फर्माईश : माझी कन्या | कवी बी Kavita | Spruha Joshi | Marathi Poems

  Рет қаралды 231,898

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

For Brand Collaborations & Partnerships: teamspruhajoshi@gmail.com
Instagram : / spruhavarad
Facebook : / spruhavarad
Twitter : / spruhavarad
_______________________________
गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोललें गोरटीला?
उष्ण वारे वाहती नासिकांत,
गुलाबाला सुकविती काश्मिरांत,
नंदनांतिल हलविती वल्लरींला,
कोण माझ्या बोललें छबेलीला?
शुभ्र नक्षत्रें चंद्र चांदण्यांची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे! भूईवर पडे गडबडून,
कां ग आला उत्पात हा घडून?
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटें लेती.
तुला लंकेच्या पार्वती समान
पाहुनीयां, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
'अहा! - आली ही पहा- भिकारीण!'
मुली असती शाळेंतल्या चटोर;
एकमेकींला बोलती कठोर;
काय बाई! चित्तांत धरायाचे
शहाण्यानें ते शब्द वेडप्यांचे?
रत्न सोनें मातींत जन्म घेतें,
राजराजेश्वर निज शिरीं धरी तें;
कमळ होतें पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायातें.
पंकसंपर्कें कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गें रत्न का भिकारी?
सूत्रसंगें सुमहार का भिकारी?
कशी तूंही मग मजमुळें भिकारी!
बालसरिता विधु वल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्नें नरवीर असमान्य
याच येती उदयास मुलातूंन.
भेट गंगायमुनांस होय जेथें
सरस्वतिही असणार सहज तेथें;
रूपसद्गुणसंगमी तुझ्या तैसें,
भाग्य निश्चित असणार तें अपैसें.
नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखीं करती;
पाच माणिक आणखीं हिरा मोतीं
गडे! नेत्रां तव लव न तुळों येती.
लाट उसळोनी जळी खळें व्हावें,
त्यांत चंद्राचे चांदणे पडावें ;
तसे गालीं हासतां तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावे!
गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोंवळ्या सम वयाच्या
सवें घेऊनि तनुवरी अद्भुताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा!
काय येथें भूषणें भूषवावें,
विशिध वसनें वा अधिक शोभवावें?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थलीं कृत्रिमाची!
खरें सारें! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टिश्रृंगारें नित्य नटायाची.
त्याच हौसेंतुन जगद्रूप लेणें
प्राप्त झालें जीवास थोर पुण्यें;
विश्वभूषण सौंदर्य-लालसा ही
असे मूळांतचि, आज नवी नाहीं!
नारि मायेचें रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तूं!
तपःसिद्धीचा समय तपस्व्याचा,
भोग भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा स्वर्ग की कुणाचा
मुकुट किर्तीचा कुण्या गुणिजनाचा
यशःश्री वा ही कुणा महात्म्याची
धार कोण्या रणधीर कट्यारीची;
दिवसमासें घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटतें असें चित्ता!
तुला घेइन पोलकें मखमलीचें,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचें,
हौस बाई! पुरवीन तुझी सारो
परी आवरि हा प्रलय महाभारी!
ढगें मळकट झांकोनि चंद्रिकेला,
तिच्या केलें उद्विग्न चांदण्याला;
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट!
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे
कोड किंचित् पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचें हृदय कसें होतें,
नये वदतां, अनुभवी जाणतीं तें!
माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा!
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
हृदय होतें हदरोनिया दुभंग!
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनि आम्हांस करंट्यांना?
लांब त्यांच्या गावास जाउनीया
गूढ घेतों हें त्यांस पुसोनीयां!
" गांवि जातों" ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली!
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येतें मी" पोर अज्ञ वाचा!
- कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#SpruhaJoshi #Poems #Marathi
_________________________________
Credits
________________________________
Produced By
Spruha Joshi
Nachiket Ashok Khasnis
Location & hospitality Partner :
Nitin Dhepe
Rucha Dhepe
Complete Dhepewada team
Filming
Angad Joshi
Shubhankar Havele
Rahul Kulkarni
Editor :
Soham kurulkar
Yogesh Dixit
Tanishq Mohite
Audio: Ameya Ghatpande
Hair & Makeup: Bhagyashree Patil
Styling : Tanmay Jangam
Costumes: Cotton Village
Production stills: Rahul Kulkarni
Partnerships and Brand Collaborations: Anurag Pathak
Social Media : Pornima Khadke
Created By: Nachiket Ashok Khasnis
___________________________
About Spruha Joshi :
___________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
____________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 867
@kishorehunnargikar811
@kishorehunnargikar811 Жыл бұрын
ही कविता ऐकून डोळे ओले न होणारा बाबा सापडणार नाही. कविता अगदी खोल अंत:करणापर्यंत जाते. स्पृहाचे सादरीकरणही तेवढेच जोरकस.
@rashmigokhale3537
@rashmigokhale3537 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण... कधीही कितीही वेळा ऐकली ,वाचली तरी डोळे घळा घळा वाहू लागतात. आणि आपल्या वडिलांनी सुद्धा त्या वेळच्या त्यांच्या परिस्थिती मध्ये आपले किती लाड केले होते ते आठवून खूप जास्त रडू येते. आता वडील नाहीत त्यांना विसरणं ही शक्य नाही पण ह्या कवितेमुळे अनेक प्रसंग डोळ्यांसमोरून गेले. खूप धन्यवाद स्पृहा
@sanikamudholkar8000
@sanikamudholkar8000 2 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण स्पृहा . आठवीत आम्ही ही कविता तोंडपाठ केली होती. बाबांची खूप आठवण आली. मी पुण्यात हॉस्टेलला राहत असताना बाबा खूप आजारी असून सुध्दा १० तासांचा प्रवास करुन मला भेटायला यायचे कारण येण्याजाण्यात माझा वेळ जायला नको म्हणून.
@sujathar3826
@sujathar3826 2 жыл бұрын
शाळेतलं बालभारतीचं पुस्तक डोळ्यासमोर आलं आणि ज्या चालीत तुम्ही ही कविता सादर केलीत त्याच चालीत आम्ही पण ही कविता म्हणत असू.. शाळेतले सुंदर दिवस आठवले आणि अत्यन्त कळकळीनी, passionately शिकवणारे त्यावेळचे शिक्षक आठवले. त्यांच्या मुळे ही कविता आजही शब्दांसकट, चालीसकट अर्थासकट जशीच्या तशी इतक्या वर्षानंतरही मनात जिवंत राहिली आहे.. ही किमया कवीच्या अद्भुत शब्दांची आहे की समर्पित होऊन शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकांची आहे हे सांगणं कठीण आहे.Thank you स्पृहा.. 😊
@latadeshpande5577
@latadeshpande5577 2 жыл бұрын
Spruha,tuzi aaji shobhen ya vayachi mi aahe.Pan ajoonhi kitihi vela aikali tari ya kavitene dole bharoonch yetat.Etaki vedana ya kavitet aahe.Suhruda Deshapande.Aani tu nehamich kavitela nyay detes.
@sachinwagh6474
@sachinwagh6474 Жыл бұрын
🙏 that's it
@radhikamarathe2376
@radhikamarathe2376 Жыл бұрын
डोळयात पाणी येते
@yugandharakulkarni5374
@yugandharakulkarni5374 2 жыл бұрын
तुझ हे सादरीकरण शाळेतल्या बाकावर घेऊन गेल आणि शेवटी 2 कडवे अगदी जड अंतःकरणाने म्हणणारे सर सुद्धा दिसले आणि ते ही अगदी ह्याच चालीत म्हणून दाखवायचे ही कविता 😇 खूप छान सादरीकरण 👍खूप खूप धन्यवाद
@dhaviskitchen5020
@dhaviskitchen5020 7 ай бұрын
अगं स्पृहा ताई ही कविता फारच करुणा स्पद आहे 😢😢 छान सादर केली स
@balumane3706
@balumane3706 Жыл бұрын
खूप छान कविता आहे आणि तुमच्या आवाजामुळे एकदम आम्ही भारावून गेलो आहे तुम्हाला मालिकांमध्ये पाहायला खूप आवडेल
@sanjaydeshpande2182
@sanjaydeshpande2182 Жыл бұрын
स्पृहा,अगदी अप्रतिम सादरीकरण,आणी तूझ्या आवाजाने जिवंत झाली,तुला खूप खूप धन्यवाद
@chitrasonawane7685
@chitrasonawane7685 2 жыл бұрын
खूपच सुंदर कविता सादर केली मला माझ्या लहानपणी ची आठवण करून दिली स कविता ऐकून मला माझ्या वडिलांनी फार आठवण आली आत्ता ते हयात नाहीत कविता फार छान आहे👌👌
@sunilgholap3924
@sunilgholap3924 Ай бұрын
अप्रतिम कविता अप्रतिम निवेदन. खूप गोड आवाज.
@Sandhyababhalikar1169
@Sandhyababhalikar1169 2 жыл бұрын
खूपच छान कविता आहे ही, मला खुप आवडते, Mi पुण्यात असते माझे बाबा गावी असतात , खुप आठवण आली आज बाबांची ते pn माला असच समजाऊन सांगायचे, माझी मुलगी pn पाच वर्षांची आहे Ani उद्याच तिचा जन्म दिवस आहे , मी ही कविता तिला समजाऊन सांगायचा नक्की प्रयत्न करेन. Ani खरच खूप सुंदर आहे कविता.
@shrutibondre1576
@shrutibondre1576 2 жыл бұрын
हॅलो स्पृहा,कवीने खूपच तळमळीने लिहिलेली कविता तुम्ही तितक्याच तळमळीने गायलीत! जुनी मराठी भाषा,तिची श्रीमती या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशात येत आहे! आपले आभार मानावेत तितके कमीच,धन्यवाद!
@RitaMore-j8h
@RitaMore-j8h 2 ай бұрын
नशिब चाल अगदी आम्हाला शाळेत होती तशीच बोलली आहे त्यामुळे आम्हाला ते शाळेतील दिवस आठवले खुप छान ❤
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
खूप सुंदर कविता आहे ही. शाळेत शिक्षक शिकताना अक्षरशः डोळ्यातून घळाघळा पाणी वहायचे.
@anuradhainamdar4070
@anuradhainamdar4070 Жыл бұрын
माझे दादा देखील ही कविता माझ्यासाठी म्हणायचे.ते आठवले आणि माझेही डोळे त्यांच्या आठवणीने पाणावले. स्पृहा खूप खूप छान म्हंटले. धन्यवाद!!
@vasudhakotwal3177
@vasudhakotwal3177 Жыл бұрын
स्पृहा तू कविता फार सुरेख सादर केलीस.कवीचे भाव अतिशय तरलतेने आमच्यापर्यंत पोचवलेस.खूप खूप धन्यवाद.
@user-br1uw2vh3l
@user-br1uw2vh3l 2 жыл бұрын
अतिशय उत्तम,अप्रतिम,माझ्या दादांची मी लाडकी कन्या होते,त्यांची आठवण झाली हि कविता ऐकून,Thx स्पृहा ताई
@प्रासादिकम्हणे
@प्रासादिकम्हणे 2 жыл бұрын
शालेय जीवनात समोर आलेल्या अप्रतिम कवितांमधली ही एक. तू सादर करत असताना मन खरंच त्या काळात गेलं. किती सुंदर कविता होत्या तेव्हा. तुझं गाऊन सादरीकरण अप्रतिम. खूप गोड तू आणि कविता .👍👏👏
@ujwalaprayagi9123
@ujwalaprayagi9123 Жыл бұрын
Wa spruha kya bat hai kavita tar apratim aahech pan tumhi gayali pan khup chaan. Bhav otale aahe tyat. Aamhi hi kavita lahanpani shikalo aahot .
@suryachemicals7312
@suryachemicals7312 Жыл бұрын
मी शाळेत असताना हि कविता आमच्या गुरुजींनी इतक्या सुंदर पद्धतीने शिकवली होती की... अजूनही स्मरणात आहे कवितेच्या शेवटी डोळे नक्कीच पानावतात.
@pramodkumthekar3853
@pramodkumthekar3853 5 ай бұрын
पहिल्यांदाच ऐकली आणि खूप छान वाटलं. कधी तरी पूर्ण ऐकायला आवडेल.
@udayganpathalli5368
@udayganpathalli5368 Жыл бұрын
स्पृहा ,तुम्ही थोडक्यात भावर्थासह अप्रतीम सादर केलीत ही कविता... या व्हिडिओ सोबत खाली दिलेली संपूर्ण कविताही वाचली आणि हे खूप छान केलं की की संपूर्ण कविता discription box मध्ये दिलीत... 👍🏻👌
@35vaishnavisansare24
@35vaishnavisansare24 2 жыл бұрын
Khupch chan kavita Spruha di...Tu explain pn khup chan kelis...Thank you for poem
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
छान कविता.. अप्रतिम मांडणी..गोड काव्यवाचन... अर्थबोध कविता... परीचे प्रेमळ बाबा...
@truptibhagat2246
@truptibhagat2246 2 жыл бұрын
khupach chan kavita ani tuze sadarikaran pan khup chan👌👌kavita chalit mhantlyamule ani tuzya goad awajane agdi bhavuk zale,👌👌👌
@sureshdeore6447
@sureshdeore6447 11 ай бұрын
ताई, तूम्ही खूप चांगली कविता आपल्या आवाजात सुंदरपणे सादर केली. तशी ती कविता अजरामरच आहे. प्रत्येक्ष वडिलांनी आपल्या कन्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण परिस्थिती मुळे बाप बिचारा हतबल झालेला असतो, पण बापाने आपल्या लाडक्या कन्येला खूपच समजवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्य ते वडील.
@baswarajdadge5050
@baswarajdadge5050 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर व संवेदनशील कवीता व त्याबरोबरच तुमचे सादरीकरण ही तेवढेच महत्त्वाचे आणी खुप छान भावपूर्ण होते. खुप खुप खुप खुप खुप खुप आवडले खरेतर ही पुर्ण कविताचे सादरीकरण नक्कीच आवडेल ... प्लीज पहा जमते का? तुमचे काव्य वाचनाची आवड खुप भावली व तुमच्यामुळेच माझी पण कवितेत ली रुची वाढायला लागली.. 👌👍❤️
@swatigokhale1302
@swatigokhale1302 4 ай бұрын
अतिशय सुंदर सादर केलीत , स्पृहा ताई तुम्ही ही कविता.आणि मनाला भिडली त्यातील अप्रतिम शब्दगुंफण.
@avinashdhobe7608
@avinashdhobe7608 9 ай бұрын
👍👍👏👏छान ..बाप लेकीच्या उत्कट प्रेमाचे शब्दचित्र..🙏🙏
@VijayPatil-vy7jc
@VijayPatil-vy7jc Ай бұрын
आम्हाला आठवीला ही कविता होती.मला चांगलेच आठवते,परब बाईंनी सांगितलेल्या कवितेचा अर्थ ऐकून वर्गातल्या साठ टक्के मुलांच्या डोळ्यातून पाणी आले होते. किती सुंदर होते त्यावेळचे दिवस. क्षणार्धात शाळेतील बालपण आठवले.😊
@sujatamokal3982
@sujatamokal3982 2 жыл бұрын
Khup sunder! Man helavun taknari ani mazya athvanitli ani mala avadnari Kavita vachlis! Khupach Chan vatle,tya junya shaletil ayushhyat ramle! God Bless You !
@arunabhide3441
@arunabhide3441 2 жыл бұрын
अंगावर काटा आला, अप्रतिम सादरीकरण एका अप्रतिम कवितेचे
@rashmipadture5019
@rashmipadture5019 2 жыл бұрын
माझी पण खूप आवडती कविता.माझे बाबा सुद्धा पूर्ण कविता म्हणायचे.आणि त्यांचे डोळे डबडबलेले असायचे.त्या वयात त्याचा अर्थ कळला नाही. मोठं झाल्यावर मात्र कविता म्हणताना मी पण रडले अगदी हमसून हमसून
@Ratnakar1962
@Ratnakar1962 2 жыл бұрын
Same here
@ajaykulkarni7011
@ajaykulkarni7011 2 жыл бұрын
जुन्या आठवणींसह माझे वडील मला आठवुन गेलेत. धन्यवाद .
@sushamasane8913
@sushamasane8913 2 жыл бұрын
@@Ratnakar1962 . ..हह हहह.
@avinashkulkarni3335
@avinashkulkarni3335 2 жыл бұрын
धन्यवाद स्पुहा।maazhi कन्या कविता खुप आवडीची आहे।अनेक वेळा dolyatun पाणी येते gatana।सदर छान kele न radataana। कमाल तुझी। सादर करणे कविता kevhadhe है kraerv
@avinashkulkarni3335
@avinashkulkarni3335 2 жыл бұрын
मातीत ते विखरले अति रम्य पंख।केले वरी uadar padur निष्कलंक।चंचु tashish च उगड़ी।
@shubhangidegaonkar3974
@shubhangidegaonkar3974 5 ай бұрын
खुप सुंदर कविता आहे.आणि तुम्ही ती गायली ही छान.शाळेची आठवण झाली आणि कविता शिकवलेल्या सरांची ही आठवण झाली.धन्यवाद स्पृहा .
@magicalmeera7138
@magicalmeera7138 2 жыл бұрын
फारच सुंदर व मन हेलावून टाकणारी कविता आहे
@tanujajoshi516
@tanujajoshi516 2 жыл бұрын
खूप छान कविता, वाचन पण सुंदर... "आई" कविता ऐकायला आवडेल
@chitranjanchaure2925
@chitranjanchaure2925 7 ай бұрын
अतिशय सुंदर रचना.कवितेचे सादरीकरण ही अप्रतिम.
@lonelyalien4412
@lonelyalien4412 11 ай бұрын
स्प्रुहा तुला कशाची उपमा द्यावी कळत नाही तू कशातच कमी नाही .तुझ्या कला धीटपणाचे कौतुक आहे धन्यवाद
@madhavkarewad5719
@madhavkarewad5719 Жыл бұрын
अतिशय सुरेख कविता आम्हाला होती टचकण डोळ्यात पाणी आले
@ashadharaskar663
@ashadharaskar663 2 жыл бұрын
Khupach sunder Kavita. Sadarikaran pan uttam.
@deepakkorwar2048
@deepakkorwar2048 2 жыл бұрын
खूप कविता . माझ्या लहानपणी वर्गातील सगळ्या मुली हमसून रडल्या होत्या !सुंदर सादरीकरण!
@sunitaubhe834
@sunitaubhe834 Жыл бұрын
Khup chan. Amhala shalet 4th or 5th la hoti hi kavita. Aani ashich aamhi wargat mhanaycho eka sura madhe..❤ Khup sunder kavita
@rangkiran8563
@rangkiran8563 2 жыл бұрын
अप्रतिम , जुना काळ आठवला , हृदय हेलावलं , ह्याच चालित म्णायचो आम्ही , एकदा पुढील कविता ऐकवाल ? मनी धीर धरी... शोक आवरी जननी , भेटेन नऊ महिन्यांनी ( भगत सिहं आईला म्हणत आहे )
@ShubhangiBhusare-dz1fx
@ShubhangiBhusare-dz1fx 3 ай бұрын
ऐकून डोळ्यात पाणी आल दीदी .....खूप छान कविता आहे आणी तुझ सादरीकरण नेहमीच अप्रतिम !.... खूप गोड ❤ तुझ्या मुळे मनातली कवितेविषयीची ओढ टिकून आहे thank you 🎉❤
@prabhachauthe235
@prabhachauthe235 11 ай бұрын
स्पृहा, तुझं कृतार्थ इथलं येणं! तुझे कविता वाचन मनाला स्पर्शून जाते ग... शब्द न शब्द अर्थ उकलून जातो.. अशीच नित्य वाचनातून कविता ऐकवित रहा!... कवी कल्पना साकार करण्याची ताकद तुझ्या आवाजात आहे!
@piranpatil9698
@piranpatil9698 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही कविता अगदी मन भरून येत आणि भूतकाळात रमल्यासारखे वाटते
@GautamMangase
@GautamMangase 4 ай бұрын
आदरणीय मॅडम कवितेचे अतिशय प्रभावीपणे वाचन केले, की कवितेच्या वाचनावरून कवितेचा अर्थ समजतो अशी ही कविता भावस्पर्शी हृदयस्पर्शी मनाला भावलेली कविता. पुढील भागात कवितेच्या एकेक ओळीचा भावार्थ समजून सांगणे विनंती. धन्यवाद.
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 2 жыл бұрын
Hrudaysprshi bol,Kavita.Om shanti.🙏
@dp9500
@dp9500 Жыл бұрын
खूपच छान कविता स्पृहा मॅम ,अप्रतिम, सुंदर .👌👌👌🙏🙏👍
@rameshneve3356
@rameshneve3356 Жыл бұрын
स्पृहा तुला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तु सादर केलेली कविता आम्हाला शाळेत असताना अभ्यासाला होती. अतिशय एका गरीब वडिलांना पोरी कडे पाहून सुचलेले शब्दांकित कवीने केले आहेत. त्यांना सप्रेम साष्टांग नमस्कार. आणि तु हे चालु केलेली ही साईट मला मनापासून आवडले. धन्यवाद
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 2 жыл бұрын
खूप भावपूर्ण व छान , जुनी अविस्मरणीय अशी कविता. छान सादर केली.आता अशा सुंदर अर्थपूर्ण कविता शालेय कार्यक्रमातून गायब झाल्यात की केल्या आहेत. त्याचे वैषम्य वाटते भावी पिढी या ह्या साहित्या पासुन वंचित रहात आहे.
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 2 жыл бұрын
शालेय पाठ्यपुस्तकातुन
@learn_share_apply
@learn_share_apply Жыл бұрын
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती. तेंव्हाच माझ्या शिक्षकांनी ती कविता खूप छान समजावून सांगितली होती. शिवाय आमची परिस्थिती अशी होती की गरिबी काय हे कोणी समजावून सांगायची गरज नव्हती. त्यामुळेच आज सुध्धा ही कविता वाचली की डोळे भरून येतात. त्या सर्व आठवणी आज परत आल्या. धन्यवाद.
@chhayadongre409
@chhayadongre409 2 жыл бұрын
Khup chhan ani mazi aavadti kavita.aajavi purn path aahe
@swatijawale5960
@swatijawale5960 Жыл бұрын
अप्रतिम kavita ani spruha che sadarikaran....aikat rahavishi vatate👍👌👌
@sulabhaborhade9443
@sulabhaborhade9443 2 жыл бұрын
खूप छान,शाळेचे दिवस आठवले, धन्यवाद .🙏
@jaishreejoshi9916
@jaishreejoshi9916 10 ай бұрын
खूप सुरेख कविता व सादरीकरण दोनही❤❤
@pandhrinathpatil2083
@pandhrinathpatil2083 2 жыл бұрын
Dhanya te kavi bee .Namaskaar .🙏om Shanti.🙏
@rohinipatil8969
@rohinipatil8969 2 жыл бұрын
बालमनात रुजलेली हृदयस्पर्शी आवडीची कविता,माझे गोकाक कर सर यांनी इतकी छान शिकवली होती ,त्यांची आठवण झाली.वडिलांची आठवन तर शब्दात सांगता येत नाही,ते एक शिक्षक,मोठ्या घराण्यात मी लग्न होऊन आले, आपल्या मुलींना गरीबाची म्हणून हिणवलं जाऊ नये असं त्यांना खूप वाटायचं🙏🏻
@vaijayantikulkarni5215
@vaijayantikulkarni5215 2 жыл бұрын
कवीता ऐकताना डोळ्यातुन पाणी थांबतच नव्हते ताई खुप छान आवाज आहे तुमचा 👌👌
@vibhagirkar3978
@vibhagirkar3978 Жыл бұрын
खूपच छान स्पृहा राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या ही कविता म्हण
@manjiripatankar-panditrao185
@manjiripatankar-panditrao185 2 жыл бұрын
Khoop sundar kavita.....kadhitari aaichya tondun aikali hoti....kavita vachan as usual apratim....samor baap lek oobhe rahile......
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 Жыл бұрын
खुप छान ! कृतकृत्यते तुझं नाव स्पृहा ! फार फार आभारी !
@vilasdadhe5841
@vilasdadhe5841 Жыл бұрын
खूप छान
@nilimagune8086
@nilimagune8086 6 ай бұрын
अप्रतिम..गाई पाण्यावर आल्या तुमच्या सादरीकरणामुळे.. वडिलांविषयी च्या अनेक आठवणींनी मनाला साद घातली.
@alkapuranik8
@alkapuranik8 2 жыл бұрын
स्पृहा तू वाचलेल्या सर्व कविता मला फार आवडतात. ही कविता ऐकताना मला माझ्या वडिलांची खूपखूप आठवण झाली.आणि बेताची परिस्थिती असल्यावर मुलांनी छोटासा हट्ट केला आणि तो आई वडिलांना पुरवता आला नाही की त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल हे मला आत्ता कळते आहे त्या बद्दल तुला धन्यवाद.आणि खूप सार्या शुभेच्छा.
@shekharshende5739
@shekharshende5739 2 жыл бұрын
नमस्कार. सादरीकरण नेहमी प्रमाणे अप्रतिम.
@supriyakamat3504
@supriyakamat3504 Жыл бұрын
हि कविता जेंव्हा जेंव्हा मी ऐकते किंवा वाचते तेंव्हा ती नेहमीच माझ्या डोळ्यात पाणी आणते.. खूपच सुंदर आहे
@anjalipendharkar6427
@anjalipendharkar6427 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण स्प्रुहाजी! ही कविता आम्हांला लहानपणी अभ्यासाला होती. आजही ती ऐकताना डोळे आणि कंठ अगदी भरून आले. छान उपक्रम आहे.त्याकरिता तुमचे कॊतुक व तुम्हांला हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद!
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 2 жыл бұрын
मला ही कविता होतो .खूप आवडायची सरांनी कवितेचा अर्थ सांगितला त्यावेळी खूप वाईट वाटले .
@satishdeshpande9443
@satishdeshpande9443 2 жыл бұрын
किती सुंदर सादरीकरण एकदम सातवी/आठवी च्या वर्गात घेऊन गेली। धन्यवाद .खुप खुप धन्यवाद.
@surekhakimbhune7753
@surekhakimbhune7753 2 жыл бұрын
Khup chhan sadarikaran . mazya aai hi kavita mhante tichya kadun mi hi pahilyanda aikali, aapan hi tyach sumadhur chalit aikvalit khup aabhar
@vrindamutalikdesai3766
@vrindamutalikdesai3766 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे ही कविता. खूप अर्थपूर्ण आणि मनमोहक. डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. ही कविता मुळातच खूप छान आहे आणि त्यात तुमचे सादरीकरण इतकं सुंदर आहे की परत परत ऐकावेसे वाटते. मला *शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट* ही कविता तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल. मी यशश्री जोशी ( लग्नापूर्वी ) आणि लग्नानंतर आता Vrinda Desai, बेळगावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@Sumangal8523
@Sumangal8523 Жыл бұрын
शाळेत असताना जितकी कविता समजली,उमजली, नाही ती आत्ता मुलीचा बाप असल्यावर उमजली. या कवितेला काळाची मर्यादाच नाही.अतिशय आशयपूर्ण कविता. तसेच वाचन ही फारच सुंदर. शाळेत शिकत असताना धडे, कविता म्हणजे फक्त अभ्यास,व परीक्षा हेच डोक्यात असते त्यामुळे अशा सुंदर आशयघन कवितांचा खरा आनंद घेताच येत नाही. शिक्षकांनी सुध्दा कविता शिकवताना आभ्यासा पलीकडे जाऊन शिकवले पाहिजे असे आता वाटते.❤❤❤❤❤❤
@shrutipatki3952
@shrutipatki3952 2 жыл бұрын
खूप छान सादर केली कविता तुम्ही. डोळ्यात पाणी आले ऐकतांना .
@neetagawhankar6914
@neetagawhankar6914 Жыл бұрын
आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकात आम्ही शिकलो.तेव्हा चाल आवडली,गाता यायची म्हणून ही कविता आवडायची.मोठे झाल्यावर त्यातील अर्थ कळतो आणि डोळे पाणावतात.माझ्या गोरटीला म्हटले की अख्खा वर्ग माझ्या कडे वळून पाहायचा माझं माहेरचे आडनाव गोरटे.पूर्ण कविता खाली दिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
@meenakshimahajan1603
@meenakshimahajan1603 8 ай бұрын
खूप सुंदर सादर केलीस तू कविता ! स्पृहा खूपच भावस्पर्शी आवाजात .
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 6 ай бұрын
अप्रतिम कविता, आणि सादरीकरण चाल, उच्चार,(उत्तम)🎉👌👍
@nishaantarkar1171
@nishaantarkar1171 2 жыл бұрын
खूप छान सादर केलीस ही कविता... मलाही खूप आवडते ही कविता
@hemakatarni6787
@hemakatarni6787 Жыл бұрын
माझ्या लहानपणी ही कविता शाळेत आम्हाला होती. मी माझ्या मुलींना त्यांच्या लहानपणी म्हणायचे आणि आता नातीलाही . तुझ्यामुळे आमच्या .(आजी-आजोबा) जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खुप छान. धन्यवाद.
@dineshkulkarni6898
@dineshkulkarni6898 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद स्पृहा ही कविता माझ्या हृदयाच्या अतीशय जवळची आहे आणि ती पण माझ्या अतीशय आवडत्या व्यक्तीकडून रसग्रहणा सहीत ऐकायला मिळाली व्वा क्या बात है
@aditisalvi9935
@aditisalvi9935 2 жыл бұрын
खुप सुंदर कविता...आणि तु तर खुप छान गाऊन त्या कवितेच्या भावना आमच्यापर्यंत पोहचवल्या.
@varshakulkarni6263
@varshakulkarni6263 Жыл бұрын
स्पृहा…..माझी सगळयात आवडती कविता तुझं सादरीकरण सुंदर खूप खूप धन्यवाद🌹🌹
@nivruttichaudhari735
@nivruttichaudhari735 2 жыл бұрын
मी प्राथमिक शिक्षण घेत असताना आम्हाला चौथीला अभ्यासाला होती ही कविता. तेव्हा पाठ होती, आज काहीच आठवत नाही, स्पृहा उच्चार अप्रतिम वाचन शैली वेगळी ओळख देऊन गेली. फारच आनंद झाला.
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम स्पृहा ताई आम्हाला फार आवडली
@aartithakurdesai2998
@aartithakurdesai2998 11 ай бұрын
माझी फार आवडती कविता. खूप सुंदर लिहीलेली आहे. धन्यवाद तू ऐकवलीस. अशी च आणखी एक कविता आहे.ती जरूर ऐकवा. कविता आहे " बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून. पुन्हा एकदा धन्यवाद
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 2 жыл бұрын
स्पृहा जोशी तुम्ही कविता खूप छान सादर केली. आम्हाला 7 वीच्या पाठयपुस्तकात ही कविता अभ्यासाला होती. त्यावेळी आम्हाला आमच्या शिक्षकांनी ही कविता तुम्ही जशी सादर केली त्याच पद्धतीने सादर केली होती. सलाम तुम्हाला!
@gaurishtamhane3516
@gaurishtamhane3516 2 жыл бұрын
आम्हाला शाळेत होति हि कविता. आणि माझ्या आजोबांची अतिशय आवडती कविता. कृपया व्याकरणातील चुका असल्यास क्षमस्व 🙏🙏
@swatidorge7133
@swatidorge7133 2 жыл бұрын
thank you @स्पृहा माझे आजोबा म्हणायचे ही कविता ते जावून खूप वर्षे झाली पण कविता काल ऐकल्यासारखी वाटली या झोपडीत माझ्या ऐकायला आवडेल धन्यवाद
@manishamehendale4348
@manishamehendale4348 Жыл бұрын
उत्तम सादरीकरण & समजावून सांगण्याची पध्दत.👌 कविता.
@madhavipatil9368
@madhavipatil9368 Жыл бұрын
माझे आजोबा आणि बाबा नेहमी हि कविता आम्हाला म्हणून दाखवायचे, आज दोघेही नाहीत, पण तुझ्यामुळे पुन्हा त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या, सुंदर कविता आणि सादरीकरण ताई
@yoginikhandekar5227
@yoginikhandekar5227 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, माझी आई म्हणते ही कविता, किती अर्थ आहे ह्यात, डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही
@swapnaraich6587
@swapnaraich6587 2 жыл бұрын
फारच सुंदर कविता, लहानपणीची शाळेतली कविता ऐकून एकदम लहान झाल्यासारखे वाटले. फार सुंदर सादर केलीस.
@anildeshpande17
@anildeshpande17 2 жыл бұрын
आवडल. फार जुनी कविता. धन्यवाद.
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Жыл бұрын
हि कविता माझ्या खुप जवळची आणि आवडती आहे कारण माझी एक वर्षांची नातं हि कविता आयकत रोज झोपते खुप खुप धन्यवाद
@CKPRecipesbySushamaDeshpande
@CKPRecipesbySushamaDeshpande 2 жыл бұрын
सुंदर कविता माझ्या आईची अतिशय आवडती कविता वयाच्या ९६वर्षापर्यंत ती ह्या कवितेची ओळ म्हटली कि ती म्हणायची .
@pravinbaikar5468
@pravinbaikar5468 2 жыл бұрын
सुंदर, पथ्यक्रमातील कुमार भारती मध्ये होती, खूप प्रेम. धन्यवाद 🙏
@nalinideokar6744
@nalinideokar6744 Жыл бұрын
धन्यवाद ही कविता ऐकवलया बदल. लहानपणीचया आठवणी जागया झालाय
@kshamagore105
@kshamagore105 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आहे.माझी अतीशय आवडती कविता होती आणी आहे.
@arunathosar5263
@arunathosar5263 2 жыл бұрын
ही कविता तू स्पृहा गाईलीस तितकीच पाठ्यपुस्तकात होतीकारण मी शिकवली आहे ,पाठ होतीच ,मुलीचे भावविश्व बाबा व बाबांचेही मुलगी ,शिकवताना सुध्दा गळा दाटून यायचा.याची चाल हिच आहे ,गुणगणण्याची ,खुप छान.
@mayavatilokhande2021
@mayavatilokhande2021 2 жыл бұрын
शालेय अभ्यासक्रमात फक्त 4-5कडवी होती पण आज संपूर्ण कविता वाचायला मिळाली खूप खूप धन्यवाद.
द्वारका | Prabha Ganorkar | Spruha Joshi Poems
6:55
Spruha Joshi
Рет қаралды 67 М.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН