माझ्या दोन्ही मुली ह्या वर्षी मराठी शाळे मध्ये जात आहेत... धन्यवाद सुशील
@shubhadakulkarni36323 ай бұрын
चिन्मयी सुमित यांची मुलाखत खूपच छान झाली.ती रंगली असं वाटते ते आमच्यातही मनांत असलेले मराठी माध्यम शाळेबद्दलचे, जिव्हाळा -प्रेम, अभिमान यामुळे! इंग्रजी हा एक विषय म्हणून समाजात वावरतांना आवश्यक आहे.पण ते माध्यम म्हणून मलाही पटत नाही.माझीही शाळा मराठी होती.इंग्रजीवाचून कांहीं फारसे नाही अडले.मराठीतूनही आपण बरेच कांहीं आयुष्यांत करु शकतो.हे चिन्मयी ताईंनी आपल्या मुलांची उदाहरणे देऊन पालकांना एक आवाहन केले आहे.सुजाण पालक याचा नक्की विचार करतील. मराठी भाषा,शाळा यासाठी विचारलेलेयोग्य प्रश्न,-मनमोकळी उत्तरे..!
@sambhajikhandekar68253 ай бұрын
माणसाला अविष्कृत करते ती त्याची मातृभाषा
@UmeshBodke-story2 ай бұрын
आपण माणूस म्हणून खूप ग्रेट आहात चित्रपट सृष्टीत असून ही पाय जमिनीवर आहेत ह्याचे मी स्वतः मुंबईत अनुभव घेतला मागे मेळाव्यासाठी मुंबईत गेलेलो , दादर परिसरात ह्या अगदी समोर दिसल्या त्यांना ओळख दिली तर छान वागल्या कोणताही देखावा अहंभाव नाही चिन्मयीजी ग्रेट व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏
@shailajabotlawar41173 ай бұрын
मराठी भाषेसाठी व आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवास्पद, झेंडा मराठीचा, जय महाराष्ट्र🙏
@शाश्वतप्रेरणा2 ай бұрын
नक्कीच ताई , मलाही वाटतेमराठी शाळांचे भवितव्य उत्तम असेल.!
@clearning75943 ай бұрын
मातृभाषेतून शिक्षण, आनंददायी आहेच आणि आशयाचे संकल्पनात्मक पातळीवर आकलन होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे आहे.हा विचार यथार्थ आहे.
@wetheworld3 ай бұрын
शिशु वर्गापासून त्याचा प्रवास सुरु केला आहे... ह्या आधी त्याना आम्ही नर्सरी मध्ये पण टाकले नाही...
@harshaliawasare44763 ай бұрын
ताई मी पूर्वप्रार्थमिक शाळेची माजी शिक्षिका आहे. तुम्ही आमच्या शाळेत आला होतात. मागच्य महिन्यात मी भीमाशंकर ते पुणे प्रवासात प्रत्येक छोट्या गावातील शाळेच्या पाट्या इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल अशा वाचल्या. मला फार वाईट वाटले की आम्ही शहरांमधे मराठी शाळा वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत आणि छोट्या गावांमधे इंटरनॅशनल स्कूल सुरु आहेत.
@madhukarwarbhuwan27953 ай бұрын
छान मुलाखत
@SwatiGawade8522 ай бұрын
My son is in English medium CBSE board but the poems stories in marathi language are so useless that they don't give any morals .even English poems and chapters are same.
@sanjeevundalkar6463 ай бұрын
चिन्मयींनी एक खूप महत्त्वाचे विधान केले .मराठी ही पैशाची भाषा नसल्याने आपल्या मागण्यांना जोर प्राप्त होत नाही .पुरेसा दबाव बनत नाही . या चॅनलचे उद्घाटनही परभाषिक हाॅलमधे झाले . यातच सार आले .आपण समाज म्हणून बचत करून हाॅल , शाळा ,हाॅस्पिटल चालवत नाही तोवर आपली प्रतिष्ठा वाढणार नाही . एक डाॅ.मांडके यांनी भव्य स्वप्न पाहिले .पण त्यांच्या अकाली निधनानंतर पत्नीने मराठी लोकांना आवाहन करून पैशाचे पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न केला तो आपल्या बेपर्वाईने विफल होऊन शेवटी अंबानीच्या घशात हॉस्पिटल गेले .नितीन देसाई स्टुडिओ त्याच मार्गाने जात आहे . यावर युद्धपातळीवर कृती हो नाहि तोवर मराठी भाषा ,संस्कृतीच्या गप्पा निरर्थक आहेत .