निसर्गाबद्दल ज्ञान मी कसे मिळवतो? Ecological Studies| Wild One Tilari

  Рет қаралды 47,010

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

एक शिकरीच जंगलाचा खरा संशोधक असतो पण तो शिकार सोडून wildlife guide बनला तर?
महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरळी च्या खोऱ्यातील तेरवन मेढे या गावातले सिताराम काका म्हणजे चालते बोलते जंगल बुक
दऱ्या खोऱ्यातील रान वाटा तुडवत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवले
इतक्या वर्षांच्या अनुभव आणि निरीक्षणातून त्यांना या जंगलातील दुर्मिळ झाडे फुले कीटक पक्षी प्राणी नदी डोंगर देवराई प्रत्येक घटकाचा केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर त्याचा आपल्या जीवनातील उपयोग आणि सहसंबंध माहिती आहे...माणूस आणि निसर्गाचे नाते ते नकळत उलगडून सांगतात...
त्यांच्या ह्या कौशल्यामुळे वाइल्ड वन या नेचर कन्सर्वेशन सेंटरने त्यांना वाइल्डलाइफ गाईड म्हणून नेमले आहे..
सिताराम काकांसारखी जुनी जाणती अनुभव संपन्न रान माणसेच या कोकणातले खरे सेलिब्रिटी आहेत .. त्यांच्यासोबत एक दिवस घालवणे म्हणजे एक पुस्तक वाचण्यासारखच..
अशी माणसे आता दुर्मिळ झालीय त..काळा च्या ओघात हरवत चालली आहेत...
अनुभवांचा हा वारसा पुढल्या पिढी साठी जपायला हवा...केवळ व्हिडिओतुन नव्हे तर आपल्या जगण्यातूनच तो कायम स्वरुपी document व्हायला हवा

Пікірлер: 120