Рет қаралды 50,081
#Afghanistan #Taliban #OldAfghanistan
हे फोटो पाहून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? तसे तुम्हाला हे जुन्या काळातल्या पाश्चात्य महिलांचे फोटो वाटतील. मात्र, हे फोटो अफगाणिस्तानातल्या महिलांचे आणि तिथल्या लोकांचं आहेत हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल? होय पण, अफगाणिस्तानतलेच हे १९७२ सालचे फोटो आहेत. तेव्हा मुली अशा निर्धास्त अफगाणिस्तानातातल्या रस्त्यांवर फिरत होत्या. जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचं काबूल कुठल्याही इतर आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरासारखंच वाटावं, असं होतं. पण नंतर युद्ध आणि नव्वदच्या दशकात कट्टरतावादी तालिबानच्या राजवटीत देशाचा चेहरामोहरा बदलून गेला. महिलांच्या शिक्षणाच्याच काय तर घराबाहेर पडण्याच्या अधिकारावरही तेव्हा गदा आली. आता तालिबानची नवी राजवट महिलांसाठी कशी असेल? महिलांच्या हक्कांविषयी तालिबानची भूमिका काय असेल? हे चित्र अजून स्पष्ट नाही. या निमित्ताने आपण अफगाणिस्तानतला पूर्वीचा काळ कसा होता ते पाहुयात.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi