Рет қаралды 54,114
#BolBhidu #PuneCrime #KarimLala
मागच्या काही दिवसात तुमच्या नजरेत एक बातमी आली असेल, पुण्यात अंमली पदार्थांचा साठा जप्त. सुरुवातीला मीठाच्या पाकिटात अंमली पदार्थ सापडले, पुण्यात मोठं रॅकेट समोर अशाच या बातम्या होत्या. मग नंतर पोलिसांनी छापासत्र सुरु केलं. पुणे, सांगली ते अगदी दिल्ली अशी कित्येक कनेक्शन्स जुळली आणि तीन दिवसात पोलिसांनी ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. काही महिन्यांपूर्वी पुण्यात ललित पाटील प्रकरण गाजत होतं, तेव्हाही अंमली पदार्थ आणि पुणे याचीच चर्चा झाली. तेव्हा नाशिकमध्ये अंमली पदार्थ सापडले होते आणि आत्ता पुण्या-मुंबईसोबतच सांगलीचंही नाव चर्चेत आलं आहे.
थोडक्यात काय, तर हे रॅकेट फक्त महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित नाहीये, तर गावागावात हा नाद पोहोचलाय. यातून होणाऱ्या नशेमुळं आणि यातून मिळणाऱ्या अमाप पैशांमुळंही. पण महाराष्ट्रात अंमली पदार्थ आणायचं, ते गावागावात पोहोचवण्याचं क्रेडिट कुणाला जातं ? उत्तर आहे, अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला. करीम लालानं अंमली पदार्थ मुंबईत कसे आणले ? ते पसरवले कसे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/