टूनीच्या तब्येतीत आता चांगलीच सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हीं तिची योग्य ती काळजी घेतोय. संध्याकाळ झाल्यानंतर तिला घराबाहेर सोडत नाहीं. तसच दिपू माघी बरोबर इतर गुरांचीही काळजी घेत आहोत. गोठ्यात ते सुरक्षित आहेत. तुम्ही इतक्या आपुलकीने टूनी बद्दल विचारणा करताय त्यासाठी सगळयांचे खूप खूप धन्यवाद. टूनी लवकरच पुर्णपणे बरी होईल. Vlogs मधून वेळोवेळी मी तुम्हाला टूनी चे updates देत राहीनच
@Adk02076 ай бұрын
नक्कीच...टुनी लवकरच बरी होईल आणि तुझ्याशी खेळू लागेल😄😊 तू तुझी आणि तुझ्या फॅमिलीची ही काळजी घे..😊
@sanskrutivlogs3036 ай бұрын
टुणी ची काळजी घे बाळा आणि सर्व गुरांची पण आमच्या दिपुला निट सांभाळ पावसाळी वातावरण आहे हिरवी गार झाडी दाट झाडी झाली आहे त्यामुळे तू स्वताःची पण काळजी घे तू खूप छान आहेस माझं पण माझ्या मांजरावर कुत्र्यावर खूप प्रेम आहे माझ्या मांजरासोबत असच काही झालेलं पण त्याला कुत्र्यांनी मारलं दुर्दैवाने तो माझ्या सोबत नाही आहे टुनीचे नशीब आणि तुझे प्रेम व प्रयत्न कामी आले
@RollexSir10116 ай бұрын
🙏 Take Care 🐶🐶🐶 🙏
@ROHITAPTE6 ай бұрын
काल तुझा mini vlog पाहिला. तेव्हाच कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली की टुनी बरोबर काहीतरी दुर्दैवी प्रकार घडला आहे. मी Insta वर msg पण केला होता की टुनीची काळजी घे असा. म्हणजे शंका खरी ठरली तर.... आता सगळे काळजी घ्या.
@nitinpawar93446 ай бұрын
टुनीच्या गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा पट्टा येतो तो घाला. हा पट्टा स्टिलसारख्या धातुचा असून त्यावर pointed projections असतात. बिबट्या,वाघ वगैरे शिकार करताना प्राण्याच्या गळ्याला जबड्यात पकडतात. असे गळ्याला पकडून प्राण्याची ज्युग्युलर व्हेन तोडून त्यातील ताजे, गरम रक्त ते पितात. त्याच बरोबर ट्रकीया देखील तुटतो. त्यामुळे प्राण्याचा जीव जातो. हे टाळण्यासाठी टोकदार काटेरी भागाचा धातूचा पट्टा गळ्तात असला की गळा पकडला बिबट्याने तर त्याच्याच तोंडाला त्या टोकेरी भागाने इजा होवून कळ गेल्याने तो शिकार सोडतो. तुम्ही टुनीला असा पट्टा घाला. त्या बिबट्याला माहीत झालेय की इथे कुत्रे आहेत म्हटल्यावर तो परत येणार. काळजी घ्या तिची आणि स्वतःची. रेबीजचे पोस्ट बाईट डोस पुर्ण कराच पण एक टिटॅनसचा डोसही देऊन टाका. रानभाज्या तुम्ही ज्या एकत्र शिजवल्या आहेत त्या वेगवेगळ्या शिजवल्या असत्या तरी चालले असते. कारण प्रत्येक भाजीची चव युनीक आहे. कवळा मात्र आम्ही देखील भोपळ्याची पाने, भेंडी, थरबरा, रताळीची पाने वगेरे घालून करतो. तुम्हाला जी गिळगिळीत/बुळबुळीत भाजी त्या मिक्स भाजीमधे लागली ती कवळ्याची. तुम्ही जिला बांधातली किंवा रानातली भाजी म्हणालात तिला देढर (डेढर) असेही म्हणतात. चांगली लागते ती भाजी वेगळी केली तरीही. संपदा जोगळेकरच्या युट्यूब चॅनलवर तिने आघाडा, गोमेट्याचीही भाजी सांगितली आहे. तसेच इतर रानभाज्यांमधे तुम्ही फोडशीचा उल्लेख केलाच आहे त्या फोडशीसारखीच दिसणारी ढोमशाची देखील भाजी काही जण करतात. कधीकधी बाजारात हो ढोमशाच फोडशी म्हणून फसवून विकला जातो. बाकी रान भाज्यांमधे मग अकुर, पाथरी (पाथर्डी), पेव्याची (करदळीसारखी पाने पण आकाराने छोटी सशाच्या कानासारखी), चवईच्या कोक्याची (रानकेळीच्या फुलाची ), खरशिंग्याच्या शेंगांची, अबया (अभयाच्या ) शेंगांची, पेंढरीच्या फळांची, तेरे (रान अळू), शेवळं (रायगड, ठाणे भागात करतात.), बांबुच्या कोवळ्या कोंबांची इत्यादी रानभाज्या पटकन आठवताहेत. यातल्या फक्त आघाडा आणि गोमेटा सोडला तर सगळ्या भाज्या स्वतः खाल्लेल्या आहेत. तसेच वड्या करायला जसे आपण अळूची पाने वापरतो तसे मंडणगड, रायगड, ठाणे वगैरे भागात वेगळी पाने वापरतात. त्याला ते माणगावात हायवेला रानभाज्या विकायला बसणाऱ्या कातकरी समाजातील बायका वड्यांची पाने म्हणतात त्या वड्या पण चांगल्या होतात.
@vilassagavekar73395 ай бұрын
अशी युवा पिढीतील स्वानंदी मी आज वर पहिली नाही ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@nandapatil41956 ай бұрын
देवाने तुला खुप वेळ घेवुन मनापासून घडवुन धर्तीवर पाठवल आहे धन्य ते आई वडिल आमचे खुपखुप आशीर्वाद.
@kasturithatte82196 ай бұрын
स्वानंदी तुझे व्यक्तीमत्व आजच्या पीढीलाच नाही तर आमच्या पीढीला सुद्धा सकारात्मकता काय असते व कशी टिकवून ठेवायची,त्याच बरोबर देवाने दिलेल्या देणगीचा चुकूनही अनादर नकरता न करता त्यात एकजीव होऊन राहाण्याचा गृहपाठ दररोज देतेस तुझे कौतुक वाटते.खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.❤
@vilaspaigude51736 ай бұрын
स्वानंदी तुला काय येत नाही हा प्रश्न पडतो. आवाजाची गोड देणगी.. खऱ्या अर्थाने निसर्ग कन्या.. कोकणची कन्या... मराठी, महाराष्ट्राची परंपरा जपणारी...तुमचे कुटुंब सगळेच भाग्यवान.. ग्रामीण, शहरी सगळ्याच मुला-मुलींनी तुझा आदर्श घ्यावा.. टूनी वरील तुझा जिव्हाळा, ममता पाहून अचंबित व्हायला होतं.. रानभाज्याविषयीचं ज्ञान, माहिती.. शास्त्रीय संगीत असूनही गोड गळा.. सर्वच अप्रतिम, लाघवी, भावनेनं ओतप्रोत भरलेलं.. आयुष्य असच असावं..
@SwanandiSardesai6 ай бұрын
@@vilaspaigude5173 😊🙏🏼
@suvarnapethe96736 ай бұрын
स्वानंदी तू खूप छान आहेस ग कोकणातील कोणतं गाव तुझं
@Swarangitamhane60606 ай бұрын
तुझ्या सारखी गुणी ,आईवडिलांच्या कष्टाची जाण असलेली ,पारंपारिक आणी आधुनिक युगाचा योग्य ताळमेळ साधणारी ,समंजस, सुशिल अशी मुलगी सर्व आईवडलांना मिळावी ही देवाकडे नक्कीच प्रार्थना करेन..खुप छान काम करतेस बाळा ❤ ❤
@Teccno-n8f4 ай бұрын
तुमचा पता काय आहे मीनल खाङीलकर अगणवाडी सेविका मुब ई
@jyotimalap94676 ай бұрын
स्वानंदी तू मुक्या प्राण्यांनाची इतकी काळजी घेतेस हे बघून मन खरच हेलावून जाते, टोनी खरच भाग्यवान आहे, अशी तुमच्या सारखी जीव लावणारी माणसे मिळाली, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी स्वामी चरणी प्रार्थना ❤❤
@dipalijoshi24986 ай бұрын
True
@santoshshinde42982 ай бұрын
स्वानंदी तु सुंदर रानभाज्या दाखवत आहेस ❤❤तू टूनी आणि दिपू यांना सांभाळ है प्रनिमत्रवरच प्रेम आणि त्यांची देखभाल तूझ्या निस्वार्थी प्रेमाची आठवण करून देत आहे आणि हे त्यांचे आशीर्वाद तुला तुझ्या भावी आयुष्याचे सासर कोकणातच शक्यतो आपल्या रत्नागिरी विभागातच मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤
@santoshmetri90063 ай бұрын
यापुढे लोकांकडे भरपूर पैसा असेल, असे नैसर्गिक जिवन कमी असणार, फार छान❤
@GeetaShinde-u7d6 ай бұрын
खरच स्वानंदी मुक्या प्राण्याला जीव लावते.त्याच्या जवळ बसुन रियाज.त्याच्या अंगावरुन हात फिरवत.खरंच खुप च छान.
@manishabhat57456 ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी लेक कोकण कन्या अतिशय गुणी गुणी बाळ 🎊❤
@namdeotulsankar65626 ай бұрын
barobar upama dili ahe.
@magicaquariumfilter.33446 ай бұрын
Very nice👍❤❤❤❤❤
@kulkarnitechnical14386 ай бұрын
धन्य तुझे आई बाबा इतकी गुणी मुलगी आहे .पूर्व पुण्याई म्हणायची अशीच आनंदी व सुखी रहा बेटा स्वानंदी
@sulajagaonkar19456 ай бұрын
स्वानंदी खरच खुपच भाग्यवान आहेत तुझे आईवडील कारण तुझ्या वयातील मुली आजकाल गॅसवर स्वयंपाक करत नाहित चुल तर फारच लांबची गोष्ट अशीच साधी रहा आणि असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद
@leenapadhye32863 ай бұрын
खरंच.....दिवसभर insta,WhatsApp चे non productive reels बघत दिवस दिवस लोळून काढणाऱ्या युवा पिढीमध्ये तु light house आहेस....किती बहु आयामी व्यक्तिमत्त्व आहे तुझं.... Beauty with multi talents.....God bless dear ❤❤❤❤
@pachaaktalks67466 ай бұрын
शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी तुला असे संस्कारशील बनवणाऱ्या आई बाबाना नमस्कार, तुझे ते टुनी, गाईगोठा,देव्रराई ,भातशेती, यान्च्यावरील प्रेम मनाला खुप भावत ,तु तुझ्या नावाला सार्थक केलस तु नेहमी आनंदी राहतीस आणी तुझा व्लॉग पाहुन् आम्ही पण खुष....तुझे कौतुक करावे तेवढे थोतेच आहे ,खुप गुणी मुलगी आहेस तु
@SwanandiSardesai6 ай бұрын
😊🙏🏼
@seemabora37232 ай бұрын
तुझे व्हिडिओ बघुत तरी आजच्या पिढीने काहीतरी शिकावे स्वानंदी तुला पुढच्या वाटचाली ला खुप खुप शुभेच्छा बेटा❤
@pratimachiplunkarsapte94196 ай бұрын
स्वानंदी तू किती प्रेमळ आहेस ग कोणत्याही विषयात अतिशय पारंगत आहेस शेती असो प्रण्यावरील प्रेम असो रेसिपी असो आणि संगीत असो❤❤❤❤❤❤ अशी मुलगी या कलियुगात अवतरली तर खरच अस वाटत ना दुर्गेची विविध रूपे तुझ्यात साकारतायत. तुझ्या आईबाबांना अनेक धन्यवाद🙏🙏
@SwanandiSardesai6 ай бұрын
तुमचे आशीर्वाद कायम राहोत🙏🏼
@snehaldeshpande54102 ай бұрын
स्वानंदी अशीच सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आस्वाद घे नावाप्रमाणेच आनंदी प्रसन्न हसतमुख आहेस.सुखी रहा❤❤❤❤
@VandanaRedekar-o4u6 ай бұрын
स्वानंदी तू जो काही टोनी च्या बाबतीत सांगितलं ते ऐकून अगदी अंगावर शहारा आला टूनी खरंच लकी आहे , ती वाचली आणि या सर्वांचे श्रेय तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला जात तुम्ही तिची इतकी छान काळजी घेतली , स्वानंदी तुझे व्हिडिओ फार सुंदर असतात आणि तुझा आवाज सुद्धा खूप सुरेख आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी All the best
@SwanandiSardesai6 ай бұрын
@@VandanaRedekar-o4u 😊🙏🏼श्रेय डॉक्टरांचंही आहे, तातडीने उपचार केले त्यांनी.
@veenaprabhudesai64556 ай бұрын
हे गाण अगदी टोनी वाचला त्यासाठी आहे अस वाटत बाकी सगळ छान करतेस मी पण गाण म्हणते मला हे भजन फार आवडत माझे बाबा म्हणायचे तुझा अवाज खूप छान आहे
सुंदर व्हिडीओ.. स्वानंदी तू ज्या सहजतेने भाकरीपासून भारतीय शास्त्रीय संगीत आणि शेती पासून चित्रकलेपर्यंत वावरतेस .. तुझे खरेच कौतुक.. तसेच तुझ्या आईबाबांचे ही कौतुक.. ज्यांनी तुला हे संस्कार दिले .. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@purnanandnadkarni51176 ай бұрын
ग्रामीण संस्कृतीची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
@madhurahublikar73727 күн бұрын
सर्व गुण संपन्न स्वानंदी, तुला खूप आशीर्वाद 🌹
@muktakamble61636 ай бұрын
खुप छान स्वानंदी. रानभाज्याचा व्हिडिओ खुप आवडला. माझ्या सासूबाईंचे माहेर तुमच्या शेजारीच असलेले वाघणगाव आहे.त्याना तुझे व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.जणू माहेरच आपल माणूस भेटल्यावर होतो तसा आनंद आम्ही त्याना झालेला पाहिला. विशेषतः तू गायलेली लोकगीत ऐकून सासूबाई सुद्धा तुझ्या गाण्याबरोबर गाऊ लागल्या. तुम्ही सर्वजण आपली आणि गुरांची काळजी घ्या. ❤😊
@harshadshelar79482 ай бұрын
Khara kokan tar tujya sanskar madhe aahe u really has a good carring heart with golden voice
@janhavlashtekar78156 ай бұрын
खूप सुंदर झाला व्लाँग टूनीची घेतलेली काळजी दिसली बांधावरची भाजी दिसली सुगरण स्वानंदीची चुलीवरची फुगलेली भाकरी पाहिली आणि सुरेल आलापीने सांगता झाली 🏅💐🎊
@anmolshedge75656 ай бұрын
स्वानंदी तुझ्या टूनीला तुझं सुमधुर संगीत ऐकायला मिळते काय पुण्य केलं असेल तिने . मस्त . तुझी रानभाजी आणि भाकरी पण मस्त. आणि घरात घुसून दिवसा टूनी वर बिबट्याचा हल्ला तरी तू रानात भाजी तोडायला जातेस. घराजवळ बिबट्या येऊन जातो तरी तुला भीती नाही वाटतं great 👍😍😚
@vishakhakarnik3772 ай бұрын
निसर्गावर, मुक्या प्राण्यांवर, स्वतः घ्या गाण्यावर मनापासून प्रेम करणारी स्वानंदी अतिशय हळव्या मनाची आहे,हे तिच्या आचरणातूनच जाणवतं.स्वानंदी तुला खूप शुभाशीर्वाद.
@rohanmeher14856 ай бұрын
टूनी बद्दल जेव्हा सांगायला सूर्वात तेव्हा जवळ जवळ डोळ्यात पाणी तरळत आलं होतं असा वाटल टूनी आपल्यातून गेली पण पुढे तुझा तोंडातून निघालेल्या शब्दांनी दिलासा दिला 🥹🥹💖💖 बाकी खूप छान माहिती दिली रान भाज्याबद्दल खूप धन्यवाद... आणि शुभेच्छा... टूनीला सांभाळा 🥹😊😊😍🥰
@jayshreemahajan81622 ай бұрын
किती छान पाऊस येतोय वातावरण हिरवगार झालय आणि ताई तुझा आवाज खूप छान आहे वा मस्त कायकाय गाणी आम्हास गाऊन दाखवावे लागेल
@AmitGidde-zv9yv6 ай бұрын
घराच्या अवतीभोवती पक्ष्यांचा आवाज किती छान ऐकू येतोय काय निसर्गरम्य वातावरण असेल तुमच्या इथं
@SwanandiSardesai6 ай бұрын
@@AmitGidde-zv9yv हो, खूप पक्षी आहेत
@maheshchoudhary95615 ай бұрын
Telpat chi fula Ani telpat chya kadya... Most favourite ahet... Khup tasty lagtat
@nehadhar91416 ай бұрын
स्वानंदी तुझे खुप खुप कौतुक आणि आभार कारण आम्हा मोठ्यांनासुद्धा तुझ्याकडून कळलेल्या छोट्यामोठ्या गोष्टीतून शिकण्यासाठी बरेच काही आहे. तुझ्या आईबाबांचे ही कौतुक आणि आदर वाटतो.
@suvarnadabholkar74044 ай бұрын
स्वानंदी..... नावाप्रमाणे स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना पण आनंद देतेस.... तुझ्यात प्रत्येक गुण आहे.... सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकत्र नांदत नाहीत असे मानले जाते पण याला तु अपवाद आहेस..... तुला उदंड आयुष्य आरोग्य लाभो.... कायम अशीच रहा.....🌹😘😘😘
@snehaiswalkar8036 ай бұрын
स्वानंदी खुपच ❤टच विडीओ तुझे प्राण्यावर बरोबरीचे नाते आणि त्यांच्यासोबत तु बोलते ते मनाला खुपच भावत टोनी लवकरच बरी होणार आणि रानभाजी रेसिपी यम्मी😋 जानकी नाथ सहाय करे प्रभू हे तुझ्यातच आहे खुप गोड🥰🥰
@anandkumardeshpande56594 ай бұрын
छान, लहानपणीची आठवण झाली.मुक्या प्राण्यांच्या बाबतीत फारच हळवं मन आहे.निसर्ग व माणूस परस्पर पूरक आहे.जीवनशैली त्याप्रमाणे असावी.धन्यवाद मन भूतकाळात गेलं.शेवट मस्तच.
@AjitOak-il7tv6 ай бұрын
टुनी जवळ बसून गायलेली बंदिश जबरदस्त. रणभाज्यांची माहिती छान अप्रतिम व्हिडीओ. गोड गळा सुंदर सादरीकरण.किती करावे कौतुक तेवढे कमीच.. 🌹🌹🌹👌👌👌
@pratibhagokhale4006 ай бұрын
अगदी बरोबर
@DasharathDighe-cm5kf2 ай бұрын
स्वानंदी तु गांवच नैसर्गिक सुख दाखवून आमचं मन प्रसन्न करतेस व गांवाच्या आठवणीने खूप मज्जा येते तु खुप चांगली आहेस.आजुन काय सांगू.
@kishorwarekar58696 ай бұрын
स्वानंदी तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात तू पुण्यात कुठले शिक्षण घेत आहे आम्हाला तुझा खूप अभिमान आहे नवीन पिढीतली असून तू सर्व आनंदाने सारे करते तुला भावी जीवनाच्या मनापासून शुभेच्छा
@suvarnamore3613 ай бұрын
मुक्या जनावरांवर प्रेम करण शेती करण किती प्रकारच्या कला तुझ्याकडे आहेत स्वानंदी तू खरच गुणी मुलगी आहे कधी कधी मला तुझा हेवा वाटतो इतरांप्रमाणे तू स्वतःची पण काळजी घे आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहोत ❤🎉
@udaychuge24696 ай бұрын
तु खरोखरच कोकण कन्या आहेस आधुनिकता आणि परंपरा याचा उत्तम मेळ आहे खरच आजच्या तरुण तरुणींनी आसच प्राणी प्रेमी परंपरागत व आधुनिक असायला जावे really I love you
स्वानंदी बेटा तू सांगशील तसे जर लोकांनी वागल तर आयुष्य खूप सुंदर आहे ❤❤❤ you, Take care..!
@SwanandiSardesai6 ай бұрын
@@deepakaher6687 मी सांगते तसं वागावं लोकांनी असं नाही; पण त्यातून काहींमध्ये आवड रूजून आपसूक बदल घडावेत.
@anantanabhavane12106 ай бұрын
Khup Chan❤❤❤
@bharatikatake44132 ай бұрын
Swanandi khup chhan tuza awaj pan kiti god ahe. Sarv gun sampanna ahes. Tya ranbhajya Punyajaval nahi milat. Tu tonichi suddha kiti kalji ghetes. Khup sundar ahe.
@shilpanayak82326 ай бұрын
Atishay sundar vlog . Kewadha tras gheun banavtes. Khup shravaniy ani darshaniy suddha. Keep it up dear..🎉
@sonalisakpal95292 ай бұрын
Khup sunder व्यक्तिमत्त्व
@rohinikulkarni19006 ай бұрын
केवळ अप्रतिम स्वानंदी !! शब्दच नाहीत माझ्याकडे
@vinitadeogaonkar32374 ай бұрын
हाय स्वानंदी खूपचं छान गातेस. खूप छान दिसतेस किती गोड आहे सगळंच तूझ प्राण्यांवरील प्रेम म्हणजे सगळच खूप खूप सुंदर वाटल सगळं मन भारावून गेले. निसर्ग अगदी सूंदर.
@archanatakale32046 ай бұрын
अहाहा किती सुंदर भाजी आणि भाकरी बनवलीस ग तेही चुलीवर आणि भाकरी तर केवढी मस्त टम्म फुगली चुलीत शेकताना! स्वानंदी बेटा तू खरेच खुपच हुशार आणि प्रेमळ आहेस!तुझा आवाजही खुपच कर्णमधुर आहे❤ लव्ह यु & गॉड ब्लेस यु बेटा! अशीच सर्वांची आणि स्वतःचीही काळजी घेत जा, वन्यजीवांपासून! खुप खुप मोठी हो, स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचा सदैव प्रयत्न करीत रहा, तुझ्या कार्यात तुला प्रचंड यश व समाधान मिळो हीच, सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना!🙏विठ्ठल विठ्ठल🙏
स्वानंदी,उतका सुंदर व्हिडीओ त्यामध्ये रानभाज्या त्याचे गुणविशेष वर्णन, सद्य स्थितीत ला मनमोहक असा गावाकडचा निसर्ग, पुन्हा तुझे अष्टपैलू दर्शन म्हणजे चुलीवर केलेला स्वयंपाक व्वा आणि हो बिबट्याची असलेली दहशत बापरे,काळजी घ्या हो सगळे तुझ विशेष कौतुक म्हणजे आमच्यासाठी व्हिडीओ अपलोड करण्यासाठी होणारी मेहनत. आणि टोनुची घेतलेली काळजी
@sureshsawant55024 ай бұрын
ब्लॉग बघताना गावातील सौंदर्य बघून फार आनंद होतो. असे बरेच नैसर्गिक आनंदाने शहरात राहणाऱ्यांना मुकावे लागते.शुभेच्या हा प्रवास घडवत आहात.
@arvindaphale53326 ай бұрын
मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे , रानभाज्या ची माहिती विशेष ,स्वानंदी अभिनंदन 👍👍👍
@swatijoshi51136 ай бұрын
तू गावात राहते म्हणून तू निसर्ग आणि रान भाज्यांचा स्वाद चाखू शकते काही भाज्यांची नाव सुद्धा आम्हाला माहीत नाही..मनापासून धन्यवाद या ब्लॉग मुळे काही नवीन गोष्टी आम्हाला समजल्या 😊
@vijayvaidya92896 ай бұрын
आज कालच्या मुली पेक्षा तू खूप वेगळी आहेस सुंदर प्रेमळ खूप माहिती असणारी आणि खूप छान मराठी बोलणारी
@neetanikam23366 ай бұрын
खरं आहे
@MilinSutar6 ай бұрын
मुक्या प्राण्यांवरील प्रेम बघून बरं वाटलं.
@gaurim88026 ай бұрын
अतिशय सुंदर गायलीस..God bless you.. खूप छान vlog
@sainathmeshram42746 ай бұрын
आम्हाकडे कुड्याचा बार, हरतफरी ची भाजी, शेरडिरे, पिंपळाचा बार, रानतुरी, भाळकळ बार, वरंब्या इत्यादी रानभाज्या आहेत . Love from Gadchiroli 💚 स्वानंदी ताई.
@prachitirodkar17964 ай бұрын
अग बाळा तु अनवाणी जातेस. गवत वाढलेले आहे. पायाखाली सरपटणाऱ्या प्राण्यांची भिती नाही वाटत.😊 तुला अनेक आशिर्वाद ❤
@alexgates52026 ай бұрын
तुझे व्हिडिओ खुपचं छान 👌👌👍तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत अशीच हसतमुख स्वानंदी खुप खुप शुभेच्छा ,
@sulbhasoman65696 ай бұрын
अशी मुलगी सर्वांना लाभो. तुझ्या साठी सर्वांनी जे काही चांगलं लिहिलं आहे ते सर्व अपुरं वाटतंय.पुढील वाटचाली करीता तुला आमच्या कुटुंबातर्फे खूप मनापासून शुभेच्छा. तुझ्या प्राणी प्रेमाबद्दल अतीशय आदर आहे.
@SwanandiSardesai6 ай бұрын
तुम्हा सर्वांच्याच सदिच्छा कायम बळ देतात🙏🏼😊
@dattatraygadakh91656 ай бұрын
ताई राणभाज़्या बघतानी सरपटनार्या प्राण्यांनपासुन सावध रहा ❤ राम कृष्ण हरि माऊली ❤
@SwanandiSardesai6 ай бұрын
@@dattatraygadakh9165 हो😊
@suvarnakadekar99046 ай бұрын
रान
@aishwaryadandekar91335 ай бұрын
अग् sunder गाते Top
@rajeshkulkarni19756 ай бұрын
रानभाज्यांची माहिती दिली आहे ती एकूण च खूप छान आहे
@sameerapednekar39616 ай бұрын
खूप छान व्ह्लाॅग.... नेहमीसारखाच..होय हिरवाईची खरच..भूल पडावी असा हा समृद्ध ऋतू...टाकळा,कवळा,कुर्डु,कडिया,भारंगी आणि रोवण...रानमेवा निसर्गाच्या सान्निध्यातल्या लोकांना निसर्गाची भेट अगदी फुकट असत ग सगळ.. फक्त ते ओळखता आल की छान..भाकरी सोबत मेजवानी....चुलीवर केलीस ही छान..आईसोबत❤ एक वेगळीच चव मला वाटतं पहाणारे पोहोचलेच असणार मनाने कोकणातल्या आपापल्या गावातल्या चुलीपाशी...आमची नानी आजी खूप प्रेमान वाढायची चुलीच्या बाजूला बसवून.. महानंदा शंकर मुरकर.. खूप आठवण आली तीची तुझा हा ह्लाॅग पहाताना..रोवळीत जमा करताना टाकळा आठवली साक्षात... आभार मुली❤
@SwanandiSardesai6 ай бұрын
किती छान आठवणी आहेत 😊🙏🏼
@medhaabhyankar23676 ай бұрын
स्वानंदी ,तुझ्या बरोबर राहुन निसर्ग पहायला आणि विविध कामांचा अनुभव घ्यावासा वाटतोय. मी एक मध्यम वयीन गृहिणी आहे. गैरसमज नसावा.
@anjalijoshi91904 ай бұрын
तुझे videos पाहून आपण इतकं बरं वाटतं आणि आम्ही शहरात राहून निसर्गाच्या सहवासाला किती मुकतो आहोत हे प्रकर्षाने जाणवते निवृत्तीनंतर अशाच शांत शुद्ध हवा चिरेबंदी छोटूश्या घरात उरलेलं आयुष्य घालवावे अशी फार इच्छा होते बाळा तुला अनेक आशीर्वाद
@ramdaspatekar33646 ай бұрын
आमच्या गावाला म्हणजे खालापूर जी रायगड इथे मिळणाऱ्या रान भाज्या म्हणजे सुरवातीला. शेवली भाजी. कर्तूली. कोळीची भाजी. भारंगा आंबट बिंदूकाळी. आखूर भाजी. अश्या अजून सुद्धा आहेत. धन्यवाद स्वानंदी.
@rajnigandhalive14 ай бұрын
Waa waa Khupach Chan Vlog.. Gaana He Khupach Sundar 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@uttaramodak43866 ай бұрын
Kiti कळकळून बोलते आहेस तू एक छान गुणी मुलगी आहेस तुला खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@sandeshnarkar6414 ай бұрын
स्वानंदी! तुला सगळंच सुंदर समजत!🙏🙏🙏
@dattatraybachanakar20976 ай бұрын
स्वानंदी तुझ्या सारखी परंपरा प्रत्येक मुलीने atamsath केली पाहिजे 👌👌
@rupalichakankar86676 ай бұрын
Hero herion LA copy karnypeksha tula copy kele tar jivnat khara anand milel
@moonstruckmoth4 ай бұрын
Wow! Truly amazing singing, very soothing. Keep it up
@ganeshfulsawange88556 ай бұрын
तुझे विडिओ बघून मन प्रसन्न होते सगळ्या गोष्टीत सर्व गुण सम्पन्न म्हणजे स्वानंदी ❤❤❤❤ I love kokan❤❤❤
@GaneshHadgaonkar6 ай бұрын
काय मुलगी आहे... हुशार खुनी सुंदर.. आवाज पण छान आहे.. निसर्गाच्या सोबतीत खूप रमते.एक सुगरण पण आहे... आम्ही हीच्या प्रेमात पडलो ...हीरा भेटाव वाटते.😅😅😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉
@mitalitanksale2166 ай бұрын
खर्या अर्थाने कोकणकन्या आहेस ...आवाज तर कोकीळेसारखाच खणखणीत मुग्ध करुन टाकणारा.... मलाही डुलकी आली असा.जियो ❤💚🌳💚
@kedarchoudhari2794 ай бұрын
रानभाज्या गोळा करताना किंवा झाडीत जातांना काळजी घे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी जास्त असतात. मोठे गमबूट वापर.Vlog मस्त. 👌👌👌
@swatithosar9976 ай бұрын
केवळ अप्रतिम! एकदा subscribers ना भेट, खुप छान वाटेल.
@mazelikhan36272 ай бұрын
गाणं ऐकत झोपला टुण्या 😍 मस्त ग स्वानंदी ❤❤
@sahikantlad95826 ай бұрын
कौतुक करावे ते थोडे खुपच छान माहिती देता राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@sahikantlad95826 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vishalrahate96106 ай бұрын
तुमचे विचार, तुमचे व्यक्तिमत्त्व, आणि जनावरां वर तुमचं असलेलं प्रेम स्वतःच्याच नाही तर इतरही जनावरां विषयी तुमचं प्रेम त्यांच्यविषयी असणारी भावना ,काळजी आणि प्रेम खरंच खुप कौतुकास्पद आहे,तुमचे विचार इतरांनीही आत्मसात करावी हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो . तुमचे व्हिडिओ खरंच खुप छान आहे,सतत असेच व्हिडिओ बनवत रहा , धन्यवाद.
@shraddhanaik95316 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ!
@sanjaybugdane82376 ай бұрын
तुझे सगळे व्हिडीओ खूप छान असतात रानभाज्या ची माहिती खूप छान होती ❤❤❤
@vishwaskekane16 ай бұрын
तुझे सर्व videos मी आवडीने पाहतो. खूप आवडतात आणि खूप छान छान माहिती पण मिळते नकळत गावाला जाऊन आल्यासारखे वाटते. तू खूप छान explain पण करतेस. आईमुळे मी यातील बऱ्याचश्या भाज्या खाल्या आहेत खुप छान लागतात. तू खरंच कोकणची निसर्गकन्याच आहेस, तुला गाण्याचे, चित्रकलेचे तसेच शेतीचे खूप सारे ज्ञान आहे. मुक्या प्राण्यांवरील तुझे प्रेम पाहून खूप वाटतं. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!! असेच छान छान videos करत रहा.
@SwanandiSardesai6 ай бұрын
खूप धन्यवाद 😊🙏🏼
@sanjaymagar13906 ай бұрын
स्वानंदी . फार सुंदर माहिती देतेस कुत्र्यां साठी मोठ्या आकाराचा पिंजरा करून घे बिबट्या सारखा येणार बघ शिर्डीला कधी आलीस तर भेटुया🙏🏻🌹 ॐ साई राम🌹🙏🏻
@usj12926 ай бұрын
स्वानंदी, आजचा vlog दृष्ट लागण्याइतका सुरेख केलायस. सुरुवातीला 'टुनी' च्या जिवावरचा प्रसंग, त्यातून तिचे वाचणे, तुम्ही तिची काळजी घेणे आणि शेवटी तुझ्या सुरेल आवाजात पं. पलुस्करांचे 'जब जानकी नाथ सहाय करे' हे प्रत्ययकारी भजन ! मधेच कोकणातल्या रानभाज्यांविषयी छान माहिती. हे सर्व एखाद्या उत्तम पटकथा असलेल्या छोट्या सिनेमासारखे झाले आहे. हे भजन तुझे गुरुजी केदार बोडस अतिशय सुरेख गायचे. मी दोन तीन वेळा त्याने गायलेले ऐकले आहे. आज तुझे गाणे ऐकतांना अपरिहार्यपणे त्याची आठवण झाली. BTW तुम्ही घराजवळ रानभाज्या सोडून आणखी देखील एवढ्या भाज्या पिकवताय म्हणजे तुमच्या परिसरात माकडे आणि वांदरांचा उपद्रव दिसत नाहीये. भयंकर नशीबवान आहात. माझे गांव धोपेश्वर, राजापूर ! आमच्याकडे उत्तम जागा आहे पण माकडे काही म्हणजे काही करू देत नाहीत. नुसता उच्छाद मांडलाय. कशालाही घाबरत नाहीत. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भरपूर आणि डोळस रियाझ कर. मोठ्ठी हो. P.S. --- Vlog छान एडीट केलायस. प्रत्येक Vlog तूच एडीट करतेस का?
@SwanandiSardesai6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏼😊 मीच edit करते vlog. मला गातानाही केदार दादांची खूप आठवण आली. त्यांनीच हे पद शिकवलेलं 🙏🏼. तुमच्या सदिच्छा कायम राहोत 🙏🏼
@shwetakocharekar59416 ай бұрын
तुझा video बघून माहेरची आठवण येते माझे जीवन पण असेच होते
@madhavitalnikar44756 ай бұрын
स्वानंदी खूप छान केलीस रानभाजी ,भाकरी. भाज्यांची माहिती, रेसिपी बघायला खूप मजा आली. चूल पेटवून भाकरी ही मस्तच बनवली
@shraddhameshram56406 ай бұрын
खूप साधेपना आणि सगळ्या गोष्टी इतक्या सोप करून सांगते प्रत्येक्षात जगते भारी वाटते ग खूप, तुला सांगु तूझ्या वयात असताना मी माझा past व्यर्थ घालवलं अस वाटत खूप काही शिकण्यासारख आहे तूझ्या कडून, तुला घळवणारे तुझे आई बाबा यांनी खूप सुंदर संस्कार केले आहेत ग तूझ्या वर. मला एक 7 वर्षाची मुलगी आहे, माझी मनापासून इच्छा आहे का ती अगदीं तूझ्या सारखी व्हावी, पण कदाचित मी कूठे तरी कमी पडतं असेल.. असो next vlog मध्ये तूझ्या आई बाबा सोबत video बनव,next topic त्यांनी तुला कसं घडवल या बद्दल सांग plz करशील ना या विषयी video, it's my request बाळा. खूप यशस्वी हो आणि अशीच आनंदी आणि सुखी रहा बाळा 💖🙏
@shilpatembhurne51926 ай бұрын
ho nkki kr
@rajeshreebhambale90526 ай бұрын
Swanandi kharach tuji aai khup nashibvan ahe ticha poti as ratan janmala aal tuje sarv gun chaan ahet chaan mahiti dete sarv pranyanvar mansasarkhech Prem kartes Ani amha sarvana khush thevtes chaan video ahet tuje pahat rahave ase khush Raha Ani amhala asech chaan chaan video tukun khush kar Bala 😘😘😘😘
@Creativ100-DM6 ай бұрын
आपकी गायकी बहुत अच्छी है, टोनी के पास बैठना बहुत अच्छा था..❤❤
@adityakirti63445 ай бұрын
Swanandi tai jabardast video asatat tumche sarva ...khup chan mahiti deta tumhi thanku so much tai
@maharashtra07196 ай бұрын
खुप लोक व्हिडीओ बघतात पण लाईक करत नाही. लाईक करत रहा.
@NageshFadtare6 ай бұрын
स्वानंदी तुमच्या परिवारातल्या सदस्यांवर बिबट्याने हल्ला केला हे पाहून फार वाईट वाटले. कारण आम्हाला नेहमीच तुझ्या विडिओ मधून छान छान गोष्टी, माहिती पाहायला मिळते . सावध ,सतर्क रहा आणि सर्वांचीच काळजी घ्या. आम्हाला तुम्हाला नेहमीच आनंदी बघायच आहे. ❤❤❤
@nanditakhandekar69856 ай бұрын
मी या सर्व भाज्या खाल्या आहेत खुप छान लागतात 👌मला माझ्या आईची आठवण झाली ती आता या जगात नाही त्यामुळे मी हे सर्व खुप मिस करते 😔
@dhananjayjoshi22066 ай бұрын
चुलीवर टम्म फुगलेली भाकरी, सोबत रानभाजी आणि पावसाने झालेलं ओलं पण मन प्रसन्न करणारं वातावरण - आणखी काय पाहिजे. टोनीला लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छा
@santoshmondkar64776 ай бұрын
तुझ्या इमेज प्रतिमेमुळे लोक स्वतःच्या मुलीचे नावं स्वानंदी ठेवतील
@raginideodhar16902 ай бұрын
Jari naw thewale tari ashi swanandi nahi karu shaknar.. ti lakhat 1 swanadi sardesaich. Ekmev n adwitiya vyaktimatwachi❤
@sunilborkar86076 ай бұрын
खूपच सुंदर तुझी रान भाजीची रेसिपी आणि आणि नंतर गायलेले गाणे असेच तुझे व्हिडिओ पाहिला मिळावे
@dineshmandlik91226 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता आमच्या जुन्नर शिवजन्मभुमी तालुक्यात भरपूर वाघ 🐅🐅🐅 आहे आमच्या तालुक्यात प्रत्येक गावात वाघ आहेत मागच्या आठवड्यात आमचा मोत्या पण दिवसा खाटेवरून वाघांने नेला रानभाज्याची छान माहिती आहे तुला धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे
किती किती छान वाटतं स्वानंदी तुझे vlog बघून काय सांगू..... या जगात जिथे negativity पसरवली जात आहे समाज माध्यमातून तिथे तुला पाहून, तुझे बोलणे ऐकून आणि तुझे संगीतमय सूर ऐकून आजही या जगात चांगलेपणा, positivity आहे यावर पूर्ण विश्वास वाटतो...... love you बाळा❤❤❤❤❤❤
@anilkaryekar35006 ай бұрын
स्वर्ग सुख म्हणजे काय असतं ते आम्ही अनुभवलं.
@ashoknikam96706 ай бұрын
अतिसुंदर माहिती देत आहात. आम्ही ती काळजीपूर्वक ऐकतो, शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा एक उत्तम मिलाप आपणाकडे पाहिलं की वाटतं. समाधान मिळतं , keep it up, God bless you.
@kavyapatil17056 ай бұрын
काळजी घे टूनीची. देवाने वाचवलं तीला. नशिब बलवत्तर आहे टूनीचं😊