Рет қаралды 48,159
SNT च्या ह्या व्ही लॉग मध्ये पाहूया मुंबापुरीच्या किल्यांतील पुढचे 2 किल्ले माहीम व वरळी.
दुर्दैवाने माहीम किल्ला अनधिकृत वस्ती व कचऱ्याच्या साम्राज्यात फसल्याने इतिहासप्रेमींना पहाता येत नाही.
केवळ समुद्राच्या बाजूने ह्या किल्याच्या जवळ जाता येते.
मुंबई शहरातील सर्वात जुनी मानवनिर्मित वास्तू म्हणून हा किल्ला अजूनही काळाशी झुंजत उभा आहे.
ह्याउलट वरळी चा किल्ला अजूनही भारतीय पुरातत्व खात्याच्या कृपेने सिमेंट चा प्रसाद खाऊन भक्कम उभा आहे.
ह्या किल्याची मूळ बांधणी जशीच्यातशी ठेवल्याने आपल्याला पुरातन काळी हा किल्ला कसा दिसत असेल ह्याचा अचूक अंदाज येतो.
बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटातून ह्या किल्ल्याचे दर्शन तुम्हाला झाले असेल
वरळी कोळीवाड्याच्या टोकाशी असणाऱ्या भूषिरावर हा किल्ला आजही इतिहासप्रेमींच्या प्रतीक्षेत उभा आहे.