Рет қаралды 80
पहा आळते गावातील रामलिंग मंदिरामधील मारुतीबद्दल संपूर्ण माहिती व इतिहास.
#RamlingMandir #History #HistorikalTempl
ऐन श्रावणात सणवारांपाठोपाठ सुट्यांचीही गर्दी होते. सणांना जोडून सुटी आली की मग धमालच करायला मिळते. त्यात एखाद्या रविवारला जोडून येणारी सुटी असेल तर मग आपल्याला मनाजोगती धमाल करता येते. निसर्गाच्या सान्निध्यात एखादी चक्कर मारता येते. तसं पहायला गेलं तर चंदगड, आजरा परिसरातील निसर्ग तुम्हाला खुणावतोच. पण, सांगलीकडे जाताना आळतेजवळील डोंगरावरील हिरवाईही तुम्हाला साद घालते. हिरवेगार डोंगर आणि आसपासचा धार्मिक परिसर तुम्हाला निश्चितच एक वेगळ्या वीकेंडला गेल्याचा फिल देतो. मग कसली वाट पाहताय. चला उठा, बाहेर पडा. श्रावणसरींचा आनंद घ्या...