कुतूहल असलेल्यांसाठी मिलिंद शिंत्रे ह्यांचे ३४ व्यंजन असलेले वाक्य: "बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ!"
@jitendratarmale63106 ай бұрын
सुंदर
@mrunalrmohiteenglish6 ай бұрын
Thank you
@shreemanjrekar60486 ай бұрын
व्वा साहेब.... 👌👌👌👍🙏धन्यवाद!
@meragaonmeradesh86316 ай бұрын
Nice
@rajeshreesrecipe56436 ай бұрын
माझ्या भाच्याचे नाव सुराग आहे, अस नाव कोणाचेच नाही पण त्याचा काकांनी त्याचे नाव ठेवले आहे, मात्र हे नाव फारस कोणाला आवडत नाही,
@vinayakkulkarni29657 ай бұрын
अतिशय महत्वाचा विषय.. अर्ध्या हळकुंडाने प्रजाती तील नमस्कार बुद्धी जंताना ही चांगली चपराक.. अतिशय तारतम्य बाळगून हा गप्पांचा कार्यक्रम केल्याबद्दल सौमित्र तुझे मनापासून कौतुक.. आदरणीय मिलिंद शिंत्रे अभिमान वाटला.. माहिती उद्बोधक ❤❤❤
@harshadajoshi38417 ай бұрын
Fantastic विषय! नक्कीच ऐकणार! आम्हां संस्कृतच्या अभ्यासकांना लोक असाच बाळांची नावं सांगा म्हणून त्रास देतात. आणि आम्ही वेळ घालवून, छान निवडून नावं शोधून दिली की हे लोक त्याकडे न बघताच यांना हवं ते नाव ठेवून मोकळे होतात...बरं त्याचा अर्थही त्यांना नीटसा कळलेला असतोच असंही नाही...सगळीच मौज असते. पण शिंत्रे सरांचं बोलणं अगदी स्पष्ट नि सडेतोड आहे...त्यामुळे ही मुलाखत मजा आणणार हे नक्की!
@shrikrishnadixit86766 ай бұрын
ढेरे हे आडनाव मी ऐकले होते. नंतर केव्हातरी सपाटे हे आडनावही पाहण्यात आले. मला मोठी मौज वाटली. एकूण मुलाखत खेळीमेळीची व माहितीपूर्ण झाली. दीननाथ हा शब्द प्रथमच शुद्ध स्वरूपात समजला. धन्यवाद !
@balirammegulkar8563Ай бұрын
अरुणा ढेरे या प्रसिध्द कवयित्री आहेत.
@reductioadabsurdium95607 ай бұрын
हा व्हिडीओ पण छान आणि मनोरंजक झाला. यातल्या एका विषयाला धरूनच एक बातमी आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे वाचली. ती अशी की मीरा रोड येथे राहणा-या मुस्लीम दांपत्याला कोल्हापूर-मुंबई हा रेल्वे प्रवास करतांना "महालक्ष्मी एक्सप्रेस" मधे त्या भगीनीची आपत्कालीन प्रसूती होऊन कन्यारत्न प्राप्त झाले.म्हणून त्यांनी देवीचा आशिर्वाद म्हणून त्या मुलीचे नाव "महालक्ष्मी" असे ठेवले आहे.वाचून बरे वाटले.पण अशा बाबतीत भाबडेपणाच्या आहारी न जाणा-या माझ्या मनाने सुचवले की त्या दांपत्याला महालक्ष्मी हे नाव टिकवून ठेवण्यात किती काळ यश येईल हे बघणे औत्सुक्यपूर्ण होईल.
@theartmedlay4806 ай бұрын
waa😅
@bestrealestatedeals60207 ай бұрын
अतीशय मनोरंजक आणी माहितीपूर्ण मुलाखत...मिलिंदजी जबरदस्त व्यासंग. सौमित्रजी फारच छान करता तुम्ही चर्चा...माझ्या ओळखीत एक देवआनंद नांव असलेली व्यक्ती आहे. ..अर्थातच आडनांव वेगळं आहे.
@shravananukarve7 ай бұрын
सर्वांग सुंदर मुलाखत...अजून हवी वाटणारी...या पुढच्या मुलाखतींसाठी बरेच विषय आहेत याचा पोटेसाहेबांनी विचार करावा...असा मराठीचा तास असेल तर किती छान होईल! मराठीतले तीन विश्वविक्रम....खूपच कौतुकास्पद बाब...शिंत्रेसरांचे मनापासून अभिनंदन... कोड्याची वाट पाहत आहोत.
@vinayakjoshivp7 ай бұрын
मिलिंद शिंत्रे यांची उत्कृष्ठ मुलाखत झाली... जबरदस्त अभ्यास आणि उत्तम विनोद बुध्दी
@adityashining7 ай бұрын
हैदराबादला असताना मी जोशी नावाच्या व्यक्तीला भेटलो आहे. ते काका पूर्ण तेलुगू होते. त्यांच्या वडिलांना SM Joshi हे नेते खूप आवडायचे म्हणून त्यांनी मुलाचं नाव जोशी ठेवलं होते. त्यामुळे त्यांचं पूर्ण नाव "जोशी रेड्डी" होतं 😂
@mr.trustworthy7 ай бұрын
😂
@ShabdaAniSanskriti7 ай бұрын
देवाआआआआ
@vilaskaryakarte45307 ай бұрын
खूपच छान.
@sandhyakapadi41127 ай бұрын
😂😂😂😂
@geetaboramani14067 ай бұрын
😅
@ameyavr20087 ай бұрын
खूपच छान मुलाखत... एक वेगळं उदाहरण म्हणजे, वडील आणि मुलगा यांचं एकच नाव. लेखक वसंत वसंत लिमये
@gulmohar78077 ай бұрын
Arrey vaa... Ameya ji... khup khup khup dhanyavaad ya comment and ya naavachi aathvan karnya sathi... i was trying to remember that name since a long time.... VASANT VASANT LIMAYE... 😊😊😂😂
@parthwankhade46257 ай бұрын
मुलाखत घेताना विषयांमध्ये तोच तोपणा नाही; हे या चॅनलचे वैशिष्ट्य मला फार आवडले. असे रंजन व माहितीची सांगड घातलेले विषय जर हाताळल्या जात असतील तर कितीही प्रदीर्घ मुलाखत असली तरी त्याला प्रतिसाद उत्तम मिळेल याची खात्री आहे. त्यामुळे आपणाला विनंती असेल की कृपया या मुलाखतीचा दुसरा भाग आणण्याचा प्रयत्न करावा
@meenakshideshmukh4497 ай бұрын
मुलाखतीतून भन्नाट नावे ऐकायला मिळाली आज, त्याच बरोबर कॉमेंट्स मधे पण मस्त नावे वाचायला मिळाली. खूप मजा वाटली 😂
@adhokshajkarhade26977 ай бұрын
आजवरचा सर्वोत्कृष्ट भाग! 👌🏼 खूप गरज आहे अशा माहितीची! मनःपुर्वक आभार तुम्हा दोघांचे!!! 🙏🏼
@mmtawade6 ай бұрын
अप्रतिम मुलाखत .खूप छान माहिती मिळाली .मराठी भाषेचा श्री.शिंत्रे सरांचा सखोल व अमाप अभ्यास ऐकायला मिळाला. Lord Shiva, Rama ,Ganesha ही चुकीची नावे आहेत हे सत्य आहे. मुंबई या शब्दाचा खरा अर्थ कळला. खरंच अफाट व अचाट अभ्यास आहे आपला नावांचा व त्यांच्या अर्थांचा .
@SharadaNalawade-m8e7 ай бұрын
मस्त माहीती, अजून 2/3 एपिसोड करून सरांनी मराठी भाषेची गम्मंत सांगावी,आणि आमच्या ज्ञानात भर पाडावी हि सरांना आणि सौमित्रला विनंती.🙏🚩
@joshipriyankaj7 ай бұрын
Shintre sirancha youtube channel ahe
@mrinalinikhandkar60877 ай бұрын
आमच्या शेजारी एका मुलाचं तिमीर नाव होतं. त्याचा खरंच एकंदरीत सगळा अंधारच होता.
@rpatil44077 ай бұрын
@@mrinalinikhandkar6087😂😂😂
@bylagu7 ай бұрын
नमस्कार. खरं आहे तुमचं म्हणणं. कारण मुळात मराठी ही एक समृद्ध आणि महाकाय भाषा असल्याने त्यातील वैशिष्ट्ये आणि वैविध्य ही दोन्ही जाणून घ्यायला खूप मजा येईल किंवा आवडेल सुद्धा.
@MAP5737 ай бұрын
या विषयावर सरांसोबतचे किस्से, गमतीजमती, असलेले आणखी भाग ऐकायला नक्कीच आवडेल.
@amodparanjape88327 ай бұрын
भन्नाट आहे हा एपिसोड!!! धन्यवाद सौमित्र आणि मिलिंद सर.... माझ्या वाचनात आणि ऐकण्यात "वकील", "विज्ञान"... अशी नावं आली आहेत... माझ्या एका मित्रानं त्याच्या मुलाचं नाव "शोतेन" ठेवलंय (अर्थ: गणपतीला जपान मध्ये शोतेन म्हणतात)... माझ्या मित्राच्या सोसायटीचं नाव "anriya dwellington" असं आहे....
@tejaswineegore52617 ай бұрын
खूप छान... सौमित्र तुमचे खूप आभार कि तुम्ही हा विषय आणि हे वक्ते निवडले. खूप खूप आवडला हा एपिसोड... खूप मनोरंजक माहिती आणि लोकांची विचार करण्याची पद्धत कळाली. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दोघांनाही! शब्दकोड्याच्या app ची मी नक्कीच वाट पाहत आहे.
@archanakhandekar9845 ай бұрын
खूप छान पॉडकास्ट....छान माहिती. मिलिंद शिंत्रे यांचा मराठी भाषेचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांच्या विक्रमां बद्दल त्यांचे खूप खूप अभिनन्दन. मुलाखत खूप मजेशीर ❤
@sangeetadeshpande69387 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत झाली.अनेक गोष्टी नव्याने कळाल्या .मुलांची विचित्र नाव ऐकून खूप पोट धरून हसले.एक मात्र खरं आहे, नवीन पिढीला नाव ठेवताना आईवडीलांनी , विचार करून ठेवावे.वेगळ काही करण्याच्या नादात, नावांची वाट लावतात. असेच मस्त विषय येऊ द्या 💐💐
@rameshneve33566 ай бұрын
अतिशय ऊत्कृष्ठ माहिती मिळाली. श्रीमान श्री शीन्थ्रे गुरुजींना धन्यवाद. संस्कृतीचा चालेलेला बट्याबोळ थांबेल असे वाटत नाही. कारण एवढे सगळे डोळ्यासमोर येत आहे तरीही पिढी बदलत नाही याची कारणे खुप आहेत. खुप आवडली मुलाखत.
@spatwardhan906 ай бұрын
अगदी बरोबर.. त्यांचं आडनाव शिंत्रे आहे..
@gourivaidya77647 ай бұрын
सुरेख मुलाखत! सौमित्र पोटे ह्यांचे नेमके प्रश्न आणि त्यावर शिंत्रे सरांनी मांडलेली, खुसखुशीत शैलीतील अभ्यासपूर्ण माहिती..निव्वळ लाजवाब!! मजा आली!!!
@sampadasvariety81007 ай бұрын
छान झाली मुलाखत, ऐकायला मजा आली. काही गोष्टी कळल्या, मराठी भाषेची गंमत कळली आणि सरांची बोलण्याची, सांगण्याची पद्धत मस्तच. खुसखशीत होती.
@sayalibarve34347 ай бұрын
श्री. शिंत्रे यांची बोलण्याची शैली अतिशय खुसखुशीत आणि खुमासदार आहे. खूप हसलो. 😅 पण मुलाखत तितकीच माहितीपूर्ण सुद्धा झाली. 👍 शब्दकोडे ॲप ची आतुरतेने वाट पाहत आहोत.
@shyamkahate15137 ай бұрын
खूप छान सर, अजून नवीन विषय शोधून आम्हास माहिती द्यावी❤
@mrbkul6 ай бұрын
अप्रतिम झाली ही मुलाखत, याचे अजून अधीक 2/3 भाग झाले तर अजून बरच जे माहीत असायला पाहीजे ज्याचा गंधही नाही सामान्यपणे असमन्यांना आणि अतिसमान्यांना.
@rasibodas01bodas227 ай бұрын
अजून यांचा part 2 येऊन दे....खूप छान माहिती सांगत आहेत
@poojakatneshwarkar10386 ай бұрын
मुलाखत खूप छान , माहितीपूर्ण आणि मनोरंजक झाली. पण खूप आटोपती घेतल्यासारखी वाटली. ह्या मुलाखतीचा विस्तृत पार्ट टू नक्की आणावा ही विनंती 🙏
@shivaniwankhade29556 ай бұрын
काय योगायोग आहे मी हा podcast सहज माहिती म्हणून बघत होते आणि त्यात मी माझ्या २ महिन्यापूर्वी झालेला मुलाच नाव ऐकलं “ वरद” …फार छान वाटल कारण मला बरेच जण म्हणत होती की हे नाव modern नाही वाटत पण मला आपल्या संस्कृतील आणि आपल्या मातीतलं अस साजेच नाव त्याला द्यायचं होत😊❤
@sumitmaindalkar6 ай бұрын
Nakkich chhan nav ahe varad
@sheelamohite32956 ай бұрын
मी पण माझ्या मुलाचे नाव वरद ठेवले आहे. मला ही लोक असेच बोलतात
@gkeducation65736 ай бұрын
मी पण वरद ठेवले आहे.
@ratnatodkar40566 ай бұрын
Siyona, garv, jayavanshi are also names
@Veenahemant16 ай бұрын
आमच्या ओळखीतले एक आहेत त्यांच्या नातीचे नाव 'सा' असे आहे.
@snehajoshi12856 ай бұрын
खूप महत्वाचा विषय घेतलात आणि खूप छान प्रकारे हसत खेळत मांडला. नवनवीन ज्ञान ही मिळाले. धन्यवाद!
@sandhyaharale11257 ай бұрын
फार फार सुंदर... सर आणि माझं या बाबतीत अगदी एक मत आहे की नावाला एक सुंदर अर्थ पाहिजे., 👌🏻🙏🏻🙏🏻
@aditibhatawdekar75256 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. मराठी भाषेबद्दल खूप नवीन गोष्टी कळल्या. आणि साबणामुळे आणखीनच मजा आली.
@pareshmkulkarni7 ай бұрын
Note - Due to limitation of Keyboard that i have, cannot write in Marathi. I enjoyed this discussion thoroughly and laughed a lot as well. Very important observations made by Milind sir regarding correctness of Marathi words to get right meanings out of it. We are very particular about English even when it is not as phonetic as Marathi. Pune Municipal Corporation also has incorrect board for Dinanath Mangeshkar Hospital.
@dominant_76 ай бұрын
पण हे सर्व तुम्ही शुद्ध मराठीत का लिहिले नाही...😂
@seejoygopro2 ай бұрын
खूपच छान गप्पा, मुलाखत मस्त 👌👌 बरंच काही चांगलं ऐकायला मिळाले 👏👏 अजून एक भाग हवा आहे 😊👍
@Deshpande20086 ай бұрын
आमच्या काकांच्या मित्राचं आडनाव कुकर आहे ते त्याला नेहमी चिडवत असत कुकर शिट्टी वाजव..... 😂😂😂 तुमची मुलाखत ही खूप सुंदर आणि खूप हसायला पण आलं छान छान गमती जमती ऐकायला मिळाल्या मिळाल्या😂
@shiv64496 ай бұрын
माझा पण एक मित्र आहे उद्धव कुकर मु परळी जि बिड
@dinkarmahajani48777 ай бұрын
अतिशय मनोरंजक व ज्ञानात भर घालणारा कार्यक्रम. शिंत्रे महाशय उत्तम गप्पिष्ट (चांगल्या अर्थाने) आहेत. एखाद्या निराळ्या विषयावर बोलण्या करता परत बोलवा.
@anujabal47977 ай бұрын
एक वेगळाच विषय पण मनोरंजक पद्धतीने सादर केला त्याबद्दल सौमित्र पोटे जी तुमचे खूप धन्यवाद सरांनी दिलेली माहिती सुंदर आहे त्यांचेही खूप धन्यवाद
@veenaparanjape47636 ай бұрын
What a beautiful and interesting interview! Marathi chi khatri ne shappat gheun sangnare majhya mahititle ekmev vyakti🙏
@ajgo34227 ай бұрын
मुलाखत खूप सुंदर झाली.. अजून एक भाग बघायला नक्की आवडेल..मराठी भाषेचा अभिमान वाटला..
@SuvarnaKaule7 ай бұрын
मा. शिंत्रे. सरांनी भाषा,नावाबद्दल खूप छान माहिती दिली. माहितीचा खजिनाच उघडून दिला. खूप विचार करायला लावणारा विषय आणि न संपणारा सुद्धा. बोलण्याची शैली खूप छान, प्रभावी...संस्कृती जपणारा,वेगळा विषय, महत्वाचा... धन्यवाद 🎉
@nitawalavlkar37727 ай бұрын
मस्त मस्त मस्त....सौमित्रजी ह्या सरांची मुलाखात अजून दोन तीन भाग तरी असायला हवी होती हो! खूप धन्यवाद इतक्या वेगवेगळ्या विभूतींना तुम्ही बोलावता त्याबद्दल 🙏
@neetanikam23367 ай бұрын
Right ❤
@vaibhavigawde40887 ай бұрын
खरंच अजून 2 /3 भाग व्हायला हवे खूपच छान
@JM-xl1sx6 ай бұрын
I really liked the host’s approach to challenging the biases and prejudices of the guest (which was pretty evident to me at most times). For example at one point the guest says “he asach ahey”. Or his cover up of the name “Duryodhan”. Keep up the good work.
@walimbenita77747 ай бұрын
छान मुलाखत .... मिलिंद शिंत्रे आणि संजय मोने एकत्र बघायला आवडेल सौमित्र जी !
@shyamalshetty2026 ай бұрын
Thoroughly enjoyed this episode and was enlightened .Thanks a lot Shinkre Sir.After a long time I heard such beautiful Marathi.
@poojakelkar70126 ай бұрын
खुसखुशीत झाला हा भाग!!! आणि अद्याक्षर वापरून लेखन करायचं म्हणाल तर हॅरी पॉटर ह्या सुप्रसिद्ध कादंबरीची लेखिका जे के रोलिंग हिने सुद्धा तीच हे नावं पुरुषांच्या नावाशी साधर्म्य होईल असं नावं वापरले......
@kashmirakailashi267 ай бұрын
अप्रतिम माहिती मिळाली! शब्द कोडाची वाट आतुरतेने पाहते. आपली विषयांची निवड खूप चांगली आहे. मला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चा एपिसोड खूप आवडला. या विषयावर अजून ऐकून/समजावून घ्यायला आवडेल. दुसर्यांदा नाळ तुटल्यावर मानसिक त्रास कसा सहन करावा यावर आणखीन चर्चा व्हावी असे वाटते
@madhurideshmukh8027 ай бұрын
खूपच छान 👌 नवीन गोष्टी समजल्या, हैदराबाद येथे एक नटीचे नाव झाशी राणी असे आहे
@manjiripalkar58177 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण व मनोरंजक भाग... मजा आली ऐकताना .. मराठी शिक्षिका या नात्याने माझ्या मराठीच्या ज्ञानात मोलाची भर टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
@prakashchitrakaar7 ай бұрын
कर्नाटकातील फोटोग्राफर रवि होंगल यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या प्रेमापोटी आपल्या मुलांची नावे Canon, Nikon आणि Epson अशी ठेवलेली आहेत.
@gulmohar78077 ай бұрын
majjach kinayi... 😂😂 i just wonder🤔 just out of curiosity that, on this same line of naming own kids after Cameras, that what will a person related to Jockey clothes company, name his kids after?? which type of garment??!! 😂😂😂 just joking around... i hope no one is offended😊
@gulmohar78077 ай бұрын
he bhari ahe pan.... Canon, Nikon & Epson... 😂😂😂
@gulmohar78077 ай бұрын
Gujrat has a village named as Rabarika..... but but but.... its known only as AMERICA & not Rabarika..... even if you travel by bus, you have to ask for tickets to America and they get offended if you don't say so... 😂😂😂
@akshayraut2267 ай бұрын
हो...हे खरं आहे...त्यांनी घर पण कॅमेरा थीमचे बांधले आहे...
@abhijeetsurekar4466 ай бұрын
हो खरे आहेत, बेळगाव मधे राहतात 😀
@MayaJoshi-v6p6 ай бұрын
अतिशय सुंदर आणि ज्ञानात मोलाची भर घालणारी मुलाखत.
@--varshasidhaye59847 ай бұрын
फार लवकर संपवलीत मुलाखत. खूप भारी झाली. Sandharst रोड ला संडास रोड म्हणतात तसेच manchester च्या कापडाला मांजरपाट म्हणतो आपण!😂😊
@makaranddkolekar83026 ай бұрын
TinPot ला चिंपाट असं म्हणत होते पूर्वी म्हणजे टमरेल 😂
@sanketrasal20115 ай бұрын
पहिलं माहीत होतं. दुसरं आताच ऐकलं 😂😂😂
@sunilshinde93106 ай бұрын
सौमित्र सर, खूप खूप धन्यवाद. आज मिलिंद शिंत्रे सरांनी नावांविषयी जी रोचक माहिती सांगून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन तर केलेच पण त्याहीपेक्षा आमच्या ज्ञानात जी भर घातली आहे ती लाख मोलाची आहे. त्यासाठी शिंत्रे सरांचे मनापासून धन्यवाद. सरांना पुन्हा आमंत्रित करून या विषयावर अजून किमान दोन तरी भाग सदर करावेत ही आग्रहाची विनंती.
@pareshgharat12307 ай бұрын
माझ्या बायकोच्या नात्या मधे तिच्या कुठल्या तरी मावस बहिणीच नाव हवा आहे, आणि ज्या वेळेस मला हे माहिती झालं तेव्हा तर पोट दुखे पर्यंत हसत😂 होतो, आणि काय तर हवा आली,हवा गेली,हवा कशी आहे😂😂😂😂😂
@dipakpatil33786 ай бұрын
Chala hava yevu dya😂😂
@PastelNuages6 ай бұрын
@dipakpatil3378😂😂😂😂😊
@sandhyar54266 ай бұрын
😂😂😂😂😂😂bhari
@smaya376 ай бұрын
😂😂😂
@devyanikarvekothari6 ай бұрын
😂😂😂 पुण्यात ओळखीचे आहेत त्यांनी मुलीचे नाव झुळूक ठेवले आहे😂😂
@mandarredij5 ай бұрын
अतिशय सुंदर एपिसोड! फारच मनोरंजक तसाच उद्बोधक.
@Punerifamily7 ай бұрын
केवळ अप्रतिम... अजून एक vlog होवून जाऊदे..शब्द भांडार आणि भाषेबद्दल इतकी माहिती मिळाली की अजून नवीन शब्दांची भर पडावी असे वाटते
@maheshbarve94007 ай бұрын
16:09 मी डहाणू पालघर किंवा सातपुडा भागातील काही आदिवासीमध्ये किंवा काही भटक्या फासे पारधी जमातीमध्ये ट्रक, टीव्ही, रेडिओ आशिसुध्दा नावे बघितली. कारण शोधले असता असं समजलं की त्यांना कोणतीही नवीन गोष्ट /वस्तू प्रथम दिसली तर ते नाव लक्षात राहण्यासाठी म्हणून आपल्या मुलाबाळांची नावे ते अशी काहीतरी ठेवतात. जे मला संयुक्तिक वाटले. खूप सुंदर मुलाखत झाली आहे. सौमित्र तुमच्या नावातच १०० मित्र आहेत😀.
@handfulofwisdom63757 ай бұрын
अहो सौमित्र हे लक्ष्मणा चे नाव आहे. सुमित्रे ( सुमित्रा राणी चा)चा मुलगा सौमित्र
@devyanikarvekothari7 ай бұрын
😂😂😂😂 ट्रक इकडे ये 😂😂😂😂
@maheshbarve94006 ай бұрын
@@devyanikarvekothari mala bhetla teva tyacha trakya zala hota. Prakash cha Pakya hoto tasa 🤣 Lahan pani trakulya vagaire asu shakel😃
@devyanikarvekothari6 ай бұрын
@@maheshbarve9400 😂😂
@rohinigaykar52707 ай бұрын
खूप diwasani एका दमात सगळा इंटरव्ह्यू बघितला .खूप श्रवणीय मुलाखत कधी संपली कळलंच नाही❤❤❤❤
@neetanikam23367 ай бұрын
👍🏻👍🏻
@harishchandrabhandare63847 ай бұрын
Ho.. khare ch.. me pan
@ruchirajadhav36787 ай бұрын
खूप खूप छान बोलले मिलिंद सर
@yograjk19256 ай бұрын
मिलिंद शिंत्रे प्रो हिंदुत्ववादी आहेत,🕉️ ते कोणाला वाईट वाटेल म्हणून बोलायचं थांबत नाहीत. सत्य ते सत्यच❤🎉 सौमित्रजिंना जास्त धास्ती वाटते, बरोबर आहे त्यांचा चॅनल आहे, हिंदूंचा पक्ष घ्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे... पण मिलिंद जी खूप शुभेच्छा ❤❤
@paulamideshmukh29417 ай бұрын
साबण, जोशी कुळकर्णी, ऋषी कपूर किस्से कमाल.. खूप हसले!
@rajaninikam63607 ай бұрын
खूपच सुरेख मुलाखत. उपयुक्त आणि यथायोग्य माहिती मिळाली. धन्यवाद सौमित्र सर.
@renupore98047 ай бұрын
खूप वर्षांपूर्वी सय्योनी हे अल्बम मधील गाणं गाजलं होतं, माझ्या एक लांबच्या भावाने त्याच्या मुलीचे नाव सय्योनी ठेवले आहे😅
@renukamane21176 ай бұрын
Wow i just fallen in love with marathi again so proud to watch ...apli marathi manas postcast banvat ahet ❤❤
@priyankajoshi997 ай бұрын
फारच अप्रतिम आणि उद् बोधक चर्चा झाली. आज कालच्या मुलांची फारच विचित्र आणि काढीव नावे असतात. आजकाल आयरा, कायरा, मायरा अशी सर्रास नावे आहेत या मुली लहानपणी चुकून बोबड्या झाल्या तर त्यांचं आयला कायला मायला व्हायला वेळ लागणार नाही.
@sandhyakapadi41127 ай бұрын
ते सगळे ग्रीक शब्द आहेत. ज्यात कायरा म्हणजे सूर्यकिरण असा होतो. परिचयात हे नाव ऐकले म्हणून
@amey4097 ай бұрын
@@sandhyakapadi4112 नाही. Google वर कोणीतरी सोम्यागोम्या ने बनवलेल्या website येतात. ते काही खरे नसते. आधुनिकतेची खाज असलेले मायबाप ही असली गुगलयोनीत जन्माला आलेली नावे देतात. ह्या सगळ्या नावांचा अर्थ एकच - "सूर्याचे पहिले किरण" 😂😂😂😂
@kapilsuravashi7337 ай бұрын
@@amey409google yoni🤣🤣 pradnyet bhar padli😂😂🙏🙏
@shugar1457 ай бұрын
वेगवेगळे अंश फार झालेत हल्ली....कुठले ही नावं न त्यात अंश जोडतात.😂😂
@Shrikant_Patil7 ай бұрын
क्रिव्हा😂😂
@SwamiAmol5 ай бұрын
Thanks for knowledge I enjoyed today's podcast
@suneetagadre557 ай бұрын
अफलातून मुलाखत. आणखी एक एपिसोड व्हायला हवा. धन्यवाद मित्र म्हणे टीम.
@Aradhanasahasrabuddhe6 ай бұрын
खुप सुंदर झाली मुलाखत खुप नवीन माहिती मिळाली
@madhaviraje36737 ай бұрын
विदर्भात पारधी समाजात मुलीचं नाव माधुरी दीक्षित घोषले असं आहे,कुलूप,किल्ली,अल्मरी,डॉक्टर, कंपाऊंडर, बहत्तर १५ ऑगस्ट अशी आणि अनेक वेगळी नावे आहेत.
@ashwinighatpande3986 ай бұрын
उत्तम मुलाखत! सौमित्र, तुम्ही खूपच चांगले,भाषेला समृद्ध करणारे कार्यक्रम करत असता,असे उत्तम कार्यक्रम करत राहावेत हीच इच्छा!! मिलिंद शिंत्रे यांचे अभिनंदन!🎉🎉
@hemaagawane23127 ай бұрын
मी शिक्षिका म्हणून नावांचे खूप किस्से माहिती आहेत. परीक्षा हे मुलीचे नाव. का तर परीक्षा कालावधीत जन्म. निरोध वापरूनही मुलगा झाला.नाव थेंब. जेजुरीजवळ पांडेश्वर, जवळार्जुन अशी महाभारतातील कथेशी संबंधित गावे आहेत. तेथे दुर्योधन वगैरे नावे असणारी खूप माणसे आहेत. १००कौरवांची नावे' दु 'नेच सुरू होतात.
@m3rup3rv3rt7 ай бұрын
विकर्ण आणि चित्रसेन हे दोन कौरव सुप्रसिद्ध आहेत त्यामुळे सगळ्या कौरवांची नावं 'दु' ने सुरू होत नाहीत.
@saraswati266 ай бұрын
Most entertaining enriching episode..Sir na punha punha bolava..sharing it as much as possible..All The Best
@sinduradixit40727 ай бұрын
फार मार्मिक, आणि अभ्यापूर्ण मुलाखत.
@pushpasingh12026 ай бұрын
खुप छान आणि सखोल शब्दांची माहिती आज कळाली मुंबई च अर्थ ही आज कळाला खुप छान एपिसोड आहे महितीतित भर घटल्याबद्दल आभार
@BhaktiSJ17 ай бұрын
@mitramhane please note - ईशान हे विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रामध्ये असलेले नाव आहे. ईशान हे विष्णूचे नाव आहे.
@MAP5737 ай бұрын
हो बरोबर आहे, श्लोक क्रमांक 21 विष्णु सहस्रनाम, गीता प्रेस गोरखपूर
@ketakeepaage6137 ай бұрын
होय, मी त्यावरूनच माझ्या मुलाचं नाव ईशान ठेवलंय. मी तर वाचलं आहे की ते शिव आणि सूर्याचं पण नाव आहे
@BhaktiSJ17 ай бұрын
The name "Ishaan" has a significant meaning in Hinduism and is derived from the Sanskrit language. It is a popular name among Hindus and is given to both boys and girls. The name "Ishaan" has several interpretations and connotations in Hindu mythology and tradition. In Hinduism, "Ishaan" is one of the names of Lord Shiva, one of the three supreme deities of the Hindu pantheon. Lord Shiva is also known as "Ishwar" or "Ish" which means lord or master. "Ishaan" is derived from the Sanskrit word "Isha," which means lord or ruler. Therefore, the name "Ishaan" can be interpreted as "the lord of rulers" or "the master of masters." Another interpretation of the name "Ishaan" is that it represents the direction of the northeast. In Hindu mythology, each direction is associated with a particular god and symbolizes a specific energy or force. The northeast direction is associated with Lord Shiva and is considered to be the direction of prosperity and good fortune. Therefore, the name "Ishaan" can also be interpreted as "one who brings prosperity and good fortune." In Hindu astrology, "Ishaan" is also the name of the fifth pada or segment of the nakshatra or lunar mansion called Uttarashada. The Uttarashada nakshatra is associated with the planet Sun and represents prosperity, success, and leadership qualities. Therefore, the name "Ishaan" can also be associated with leadership qualities and success. The name "Ishaan" has also been mentioned in various Hindu texts and scriptures. In the Rigveda, one of the oldest Hindu texts, Ishaan is referred to as a divine power that provides guidance and direction to humanity. In the Shiva Purana, Lord Shiva is described as the supreme being who governs the world in all directions, including the northeast, which is considered the direction of Ishaan. Overall, the name "Ishaan" has a rich and significant meaning in Hinduism. It is associated with Lord Shiva, the direction of northeast, prosperity, good fortune, leadership, and guidance. The name is considered auspicious and is often given to children as a blessing for their future success and well-being.
@namitajoshi57197 ай бұрын
हे शिवाचेही नाव आहे. शिवाच्या पंचमीखांपैकी पाचवे मुख हे ईशानचे.
माझ्या एका मित्राच्या मुलीचे जन्माक्षर खो असे आले होते . या पठ्ठ्याने तिचे नाव खोडियार माता असे ठरवले होते . परंतु मी त्याला सांगितले आणि सुचविले की तिचे नाव रेवा असे ठेवावे . करण रेवा हा शब्द मराठीत लिहिताना वरची मात्रा थोडीशी सरकवली की ते खो सारखे दिसते ! अशा रीतीने आम्ही नर्मदा मातेचे माझे आवडते रेवा नाव ठेवून नियतीलाच खो दिला !
@pranalijikamde55187 ай бұрын
ते वाक्य कोणते हेही विचारले पाहिजे होते ज्या चा रेकॉर्ड झाला आहे❤
@milindmagadum6 ай бұрын
३४ व्यंजन असलेले वाक्यः "बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ!"
@pranalijikamde55186 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@madhurigore36097 ай бұрын
खूप सुंदर होता हा भाग.मला स्वतःला मराठी भाषा खूप आवडते आणि मला तिचा प्रचंड अभिमान आहे.हा भाग बघताना खूप मनोरंजन ही झाले आणि नवीन शिकायलाही मिळाले.मी अनेकांना पाठवला.
@vinodpawar47157 ай бұрын
व्वा मस्त झाली मुलाखत. नावांसंबधी नवीन माहिती मिळाली.
@seemamunshi9533Ай бұрын
खुप सुंदर माहिती आणि रंजक पद्धतीने सांगितले
@kkartiksgokhale7 ай бұрын
खूप सुंदर video नक्की पहा eika ha एक sanskarch कोणतेही व्हायचाय he ठरवायचं
@sumitradeodhar1087 ай бұрын
कमाल धमाल आणि interesting episode. म्हणींवर एक episode कराच.
@girijakulkarni66956 ай бұрын
सौमित्र सर याचा दुसरा भाग नक्कीच पाहायला आवडेल...
@growgreenlivegreen352217 күн бұрын
खूपच छान आणि माहिती पूर्ण
@shuhangimahekar98457 ай бұрын
हसून हसून मुरकुंडी वळली....ह्या वाक्प्रचाराची तंतोतंत प्रचीती / प्रतीतीआली .....आई शप्पथ! हसून हसून आतडी गोळा झाली. लोळायचं आवरलं.....😂😂😂😂
@vandanajoshi65563 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक ही.
@MrMangeshshukre15 ай бұрын
धन्यवाद सर. या मुलाखतीतून नवीन माहिती मिळाली. आपल्या नावावर असलेल्या विक्रमांबद्दल हार्दिक अभिनंदन सर.
@nishantranade85216 ай бұрын
फार सुंदर मुलाखत. खूप नवीन माहिती मिळाली. अशा माहिती पूर्ण रंजक मुलाखती ऐकायला आवडेल.
@yogeshkalwankar42756 ай бұрын
बरोबर प्रश्न विचारला "अशी नावाची लोक तुमच्याच कशी संपर्कात येतात? "... एकदम वेगळा विषय आहे.. धन्यवाद
@manali_anurag6 ай бұрын
कमाल मुलाखत झाली.. मिलिंद शिंत्रे प्रचंड व्यासंगी व्यक्तिमत्त्व.. खूप नवी माहिती मिळाली..❤❤
@kirtideodhar53257 ай бұрын
मी पुणे मुंबई प्रवासात असेच एका लहान मुलाला नाव विचारले तेव्हा त्याच्या आई बाबांनी सांगितलेले त्या मुलाचे नाव 'मुद्रांक'😅 का तर म्हणे punch आहे शब्दात😂
@chinmaynawathe6 ай бұрын
Tya mulala ayushybhar punch khave lagnar ahe.😅😂😂
@makaranddkolekar83026 ай бұрын
😂😂😂 घोटाळा प्रकरण असेल
@sadashivdongare89206 ай бұрын
@ma😂😂😂😂😂karanddkolekar8302
@bharatfirstreaction6 ай бұрын
😂😂😂
@Vijay_joshi3505 ай бұрын
Khup mast vlogs...nice information
@rajeshmaghadepvpssloni69887 ай бұрын
माहितीपूर्ण आणि खूप मनोरंजक संवाद. पारधी कोल्हाटी समाजातील मुलांची नावे खूप गमतीदार ठेवतात. जसे गव्हर्नर,पिस्तुल्या, बाजऱ्या, मिनिस्टर वगेरे वगेरे. आमच्या आत्याच्या गावी त्यांच्या कुत्र्यांची नावे सरपंच आणि पोलीस अशी ठेवली होती.
@actualangel51336 ай бұрын
😂😂😂😂😂
@sadashivdongare89206 ай бұрын
😂😂
@PastelNuages6 ай бұрын
Interesting 😂😂
@pranalijikamde55186 ай бұрын
आमच्या घरी एक गृहस्थ येत त्यांना आम्ही डमरू असे टोपणनाव ठेवले होते आणि त्यांना ही ते आवडायचे पुढे त्यांना त्याच नावाने लोक ओळखायचे
@ashishthakare91186 ай бұрын
@@pranalijikamde5518 आमच्या गावात डमरू चा शॉर्ट फॉर्म डम अस नाव आहे एका मुलाच
@shrutigurjar-thakur52996 ай бұрын
अजून काही भाग करा मिलिंद सरां बरोबर .. खूप छान माहिती देतात
@thekiminthenorth5047 ай бұрын
दु:शासन शब्दाचा अर्थ "जो शासन करण्यास अवघड किंवा जो स्वतःच शासक आहे" असा होतो. दुर्योधन शब्दाचा अर्थ "ज्याला युध्दात हरवता येत नाही तो" असा होतो. इंग्रजीमध्ये दु:शासन= ungovernable दुर्योधन= invincible
@pracheepalsule7 ай бұрын
Absolutely right.
@ShabdaAniSanskriti7 ай бұрын
आणि महाराणी गांधारीने ती नावं सकारात्मक दृष्टीनेच ठेवली असतील न. बळ, सामर्थ्य वगैरे दाखवणारी नावं.
@thekiminthenorth5047 ай бұрын
@@ShabdaAniSanskriti हो
@sandhyakapadi41127 ай бұрын
बरोबर. गांधारी आणि श्रीकृणसुद्धा त्याला सुयोधन् म्हणायचे. सुयोधन् - म्हणजे उत्तम योद्धा - अर्थातच ज्याला युद्धात हरवणे अवघड आहे असा
@swatimali94207 ай бұрын
आताचे मराठी पालकांनी आवर्जून पहावा असा डोळ्यात अंजन घालणारा कार्यक्रम मुलीचं नाव स्कायला,आयांश, सिया,रेयांश,ही मराठी नाव असतात आता😊😮
@MohiniLonkar-b4n7 ай бұрын
@ मित्रम्हणे , मुलाखत अप्रतिम झाली. त्यांच्या तीनही विक्रमांबाबत व मराठीतील शब्दकोशांबाबत माहिती घेण्यासाठी अजून २-३ वेळा मिलिंद सरांना मुलाखतीसाठी बोलवावे. म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल .. धन्यवाद 🙏😊
@knight_of_GAMING8557 ай бұрын
माझ्याकडे आलेल्या एका patient चे नाव.. श्री.पंडित यादव जाधव.. असे होते..
@prachiSathe-q1q7 ай бұрын
खूप छान चर्चा झाली. डोळ्याच्या इन्फेक्शन मुळे ही मुलाखत बघण्यापेक्षा ऐकली,तेव्हा एक गोष्ट जाणवली..ती अशी की तुम्हा दोघांच्या आवाजात फार साधर्म्य वाटतं
@MohiniLonkar-b4n7 ай бұрын
खर आहे. दोघांच्या आवाजात खूप साम्य आहे 😂
@nagarjun.wadekar3 ай бұрын
त्यामुळं कोण काय बोलतोय की विचारतोय असा प्रश्न पडतोय ऐकताना...
@kirtichopade45537 ай бұрын
फारच अति सुंदर मुलाखत.ज्ञानात भर पडली.अजुन किही एपिसोड पोटेसर घेता आले तर छानच. आपल्याकडे गंमतीशिर असे गावस्करचे "गवास्कर😂 सरदार महादजी शिंदेंचे "सिंदिया" झालेले आज ऐकतोच आहोत.
@Dhanshree_Art7 ай бұрын
Khup sundar mulakat 🎉👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻 Milind sir khup chan mahiti milali Thanku for this Please do part 2 even series also 😊
@vijayk244597 ай бұрын
आमच्या लातूरच्या महात्मा बसवेश्वर कॉलेज मध्ये 'सनीदेवल जाधव' नावाचा मुलगा 2001 - 2003 बॅच ला होता.
@ParshuramSchool6 ай бұрын
मग त्यांनी त्याच्या मुलाची काय नाव ठेवली आहेत 😆😆
@devyanikarvekothari5 ай бұрын
@@vijayk24459 😂😂😂
@padmadhawade90276 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌माझ्या मुलाने स्वतःच्या मुलाचे नाव आपल्या आजोबांच्या नावावरून ज्ञानेश असे ठेवले आहे.
@ketakisiras81247 ай бұрын
माझ्या एका विद्यार्थिनीचे नाव रशियन आहे.पेप्सी आणि नवमी शाळा सोडून गेल्या.😊
@GAW07117 ай бұрын
तुम्ही Crazy & EZ (उच्चार: ईझी) ही नावे ऐकली आहेत का? 😂😂😂 माझे सगळ्यात आवडते नाव: Vape 😅 एका पहिलीतल्या मुलीचे नाव आहे.
@narendraganpule6 ай бұрын
36:12 Vivaan (विवान) and Ishaan (ईशान) have been stated as examples of Westernized / anglicized names. On the contrary, both are Sanskrit names. Vivaan in Sanskrit means rays of the rising sun. And Ishaan has two meanings - the sun or the lord of North East direction.