१८ एकर जमीन वडील मयत झालेने त्यांचें एकूण ५मुल वारस म्हणून नोंद आहे.सर्वाची तोंडी वाटणी वहिवाट ४५-५०वर्षापासुन वडील जिवंत असताना आहे, ५पैकीं एक ते चार वारस मयत झालेने त्यांचेंपण वारसांची नोंद झाली आहे. मयत नं १चे वारसांनी नं २ च्या वारसांच्या हिस्याच्या जमिनीतील साडेचार एकर ऊस पीक कारखान्यास गाळपासाठी पाठविताना आडवून बेकायदेशीर नुकसान केले आहे.त्यावेळी त्यांनी आमचे बरोबर मारामारी केलेली होती, त्यांचे शेतातून जाणारी आमच्या पीव्हीसी पाईपलाइनी फोडल्या आहेत, आमच्या शेतात आमचे पैकी कोणीही गेले तर ते भांडण करण्याचा प्रयत्न करतात, दोन वर्षांपासून आमची जमीन पडीक असुन त्यांची जनावरे सोडून, बांधून चारतात. सुमारे ६००फूट लांबीचा बांध ५ते६ फुट रुंदीने फोडला आहे.यावर "कायदेशीर उपाय" काय आहे?