏🏻
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@nitinnarkhede2642
@nitinnarkhede2642 4 жыл бұрын
सुनील भाऊ, यु ट्यूब वर काकांचा व्हीडीओ पाहताना पहिल्यांदा डोळे भरून आले. काकांच्या काबाडकष्टाला साष्टांग दंडवत. तुझेही मनापासून आभार 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, नितीनजी काकांची मेहनत पाहून आपण भावनिक होतो हे खरंय. धन्यवाद.
@maggituscano2741
@maggituscano2741 4 жыл бұрын
आपण केलेला वसईचा केळी वाला हा माझ्या नानांचा माहिती पट पाहुन आमचे नाना करत असलेल्या मेहनतीला थोडेफार फळ मिळाले किंवा त्या मेहनती चे चीज झाले असे मला वाटते आणि हा व्हिडिओ पहात असताना डोळे भरून आले कारण लहान असताना मला सुध्दा आमच्या नानांनी तीन चार वेळा मुंबईला नेलेले आणि मला एका गि-हाईंकांच्या घरी बसवून ते पुर्ण माल कितीतरी जिने चढुन उतरून विकुन यायचे, हयाची कल्पना आज तुमचा व्हिडिओ पाहताना आली, तुमचे खुप खुप आभार व वसईची संस्कृती जतन केल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
नानाला सलाम, त्या मेहनतीला आन सातत्याने कार्यरत ऱ्याश्या स्वभावाला सलाम!!!
@vaishalidabholkar5321
@vaishalidabholkar5321 4 жыл бұрын
Heart touching
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@vaishalidabholkar5321 जी, धन्यवाद.
@devramshirole9308
@devramshirole9308 7 ай бұрын
नानांच्या मेहनतीला सलाम यांच्या नंतर हे काम कोणीच करनार नाही खूप खूप धन्यंवाद
@vinitvaskar9655
@vinitvaskar9655 5 ай бұрын
मित्रा ते काका आता काय करतात?? त्यांची शारीरिक व आर्थिक स्थिती कशी आहे ?? सांगू शकशिल का ?
@rebeccalewis3947
@rebeccalewis3947 3 жыл бұрын
If there is any documentary I've watched in my 23 years, then it is this video that really touched me and brought tears to my eyes.. My generation wouldn't even think of doing 1% of the effort he's doing... Huge huge huge respect to Uncle Michael.. And thank you for documenting this Sunil..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rebecca Ji
@ryandsouza4482
@ryandsouza4482 2 жыл бұрын
I just watched it, share your sentiments
@satishjoshi4174
@satishjoshi4174 3 жыл бұрын
मायकल काका चे कष्ट बघुन खुप आश्चर्य वाटले. येवढे ओझे ते कसे या वयात उचलू शकतात खरोखर कमाल आहे. हिंदू कॉलनीतील लोक भाग्यवान आहेत..ज्यांना असा without pesticide चा माल मिळतो. देव करो आणि काकांना उदंड आयुष्य लाभो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सतीश जी
@vinitasawant4800
@vinitasawant4800 Ай бұрын
मायकल काकांना नमस्कार,या वयात कामाची जिद्द,कावड घेऊन जो प्रवास ,आणि या वयात मानले बुवा,मला तर या वयातला प्रवास पाहून रडू कोसळले,आता या वयात त्यांच्या मुलांनी त्यांना मदत करावी.त्यांना आराम द्यावा. आमच्या bandra chya घरी कावड घेऊन वसईचे काका ताज्या भाज्या यायचे विकायला त्यांची आठवण झाली,खूप मेहनती असतात . 🙌🙌🙌🙏🙌🙌🙌
@pritithale4536
@pritithale4536 4 жыл бұрын
मायकल काका तुम्हाला मानाचा मुजरा खरच आज येवढ्या वयात सुध्दा खुुप कष्ट करतात
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद प्रितीजी
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 4 жыл бұрын
Very Hardworker dedicated person n real nature lover maintaining Environment .Young generation must take active part in maintaining our environment.No dobut this is his livelyhood.Hats off to both Kaka as well Sunil for making nice video
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 4 жыл бұрын
P
@bhaskarzemse6659
@bhaskarzemse6659 4 жыл бұрын
By mistake p toched
@priyadeshpanderajan
@priyadeshpanderajan 4 жыл бұрын
आजच्या पिढीला लाजवतील असे त्यांचे काम आहे जोवर हात पाय चालतात तोवर कष्ट करायचे ही शिकवण देत आहेत देव त्यांना खूप बळ आणि भरभराट देवो ही देवा चरणी प्रार्थना
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, प्रियाजी. काका खरोखरच आजच्या पिढीला खूप काही शिकवून जातात धन्यवाद.
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 жыл бұрын
@@sunildmello तुम्हाला नाताळ chya शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@prasadjoshi7373 जी तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
@rajeshwarkalge632
@rajeshwarkalge632 4 жыл бұрын
Bhau tumchey khup abhar. Tumhi khup durmil gosti dakhwalat. Mi vachley hotey ki Velchi keli chey variety naamshesh zali. Tumchy kadi ashich vanaspati va rural life prt dakhwa. Tumhala khup khup shubhechha.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@rajeshwarkalge632 जी, धन्यवाद.
@yaminiborkar5993
@yaminiborkar5993 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे सुनिल कि तुम्ही ही डॉक्युमेंटरी बनवून अतिशय कष्टाळू,सचोटीने व मनापासून काबाडकष्ट करणारया काकांना न्याय दिला व साठ वर्षांपासून चाललेल्या त्यांच्या अमाप कष्टांचे चीज केले.सर्व लोकांना त्यांची ओळख झाली.ह्यासाठी तुम्हीही फार मेहनत घेतली.दोघांनाही माझा मानाचा मुजरा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यामिनी जी
@purushottam647
@purushottam647 6 ай бұрын
अतिशय कष्टाचं काम आहे.काकांना व तुम्हाला प्रेमाचा नमस्कार! अनवाणी पायांनी चालताना बघून वाईट वाटले.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@balashebshinde3856
@balashebshinde3856 4 жыл бұрын
खरच डोळे भरून आले काकांची मेहनत बघून. ह्याच्यामुळे मुंबई कराना ताजा आणि नैसर्गिक माल मिळतो. सो एक विनंती आहे की या मालाची किंमत करू नका. कमी पैशात. योग्य तो मोबदला द्या आणि काकांच्या कष्टाला सलाम. सर तुम्हाला ही. कारण असे व्हीडियो कोण बनवत नाही. ग्रेट जाब
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बाळासाहेब जी.
@archanapatil3948
@archanapatil3948 4 жыл бұрын
काकांचं काम, कष्ट समाजासमोर आणल्याबद्दल आपलं अभिनंदन. भाज्या / फळांचे भाव विचारताना घासाघीस करणारे हा माहितीपट बघितल्यावर दहा वेळा विचार करतील ही अपेक्षा!
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी खरं अर्चना जी, धन्यवाद.
@prajakta3010
@prajakta3010 2 жыл бұрын
सुनील, खूप मोठा video म्हणुन नंतर आरामात बघेन असा विचार करून इतके दिवस मी हा video पाहिला नव्हता, पण परवाच्या मुलाखतीत तू त्याचा उल्लेख केला आणि मी वेळ काढून तो पाहिला. आता बोलायला शब्दच उरले नाहीत. मायकल काकांना साष्टांग दंडवत. या वयात ते जे मेहनतीचे काम करत आहेत ते आपल्याला ह्या वयात देखील जमणार नाही. त्यांचा हा प्रवास दाखवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता जी
@rameshmehta9013
@rameshmehta9013 Жыл бұрын
I am just talking about may be year 2010 and before. After visiting Hindu Colony, Dadar, probably he would come to my building, just sale some remaining Banana and sometimes vegetables. Just Hat's off, a hard working Vasai wala. Happy to see a very familiar face in documentary. Resident of Matunga (east), very known building in Matunga & Dadar area.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for sharing this wonderful memory, Ramesh Ji
@shailacarval2177
@shailacarval2177 4 жыл бұрын
सुनिल सर धन्यवाद . हा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळयांत पाणी आले . कारण माझे बाबा पहाटे पाहिल्या गाडीने दादरला असेच भाजी घेऊन जायचे . पण ते कशप्रकारे भाजी विकत असतील याची कल्पना आज मला व्हिडियो पाहून आली .आज माझे बाबा हयात नाहीत पण त्यांच्या कष्टाला मी सलाम करते .सर आपला व्हिडियो अप्रतिम !भाषा अतिशय सुंदर !हा व्हिडियो सर्वांना मनापासून आवडेल यात तिळमात्र शंका नाही ,
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, शैलाजी आपल्या पूर्वजांनी खरोखर खूप मेहनत घेतली आहे. धन्यवाद.
@sarojsatam1326
@sarojsatam1326 4 жыл бұрын
Namashkar kaka
@smileman3161
@smileman3161 4 жыл бұрын
मेहनत करून केळी विकणारा मराठी व्यापारी पडद्याआड गेला व पावडर टाकून केळी विकणारे भैय्या गब्बर झाला
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, विवेक जी.
@sanjaysawant232
@sanjaysawant232 11 ай бұрын
धन्यवाद. किती प्रामाणिक, किती कष्ट डाेळे आेले हाेतात. उदंड आयुष्य लाभाे हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@aniljoshi6933
@aniljoshi6933 11 ай бұрын
खरंच काकांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम महाराष्ट्र मधील शेतकरी वर्गासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे काका आपलं कौतुक करावे तेवढं कमी आहे तुमचे कष्ट खूप आहेतच आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा 👍🙏💐
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, अनिल जी. धन्यवाद
@divinepropertydealernalaso9860
@divinepropertydealernalaso9860 4 жыл бұрын
असा व्यावसाय करणारे ज्येष्ठ व्यावसायिक आपल्या समाजात आजही आहे...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, जिमिजी.
@somnathgoje9299
@somnathgoje9299 4 жыл бұрын
खरंच प्रनाम ह्या माऊलीला किती कष्ट घेताय ते ह्या वयात
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, सोमनाथजी खरोखरच खूप कष्टाचं काम आहे.
@chandrakantambekar3026
@chandrakantambekar3026 4 жыл бұрын
तूमचा म्हनंतीला सलाम
@ravindranarvekar3283
@ravindranarvekar3283 4 жыл бұрын
खरेच नाननचाया मेहनतीला मानाचा मुजरा
@2887raj
@2887raj 2 жыл бұрын
फक्त एकच शब्द ...सलाम ....तुम्हाला काका... आणि सुनील तुमचे पण आभार... 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राज जी
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आलं ‌काकांच्या असेच बालबुद्धी ताकत राहू दे देवा त्यांना कायमस्वरूपी ठणठणीत राहुदे मनापासून नमस्कार थँक्यू सुनील दादा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
@chhayalobo4773
@chhayalobo4773 4 жыл бұрын
खूपच छान .डोळयात पाणी आले.काका तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार।
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, छायाजी, काकांचे हे मेहनतीचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. धन्यवाद.
@kunaltathare2135
@kunaltathare2135 4 жыл бұрын
खुप छान उपक्रम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏 मायकल काकांच कौतुक कराव तेवढे थोडेच आहे मायकल काकांची मेहनत हि तरूणांना लाजवेल अशीच आहे मायकल काका तरूणांन साठी आदर्शवत आहेत तुमचा हा आगळा वेगळा माहिती पट पाहून मायकल काकांना भेटण्याची खुप ईच्छा झाली आहे मी गिरगावात राहायला आहे आधी गिरगावात हि वसई चे भाजीवाले दुधवाले खुप यायचे ते आता ऐणे कमी झाले आहेत आम्हला त्याची कमी नेहमीच जाणवते माझी आई सांगते कि मला माझ्या बाबांनी लहान पणी वसईच लावल होत. खरच वसई करांचे आम्हा मुबंई करांवर खुप उपकार आहेत कि ज्यांनी आम्हाला ताजी भाजी फळ दुध हे नेहमी अगदी लेकरा सारख पुरवल. तुम्ही दादरला आल्यावर हिंदू काॅलनीत पहीला थांबा कुठे घेतलात हे सांगितलं तर बरे होईल मला मायकल काकांना भेटण्याची खुप ईच्छा झाली आहे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
कुणाल जी, तुमच्या विस्तृत कमेंटवरून तुमचे आम्हा वसईकरांवर असलेले प्रेम जाणवते. काका दर बुधवारी दुपारी २ च्या सुमारास दादरला हिंदू कॉलनीत पहिल्या गल्लीत इराणी हॉटेलच्या मागे असतात, पण ह्या बुधवारी नाताळ असल्याकारणाने ते गुरुवारी येतील. धन्यवाद.
@kunaltathare2135
@kunaltathare2135 4 жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद सुनिल भाऊ. 🙏
@neetashinde538
@neetashinde538 2 жыл бұрын
या काकांच्या कष्टांना शब्दच नाही खूप खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या परिवाराला सुध्दा धन्यवाद सहयाद्रीचा कार्यक्रम पाहीला विरार पश्चिम
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नीता जी
@seemaraut2404
@seemaraut2404 3 жыл бұрын
वसईचा केळीवाला ही तुमची डाॅक्युमेंटरी अतिशय आवडली.लोकांना फक्त वसईची केळी,भाजी माहित आहेत.पण ती वाडीतून थेट त्यांच्या दारापर्यंत आणणारा मधला दुवा त्यासाठी किती मेहनत घेतो हे माहित नसेल.तुम्ही या डाॅक्युमेंटरीद्वारे यावर छान प्रकाश टाकलात .श्री.मायकेलकाका हा व्यवसाय करताना जी अपार मेहेनत घेतात त्याला तोड नाही.खरोखरीच ही एक साधना आहे त्यांची.बरं कुठेही मी काही मोठं काम करतोय याचा लवलेशही त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत नाही.ग्रेट माणूस!! 🙏 माझे माहेर आगाशीचे असल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक आपुलकी.तसेच माझी मोठी बहिणही ( सौ.चौधरी )हिंदू काॅलनीत राहते.तिच्याकडे नित्यनेमाने काका भाजी देत आलेत.मीही त्यांना बरेचदा भेटलेय.म्हणून पाहताना खूप आनंद झाला. आणि सुनिल डिमेलो,तुम्ही या Unsung Heroes ना प्रकाशात आणण्याचे फार मोठे काम केलेत.तुमचेही खूप कौतुक. व अभिनंदन! !
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सीमा जी
@SanjayJD-pu1hz
@SanjayJD-pu1hz 4 жыл бұрын
खरोखर सलाम बाबांच्या अफाट मेहनतीला 🙏🙏 माझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रु होते ❤️ ह्या व्हिडीओसाठी खुप मेहनत घतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद... ह्या व्हिडीओ बद्दल बोलायला झाले तर शब्द तोकडे पडतील💖
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूब आबारी, संजयसायेब.
@astrillrodrigues4846
@astrillrodrigues4846 4 жыл бұрын
अचाट , अफाट व भन्नाट कल्पना आणि तितकेच अफलातून सादरीकरण ! या व्हिडीओ द्वारे तुम्ही 'सुवर्ण काळोखावर ' प्रकाश टाकला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या साठी 'वाहिलेल्या ' अथक प्रयत्नांना झळाळी प्राप्त करून दिली आहे . हा व्हिडीओ पाहून आज वसई नक्कीच आनंदात उजळली असेल.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
तुमच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण कमेंटसाठी धन्यवाद, एस्ट्रीलजी.
@vikasbagwe5055
@vikasbagwe5055 4 ай бұрын
मी हा व्हिडिओ आज अपलोड केल्यानंतर चार वर्षानंतर बघत आहे, अप्रतिम व्हिडिओ वसईच्या कावड वाला एवढी मेहनत घेतो हे आम्हाला तुमच्या व्हिडिओमुळे कळलं मायकल काकांच्या मेहनतीला सलाम
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विकास जी
@mrs.sanjumesh7874
@mrs.sanjumesh7874 5 ай бұрын
खूप कष्टाळू काका आहेत हे, बघून डोळ्यात पाणी येत आहे, इतका अवघड प्रवास सोप्या पद्धतीने करून कष्ट करतायत, पण पायऱ्या चढताना पाय किती थकत असतील काकांचे, येवढ्या वयात इतकं कष्ट करतायत, देवा सुखी ठेव काकांना नेहमी, शतायुषी ठेव🙏
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, संजुमेश जी
@PSMVIDEOBLOG
@PSMVIDEOBLOG 4 жыл бұрын
सुनील जी आपण खूप चांगला व्हिडिओ टाकला आहे आणि मायकल अंकल यांना सलाम गेल्या 60 वर्षापासून जे त्यांच्याकडे पिकते ते थेट ग्राहकापर्यंत पोचवत आहेत याची प्रेरणा खर तर सर्व शेतकर्‍यांनी घ्यायला हवी.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, काकांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. धन्यवाद.
@meenatuscano2854
@meenatuscano2854 4 жыл бұрын
Thanks Sunil , for giving Recognition to my Nana. Keep it up of giving knowledge to our young generation of our traditional farming business.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
आबारी मीनाबाय.
@shivprasadgavli8204
@shivprasadgavli8204 2 жыл бұрын
फक्त नतमस्तक होवून ह्यांच्या कष्टाचा आदर्श घ्यावा आत्महत्या करू इच्छिणाऱ्या किंवा तसा विचारात असलेल्या सर्वांनी हा व्हिडीओ पाहायला हवा। व्हिडिओ ला हा विषय निवड केली त्याबद्दल सुनील तुझे आभार मायकल काका ना परत एकदा मानाचा मुजरा काकूंना साष्टांग नमस्कार
@nandkumarnalawade5439
@nandkumarnalawade5439 3 жыл бұрын
वयाच्या चौ-याहत्तरीतही केवढी ढोर - मेहनत ! केवढे काबाडकष्ट !! व्यवसाय कसा नेटानं करावा ह्याचा सर्वोच्च वस्तुपाठ !! सलाम जिद्दीला ! साठ वर्षांच्या कारकिर्दीला !!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी
@prajaktapotnis6573
@prajaktapotnis6573 Жыл бұрын
मी IES पाटकर गुरुजी विद्यालय,हिंदू कॉलनीतच शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहे.आणि आपल्या मायकल काकांना गेली ३२/३३ वर्ष पाहतेय.....सदा हसतमुख असणाऱ्या मायकल काकांना अगदी मनापासून सलाम... आणि सुनील जी तुम्हाला मनापासून धन्यवाद..,
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मॅडम
@tukarampatil8579
@tukarampatil8579 4 жыл бұрын
मायकल काका ला सलाम सुनील ङिमेलो तुमी आपले वसईची माहीत आपली माणसे आपली माती.दिली धन्यवाद मित्रा तू दिलेल्या माहिती.बद्दल
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद तुकारामजी.
@sanjaydalvi8279
@sanjaydalvi8279 4 жыл бұрын
काका च्या मेहनती ला सलाम 👍🙏🙏🙏🙏🙏
@prashantmayekar1921
@prashantmayekar1921 4 жыл бұрын
मायकल काकांच्या या मेहनतीला सलाम , देव त्यांचं कल्याण करो , रक्षण करो , भरभराट करो आणि त्यांना दीर्घायुष्य देवो 👍 .
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, प्रशांत जी.
@milindakerkar2350
@milindakerkar2350 4 ай бұрын
एवढ्या वयात कोणीच असं काम करू शकत नाही मानलं या काकांना सलाम काकांना
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी
@milinddonde4413
@milinddonde4413 2 жыл бұрын
मराठी माणूस मेहनत करत नाही.. असे म्हणणाऱ्या साठी हि एक चपराक आहे.. प्रेरणादायी आणि भावनिक व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मिलिंद जी
@milind4426
@milind4426 4 жыл бұрын
पोच देण्यास उशीर झाला. क्षमस्व. खुप छान काम. तुमची चित्रफित बरेच सांगुन जाते, अजुन काय बोलावे. काका तर कर्मयोगी.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, भारत जी. काका खरोखरच कर्मयोगी आहेत.
@rajeshreeabdar9005
@rajeshreeabdar9005 4 жыл бұрын
आपल्या गावाची माणसं खूपच. कष्टाळु आहेत . माझे बाबा पण ९० वयाचे आहेत आताहि ते सुताराचे काम करतात. घरी बसुन
@shundi5
@shundi5 4 жыл бұрын
सलाम तुझ्या बाबाला
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अरे बाप रे, ९० व्या वर्षी सुतारकाम? कमाल आहे बाबांची. कुठे राहतात ते राजश्रीजी.
@rajeshreeabdar9005
@rajeshreeabdar9005 4 жыл бұрын
@@sunildmello सत्पाळा सोनार आळी माझा बाबाना आम्ही नाना बोलतो त्याचे नाव प्रभाकर रा. भट्टे माझा भाऊ पण तेच काम करतो महेश त्याला ते मदत करता नागराचे काम तेच करतात महेशला नाही येत ईसण (सिडी)पण बनवतात
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
ओह्ह, खूपच प्रेरणादायी आहेत तुमचे बाबा. मला त्यांचा किंवा तुमचा नंबर मिळू शकेल का?
@rajeshreeabdar9005
@rajeshreeabdar9005 4 жыл бұрын
@@sunildmello9321642108
@poojaraykar2793
@poojaraykar2793 2 жыл бұрын
असे अतिशय कष्टाळू प्रामाणिक काका त्या दादरकरना भेटले हे त्यांचे भाग्य आहे. काकांच्या कष्टाला सलाम. आणि सुनील तुझी कळकळ दिसते त्यालाही अभिवादन. डोळ्यात अश्रू आणणारे काका. त्यांच्या मेहनतीला तोड नाही.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पूजा जी
@CreativeWorld-ot1po
@CreativeWorld-ot1po 3 ай бұрын
व्वा छान, हे एक शूर वक्तीची ओळख करून दिल्याबद्दल आभार आणि एवढ्या प्रचंड मेहनतीने पिक्चर शुट केल्या बदल.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@ajinkyaaher
@ajinkyaaher 4 жыл бұрын
I don’t have words to write down here, people like him will never stand a chance to record their life, you did a great job by recording this I hope someday this documentary will reach to some medium where he will get recognition he deserves.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you for your kind words, Ajinkya Ji.
@sandy222197
@sandy222197 4 жыл бұрын
आजच्या पिढीला लाजवतील असे त्यांचे काम आहे ........
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी खरं बोललात आपण, धन्यवाद.
@ivana.gonsalves7368
@ivana.gonsalves7368 3 жыл бұрын
तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व खूप चांगलं आहे .सातजन्मी मला वसई च लाभू दे हीच इश्वरचरणी प्राथना .🙏🙏🙏 आमची वसई सुंदर वसई ..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आयवन जी. हरित वसई, सुंदर वसई!
@pravindabholkar1455
@pravindabholkar1455 3 жыл бұрын
सुनील तुम्ही हा व्हिडीओ बनवल्या बद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो कारण आपला मराठी माणूस कष्ट करू शकत नाही असं म्हणणाऱ्या पर प्रांतीयांच्या आणि काही स्वकीयांच्या ही थोबाडात तुम्ही चांगलीच मारलेली आहे. मायकल काकांच्या कष्टाला माझा तरी मनापासून सलाम. मी आज साठी कडे आलेला गृहस्थ असून साधं ट्रेन मध्ये चढण आता अवघड वाटत. यापुढे माझ्या खिशात जर पुरेपूर पैसे असले तर काका सारख्या माझ्या स्थानिक शेतकऱ्यांकडून अधिक घासाघीस न करता त्यांच्या कडील माल खरेदी करेन. काका तुम्हाला माझा शतशः मराठी सलाम. हिंदू कॉलनी ठीक आहे पण आज मुंबईत अनेक अशी मराठी लोक आहेत की ज्यांना पुढच्या सात पिढ्यांची काळजी करावी लागणार नाही इतकी सम्पत्ती आहे. त्यांनी ही ह्या आपल्या अशा अनेक काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास आपली वसई-विरार चे शेतकरी स्वताच्या वाड्या बिल्डरांच्या घशात न घालता अभिमानाने आपला पारंपारिक शेती व्यवसाय कायम ठेवतील, पर्यायाने मुंबई च्या जवळपास असणारा हरित पट्टा कायम राहील, आणि मुंबई गिळंकृत करण्याचे परप्रांतीयांचे डाव फेल होतील.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या विस्तृत व अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@pjd7635
@pjd7635 4 жыл бұрын
Hats off to Micheal Kaka!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 So much hard-working, honest, determined, disciplined!! Khup kahi shikayla milale Micheal kaka la pahun! Thanks a ton Sunil for bringing his story to us. Micheal Kaka is real Hero!🙏🏻
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, Michael Kaka is really great. Thanks.
@raviusare4269
@raviusare4269 4 жыл бұрын
सुनील दा, खूप खूप धन्यवाद हा विडिओ बनवल्याबद्दल . आजच्या पीडी ला लाजवेल असा हा विडिओ आहे . मायकल काका ला मनापासून सलाम 🙏🙏🙏. बाहेरून आलेली यूपी, बिहारची जे लोंढे आहेत, खास करून जे शॉर्टकट, भेसळ पद्धतीने मुंबई, महाराष्ट्रात राहून माल विकतात. अशा लोकांच्या बुढावर लात मारून त्यांना हकलवून द्यायला हवे आणि मायकल काका सारखे लोक जे खऱ्या अर्थाने इमानदारीने, खऱ्या कष्टांनी काम करतात अश्या लोकांना प्रतिसाद दिला पाहिजे .
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, रवी जी.
@shalinimarathe7131
@shalinimarathe7131 4 ай бұрын
अतिशय हृदयस्पर्शी video ! मायकेल काकांना, त्यांच्या हा organic भाजीपाला पिकवण्याच्या आवडीला आधी सलाम ! त्यानंतर सगळ्या हिंदू coloney तल्या रहिवाशांच्या भाग्याचा खूप हेवा वाटतो.सगळ्यांनी खूप मनापासून कौतुक केलं आहे त्यांचं ! फारच सुंदर video !
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, शालिनी जी
@purushottam647
@purushottam647 6 ай бұрын
आपले मराठी अतिशय स्वच्छ आणि शुद्ध ऐकून छान वाटले.
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी
@inacinfernandes6847
@inacinfernandes6847 5 ай бұрын
uncle Michael May God bless you always.pure soul very hard working.❤
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thanks a lot, Inacin Ji
@charupatki5867
@charupatki5867 4 ай бұрын
Enjoyed watching the video very much Hats off to Michal kaka
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
@@charupatki5867 Ji, thank you
@shrishwaghmare4679
@shrishwaghmare4679 4 жыл бұрын
खरच अप्रतिम सादरीकरण काकांचा उत्साह तरुण मुलाला लाजवेल 🙌
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद श्रीशजी.
@gadgilpb1034
@gadgilpb1034 3 жыл бұрын
Hats off
@vijaychandmare7644
@vijaychandmare7644 Жыл бұрын
पाच दिवस लगातार सुट करुन कमालीची मेहनत केली या विडीओ बनावन्या साठी सलाम है भाई तुला लाईक तो बनता है
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विजय जी
@sandeepjadhav2009
@sandeepjadhav2009 2 жыл бұрын
गेली साठ वर्षं काका खूपच या वयात आपली मेहनत करून आपले पोट भरतात हे बघून डोळ्यातून पाणी येते हे काम म्हणजे खूप कष्टाचे आहे अशा या काकांना साष्टांग नमस्कार ग्रेट काका
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@deepakgoilkar885
@deepakgoilkar885 4 жыл бұрын
खरच खूपच मोठं काम आहे हे मी पहिल्यांदा च काही लिहत आहे कारण मला राहवलं नाही. कामाशी असणारी जबरदस्त बांधिलकी,प्रामाणिकपणा, कष्ट,आणी खूप मोठा प्रवास......👍 सलाम तुमच्या कामाला.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी.
@prashantd3492
@prashantd3492 4 жыл бұрын
Motivational video. Mi Michel kakana baryach vela dadar hindu colony madhe pahila ahe, te khup mehnati ani polular ahet. Tyanchi mahiti publish kelya baddal dhanyavad. Amchi Maati Amchi Manase. 👍
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप धन्यवाद, प्रशांत जी.
@chitrarawool8913
@chitrarawool8913 3 жыл бұрын
सर्व प्रथम सुनील भाऊ मी आपल्याला धन्यवाद देतो व आभार मानतो. मायकल काकांंच्या जीवनावर तुम्ही ही डॉक्युमेंटरी बनविली. त्यांच्या सलग दोन दिवसांचा दिनक्रम चित्रित केलात. केवढे कष्ट उपसताहेत काका आणि तेही गेली साठ वर्षे? आज ७४ व्या वर्षी ही हा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय. कोणताही शॉर्ट कट नाही! धन्य झालो! मी सहज मध्ये जागा झालो. मोबाईल चाळला आणि हा व्हिडीओ अव्याहतपणे पाहिला आता रात्रीचे अडीच वाजून गेलेत. डोळे भरुन आलेत . मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निव्रुत्त झालोय. त्यामुळे वसईशी जवळचा संबंध आहे. तरीही या शेवटच्या मालुसऱ्याला त्रिवार मानाचा मुजरा!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, चित्रा जी
@rohangawad6251
@rohangawad6251 3 жыл бұрын
ह्या काका ना मी ओळखतो नेहमी स्तपाळा बस मध्ये दिसायचे, हा व्हिडियो बघुन समजले काका किती कष्ट करतात, मला तर कधीच जमणार नाही. काका बदल खुप आदर वाटत आहे .काकांच्या कामाला सलाम...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहन जी
@meenatuscano2854
@meenatuscano2854 4 жыл бұрын
Thanks for all ur wonderful comments, U all may be wondering why Nana need to do so hardwork at this age, Maze Nana 13yrs astanch thyani aplya family chi Jababdarichi ani Kali chi kawad khadyavar getali, family madhye sagale chote hote, kalantarane maze Kaka , Aplya Budhimatani ani Mehanatine Aplya payavar uphe rahile, mazya Kakachi ani family chya konachi hi Icha nohati ki Nana ni Ajun kasht karave . Maze Nana sagatat " jya kashta mule maaz Kutubh Manane uphe rahile , me Bidi Daru Vasana pasun door rahilo, mazya Babani Khastachte je Balkdu Amhala pjajle ahe te me maaz sharir saath sode parant sodnar nani, maazya sathi Mehant Kasht nahi tar maza Virangula ahe", maze Nana week che 6 divas Mumbai la jat hote te thyani aj 1 divasavar anle ahe , Nanchya hya Virangula var Amhi Bavande ani amche Kaka Samdhani kush ahote, May Almighty God bless him n keep him healthy for ever.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
नाना थोर आहेत...
@seemasupali4227
@seemasupali4227 4 жыл бұрын
Seema supali Kala tumhi great aahat Tumahala sashatang namasakar
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@seemasupali4227 जी, धन्यवाद.
@raghugadgil6669
@raghugadgil6669 4 жыл бұрын
मीनाताई मराठी टाईप मधे लिहा रोमन कशाला ? अगदी सोपे . जिथे रफार वगरे येतील तिथे रोमन लिपीत/ शब्द वापरा. तुमच्या mob dealer कडून मराठी keyboard वरadd करा happy marathi typing -- रघूजी
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@raghugadgil6669 जी, अगदी बरोबर. देवनागरीत लिहिणं खूप सोपं आहे. धन्यवाद.
@yogitanaik5143
@yogitanaik5143 4 жыл бұрын
मायकल काकांना त्रिवार नमन, 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, सलाम त्यांना. धन्यवाद, योगीताजी.
@vishalvanikar714
@vishalvanikar714 4 жыл бұрын
सुनील भाऊ तुला नमस्कार, मी तुझे व्हिडिओ नेहमी पहात असतो ते मला खुप आवडतात. हा वसई केळी वाल्या काकांचा संपुर्ण डॉक्युमेंट्री मी पाहिली. मला असे विचारायचे की वसईला केळीचे बाग किव्हा शेती कोठे आहे? कारण मी वसईला गेलो आहे. तसेच फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे कुपारी समाजाचे आहेत का? आणी मायकल काका ह्या वयात पण किती कष्ट करतात. एवढा प्रवास करून एवढे जड सामान ते घेऊन जातात. खरोखर त्यांच्या कष्ठाला सलाम.
@sanaparab6073
@sanaparab6073 Жыл бұрын
सुनील ,मायकल काकांना माझा नमस्कार सांग, एवढे वजन घेऊन पायऱ्या चढणे आम्हाला ही जमणार नाही,पण काकांनी एवढ्या वयात हे सगळे करत आहेत त्यांना सलाम आणि तुला ही thank you🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सना जी
@sindhusarode9671
@sindhusarode9671 3 жыл бұрын
सलाम , सास्टांग दंडवत , देखील कमी आहेत, नानासाहेबा साठी , प्रचंड मेहनत आहे, आवाक व्हायला. झाले, त्याच्या मेहनती पुढे, यावयात कुणी ही असे काम करणार नाही , मी तर जबरदस्त साधना म्हणिन, दादा तुमचे कौतुक आहे, आमच्या पर्यंत हि माहिती पोहचवल्या बद्दल धन्यवाद ग्रेट
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, सिंधू जी काका खरोखर जबरदस्त मेहनत घेतात. धन्यवाद.
@novinaalphanso-dias4736
@novinaalphanso-dias4736 4 жыл бұрын
Hats off to his hardwork....we know him as a relative, he is very honest and kind hearted person...really touching and inspiring.... Thanks for making this video....first time kalala ki apla adsha lokai mal netana kodi mehnat ghetli...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हा नोविना जी, काकाआ मेहनती आन प्रामाणिक ते हायुस पान तो त्या कामोर ज्याप्रमाने प्रेम करते ता अद्वितीय हाय. आबारी.
@sandipmitragotri5523
@sandipmitragotri5523 4 жыл бұрын
Salute to micalji for his extraordinary work even at the age of 74 as well thanks to Mr.D'mello sir who introduced mical uncle to public at large by shooting this short film. I am from solapur but lived at Thane and Palghar area for 8 yrs.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you for your kind words, Sandipmitra Ji.
@maharashtradharma
@maharashtradharma 2 жыл бұрын
काकांच्या अपार मेहनतीला साष्टांग दंडवत. व आपण या माणसाची मेहनत इतक्या मेहनतीने जगासमोर आणली त्या बद्दल आपलेही अभिनंदन . माझ्या आई चे वडीलही चंदनसार विरार येथून दादरला कावड घेऊन दूध विकायला जात असत.अशी कष्ट करणारी माणसे पाहिले की लाज वाटते आपली आपल्याच . काकांना उत्तम दीर्घायुष्य मिळो .
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण. खूप खूप धन्यवाद
@rakeshkarkare5521
@rakeshkarkare5521 11 ай бұрын
मी अनेकदा या काकांना दादरला पाहिले आहे पण या मागची मेहनत आज बघायला मिळाली सलाम काकांच्या मेहनतीला
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
धन्यवाद, राकेश जी
@romeodcosta4913
@romeodcosta4913 4 жыл бұрын
खूपच छान ! 🙏 🌱निसर्ग जपला वसई ने . 🏃🧗 मेहनत दाखवली वसई ने . चांगलं उदाहरण आमच्या सारख्या रस्यानिक☢️☣️ खानपान करणाऱ्यांना सुसुक्षित लोकांना .. लाँग लिव्ह वसई ...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
अगदी खरं, रोमिओ जी. धन्यवाद.
@suchetanaik
@suchetanaik 2 жыл бұрын
My goodness Sunil D'Mello this is awesome 👌 I feel like I haven't done anything in life. Salute to Michael kaka and sashtaang namaskar to him. 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for the wonderful comment, Sucheta Ji.
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 2 жыл бұрын
सुनीलजी, आज हा व्हिडीओ पाहताना डोळे कितीवेळा भरून आले, त्याचा हिशोब नाही!😥 हा फक्त व्यवसाय नाही, ही तर तपश्चर्या आहे,.. आणि अशा काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींसोबत कुणी कधीही मोलभाव करू नये, ही जाणीव करून देणारा हा व्हिडीओ आपण बनवला, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! -प्रसाद मडगांवकर.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
@urmilaapte9198
@urmilaapte9198 2 ай бұрын
त्रिवार सलाम आहे काकांना ग्रेट व्यक्तीमत्व, अशी प्रामाणिक माणस मिळणार नाहीत बघायला. छान माहिती दिलीत आपल्यालाही धन्यवाद @
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, उर्मिला जी
@themac89
@themac89 4 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सुनील दादा... काकांच्या मेहनतीला लाख लाख सलाम...
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, मॅकसनजी.
@rakeshnangia2400
@rakeshnangia2400 4 жыл бұрын
Oh what a super man. At this age it is just unbelievable. We can’t even lift 25 kgs. God give him good healthy life.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes he is indeed a superman, Rakesh Ji. Thank you.
@kanchanmishal8234
@kanchanmishal8234 3 жыл бұрын
काका चे काम बघुन .डोळे भरून आले सलाम काकाना कष्टकरी माणसांच्या मागे देव मदत करतो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कांचन जी
@shailapatil4646
@shailapatil4646 3 жыл бұрын
O my god हे same माझ्या बाबां सारखेच आहेत मला आज माझ्या बाबांची आठवण झाली ते सुद्धा असेच कष्ट करायचे शेतातून पायी घरी येताना चारा डोक्यावर आणायचे बस बाबा आता कष्ट नका करू सलाम young boy
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शैला जी
@anitakundap6799
@anitakundap6799 4 жыл бұрын
सुनील तुमचे खूप खूप आभार हा विडिओ केल्याबद्दल. आत्ताच्या पिढीने त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यांची मेहनत जिद्द ह्याला सलाम.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, अनिता जी. खूप काही शिकण्यासारखं आहे काकांकडून. धन्यवाद.
@shubhangiacharekar9177
@shubhangiacharekar9177 4 жыл бұрын
Mr.Sunil realy u r great ...eka young age ne ashya vishyacha video evdhi mehnt gheun bnwla, tumhala kakanchya bhrlelya pati evdhe ashirwad. Amchyakde fkt vasai chi velchi kelich khalli jatat pn ata khatana prtyek ghasala kakancha chehra dolya smor yeil .aapn vikt ghetana kiti bargening krto tyaptine kiti ksht kaka ghetat. आणि वाईट वाटतंय आता केळ्यासाठी सुपीक असलेल्या जमिनीवर bulidigs उभ्या रहात आहेत. मायकेल काकांना 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, शुभांगीजी. काका खरोखर खूप कष्ट घेतात.
@deepikarain2131
@deepikarain2131 2 жыл бұрын
सुनिलजी तुमची दूरदर्शन वरील मुलाखत बघून हा व्हिडिओ मी पहिला काकांची मेहनत पाहून खरंच डोळे भरून आले पूर्वी च्या लोकांची आपल्या कामाबद्दल असलेली आत्मीयता लक्षात येते काकांना सलाम आणि तुम्हांला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपिका जी
@ashapingle983
@ashapingle983 Жыл бұрын
तुमच्या मेहनतीला व. निगेवार ठेवलेल्या मांडणी ला सलाम किती प्रेम आपल्या व्यवसाया बद्दल. आपल्या ला ही धन्यवाद. आपण अगदी सामान्य. माणसाच्या मेहनीचा व्हिडिओ. बनवला. आपल्या ला. धन्यवाद सर.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@nandkishorkale8458
@nandkishorkale8458 4 жыл бұрын
निसर्गाचे देने कोकण कोकण भुमी देवभूमि मला कोकण खूप आवडतो मी मराठवाडा चा आहे
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो किशोर जी, आपलं कोकण खूपच सुंदर आहे, धन्यवाद.
@nandkishorkale8458
@nandkishorkale8458 4 жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद सर कोकणातल्या भाताची (तांदूळ) गावठी जातीची माहिती व बाजार भाव खरेदी साठी शेतकर्यांचे किंवा दुकानदार चे फोन नंबर कारण की कोकणात इतकी भातशेती असताना आपण बाहेर राज्यातील पाॅलीस केलेल्या भात खातों कोकणात भातशेती चालना मिळेल शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹🌷💐🌻🥀
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@nandkishorkale8458 जी वसईत सध्या भातशेती कमी झाली आहे पण पुर्णतः संपली नाही. मी प्रयत्न करेन पुढील वर्षी एखादा व्हिडीओ बनवायचा. धन्यवाद.
@nandkishorkale8458
@nandkishorkale8458 4 жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद सर सांगितले बद्दल
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 4 жыл бұрын
अप्रतिम... भारी video, असा कधी बघायला मिळणार नाही, असा दाखवाल आहे really great Thanx to you n काका , काकांना साष्टांग दंडवत 🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, अश्विनीजी काकांचे काम खरोखर साष्टांग दंडवत करण्यासारखेच आहे. धन्यवाद.
@dilipdevdhar6069
@dilipdevdhar6069 4 жыл бұрын
मायकल काकांना कडक सॅल्यूट. इथे लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याच्या जगात अधिकच्या पैशाच्या हव्यासापायी ते आपल्या ग्राहकांच्या जीवाशी खेळत नाहीत.इतकी मेहनत करतात.शिवाय कुठलही केमिकल वापरत नाहीत.त्यांना आणि परिवाराला खुप सारया शुभेच्छा.तुम्ही सुद्धा इतके श्रम घेऊन हे सर्वांना दाखवलत,त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार.🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दिलीप जी.
@ninadbhambid3948
@ninadbhambid3948 4 жыл бұрын
आपले आभार कि एवढ्या मेहनती माणसाचा व्हिडिओ दाखवला, किती मेहनत करतात मायकल डोळ्यात पाणी आले ,वय वर्ष 74 कमाल वाटते, स्वतःची लाज वाटते , चेहऱ्यावर आपण फार मोठे करतो हे पण भाव नाही , साष्टांग नमस्कार या अवलीयाला.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, निनाद जी.
@yashodharaadsul1574
@yashodharaadsul1574 2 жыл бұрын
I have definitely seen Michael kaka in Hindu colony when I lived there in 2007 -2010. He is very hardworking and I am sure he rests sufficiently.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
He truly is a hardworking person. Thank you, Yashodhara Ji
@rovildapereira9255
@rovildapereira9255 4 жыл бұрын
Hats off to kaka and for his hardwork at this age. He is an inspiration for the youngsters. He has shown us how bananas can be ripen in a natural way rather than using chemicals. This video should be seen by those people who play with our health by using chemicals.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Yes, Rovilda ji. Kaka is really an inspiration to all youngsters. Thanks.
@cgiri901
@cgiri901 3 жыл бұрын
आज आमच्या कर्म योगी सज्जनाचे दिव्य दर्शन जाले अचाट परिश्रम कई असते ह्यची देहि ह्यचे डोळा दखवाल्या बद्दल सुनील सहेबांचे कौतुक। धन्य ते michal महाशय। आणि धन्य ति जननी। God bless him
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
@jagdishpawar9946
@jagdishpawar9946 4 жыл бұрын
काकांना एवढी मेहनत घेवून दादर पर्यंत जायची ‌गरज नाही हाच पुर्ण माल विरार सारख्या विभागामध्ये पण विकला जावू शकतो, वेळ पण वाचेल आणि काकांची मेहनत पण. बाकी ‌काकांच्या मेहनतीला सलाम.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं पण त्यांची गेल्या ५० वर्षांची गिऱ्हाईकं, त्यांच्याशी असलेले घरगुती संबंध आणि ऋणानुबंध सहज तोडता येत नाहीत. धन्यवाद, जगदीश जी.
@johnsonlopes9020
@johnsonlopes9020 4 жыл бұрын
सुनील ने खूपच मेहनत घेतलीय या व्हिडिओ साठी यात शंका नाही. या अगोदर फर्नाडीस काकाचा व्हिडिओ सुधा खूप मस्त होता. खूप छान सादरीकरण केले आहेस आता. पण पूर्ण व्हिडिओ पाहून डोळे पाण्याने भरून आले मायकल काकाची अपार मेहनत बघून. वयाच्या 74 व्या वर्षी हा अवलिया इतकी मेहनत करून कावड वाहतोय. खरोखर कमाल आहे काकाच्या कष्टाला, मेहनतीला. त्यांना मानाचा मुजरा आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे जावो ही प्रभू चरणी प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
तुमच्या विस्तृत कमेंटबद्दल धन्यवाद, जॉन्सनजी.
@chandukatkar
@chandukatkar 4 жыл бұрын
मी अनेक वर्षे हिंदूकाॅलनीत राहिले आणि मायकेल काकांच्या कडून अस्सल वेलची केळी आणि भाजी घेत होते. त्यांचे कष्ट पाहून दरभावाची घासाघीस करणार्यांचा राग येत असे. आता तरी लोकांचे डोळे असतील ही अपेक्षा.
@chandukatkar
@chandukatkar 4 жыл бұрын
डोळे उघडले असतील ही अपेक्षा
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
हो, चंद्रकांतजी. काकांचे कष्ट पाहून दरभावाची घासाघीस करू नये असंच वाटतं. मी जेव्हा त्यांच्यासोबत गेलो होतो तेव्हा कुणीही घासाघीस केली नाही हे विशेष.
@vaishalidabholkar5321
@vaishalidabholkar5321 4 жыл бұрын
Weldon Sunilji ,keep it up
@joelgonsalves7507
@joelgonsalves7507 4 жыл бұрын
Baba you are the great. Great work. Great presentation
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Baba is really great. Thanks a ton, Joel ji.
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर असा केळी काढण्या पासून ते पिकवून पारंपरिक पध्दतीने ते विकतांना मेहनत अशी अप्रतिम डॉक्युमेंटरी. आम्ही youtube तर नाही आणि प्रत्यक्ष तर पाहीली नाही.आजच्या लोकांना अशी मेहनत कष्ट होणार नाही .खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडीओ. मी 7 year छोटा youtuber आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विराज जी. तुम्हाला शुभेच्छा
@mayachaudhari4250
@mayachaudhari4250 3 жыл бұрын
मी दादरच्या किंग जॉर्ज शाळेत, तुम्ही ज्या पाटकर गुरुजी विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते . मायकल काका आम्हाला देखील भेटायचे . मी विरारला राहणारी असून देखील आम्ही त्यांच्याचकडून वेलची केळी, भाजी घ्यायचो . त्यांना या video मध्ये पाहणं हा सुखद धक्का. स्वप्नीलसर तुम्ही आपली संस्कृती, आपला परिसर दाखविण्याचा म्हणण्यापेक्षा जतन करण्याचा जो प्रयत्न करीत आहात तो अत्यंत स्तुत्य आहे . तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि आभार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, माया जी
@kbatwe55
@kbatwe55 4 жыл бұрын
Hats off to Vasai farmers, you u are most hard working farmer in all over the India, I have seen ur hard work during my tenure as veterinary doctor Vasai Taluka.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर साहेब.
@ADIN1012
@ADIN1012 4 жыл бұрын
Nana you set an example for us and a standard for work ethic. You teach us that a real man works hard for money and there is no easy route to get money. We know work is your passion and we all salute you for your hard work and we all love you nana 😘.... Proud to be your daughter in law, you are and you will always be a great inspiration for us all... Sunil a big thanks to you for taking so much efforts to make such a wonderful and inspirational documentary.... 🙏
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Nana is truly an inspiration to all of us Deepti Ji. Do not thank me, all thanks to your family for giving me this opportunity.
@aaronshinde4922
@aaronshinde4922 4 жыл бұрын
Nice
@justinshinde8585
@justinshinde8585 4 жыл бұрын
Very nice
@justinshinde4488
@justinshinde4488 4 жыл бұрын
Very hard work
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
@@justinshinde8585 Ji, thank you.
@aabiddalait8371
@aabiddalait8371 5 ай бұрын
खरोखरीच या ऑलिया मायकेल काकांना सलुट यार. मान गये काका. तोसी great हो।
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, आबिद जी
@sunilgawade5502
@sunilgawade5502 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडीओ बनविल्याबद्दल धन्यवाद. वसईची भाजी ऐकून होतो.दादरला गेलो तर आवर्जून या वसईच्या लोकांकडूनच घासाघिस न करता पुष्कळ प्रमाणात घेतो.कारण शेतीतली मेहनत काय असते ते आम्हालाही माहित आहे. त्यामुळे सर्वांनीच या वसईच्या माणसांकडूनच शक्यतो या वस्तू आवर्जून घ्याव्यात.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@parvezkhan1817
@parvezkhan1817 4 жыл бұрын
Those who have disliked this video are not humans and they should rest in peace RIP.
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
Thank you, Parvez Ji.
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 жыл бұрын
@parvez Khan, I think as per their IQ they are confused Ki for appreciation thumb up Kare ki down Kare .( ☝️Too much sarcastic ,is it😁 )
@kuldeepgharat
@kuldeepgharat 2 жыл бұрын
I am guessing most of the time they are mis-clicks.
@ashishjadhav17
@ashishjadhav17 4 жыл бұрын
खूप आणि खूपच छान विडिओ.... महत्वाचे म्हणजे मी प्रथमच तुमचा विडिओ पहिला, थोडा मोठा होता पण बघता बघता पाऊण तास कसा गेला हे कळलेच नाही कारण मांडणी आणि माहिती देण्याची पद्धत अप्रतिम .... सुनील खूप खूप अभिनंदन आणि पुढील विडिओ साठी शुभेच्छा सुद्धा .... हॅट्स ऑफ टू मायकल काका ... शब्दच कमी पडतायत, त्यांच्या या पिढीजात कामाला त्यांनी अजून तिलांजली दिली नाही व या वयात अजूनही एखाद्या तरुणाला हि लाजवतील अशी मेहनत करतायत ......
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल खूप धन्यवाद, आशिष जी.
@sanjananeroy6495
@sanjananeroy6495 4 жыл бұрын
पहिला काकांना माझा नमस्कार, काका ज्या प्रकारे काम करीत आहे त्याला माझा सलाम आहे ही केळी ज्या पद्धतीने पिकवतात ती पद्धत पहिल्यांदा पाहिली. ज्यानी हा माहितीपट तयार केला आहे त्याला पण माझा सलाम
@sunildmello
@sunildmello 4 жыл бұрын
धन्यवाद, संजना जी.
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 28 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН