Рет қаралды 145,492
Buy or sell the amazing products shown in the video and earn Rs. 25,000 per month! Download the Shop101 app from the link below and become a reseller TODAY!
👇🏾👇🏾 Download Shop 101 App 👇🏾👇🏾
Playstore link: 101.sh/gharcha...
Use my coupon GHARCHASWAAD to download the Shop101 app
and get flat 10% off on your first three orders!
==0==***===0===***==0==***===0===***==0==***===0===***==0==***===0===***==0==***==
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
खडा पावभाजी :-
साहित्य - १¼ कप फ्लॉवर, ½ कप ओला वाटाणा, १ कप मध्यम फोड केलेली शिमला मिरची, १½ कप लहान फोड केलेली बटाटी, २ टोमॅटो मध्यम फोडी केलेल्या, १ कप मध्यम फोड केलेला कांदा, २ कांदे बारीक चिरलेले, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ८/९ ब्याडगी आणि काश्मिरी सुक्या मिरच्या ( ३० मिनिटे भिजवलेल्या ) ४ tblsp बटर, २½ tblsp आले लसूण पेस्ट, १½ tblsp पावभाजी मसाला, १ tsp टाटा संपन्न हळद, ¼ tsp हिंग, १ tblsp जीरे, १ tsp कसुरी मेथी, १ tsp मीठ किंवा चवीनुसार, ६ tblsp तेल आणि ½ किंवा १ कप पाणी.
कृती - सर्वात प्रथम मिक्सरमध्ये मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. एका पॅनमध्ये किंवा तव्यावर तेल करम करून त्यात जीरे, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मऊ करून घ्यावा. त्यानंतर यात आले लसूण पेस्ट, हळद पावडर, पावभाजी मसाला घालून एकजीव करावा. त्यानंतर यात बटाटे, वाटाणा आणि फ्लॉवर घालून एकजीव करावा. प्रमाणातील अर्धे पाणी यात घालावे आणि पुन्हा एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. ५ मिनिटांनी पुन्हा परतून घ्यावं. आता यात कांद्याचे काप, शिमला मिरची आणि टोमॅटो घालावे. सोबत बटर, कसुरी मेथी, कोथिंबीर, मीठ इत्यादी घालून भाजी चांगली एकजीव करावी आणि पुन्हा ५ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. ( कांद्याचे काप, शिमला मिरची आणि टोमॅटो हे हलके कच्चे राहिल्याने भाजी खाण्याचा आनंद व्दिगुणित होतो ) ५ मिनिटांनी झाकण खोलून भाजी परतून पाव आणि लिंबाच्या फोडीसोबत गरमागरम सर्व्ह करावी. धन्यवाद !
पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
बटर पावभाजी :-
साहित्य - उकडलेल्या भाज्या ( १ कप ओला वाटाणा, ३ बटाटे, १ कप फ्लॉवर ), २कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो बारीक चिरलेले, २ tblsp लाल मिरची पावडर, ½ tsp हळद, २½ tblsp काश्मिरी लाल मिरची पावडर, ३½ tblsp टाटा संपन्न पावभाजी मसाला, ½ कप आले लसणाची पात्तळ पेस्ट, १ tblsp जीरे, ¼ tsp हिंग, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, ½ कप बटर, ½ कप तेल, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार लिंबाची फोड, बारीक चिरलेला कांदा आणि लादीपाव.
कृती - प्रथम तव्यावर ५ tblsp तेल गरम करून त्यात जीरे, हिंग आणि कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाला कि यामध्ये आले ३ tblsp आले लसूण पेस्ट, २ tblsp काश्मिरी लाल मिरची पावडर, २ tblsp लाल तिखट आणि हळद घालून मसाला एकजीव करून घ्यावा. त्यानंतर यात टोमॅटो, शिमला मिरची घालून पुन्हा एकजीव करावा. थोडे पाणी घालावे म्हणजे मसाला खाली लागणार नाही. आता यात उकडलेल्या भाज्या घालून पुन्हा एकजीव करावं आणि भाजी बाजूला लावून घ्यावी. एकाबाजूला त्याच तव्यावर २ tblsp तेल आणि ¼ कप बटर घालावे. बटर वितळल्यावर यात ३ tblsp पावभाजी मसाला, ४ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर ( आवडीनुसार १ tblsp कसूरी मेथीसुद्धा घालू शकता. ) फोडणी छान परतावी आणि भाजी या फोडणीत चांगली एकजीव करून घ्यावी. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालावे आणि पाणी. आता एका स्मॅशरच्या साहाय्याने भाजी रगडून घ्यावी. तयार भाजी एका पातेल्यात काढून घ्यावी. त्याच पॅनमध्ये १ tblsp तेल ३ tblsp बटर, २ tblsp कोथिंबीर, १ tblsp पावभाजी मसाला यांची फोडणी करून त्यात पाव परतून घ्यावे. एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि मसाला पावासोबत गरमागरम पावभाजी सर्व्ह करावी.
#EarnMoneyOnline #Shop101 #OnlineBusiness #Trending
बटर पावभाजी, बाज़ार जैसी पाव भाजी बनान की विधि,mumbai pav bhaji recipe, पाव भाजी रेसिपी,Mumbai Style Pav Bhaji,आसानी से बनाएँ मुंबई चौपाटी वाली पाव भाजी,Special Pav Bhaji Recipe,पाव भाजी बनाने की विधि,Street Style Pav Bhaji Recipe,Mumbai Pav Bhaji,Pav Bhaji recipe in Hindi,मार्केट जैसी टेस्टी पाव भाजी बनाने की विधि,Hotel Style Pav bhaji,Pav Bhaji with all secret tricks,बिना तवा के पाव भाजी,Restaurant Style Pav Bhaji,बाजारसारखी टेस्टी पावभाजी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत,Pav Bhaji Recipe In Marathi,Pav Bhaji Recipe by gharcha swaad, gharcha swaad pavbhaji recipe,How To Make Pav Bhaji,तवा पुलाव,Tawa Pulao Recipe,how to make pavbhaji masala, Bread Masala Paav,How to make SARDAR Pav Bhaji,Sardar Pav Bhaji Street Food Recipe,Best Pav Bhaji in Mumbai,Homemade Pav Bhaji Recipe,India's Cheapest Pav Bhaji,How to make Masala Pav,Pav Bhaji in Tamil,मुंबई स्ट्रीट स्टाइल पाव भाजी,How To Make Perfect Pav Bhaji,pavbhaji masala recipe, पावभाजी मसाला कसा बनवायचा ? पावभाजी मसाले कि आसान विधी