Shrikant movie || Manobal || Deepstambh || Yajurvendra Mahajan

  Рет қаралды 1,827

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

Күн бұрын

दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिक्षणासोबत खेळ, मनोरंजन व्यायाम यासारख्या गोष्टींची खूप आवश्यकता असते. म्हणूनच, दीपस्तंभ मनोबल मध्ये या सगळ्या गोष्टींचाही जाणीवपूर्वक विचार केला जातो.
मनोबल प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात नेऊन अतिशय उत्तम दर्जाचे प्रेरणादायी चित्रपट दाखविले जातात. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दिसत नसल्यामुळे, त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघण्याचा अनुभव घेतलेला नसतो.
आम्ही मात्र सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी आणि इतरही विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात आवर्जून घेऊन जातो.
एका दृष्टिहीन विद्यार्थ्याबरोबर दुसरा दृष्टिहीन नसलेला विद्यार्थी बसविला जातो. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ऐकू येते त्यामुळे त्यांना ऐकून चित्रपट बराचसा समजतो. मात्र ज्या प्रसंगामध्ये डायलॉग नाही मात्र हालचाल आहे तो भाग समजत नाही. त्यासाठी दृष्टिहीन विद्यार्थ्याला, त्याच्या सोबत बसविलेल्या इतर विद्यार्थ्याने हा संवाद नसलेला भाग कसा समजावून सांगायचा त्याचे प्रशिक्षण दिले जाते. आणि मग हे दोघेही मित्र अथवा मैत्रिणी संपूर्ण चित्रपट एकत्रित रित्या एन्जॉय करतात.
आता तर तंत्रज्ञानाने याही क्षेत्रात प्रगती केली आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना चित्रपटातील अशा प्रसंगाचे स्पष्टीकरण देणारे ॲप तयार झालेले आहेत. ते ॲप डाऊनलोड करून चित्रपटगृहामध्ये सुरू केल्यास चित्रपटातील प्रसंगाशी ते ॲप एकरूप होऊन त्याबद्दलचे डिस्क्रिप्शन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना देते.
व्हीलचेअर वर असलेल्या अथवा चालताच येत नसलेल्या विद्यार्थ्यांनाही इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने चित्रपटगृहात नेले जाते.
मनोरंजन हे सुद्धा जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. त्यातही संधी मिळणं एखादी गोष्ट समजणं याचा आनंद व त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास हा अलौकिक असा असतो.
आमची बरीचशी मुलं आयुष्यात पहिल्यांदा चित्रपटगृहात जातात चित्रपट अनुभवतात आणि त्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो.
नुकताच हा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चित्रपटगृहात ‘श्रीकांत’ हा चित्रपट बघताना दिसला..
‘श्रीकांत’ हा चित्रपट बनविण्याच्या प्रक्रियेतील सर्वांनाच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आणि कौतुक केले पाहिजे.
या चित्रपटामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल समाजामध्ये दिव्यांगांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत विशेषतः त्यांच्या क्षमतांबद्दल गैरसमज आहेत ते गैरसमज दूर होण्यास मदत होईल. सर्वसमावेशक सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीमध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग आणि इतरही प्रवाहात नसलेले घटक असणे अत्यावश्यक आहे. त्या सर्वांनाच सर्व संधी मिळाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण व्हायला हव्यात याबाबतीत जागरूकता होईल. ते आपलेच भाऊ-बहीण मित्र मैत्रिणी आहेत ही जाणीव या चित्रपटामुळे होईल. त्यांच्याशी कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबतीत प्रबोधन होईल.
‘श्रीकांत’ ने त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटात विशेषतः त्याच्याकडून घडलेल्या चुका आणि काही काळाकरता त्याचा चुकलेला मार्गही त्यामध्ये दाखविलेला आहे. हे सर्वात अधिक कौतुकास्पद आहे . मार्ग चुकल्यानंतर पुन्हा एकदा योग्य मार्गावर येणं आणि प्रगतीपथावर जाणं हा सगळाच प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या प्रकल्पात पुणे व जळगाव येथे देशभरातील सुमारे 400 दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यांना देशातल्या व देशाच्या बाहेरीलही मुख्य प्रवाहातल्या करिअरच्या संधी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ,व्यक्तिमत्व विकसन या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत. त्यासाठीची एक उत्तम दीर्घकालीन व्यवस्था उभे करण्यास आम्हाला यश आले आहे.
या सर्व मुलांना हा चित्रपट बघून अधिक उत्साह निर्माण झाला आहे व आपण योग्य मार्गावर आहोत याबाबत आत्मविश्वास वाढला आहे.
मागील सात वर्षांपासून असे अनेक श्रीकांत उभे राहत आहेत आणि ते इतरांनाही प्रेरित करून उभे करीत आहेत.
जय हो… मंगल हो…
#shrikantmovie
@shrikant bhola

Пікірлер: 2
@SarangKumbhar-i2i
@SarangKumbhar-i2i 3 ай бұрын
🎉🎉🎉👌
@BHARATSENA.
@BHARATSENA. 3 ай бұрын
🌴दिव्यागता आत्मा की उड़ान, जीवन का सफर, दिव्यांगता में भी छवि, अनमोल अपार। साहस से भरा है उनका मन, आगे बढ़ते हैं, छलाँग लगाते हैं। हार नहीं मानते, जीत की तलाश, विश्वास से बढ़ते, मार्ग पर चलते राशि। दिव्यांगता का है गर्व, मंज़िल का इंतज़ार, जीवन की राहों में, उनकी है अद्भुत उपलब्धि की प्यार। घनश्याम चरखे ✍️
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
ОТОМСТИЛ МАМЕ ЗА ЧИПСЫ🤯#shorts
00:44
INNA SERG
Рет қаралды 4,7 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
Deepstambh Manobal Prakash Pujan 2023 || Yajurvendra Mahajan
3:25
Deepstambh Foundation
Рет қаралды 5 М.
ENGLISH SPEECH | PALKI SHARMA: India's Right Path (English Subtitles)
14:44