Рет қаралды 268
मालवणी पद्धतीचा काळ्या वाटण्याचा सांबारा l Malvani Style Kalya Vatanyacha Sambara l गोकुळाष्टमी विशेष l Gokulashtami Special #gokulastami
गोकुळअष्टमीला तळकोकणात दिवसभराच्या उपवासानंतर रात्री कृष्णाला नैवेद्य म्हणून आंबोळी, काळ्या वाटण्याचा सांबारा आणि शेगलाच्या (शेवग्याच्या) पानांची भाजी करतात.
आंबोली आणि सांबारा हे खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे.
तर हे काळ्या वाटण्याचा सांबारा आज आपण बनवणार आहोत.
साहित्य -
लवंग ४-५
काळी मिरी ७-८
तमालपत्र २-३
हिरवी वेलची २
काली वेलची १
चक्रीफूल १
दालचिनी १ इंच
जायपत्री १
मोहरी १ छोटा चमचा
लसूण ४-५ पाकळ्या ठेचून
कांदा १
उकडलेले काळे वाटाणे १ वाटी (त्यातले थोडेसे वाटाणे वाटून घ्यावेत )
मालवणी भाजलेला वाटाप - २ वाटी
पाणी आवश्यकतेनुसार
तेल २ चमचे
मालवणी भाजका मसाला १-२ चमचे किंवा आवश्यकतेनुसार
कृती
काळे वाटाणे एक रात्र व्यवस्थित भिजवून दुसऱ्या दिवशी व्यवस्थित उकडून घ्या.
काळ्या वाटण्याचा सांबारा करण्यासाठी एक कढई माध्यम आचेवर तापत ठेवा
कढई गरम झाल्यानंतर त्यात २ मोठे चमचे तेल घाला.
तेल गरम झाल्यानंतर त्यात वरील दिल्याप्रमाणे सर्व खडे मसाले घालून एक मिनिटभर परतून घ्या.
खड्या मसाल्यांचा वास सुटल्यानंतर लगेच त्यात एक छोटा चमचा मोहरी घाला
मोहरी तडतडली कि त्यात ४-५ लसूण पाकळ्या घाला
लसणीचा वास यायला लागला कि त्यात एक छोटा कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
त्यानंतर १-२ चमचे मालवणी भाजका मसाला घाला व परतून घ्या.
आता यात उकडलेले वाटाणे वाटून घाला व परतून घ्या
नंतर यात मालवणी भाजलेले वाटाप घालून योग्य तेवढे पाणी घालून घ्या.
आपल्या चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या
सांबाराला पहिली उकळी आली त्यात उकडलेले काळे वाटाणे घालून ढवळून घ्या.
५-७ मिनिटे सांबारा व्यवस्थित उकळलं कि मग गॅस बंद करा
काळ्या वाटण्याचा सांबारा खाण्यासाठी तयार
पातोळ्या -
• पातोळे - कोकण नागपंचमी...
खोबऱ्याची कापा -
• खोबऱ्याची कापा - नारळी...
मालवणी गावरान भेंड्याचा सार -
• मालवणी गावरान भेंड्याच...
मालवणी गावरान भेंडीची भाजी -
• मालवणी गावरान भेंडीची ...
Follow Our Socials -
KZbin - / kunalbandekarsfoodjourney
Facebook - / kunalbandekarsfoodjourney
Instagram - / kunalbandekarsfoodjourney
Twitter - / kunalsfoodblog
Pinterest - / kunalsfoodjourney
Website - kunalsfoodjour...
#shorts #ytshorts #youtubeshorts #youtube #youtuber
#kunalbandekarsfoodblog #malvan #malvanifood #healthyfoodbykunal #malvanicooking #cooking #steamcooking #shravan #sambara #kalyavatnyachasambara #blackbeans #blackbeanscurry #gokulashtami #gokulastami #usal #malvaniusal
#malvanicurry #malvanimasala #kokanicuisine #malvanicuisine #bandekarmasala #bandekarfoodproductsandspices #malvanifoodblogger #malvanifoodlover #marathifood #traditionalfood #malvanitraditionalfood #kokanifoodblogger #healthyfood #iamchef