Рет қаралды 399,100
परांडा - तोफांचा एक अनमोल खजिना
सह्याद्री नेचर ट्रेल च्या ह्या भागात आपण पाहणार आहोत भुईकोट किल्ल्यांचा राजाच असणारा उस्मानाबाद जिल्यातील किल्ले परांडा.
किल्ल्याच्या युद्ध वास्तूशास्त्राचे सर्व वास्तुविशेष आजही आपण पाहू शकतो- खोल बांधीव खंदक, अजस्त्र दरवाजे , गुंतागुंतीची द्वार रचना, बलदंड दुहेरी तटबंदी, शेरहाजी ,चर्या, जनग्या हे सगळे वास्तुविशेष तर आहेतच पण किल्ल्यातील विविध प्रकारच्या सुंदर व भव्य तोफा इतिहास प्रेमींना वेड लावतात.
ह्या किल्ल्याने चालुक्य ,यादव, खिलजी, बहमनी अश्या अनेक राजवटी पाहिल्या
अनेक राजकारणाचे चढउतार पाहिले, एक सुल्तानशाही बुडताना पाहिली.
पुणे - सोलापूर रेल्वेमार्गावर असणाऱ्या कुर्डुवाडी स्थानकापासून परांडा गाव ४२की मी वर आहे एस.टी. च्या बसेस कुर्डुवाडी - परांडा मार्गावर दर तासाला आहेत. परांडा बस स्थानकापासून ५ मिनिटे अंतरावर चालत परांड्याचा दरवाजा आहे.
असा हा दक्खनच्या इतिहासाचा अनमोल दागिना सर्वांनी नक्कीच जाऊन पाहण्यासारखा आहे.